Wikipedia

Search results

Tuesday 10 December 2013

भारतातील दुग्धव्यवसाय



भारतातील दुग्धव्यवसाय : दूध व त्यापासून तयार केलेले पदार्थ भारतामध्ये प्राचीन काळापासून जरी वापरण्यात असले, तरी दुग्धव्यवसाय मात्र बऱ्याच प्रमाणात विस्कळित व कौटुंबिक पातळीवरच चालत असे. त्याला व्यवसायाचे स्वरूप फारसे नव्हते. पावसावर अवलंबून असलेली शेती करणारे बहुसंख्य लोक मुख्यत्वे शेतकामासाठी लागणाऱ्या बैलांच्या निपजीसाठी गायी आणि स्वत:ची दुधाची गरज भागविण्यासाठी एकदोन म्हशी पाळत असत. दुग्धोत्पादन व दुग्धव्यवसाय हा त्यांचा दुय्यम हेतू असे. हेच लोक भारतातील प्रमुख दुग्धोत्पादक होते व अद्यापही आहेत. वर्षातील काही महिनेच उपलब्ध होणारा अपुरा चारा व अपुरा खुराक यांमुळे दूध देणारी जनावरे निकृष्ट प्रतीची राहिली. त्यातल्या त्यात गीर, शाहिवाल, सिंधी, थरपारकर, हरियाणा, ओंगोल, कांक्रेज या गायींच्या [→ गाय] आणि निलीराबी, मुरा, म्हैसाणा, जाफराबादी या म्हशींच्या जातती [→ म्हैस] दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. गायी व म्हशींच्या एकूण संख्येपैकी म्हशींची संख्या अवघी ३०% आहे. तथापि एकूण दुग्धोत्पादनापैकी ५३% दूध म्हशींचे आहे. १९७० मध्ये भारतातील दुग्धोत्पादन २ कोटी १३ लाख टन इतके झाले. यातील ९५ लाख टन गायींचे, १ कोटी १२ लाख टन म्हशींचे व ५ लाख टन शेळ्यांचे होते. १९७३–७४ मध्ये दुग्धोत्पादन २ कोटी ३० लाख टन झाले. सरासरीने एका म्हशीपासून एका दुग्धकालात ५४० लि., तर गायीपासून १७० लि. दूध मिळते. पंजाब, गुजरात, उ. प्रदेश व बिहार ही राज्ये दुग्धोत्पादनात आघाडीवर आहेत.

