Wikipedia

Search results

Saturday 30 March 2013

मुंबई विद्यापीठ University of Mumbai



मुंबई विद्यापीठ
University of Mumbai logo
ब्रीदवाक्य शीलवृतफला विद्या
स्थापना जुलै १८, इ.स. १८५७
कुलपती महाराष्ट्राचे राज्यपाल
ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
परिसर सांताक्रूझ
नियंत्रक नॅक, यु.जी.सी.
संकेतस्थळ mu.ac.in

मुंबई विद्यापीठ हे भारतातील विद्यापीठांपैकी एक जुने आणि प्रमुख विद्यापीठ आहे. "वुड्स शैक्षणिक योजने" अंतर्गत मुंबई विद्यापीठची स्थापना सन १८५७ मध्ये झाली आणि भारतातील प्रथम तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मिळवला.
         "बाँम्बे" शहराचे "मुंबई" असे नामकरण झाल्यामुळे विद्यापीठाचे नाव "बाँम्बे विद्यापीठ" ऎवजी "मुंबई विद्यापीठ" असे झाले; सदर अधिसूचना ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र सरकार द्वारा लागू केलेल्या राजपत्रात प्रकाशित झाली.
 
इतिहास
चार्ल्स वुडच्या इ.स. १८५४च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार जॉन विल्सन यांनी १८५७ साली या विद्यापीठाची स्थापना केली. मुंबईमधील सेंट झेव्हियर्स महाविद्यालय इ.स. १८६८ साली या विद्यापीठाखाली आले. सुरुवातीला एलफिन्स्टन महाविद्यालयाची इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती. सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे म्हणून ओळखले जात होते. इ.स. १९९६ साली शासनाच्या निर्णयानुसार या विद्यापीठाला मुंबई विद्यापीठ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. मुंबईबरोबरच ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबईच्या सांताक्रूझ विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो.
               इ.स. २०१० साली नॅककडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागतो.[१] अनेक नामांकित महाविद्यालये व वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च(TIFR) सारख्या शैक्षणिक संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
ग्रंथालय - विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय असून त्याला जवाहरलाल नेहरू ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू
    जॉन विल्सन.,    सर रेमंड वेस्ट,  सर अलेक्झांडर ग्रांट.
    विल्यम गायर. (इ.स. १८६९),    न्यायमूर्ती काशिनाथ त्रिंबक तेलंग. (इ.स. १८९२ ते इ.स. १८९३),    रामकृष्ण गोपाळ भांडारकर. (इ.स. १८९३ ते इ.स. १८९४.,   रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे.,   महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे.,    डॉ. जॉन मथाई. (इ.स. १९५५ ते इ.स. १९५७),    डॉ. स्नेहलता देशमुख. (इ.स. २०००), डॉ. भालचंद्र मुणगेकर. (इ.स. २००० ते इ.स. २००५),    डॉ. विजय खोले. (इ.स. २००५ ते इ.स. २००९).   डॉ. राजन वेलूकर. (इ.स. २०१०) (आजी)
मुख्य इमारत
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा राजाबाई टॉवर आहे. लंडनमधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम इ.स. १८७० साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.