शहरांच्या लोकवस्तीत जशी वाढ होत गेली तसे ग्रामीण भागातील लोकांकडून दूध विकत घेऊन ते शहरी वस्तीला पुरवठा करणारे व्यापारी दुग्धव्यवसायात पडू लागले. हे आडते लोक दूध फारच कमी भावाने खरेदी करून त्यावर भरमसाठ नफा घेऊन शहरवासीयांना चढत्या भावाने विकू लागले. दुधाला मागणी वाढली व किंमतही चांगली मिळू लागली. तथापि यामुळे मूळ दुग्धोत्पादकाला मात्र योग्य किंमत मिळत नसे.
भारत हा खंडप्राय देश आहे. दळणवळणाची साधने फारशी उपलब्ध नसल्यामुळे व दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे या अडत्या लोकांनी रस्त्यापासून लांबवर असलेल्या खेड्यांतून दूध गाळा करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. परिणामी शहरांचा दुग्धपुरवठा फारच अपुरा पडू लागला. मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास यांसारख्या शहरांमध्ये काही लोक म्हशी पाळून दुग्धव्यवसाय करू लागले. हे लोक खेड्यापाड्यातून म्हशींची आयात करीत आणि त्या आटल्या म्हणजे शहरातील खाटिकखान्यात त्यांची रवानगी करीत. यामुळे देशातील दुधाळ म्हशींची संख्या कमी होऊ लागली.
खेड्यातून होणारा दुग्धपुरवठा मोसमी असे. पावसाळ्यात व हिवाळ्यात त्यात वाढ होई व उन्हाळ्यात घट होई. खाजगी क्षेत्राकडून होणारा हा दुग्धपुरवठा महागडा असे. पावसाळ्यात दुग्धोत्पादनाचे प्रमाण वाढल्यामुळे अडते लोक उतपादकाला कमी किंमत देत व वाढीव दुधापासून मलई, खवा इ. पदार्थ बनवीत; तर उन्हाळ्यात शहरातील ग्राहकाकडून भरमसाट किंमत घेत. अशा तऱ्हेने खाजगी क्षेत्राकडे दुग्धव्यवसायाचा एकाधिकार असावयाचा असे म्हटल्यास वावगे नाही.
भारतातील दुग्धव्यवसायातील परिवर्तन : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर (१९४७ नंतर) शहरांचे औद्योगिकीकरण झपाटयाने होत गेले व तेथील लोकवस्तीत भरमसाट वाढ झाली. भारतात १९७१ साली दहा लाखापेक्षा अधिक लोकवस्ती असलेली ९ शहरे होती. जवळजवळ ११ कोटी शहरवासीयांपैकी २ कोटी लोक मुंबई, मद्रास, दिल्ली व कलकत्ता या चार शहरांमध्ये राहतात. यामुळे शहरवासीयांची दुधाची मागणी १९६१–७१ या काळात ९३ टक्क्यांनी वाढली, तर दुग्धोत्पादनात अवघी २१% वाढ झाली. दूध थंड करून ते काही दिवस सुस्थितीत राहू शकते, या शास्त्रीय माहितीमुळे दुग्धव्यवसायात परिवर्तन करणे शक्य झाले. खाजगी क्षेत्रातील दुग्धपुरवठ्याचे प्रयत्न अपुरे पडू लागले. अशा वेळी सहकारी तत्त्वावर दुग्धोत्पादन व पुरवठा करणारी भारतातील पहिली सहकारी संस्था, खेडा जिल्हा दुग्धोत्पादक संघ, १९४७ मध्ये स्थापन झाली. याआधी गुजरातमध्ये व्यापारी तत्त्वावर दूध गोळा करण्याचे प्रयत्न १९०६ च्या सुमारास पोलसन कंपनीने केलेले दिसून येतात. या संघाचे मुख्य कार्यालय आणंद येथे आहे. संघाचे कामकाज आदर्श समजले जाते व त्यामुळेच ‘आणंद पॅटर्न’ हे नाव मशहूर झाले. याच सुमारास राज्य शासनांनी शहरांच्या दुग्धपुरवठ्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. बृहन्‌मुंबई दुग्ध योजना ही या प्रकारची भारतातील पहिली योजना मुंबईच्या दुग्धपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाने दुग्धविकास खात्यामार्फत कार्यान्वित केली. त्याआधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात राज्याच्या नागरीपुरवठा खात्यामार्फत मुंबईतील नागरिकांना दूध पुरविण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसते. या योजनेनुसार मुंबईजवळ आरे येथे अद्ययावत यंत्रसामग्री बसविलेले दुग्धप्रक्रियालय स्थापन करण्यात आले. या प्रक्रियालयाशेजारी २०,००० दूध देणारी जनावरे (गायी व म्हशी) ठेवण्यासाठी अद्ययावत पद्धतीचे गोठे बांधण्यात आले आणि शहराच्या मध्यवस्तीतील अस्वच्छ गोठयांतील म्हशी या गाठयांमध्ये हलविण्यात आल्या. म्हशींच्या परवानेधारक मालकांना अल्प भाडयात गोठे, ठराविक दराने चारा व खुराक मिळण्याची सोय, पशुवैद्यकीय मदत इ. सोयी उपलब्ध योजनेला विकले पाहिजे, असे बंधन आहे. इतर राज्य शासनांनी कमीअधिक फरकाने मोठया शहरांच्या दुग्धपुरवठयाच्या अशाच योजना हाती घेतल्या. तथापि या योजनांमध्ये सुरुवातीला दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.
       केंद्र शासनाने १९६५ मध्ये राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ स्थापन केले. या मंडळाचा मुख्य उद्देश राज्य शासनांना आणंद पॅटर्नच्या धर्तीवर दुग्धोत्पादकांचे सहाकरी संघ स्थापन करण्यास मदत करणे हा आहे. या मंडळाने ‘ऑपरेशन फ्लड’ नावाच्या प्रकल्पाची १९६८–६९ मध्ये आखणी करून त्याची दुग्धव्यवसाय महामंडळामार्फत कार्यवाही पण सुरू केली आहे.