मुंबई विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने सिद्ध झालेला "मुंबई विद्यापीठ, शहराचे भूषण' हा देखणा व भव्य ग्रंथ म्हणजे या विद्यापीठाच्या सोनेरी इतिहासाचा संग्राह्य व डोळस मागोवा घेण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. इंग्रजी व मराठी या दोन भाषांत हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
विद्यापीठांची स्थापना होणे हे भारताने आधुनिक जगात टाकलेले पहिले पाऊल होते. पहिल्या तिन्ही विद्यापीठांची आज शैक्षणिक क्षेत्रातील भरारी पाहिली तर महासत्ता होणार्‍या आपल्या देशाच्या महत्त्वाकांक्षेची पायाभरणी करण्यात शिक्षण संस्था किती महत्त्वाच्या ठरतात, हे दिसून येते. कोलकता विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठाचे एका अर्थाने थोरले भावंडं! कोलकता विद्यापीठाने बंकिमचंद्र चॅटर्जींसारखे रत्न देशाला दिले. मुंबई विद्यापीठ तर त्यादृष्टीने प्रचंड समृद्ध आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, न्या. रानडे, डॉ. भांडारकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, रा. धों. कर्वे यांसारख्या विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा निर्माण केली. विद्यापीठाच्या सार्वकालीन प्रगतीच्या खुणा अधोरेखित करणार्‍या या ग्रंथातील लेख हाही स्वतंत्र लेखाचाच विषय ठरावा. वसंत आबाजी डहाके, अमृत गंगर यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच्या मुंबईतील शैक्षणिक परिस्थितीचा अत्यंत अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. अमेरिकन मराठी मिशनने १८१५ मध्ये मुंबईत पहिली शाळा सुरू केली तेव्हापासूनचा हा इतिहास आहे. राजाबाई टॉवर, ग्रंथालय व पदवीदान सभागृह या विद्यापीठाच्या देखण्या इमारती बांधण्यासाठी त्यांनी त्या काळी लक्षावधींच्या देणग्या दिल्या, त्या सर कावसजी जहॉंगीर रेडिमनी व प्रेमचंद रायचंद यांच्या आठवणीही यानिमित्ताने ताज्या होतात.
या इमारतींची वास्तुरचना जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट या जगद्विख्यात वास्तुविशारदाच्या डिझाईन्सवर आधारित आहे. या सर्वच वास्तूंचे विवेचन विकास दिलावरी यांनी केले आहे. पुनरुज्जीवित गॉथिक शैलीतील या इमारतींमधील दगडातील व लाकडातील कोरीवकाम, छप्पर, टाइल्स, चित्रकाच या सर्वांचा सुरेख वेध दिलावरी यांनी घेतला आहे. पूर्व-पश्चिम अशा दिशांना बांधलेल्या या इमारती बांधताना स्कॉट यांनी उष्ण कटिबंधातील हवामान, युरोपातली विद्यापीठे आणि सामाजिक वास्तुकला यांचेही संदर्भ विचारात घेतले होते. या शिवाय विद्यापीठ परिसरातील वृक्षवल्लींवरील प्रशांत मोरे यांचा, तर दुर्मिळ कागदपत्रांवर विजय तापस आणि वर्षा माळोदे यांचा अभ्यासपूर्ण लेखही यात आहे.
मुंबईच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जीवनाचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना अर्पण केलेल्या या ग्रंथाची संकल्पना प्रकाश विश्वासराव व छायाचित्रे संदेश भंडारे यांची आहेत. विद्यापीठाची देखणी छायाचित्रे हे या ग्रंथाचे एक सामर्थ्य आहे. या छायाचित्रांतून विद्यापीठाचा कोपरान कोपरा जिवंत झाला आहे. ही छायाचित्रेच आपल्याशी बोलतात! हा एकूणच ग्रंथ संग्राह्य करण्यात या छायाचित्रांचा फार मोठा वाटा आहे. कुलगुरू डॉ. विजय खोले यांचे अभ्यासपूर्ण निवेदन यात आहे.

भारतातील मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे, जिथे लोककलांचा एक वर्षांचा पूर्ण वेळ शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम सुरू झालाय. मुंबई फेस्टिव्हल, अ. भा. मराठी नाटय़संमेलन, नवरत्न पुरस्कार, सरस महोत्सव, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली लावणी महोत्सव, रंगपरंपरा महोत्सव, शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे तमाशा प्रशिक्षण शिबीर, तसेच दशावतार शिबीर आणि पहिले लोककला संमेलन रवींद्र नाटय़मंदिर आणि दुसरे लोककला संमेलन कऱ्हाड येथे झाले. याद्वारे आपल्या कलागुणांची चुणूक दाखविण्यासाठी लोककला अकादमीद्वारे विद्यार्थ्यांना मुंबई, तसेच राज्यस्तरीय व्यासपीठ गेल्या चार वर्षांपासून लाभले.
                सलग सातव्या वर्षी ‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले. हा महोत्सव कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात  दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ८५ गुण पटकावत मुंबई विद्यापीठाच्या अष्टपैलू संघाने सलग सातव्यांदा सर्वसाधारण जेतेपदाचा ‘राधाबाई वसंतराव रांगणेकर चषक’ पटकावत जणू काही या इंद्रधनुष्यावर आपले सप्तरंगच उधळले. तर मुंबई विद्यापाठोपाठ मुंबईच्याच एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाने ५३ गुण मिळवत महाराष्ट्रातील या २० विद्यापीठांच्या कुंभमेळ्यामध्ये उपविजेतेपदाचा मान मिळवला.

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे भूमिपुजन


अनेक दिवस रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे येथील उपकेंद्राच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडून औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र ठाण्यात व्हावे, यासाठी ठाण्याचे महापौर असताना राजन विचारे यांनी बाळकूम येथील जागा उपकेंद्रासाठी मिळवून दिली होती. मात्र नंतरच्या दोन अडीच वर्षात उपकेंद्राचे काम सुरु होऊ शकले नाही. ठाणे जिह्यातील सर्व मुलांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला विद्यापीठात जावे लागते, यात विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यासाठी ठाणे येथे उपकेंद्र सुरु करावे या मागणीकडे आमदार राजन विचारे यांनी लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येऊन अधिवेशन संपल्यावर तातडीने दुसऱयाच दिवशी 24 डिसेंबर रोजी मंत्रालयात ठाण्याच्या उपकेंद्राबाबत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मंत्री राजेश टोपेसह आमदार राजन विचारे मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. के. वेंकटरामानी तसेच एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. चंद्रा कृष्णमूर्ती आदी उपस्थित होते. आदि उपस्थित होते. ठाणे उपकेंद्राचे काम महिनाभरात सुरु करण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी बैठकीत दिले.

दरवर्षीच वाढणारी महाविद्यालये आणि कमी होत चाललेले कर्मचाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढला आहे.
विद्यापीठाच्या कोणत्याही विभागात गेल्यानंतर एकाच अधिकाऱ्याकडे एकापेक्षा जास्त पदांचा कारभार आणि त्याच्या सोबतीला असलेल्या कर्मचाऱ्यांकडे भरमसाठ काम यामुळे विद्यापीठातील अंतर्गत कामकाजाचा प्रचंड ताण कर्मचाऱ्यांवर पडतो आहे. संशोधन, परीक्षा घेणे आणि निकाल लावणे ही कामे विद्यापीठात प्राधान्याने केली जातात. दररोज १० ते १२ तास कामामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेळोपत्रक कोलमडून पडले आहे. शिवाय विद्यापीठ एकूण सात ठिकाणी विखुरलेले असल्याने एखाद्या छोटय़ा कामासाठीही बराच वेळ लागणे आणि कामे लांबणीवर पडणे ही बाब तेथे सर्रास घडताना दिसते. विद्यापीठामध्ये जे कर्मचारी निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया नसल्याने एकाच अधिकाऱ्याकडे विविध पदांची कामे एकवटल्याने अशा अधिकाऱ्यांना ‘हायपर टेंशन’, रक्तदाब वाढणे, हृदयविकार, मधुमेहासारखे आजार जडले आहेत.