     ‘ऑपरेशन फ्लड’ या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्दिष्ट मुंबई, दिल्ली, मद्रास आणि कलकत्ता या चार शहरांचा रोजचा दुग्धपुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात राज्य शासनांच्या दुग्धविकास खात्यांमार्फत ग्रामीण भागातून गोळा केलेल्या दुधाने करणे; यासाठी या खात्यामार्फत चालू असलेल्या दुग्धप्रक्रियालयांची दूध हाताळण्याची क्षमता वाढविणे अथवा नवीन दुग्धप्रक्रियालये उभी करणे; ग्रामीण भागातील दुग्धपुरवठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने या शहरांशी संलग्न अशी १८ केंद्रे निवडून त्याभागात विशेषत्वाने दुग्धोत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करणे हे आहे. अशा प्रयत्नात दुग्धोत्पादकांचे आणंद पॅटर्नच्या धर्तीवर सहकारी संघ स्थापन करणे, संघाच्या सभासदांना योग्य किंमतीत संतुलित पशुखाद्य पुरविणे, संकरित गायींच्या पैदाशीसाठी दुधाळ विदेशी जातींच्या वळूंचे वीर्य कृत्रिम पद्धतीने वीर्यसेचन करणारी केंद्रे स्थापन करणे, पशुवैद्यकीय मदत देणे, सभासदांनी उत्पादन केलेले दूध गोळा करून ते थंड अवस्थेत साठविण्याची व्यवस्था इ. सोयींचा समावेश आहे. अशा रीतीने नागरी भागातील दुग्धप्रक्रियालये व ग्रामीण भागातील दुग्धेत्पादक यांची सांगड घालून या शहरांचा दुग्धपुरवठा हळूहळू संपूर्णपणे ग्रामीण भागातील उत्पादित दुधाने करणे हे ‘ऑपरेशन फ्लड’ या प्रकल्पाचे अंतिम ध्येय आहे. ग्रामीण भागामध्ये दुग्धोत्पादन करणे आर्थिक दृष्टीने कमी खर्चाचे असल्यामुळे हे दुग्धोत्पादक आणि नागरी ग्राहक या दोघांचेही हितसंबंध सुरक्षित राहू शकतील हा विचार या प्रकल्पामागे आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे नव्याने बसविण्यात आलेले कुर्ला येथील दुग्धप्रक्रियालय याच योजनेखाली बसविण्यात आले आहे. या प्रकल्पाची सध्याची मुदत १९७७ मध्ये संपते. जागतिक अन्न व शेती संघटना आणि जागतिक अन्न कार्यक्रम यांच्याकडून या प्रकल्पाला मदत मिळाली आहे. ही मदत १९७० ते ७५ अखेर टप्प्याटप्प्याने १ लाख २६ हजार टन स्किम्ड दुधाची भुकटी, ४२,००० टन निर्जल दुग्धवसा (बटर ऑइल) या रूपाने करण्यात आली आहे. यापासून बनविलेले दूध विकून त्यापासून मिळणाऱ्या ९० कोटी ५४ लाख रुपयांचा विनियोग वर उल्लेखिलेल्या कार्यासाठी करण्यात येणार आहे.
दुग्धप्रक्रिया व वितरण : दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे तो ग्राहकापर्यंत सुस्थितीत पाहोचविण्यासाठी त्यावर योग्य ती प्रक्रिया करणे ही आधुनिक दुग्धव्यवसायामध्ये अत्यावश्यक बाब आहे. वाढती मजुरी, दुग्धोत्पादनातील वाढ, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून या व्यवसायावर आलेली बंधने, धातुविज्ञान, अभियांत्रिकी व प्रशीतन तंत्र यांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे दुधावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेसाठी यंत्रांचा वापर दिवसेंदिवस अधिकधिक होत आहे. अशा यंत्रांमधील दुधाशी संस्पर्शित भाग अगंज पोलादासारख्या मिश्रधातूंचे बनविलेले असतात. दूध काढणे, त्यातील गाळसाळ काढणे, पाश्चरीकरण, एकजिनसीकरण या प्रक्रिया तसेच बाटल्या भरणे, बुचे लावणे इ. अनेक गोष्टी स्वयंचलित यंत्राने केल्या जातात. अलीकडे ही यंत्रेही दूरनियंत्रण पद्धतीने चालविली जातात. त्यामुळे नियंत्रक फलक बसविलेल्या खोलीत बसून दुग्धप्रक्रियालयातील बऱ्याच प्रक्रिया एकच माणूस करू शकतो.
         उत्पादनानंतर काही तासांच्या आत दूध थंड करून साठविणे जरूर असते, अन्यथा ते नासून खाण्यालायक राहत नाही. दूध काढल्यापासून दोन तासांच्या आत १०० से. तापमानापेक्षा कमी तापमानात ते साठविणे जरूरीचे असते. दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेल्या बहुतेक देशांतील दुग्धशाळांमध्ये दूध थंड करण्याची व्यवस्था असते. दूध काढण्याच्या यंत्राने काढलेले दूध नळावाटे जवळच कोपऱ्यात बांधलेल्या हौदात जमा केले जाते. काही ठिकाणी अद्याप कॅन (पत्र्याच्या बरण्या) वापरण्यात येतात. यूरोपमध्ये काही थोडया ठिकाणी दुग्धशाळेपासून प्रक्रियालयापर्यंत दूध वाहून नेण्यासाठी नळ टाकण्यात आले आहेत; पण हे अपवादात्मक म्हणावे लागेल. हौदात जमा झालेले दूध पूर्वी बर्फाच्या पाण्याच्या साहाय्याने थंड ठेवण्याची व्यवस्था केलेली असे, आता याकरिता खास प्रशीतन तंत्र वापरतात. या दुधाचे तापमान १.६० ते ३.