एकेकाळी मुंबई विद्यापीठाची जगभर प्रतिष्ठा व नाव होते. आता त्यातले काहीच उरले नाही. उलट अनेक कारस्थानी कुलगुरूंमुळे ही प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. एवढेच नाही, तर विद्यापीठाचा सारा कारभार दिरंगाई आणि द्वेषाने भरलेला आहे. विद्याथीर् आणि पालकांना तर कोणी वालीच नाही. ही स्थिती कोणी बदलू शकेल?
विद्यापीठाचे नियम प्रत्येक सत्रासाठी बदलत असतात, त्यामुळे मोर्चा, रॅली अटेंड करणे हा सर्वांसाठी कॉमन टाईमपास आहे.
२. परीक्षेचे वेळापत्रक कधीच नियमित नसते. हे कदाचित ऐकण्यास नवीन नसावे, परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर देखिल पुढे ढकलल्या जातात! सर्वात वाईट दृश्य म्हणजे परीक्षा प्रिपोन (वेळेअगोदर होण्याचे) होण्याचे.
३. मुंबई विद्यापीठात कोणालाच एखाद्या विषयाचा एखाद्या शाखेसाठी असलेला निश्चित पाठ्यक्रम माहीत नसतो. विद्यार्थी अंधारात तीर मारल्यासारखे कोचिंग क्लासने दिलेल्या अथवा सीनिअर विद्यार्थ्याच्या नोटस् वापरत असतात.
जरी नियमानुसार विद्यापीठाने परीक्षा उरकल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावयाचा असला तरी, एकही निकाल वेळेवर लागत नाही..... जवळपास सर्वच निकाल तीन महिन्यांनंतरच लागतात! इतर विद्यापीठाचे बी. ई. चे विद्यार्थी जॉब मिळवत असतात तेव्हा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी निकालाची वाट बघत असतात.
              विद्यापीठाचे अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या संघटना या विद्यापीठाच्या विकासासाठी झटत नाहीत. अन्यायग्रस्त विद्याथीर्, त्यांचे पालक, कर्मचारी व शिक्षक यांना विद्यापीठात कोणीही वाली नाही. अभ्यासक्रम किंवा प्रशासनाबद्दल 'ब्र'ही न काढणारे प्राचार्य स्वत:ची वणीर् निरनिराळ्या समित्यांवर जाण्यासाठी तसेच कुलगुरूंच्या मजीर्त जाण्यासाठी धडपडत असतात. कोणत्याही विषयाची सविस्तर माहिती न घेता, सखोल अभ्यास न करता टिपणी करण्यात पटाईत असणारे प्राचार्य सर्वांनाच माहीत आहेत.
त्यातच बऱ्याच काळापासून हे विद्यापीठ कुलगुरूंविनाच आपला गाडा कसाबसा हाकत आहे. विद्यापीठाच्या आजवरच्या प्रतिष्ठेस विद्यापीठाला वेळोवेळी लाभलेले महान कुलगुरू आणि त्यांचे कार्य हेच कारणीभूत ठरल्याचे सर्वश्रुत आहे. अर्थात, अलीकडल्या काळात गुणवत्ता नसणारेही काही कुलगुरू विद्यापीठात केवळ राजकीय आधाराच्या जोरावर येऊन गेले आणि त्यांच्या कटकारस्थानांमुळेच विद्यापीठ बदनाम झाले. तरीही सध्याची कुलगुरू निवडीबाबत सुरू असलेली दिरंगाई ही आपल्याला शोभणारी बाब नाही. कारणे काहीही असोत; परंतु डॉ. विजय खोले यांची मुदत २८ सप्टेंबर, २००९ रोजी संपणार हे सर्वांना माहीत होते. कारण कुलगुरूंची निवड ही विशिष्ट कालावधीची असते, हे माहीत असूनही त्या दिवशी नवीन कुलगुरू आले नाहीत. कुलगुरू निवडण्यासाठी जी शोधसमिती स्थापली, तीच खऱ्या अर्थाने बेकायदा ठरली. असे का झाले? याचे उत्तर तत्कालीन कुलगुरूंना चांगलेच ठाऊक होते.

No comments:

Post a Comment