३० से. इतके ठेवतात. कच्च्या (निरशा) दुधावरील ही पहिली प्रक्रिया होय. दररोज किंवा एक दिवसाआड या हौदातील दूध चोषण पद्धतीने नळावाटे टाक्या थंड ठेवण्याची व्यवस्था असलेल्या मोटारीवरील टाक्यांत ओतले जाऊन जवळच्या दुग्धप्रक्रियालयाकडे यापुढील प्रक्रियेसाठी नेण्यात येते. गायींच्या आचळातून दूध काढल्यापासून प्रक्रियालयामधील टाक्यांत पडेपर्यंत नळातून ते वाहून नेले जात असल्यामुळे कोठेही जंतुसंसर्ग होण्याचा फारसा संभव नसतो. मोटारीवरील टाक्यांतील दूध प्रक्रियालयातील टाक्यांत जातेवेळी तपासणीसाठी व दुधाची प्रत ठरविण्यासाठी त्याचा नमुना घेण्यात येतो. आधुनिक दुग्धप्रक्रियालयातील यंत्रसामग्री बहुतांशी स्वयंचलित असते. दुधातील गदळ आणि कचरा काढण्यासाठी असलेले यंत्र काहीसे केंद्रोत्सारक यंत्राच्या तत्त्वावरच कार्य करते. या यंत्राने दूध स्वच्छ झाल्यावर त्याचे पाश्चरीकरण करण्यात येते. पाश्चरीकरण झालेल्या दुधाचे पुढे एकजिनसीकरण करण्यात येते. पाश्चरीकरणानंतर थंड दूध बाटल्यांमध्ये वा कार्डबोर्डाच्या खोक्यांमध्ये स्वयंचलित यंत्राच्या साहाय्याने भरले जाऊन लगेच बुचे लावण्याचे किंवा खोकी बंद करण्याचे कामही यंत्राच्या साहाय्यानेच होते. अमेरिकेत पाश्चरीकरण केलेले दूध गिऱ्हाइकाला त्याच्या उघडया किंवा बंद भांडयात देण्याला कायद्याने बंदी आहे. वर वर्णन केल्याप्रमाणे यांत्रिक पद्धतीने भरलेल्या आणि बंद केलेल्या बाटल्यांमध्ये अगर खोक्यांमध्येच ते दिले पाहिजे. बाटल्या अगर खोकी नंतर शीतकोठीमध्ये साठविल्या जातात. तेथून त्या गिऱ्हाइकाला घरपोच केल्या जातात किंवा विभागीय वस्तुभांडारामध्ये पाठवितात. १९६४ पासून बाटल्यांऐवजी प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर मोठया प्रमाणावर होऊ लागला आहे.
     काही दुग्धशाळांमध्ये दुधातील मलई वेगळी करण्याची केंद्रोत्सारक यंत्रे बसविलेली असून मलई व वसारहित दूध अनुक्रमे लोणी आणि बालकांसाठी दुग्धान्न बनविणाऱ्या कारखान्यांना विकतात. काही उत्पादक आइसक्रीम, चीज, माल्टयुक्त दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्या कारखान्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे मलईचे प्रमाण राखून प्रमाणित वसारहित दुधाचा पुरवठा करतात. उत्पादित दूध गोळा करणे, त्यावरील प्रक्रिया व वितरण यांची व्यवस्थापन पद्धती बहुतेक पुढारलेल्या देशांमध्ये वर वर्णन केल्याप्रमाणे थोडीफार साचेबंद आहे. अमिरेकेत हे काम बऱ्याच प्रमाणातखाजगी व्यक्ती व संस्था यांच्यामार्फत केले जाते. काही देशांत ते काही अंशी सहकारी पद्धतीवर करण्यात येते. दुग्धव्यवसायाबद्दल प्रसिद्ध असलेल डेन्मार्क देशातील ह व्यवसाय बव्हंशी सहाकरी पद्धतीवर फार पूर्वीपासून चालू आहे. तेथील दुग्धोत्पादकांनी १८८२ मध्ये पहिले सहाकरी दुग्धप्रक्रिया केंद्र स्थापन केले. पुढे अशा सहकारी केंद्रांची संख्या वाढत जाऊन १९३५ मध्ये ती १,४०४ झाली. ही केंद्रे २४ प्रादेशिक दुग्धव्यवसायिक संघांशी संलग्न झाली. हे प्रादेशिक संघ नॅशनल डॅनिश डेअरी अ‍ॅसोसिएशन या महासंघाशी संलग्न झालेले आहेत.  अशा रीतीने सहकारी पद्धतीवर दुग्धव्यवसायाचे जाळेच डेन्मार्कमध्ये तयार झालेले दिसते. काही खाजगी दुग्धप्रक्रिया केंद्रेही या सहकारी संघाशी संलग्न झालेली आहेत, तर काही खाजगी केंद्रांनी संघ स्थापन केले आहेत. तथापि हे संघ वर उल्लेखिलेल्या नॅशनल डॅनिश डेअरी अ‍ॅसोसिएशनशी संलग्न आहेत. या महासंघामार्फत दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्यात होत असते. लोणी, चीज, निर्यात करण्यासाठी वेगवेगळी निर्यात मंडळे असून ती आयात करणाऱ्या देशांमध्ये प्रतिनिधी पाठवून महासंघाला निर्यातीच्या बाबतीत सर्वतोपरी साहाय्य करतात. स्थानिक विक्रीसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती डॅनिश मोनॉपली कमिशन (एकाधिकार आयोग) ठरवते व त्या सर्व संघाना बंधनकारक आहेत. डेन्मार्कमधील ७०% दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्यात होतात.
भारतामध्ये दुग्धव्यवसायातील प्रक्रिया आणि वितरण या बाबींना चालना मिळाली ती शहरवासीयांच्या दुधाच्या वाढत्या मागणीमुळे व त्यामुळेच व्यवसायातील या अंगांचे आधुनिकीकरण करण्याची गरज उत्पन्न झाली. पारंपरिक, खाजगी, राज्य शासनांची दुग्धविकास खाती व सहकारी संस्था या चार मार्गांनी दुधावरील प्रक्रिया आणि वितरण होऊन ग्राहकांना दुग्धपुरवठा करण्यात येतो.
पारंपरिक पद्धतीमध्ये दुधाचे उत्पादन करणारे लोकच ग्राहकांना दुधाचे रतीब घालीत किंवा अडत्याला ते विकीत. हे दूध मिळेल त्या उपलब्ध वाहनाने- डोक्यावरून, सायकल, घोडयाची गाडी, मोटार, रेल्वे इ. शहरांकडे नेण्यात येई. मुंबईसारख्या मोठया शहरांमध्येही तेथील शहरवस्तीतील दुग्धशाळा व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील उत्पादक किंवा अडते लोक दूध घरपोच करीत असत. अद्यापही मोठया शहरांचा दुग्धपुरवठा काही प्रमाणात या पारंपरिक पद्धतीने चालू आहे. यामध्ये दुधावर काहीही प्रक्रिया केली जात नाही. फारतर ते नासू नये म्हणून थंड स्थितीत ठेवतात. काही अडत्या लोकांनी आता दुधातील वसा वेगळी करण्याची केंद्रोत्सारक यंत्रे बसवून मलई काढून त्यापासून लोणी व अंशत: वसा काढलेले दुध व इतर दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना पुरविण्याची व्यवस्था केली आहे. हे अडते लोक अतिरिक्त दूध खाजगी अगर राज्य शासनाच्या प्राथमिक प्रक्रिया केंद्रांना पुरवितात.
खाजगी क्षेत्रांमध्ये दुग्धोत्पादन करून अथवा ग्रामीण भागातील दूध गोळा करून खाजगी दुग्धप्रक्रियालयात प्रक्रिया करून त्यांच्याच वितरण यंत्रणेमार्फत ग्राहकांना पुरवितात. काही वेळा खाजगी क्षेत्रामधील दुग्धोत्पादक त्यांच्या जवळील अतिरिक्त दूध राज्य शासनाच्या दुग्धप्रक्रियालयाकडे पाठवितात.
राज्य शासनांच्या दुग्धविकास खात्यांनी शहरांचा दुग्धपुरवठा हाती घेतला आहे. सर्व राज्यांमध्ये अनेक ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची दूध थंड करण्याची केंद्रे व दुग्धप्रक्रियालये स्थापण्यात आली आहेत. देशामध्ये १९४७ पर्यंत ८७ दुग्धप्रक्रियालये स्थापण्यात आली, २१ प्रक्रियालयांचे बांधकाम चालू होते व आणखी ८४ प्रक्रियालयांची आखणी झालेली होती. महाराष्ट्रात आरे, वरळी व कुर्ला येथील प्रक्रियालयांची मिळून ११ लाख लिटर दूध हाताळण्याची क्षमता आहे. यांशिवाय कोल्हापूर, नागपूर, पुणे, नासिक इ. १७ ठिकाणी कमीअधिक क्षमतेची अशी प्रक्रियालये स्थापन करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील दूध योग्य भावाने खरेदी करून ते मुंबईसारख्या मोठया शहरातील ग्राहकांना परवडणाऱ्या दराने रोज पुरविणे हा शहरांचा दुग्धपुरवठा शासनाने हाती घेण्याच्या योजनेमागील हेतू आहे. ग्रामीण भागातील दूध दुग्धोत्पादकांच्या सहकारी संघाकडून, वैयक्तिक उत्पादकाकडून किंवा अडत्या लोकांकडून ठराविक दराने विकत घेऊन जवळच्या प्राथमिक प्रक्रिया केंद्राकडे कॅनमधून पाठविले जाते. तिथे ते थंड करून थंड टाक्या बसविलेल्या मोटारीने लांबवर असलेल्या शहरांच्या पुरवठयासाठी पाठविण्यात येते. शहरातील अधिक क्षमता असलेल्या प्रक्रियालयामध्ये एकजिनसीकरण आणि पाश्चरीकरण या प्रक्रिया झाल्यानंतर दूध स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने बाटल्यांतून अगर प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून शहरातील ग्राहकानां पुरविले जाते. शहरवस्तीच्या गरजेप्रमाणे खात्यामार्फत वितरण केंद्रे काढून या केंद्रावर सकाळ-दुपार दुग्धपत्रिका (कार्ड) धारकांना दुग्धपुरवठा करण्यात येतो. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, दुग्धव्यवसाय महामंडळ आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने दुग्धव्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्था अस्तित्वा आल्या आहेत. या संस्थांनी त्या त्या भागातील दूध उत्पादकांचे संघ स्थापन करून दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने उत्पादकाला पशुखाद्याचा पुरवठा, पशुवैद्यकीय मदत व संकरित गायींच्या पैदाशीसाठी कृत्रिम वीर्यसेचन करण्याची सोय इ. सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. उत्पादकाकडून दूध गोळा करून संस्थेच्या प्राथमिक प्रक्रिया केंद्रामध्ये त्यावर प्रक्रिया करून ते ग्राहकांना त्यांच्यात वितरण यंत्रणेमार्फत पुरविण्यात येते. दिवसेंदिवस दुग्धोत्पादकांचे सहकारी संघ व दुग्धव्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्था यांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील दुग्धव्यवसायाची वाटचाल १९६० नंतर सहकारी तत्त्वप्रणालीचा अवलंब करून चालू आहे. राज्य आणि केंद्र शससनांच्या प्रयत्नांची दिशाही हीच आहे. १९६९ अखेर सहकारी दुग्धोत्पादकांचे १४३ संघ, १०,०१० प्राथमिक सहकारी प्रक्रिया केंद्रे, ३८ सहकारी दुग्ध योजना, ५ सहकारी पशुखाद्य कारखाने व ११ सहकारी दुग्धप्रक्रियालये स्थापण्यात आली होती. महाराष्ट्रात दोन मोठी सहकारी दुग्धप्रक्रियालये वारणानगर (कोल्हापूर) आणि जळगाव येथे स्थापन होऊन त्यांचे कामकाजही मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

Thursday 5 December 2013

सण व उत्सव

गणेशोत्सव
गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते.
हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.
गणपतीची जन्मकथा
एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.
काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.
    पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली.
सार्वजनिक गणेशोत्सव
इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे कि स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुन प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्य लक्ष्यात येते.
विसर्जन
मूर्तिविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। ;अर्थ : ’पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.’ श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.

विजयादशमी
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्रात हा सण दसरा म्हणूनही साजरा केल्या जातो. परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात.या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केल्या जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे,शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे,तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची तीला प्रार्थना करावयाची कि मला विजयी कर.त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन,व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे.[ संदर्भ हवा ]
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला.गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली.परंतु त्याने फक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

लक्ष्मीपूजन
    आश्विन अमावास्या - दिपावली दुसरा दिवस - हिंदूधर्मातील सण आणि उत्सव
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी(संध्याकाळी) लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्माfनष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते. म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निःसारण, म्हणजेच रात्री १२ वाजता घरात केर काढतात.

होळी
होळी सणानिमित्त पेटवलेली 'होळी'
होळीचे पूजन
होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पासून पंचमीपयर्त या ५-६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

होळीचे महत्त्व
होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात . दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.

Saturday 30 November 2013

नागरी सहकारी बँक

सहकारी बँका            
सर्वंकष विकासाच्या पायावर सहकारी चळवळीची पुनर्मांडणी आवश्यक
आपल्या देशातील सहकारी चळवळ व ग्रामीण विकास यांच्या पुनर्मांडणीचा मुळापासूनच फेरविचार करणेचा कालावधी सध्या चालू झाला आहे. ब्रिटीश राजवटीच्या काळात ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीविषयक गरजा वेळेवर भागविता याव्यात म्हणून, पतपुरवठ्याची रचना करण्याचा निर्णय झाला व त्यातून १९०४ चा पहिला सहकारी कायदा संमत करण्यात आला. २००४ साली आपल्या सहकारी चळवळीचा शताब्दी उत्सव साजरा करणार आहोत, त्यामुळे गेल्या १०० वर्षात या देशातील सहकारी चळवळ, या देशातील शेती व्यवसाय, या देशातील शेती पतपुरवठ्याची व्यवस्था आणि एकूण ग्रामीण विकास या सर्वांचे सिंहावलोकन करुन फेरमांडणीच्या दिशा आपल्याला ठरवाव्या लागणार आहेत.
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात आपल्या देशातील उद्योगधंद्याचे क्षेत्र बर्‍याच मोठ्या प्रमाणावर विकसित झाले असतांनासुध्दा आपल्या देशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ३२ टक्के उत्पन्न हे केवळ शेती या एका विषयातून मिळते. हे ३२ टक्के उत्पन्न देशाची ६८ टक्के ग्रामीण लोकसंख्या जगविते. याचा विचार आपल्याला सध्याची आव्हाने सोडवितानासुध्दा लक्षात घ्यावा लागेल. यासंबंधात, दोन श्रेष्ठ व्यक्तींची वक्तव्ये लक्षात घेण्यासारखी आहेत. रामचरित मानस हा ग्रंथ आपण कां लिहिला याबद्दल संत तुलसीदासांचा असा दोहा आहे की,
खेती न किसान को, भिखारी को भिख न मिली
वणीननो विजन न, चोरो को चोरी
जिवीका विहीन लोक, सिद्य मान शोचक्स
कहे एक एकनको, कहा जाई जाई कहा मरी
पंडित नेहरूंनी म्हटलेले आहे,आम्हाला सहकारी चळवळीला पर्याय पाहिजे असेल तर तो एकच पर्याय आहे तो म्हणजे सर्वनाश. एकविसाव्या शतकातील आपल्या देशातील सहकारी चळवळ, आज या सर्वनाशाच्या टोकावर उभी आहे आणि भारतातल्या सामान्य माणसाची अशी प्रतिज्ञा आहे की आम्ही, कोणत्याही परिस्थितीत सहकारी चळवळीच्या आधारानेच आमचे जीवन सुखी व समृध्द करु.
स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ग्रामीण विकासाचा निश्चित मार्गदर्शनासाठी म्हणून १९५४ साली पहिली ग्रामीण पतपुरवठा सर्व कमिटी गोरवाला कमिटी नियुक्त केली. आमची ग्रामीण पतपुरवठा याची सहकारी पध्दती ही गोरवाला समितीच्या शिफारसीनुसार त्रिस्तरीय रचनेवर आधारलेली आहे. सहकारी नागरी बँका या गावाच्या विकास सोसायटीप्रमाणेच प्राथमिक सहकारी बँका या श्रेणीतच मोजल्या जातात. पर्यायाने नागरी बँकासुध्दा ग्रामीण विकासाच्या रचनेतील एक महत्वाचा दुवा आहे असे गोरवाला समितीने गृहीत धरलेले आहे. गोरवाला समितीनंतर भारत सरकारने १९६९ साली रुरल क्रेडिट रिव्ह्यू कमिटी नियुक्त केली होती. १९८१ साली शेती व ग्रामीण विकास यासाठी संस्थात्मक निधीची उपलब्धता यासाठी समिती नेमली होती आणि १९८९ साली खुली कमिटी नियुक्त केली होती. यासर्व कमिट्यांच्या शिफारसी सहकारी पतव्यवस्था बळकट ठरविण्याच्या दृष्टिकोनातून झालेल्या आहेत. परंतु त्यातल्या फारच कमी प्रमाणात अंमलात आलेल्या आहेत. विशेषत: खुली कमिटीने मुलभूत परिवर्तनाच्या बर्‍याच शिफारसी सुचविल्या होत्या. परंतू त्याची दखल भारत सरकार अगर रिझर्व्ह बॅकेने गांभीर्याने घेतली नाही.
रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरणामुळे देशापुढे व सहकारी चळवळीपुढे पुढील प्रमुख प्रश्न निर्माण झालेले आहेत.
१. स्वातंत्र्यानंतर पहिल्या नियोजन मंडळाने सहकारी चळवळ ही एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ असून देशातील सामान्य नागरिकाचा देशाच्या विकासास सहभाग होण्यासाठी हे एकमेव साधन आहे. म्हणून सहकारी संस्थांना व सहकारी उद्योगांना सहकारी व्यवसायाच्या बरोबरीने स्थान देण्यात यावे.
२. नियोजन मंडळाच्या या धोरणानुसार पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून सातव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यांमध्ये सहकारी चळवळीच्या अध्यायाचा समावेश करण्यात आलेला होता. आज आठव्या योजनेपासून सहकारी चळवळीचा अध्याय वगळण्यात आलेला आहे. पर्यायाने सहकारी चळवळ ही सामाजिक चळवळ नसून खाजगी उद्योग व्यवसाय अगर संघटन आहे असे स्वरुप त्याला प्राप्त झालेले आहे. या बाबतीत धोरणाची स्पष्टता करुन घेण्याची अत्यंत जरुरी आहे.
३. आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी हा कर्जबाजारी आहे. त्याच्या जमिनी सावकाराच्या ताब्यात आहेत, हे लक्षात घेऊन कर्जदार शेतकर्‍याच्या जमिनीमध्ये उद्या उगवणारे पीक हे आज तारण म्हणून धरावे व त्याच्या आधारावर त्याला पीक कर्ज द्यावे, ही योजना सर्वप्रथम वैकुंठभाई मेहता यांनी चालू केली. आजची संपूर्ण सहकारी चळवळ या एका धोरणाच्या आधारावर उभी आहे. कै. वैकुंठभाई मेहता यांचे हे धोरण चुकीचे होते का आज ते कालबाह्य झाले आहे याचा निर्णय नवीन धोरण ठरविताना करावा लागेल.
४. वैज्ञानिक संशोधने कितीही लागली तरीसुध्दा शेती हा निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे वेळी शेतकर्‍या ला साहाय्य करण्याच्या योजना असाव्यात अशी अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांची मागणी होती. गेल्यावर्षीपासून भात सरकारने `सर्वंकष पीक विमा योजना' लागू केली आहे. परंतु तलाठ्याने काढलेली नजर-आणेवारी व गावातील पिकाचे प्रमाण या बाबतीत कोणताही दृष्टिकोन सरकारने बदलला नसल्याकारणाने सर्वंकष पीक विमा योजना सध्या निरुपयोगी किंवा शेतकर्‍याला भुर्दंड पाडणारी अशी आहे.
५. शेतकर्‍या ला कोणत्याही सवलती अगर सबसीडी सरकारने देऊ नयेत पण कारखानदारी अगर अन्य उद्योगाप्रमाणे शेतीमालाचा उत्पादन खर्च व १०% नफा या किंमती शेतकर्‍याला दिल्या जातील अशी व्यापारव्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत केवळ पतपुरवठ्याच्या व्यवस्थेमुळे शेती व शेतकरी यांचे जीवन कधीही संपन्न होणार नाही. सरकारने आधार किमतीऐवजी शेतीमालाला रास्त किफायतशीर किमती यांच्यात जे समाजाला माल, धान्य विकताना, सबसीडी विक्री दरात द्यावी म्हणजे सबसीडीच्या नावावर याला उगाचच झोडपले जात आहे ते थांबेल.
६. आपल्या सर्व लहानमोठ्या बँकांना किंबहुना देशपातळीवरील राज्य पातळीवरील , जिल्हा पातळीवरील आणि जागतिक पातळीवरील सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेने जागतिक बँकेचे नॉर्म्स लावलेले आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे बँकाच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत चालल्या आहेत. भारत सरकारने आपल्या देशातील बँकिंग व्यवसायाचा स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपल्या देशातील ज्या बँका जागतिक पातळीवर काम करणार आहेत, त्यांनाच फक्त जागतिक बँकांचे नॉर्म्स लावावेत. देशांतर्गत अन्य सर्व बँकांना आपल्या देशाच्या धोरणानुसार जरुर ते सर्व नॉर्म्स लावावेत.
७. नागरी सहकारी बँकाना गेल्या दोन वर्षापासूनच ग्रामीण भागात शाखा काढणे व शेती व्यवसायाला कर्जव्यवहार करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. गेली सुमारे ३० वर्षे नागरी बॅंका अशा कर्ज व्यवहाराची मागणी करीत होत्या. नागरी बँका या लोकांनी काढलेल्या असतात. त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात समाजाचा त्या विश्वास संपादन करतात व समाजातूनच ठेवीच्या रुपाने निधी एकत्रित करुन त्याच्यावर कर्जव्यवहार करतात. सरकारकडे कोणत्याही पैशाची मागणी न करता स्वावलंबनावर चाललेला एकमेव सहकारी व्यवसाय म्हणजे नागरी बँका होय. नागरी बँका आज ग्रामीण भागात सफाईदारपणे कर्जव्यवहार करु लागलेल्या आहेत. नागरी बँकांची पहिली शिखर बँक महाराष्ट्रात निघालेली असून या शिखर बँकेच्या नेतृत्वाखाली साखर कारखाने, सूत गिरण्या अशा प्रकल्पांना नागरी बँका, मोठा कर्जपुरवठा करुन ग्रामीण व शेती विकास क्षेत्रात उत्तम तऱ्हेने कामगिरी पार पाडू शकताता याचा अनुभव महाराष्ट्राला आलेला आहे.
८. शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने जिल्हा बँकांना जो कायदेशीर संरक्षण दिलेले आहे. त्याची उपलब्धता नागरी बँकाना अद्याप करुन देण्यात आलेली नाही. नागरी बँकांना रिझर्व्ह बँकेने केवळ नागरी बँक म्हणण्याच्या ऐवजी विभागीय विकास बँक - रिजनल डेव्हलपमेंट बँक - असा दर्जा दिला तर या बँका, जिल्हा बँकाच्या बरोबरीने ग्रामीण विकासाचे काम करु शकतील. नागरी बँकांच्या ठेवी गोळा करण्याची क्षमता अनुभवी अधिकारी वर्ग व त्यांची स्वत:चे भांडवल या सर्वांचा विचार करुन या बँकावरील बंधन सरकारने व रिझर्व्ह बँकेने कमी केली, तर उद्याच्या ग्रामीण विकासाच्या व शेती विकासाच्या अग्रदूत म्हणून नागरी बँका उत्तम तऱ्हेने काम करु शकतात. सरकारने या सर्व धोरणांचा विचार तातडीने केला पाहिजे. आपल्या देशातील सहकारी चळवळ ही, या पुढच्या काळात पूर्णपणे ग्रामीण विकासाच्या आधारावर चालणार आहे. जागतिक स्पर्धेला तोंड देण्याचे आपल्या देशाकडे ग्रामीण विकास हाच एकमेव मार्ग आहे. शासनाने व रिझर्व्ह बँकेने स्वत:च्या धोरणांचा फेरविचार करुन नागरी बँकांना खुलेपणाने काम करुन देण्याची संधी निर्माण करुन दिली, तर या देशातील ग्रामीण विकासाला महत्वाचा हातभार नागरी बॅंकांना खुलेपणाने काम करु देण्याची संधी निर्माण करुन दिली तर या देशातील ग्रामीण विकासाला महत्वाचा हातभार नागरी बँका लावू शकतील एवढी त्यांची क्षमता आहे.
शेरी नाला योजना     पीडीएफ   
सांगली शहराजवळील वाहणारा शेरीनाला मुख्यत: पावसाचे पाणी व शेतीसाठी वापरलेले पाणी वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत असे. हे पाणी साधारणपणे ४० चौ. कि.मी. एवढ्या परिसरातून येते. या परिसरात आता लोकवस्ती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे की या परिसरातील ८ ते १० लाख लिटर प्रतिदिन एवढे सांडपाणी या नाल्यामध्येच येते. घरगुती सांडपाण्याव्यतिरिक्त काही कारखान्यांचे सांडपाणी या नाल्यामध्ये पूर्वी येत असे. परंतु सध्या ते थांबले आहे. भविष्यांतसुध्दा कोणत्याही कारखान्याचे सांडपाणी या नाल्यामध्ये येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी घेण्यात येईल असे गृहीत धरूनच शेरीनाला शुध्दीकरण योजना फक्त घरगुती सांडपाण्यासाठी प्रायोजित करण्यात आली आहे.

सहकार ठेवीदारांचा की कर्जदारांचा?
'सहकारातील  कोणत्याच मूलभूत तत्त्वांचे पालन नागरी सहकारी बँकांकडून होत नाही' असा निष्कर्ष रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीतील  अभ्याससंस्थेने काढला आहे. या पाश्र्वभूमीवर सहकारी बँकांचे व्यवस्थापन चांगल्या लोकांकडे जाऊन ठेवीदारांचे हित कसे जपता येईल, याची चर्चा करणारा लेख..
रिझव्‍‌र्ह बँकेच्या  पुणे येथील 'कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल बँकिंग' या संस्थेने ९६० नागरी सहकारी बँकांना सुमारे २७ प्रश्नांची प्रश्नावली पाठवून, त्यातून आलेली उत्तरे तसेच गेल्या पाच वर्षांतील सांख्यिकी माहिती आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे तपासणी अधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, एक अभ्यास-अहवाल गेल्या महिन्यात पुण्यातील एका चर्चासत्रात मांडला. ९६० पैकी ४२३ (४४ टक्के) बँकांनीच प्रश्नावलीला उत्तरे दिली, हे धक्कादायक होतेच, परंतु 'सहकारातील सातपैकी कोणत्याच मूलभूत तत्त्वांचे पालन नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राकडून होत नाही' असा निष्कर्ष रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीतील या अभ्याससंस्थेने काढला होता. सहकारी बँकांत होणाऱ्या निवडणुकांतील मतदान २० टक्क्यांपेक्षा कमी असते, एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश संचालक मंडळांत दिसून येतो, तेच ते संचालक वर्षांनुवर्षे कायम राहतात, सहकारी बँकांचे व्यवहार आणि व्यवस्थापन यांत सभासदांचा सहभाग नगण्य असतो,  हे सभासदत्व नियमानुसार खुले व ऐच्छिक असूनही प्रत्यक्षात ओळखीच्या व्यक्ती व कर्जदार  यांच्यापुरतेच मर्यादित राहते, असे सहकारी बँकांबाबत काढलेले निष्कर्ष अभ्यासकांच्या दृष्टीने जरी धक्कादायक असले तरी सहकाराशी संबंधित असणाऱ्या सर्वाना आणि सामान्य जनतेलाही गेल्या कित्येक वर्षांपूर्वीपासूनच हे सत्य माहीत आहे हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे आपल्या शोध-निबंधातून रिझव्‍‌र्ह बँकेने फार काही वेगळा शोध लावला, असे म्हणता येणार नाही; परंतु यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे यावर निश्चितच विचारांची प्रक्रिया सुरू होईल व ती व्हावी अशी अपेक्षा आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या अहवालात यावर उपाययोजना सुचविताना सभासदांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याबरोबरच सहकाराच्या सात मूलभूत तत्त्वांचा अंगीकार, वार्षिक सभेतील सभासदांच्या क्रियाशील सहभागात वाढ, मतदान वाढविण्यासाठी ऑनलाइन मतदानाची सुविधा, संचालक मंडळाच्या निर्णयप्रक्रियेत व्यावसायिकता आणणे, संचालकांच्या एकूण मुदतीवर र्निबध, इत्यादी उपाय सुचविले आहेत. याचबरोबर सदर चर्चेमध्ये आपले विचार मांडणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकांच्या जिल्हा/राज्यस्तरीय वार्षिक सभांचे आयोजन, अविरोध निवडणुकांवर मर्यादा, मतदान न केल्यास लाभांश न देण्याची तरतूद, संचालक मंडळ सभांना रोटेशन पद्धतीने काही क्रियाशील सभासदांना उपस्थितीची मुभा असे उपाय सुचविले आहेत.
या पाश्र्वभूमीवर कोणत्याही सहकारी संस्थेवर केवळ क्रियाशील सभासदांचेच नियंत्रण असावे हे मान्य करीत केंद्र शासनाच्या ९७ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकारांनी आपापल्या सहकार कायद्यात आवश्यक ते बदल केले आहेत. नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत मात्र बँकिंग व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांवरील नियंत्रण हे ठेवीदार सभासदांच्या हाती असावे, असा रिझव्‍‌र्ह बँकेचा आग्रह असताना प्रत्यक्षात मात्र ते कर्जदार सभासदांच्या हाती असल्याचे दिसून येते. सहकारी बँका या ठेवी स्वीकारणे व कर्ज देण्याचा व्यवसाय करतात त्यामुळे ठेवीदार आणि कर्जदार या दोन्ही व्यक्ती संस्थेच्या व्यवहारात सहभागी होत असल्याने त्या क्रियाशील ठरतात; परंतु कायद्याने केवळ सभासदांनाच कर्ज देता येत असल्याने त्यांना सभासदत्व दिले जाते, मात्र ठेवीदारांच्या बाबतीत ही अट नसल्याने ठेवीदारांना सभासद करून घेतले जात नाही. यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रामध्ये केवळ सहकारी बँकिंगचे एकमेव क्षेत्र असे आहे की जेथे बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारल्या जातात व त्यांचे वाटप केवळ सभासदांनाच कर्जरूपाने केले जाते. वास्तविक इतर सर्व सहकारी संस्थांमधून जो सभासद सहकारी संस्थेला पुरवठा करतो तो क्रियाशील सभासद ठरतो. उदा. साखर कारखान्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी ऊस देतो, दुग्ध संस्थेत सभासद दुधाचा पुरवठा करतो, शेती मालाच्या संस्थेत सभासद शेतमाल पुरवितो. गृहनिर्माण संस्थेत मेंटेनन्स देणारा क्रियाशील ठरतो; परंतु सहकारी बँकिंग संस्थेत मात्र ठेव ठेवणाऱ्या व्यक्तीला सभासद करून घेण्याचे कायदेशीर बंधन बँकांवर नसल्याने, बँकांच्या खेळत्या भांडवलात ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत हिस्सा असणाऱ्या ठेवीदारांचे नियंत्रण व्यवस्थापनावर नसते, ही वस्तुस्थिती आहे.
बँकिंगमध्ये कर्जदार सभासदांपेक्षा ठेवीदारांचे हित जोपासणे आवश्यक असल्याच्या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या मालेगम समितीच्या अहवालानुसार बँकांच्या एकूण ठेवींपैकी किमान ५० टक्के ठेवी ज्यांच्या हातात आहेत असे सर्व ठेवीदार सहकारी बँकांचे 'मतदार सभासद' असणे अनिवार्य केल्यास या बँकांवर ठेवीदारांचे नियंत्रण राहून ज्यांच्या हातात आपला पैसा सुरक्षित राहील, त्यांनाच निवडून देण्याकडे या ठेवीदारांचा कल असणार व त्यामुळे चांगल्या लोकांच्या हातात या बँकांचे व्यवस्थापन राहील व ठेवीदारांचे हित जाईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेस वाटते. यामुळे यासंबंधात रिझव्‍‌र्ह बँकेने सर्व राज्यांच्या सहकारी आयुक्तांना या विषयावर त्यांचे मतप्रदर्शन करण्याचे नुकतेच आवाहन केले आहे. मात्र एकूण ठेवींच्या ५० टक्के मूल्य असणारे ठेवीदार हे सभासद असणे आवश्यक असण्याची अट न घालता केवळ ठेवीदारांकडूनच ठेवी स्वीकारता येतील, अशी अट घातल्यास ठेव असेपर्यंत तो ठेवीदार क्रियाशील सभासद व ठेव नसताना अक्रियाशील सभासद राहिल्याने केवळ क्रियाशील ठेवीदारांचेच संस्थेवर नियंत्रण राहील, तसेच अक्रियाशील सभासदांचे सभासदत्व विशिष्ट कालावधीनंतर संपुष्टात आणण्याची तरतूद नवीन कायद्यात असल्याने अक्रियाशील सभासदांची संख्या वाढण्याचाही धोका राहणार नाही. कर्जदारांच्या शेअर्स लिंकिंगबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेनेच परिपत्रक काढून ते जसे बँकांना अनिवार्य केले आहे, तसेच ठेवीदारांनाही किमान शेअर्स देणे बँकांना अनिवार्य केल्यास, ठेवीदारांच्या नियंत्रणाचा रिझव्‍‌र्ह बँकेचा उद्देश सफल होण्याबरोबरच, ठेवीदारांनादेखील ते सभासद झाल्याने सहकार न्यायालयाचा पर्याय उपलब्ध होईल. सभासद असल्याने ठेवींवरील व्याजावर आयकर कपात करण्याचे बंधन बँकांवर राहणार नाही. केवळ सभासदांच्याच ठेवी संस्थेकडे असल्याने अशी बँक अडचणीत आल्यास तिचा बँकिंग परवाना रद्द करून तिचे पतसंस्थेत रूपांतर करता येईल. त्यामुळे संस्थेचे अस्तित्व अबाधित राहील.
वास्तविक मतदारांवर प्रभाव आणणारे कोणतेही कृत्य आपल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बेकायदा ठरते. येथे तर  ज्या ओळखीच्या व्यक्तीस कर्ज देत सभासद करून घेऊन उपकृत केले जाते, त्याचे मतदान हे कोणाला होणार हे उघड असल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकारी बँकांवर ठेवीदारांचे नियंत्रण राहिल्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या शोधनिबंधातील अनेक समस्यांची उकल होईल, असे वाटते. हा विचार प्रवाहाच्या विरुद्ध वाहत असला तरी नागरी सहकारी बँकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो आवश्यक वाटतो. केवळ सभासदांचे हित जोपासणारा सहकार कायदा आणि केवळ ठेवीदारांचे हित जोपासणारा बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी भविष्यात मालेगम समितीच्या सूचनेनुसार रिझव्‍‌र्ह बँकेने वरील विचार अमलात आणल्यास या क्षेत्राला आश्चर्य वाटायला नको.

Saturday 9 November 2013

स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स

(इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा पूर्वी पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ऍपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ऍपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ऍपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ऍपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून, इ.स. २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले[ संदर्भ हवा ].
स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.

 स्टीव जॉब्स...स्टे हंग्री...स्टे फुलीश.
 स्टीव जॉब्स...स्टे हंग्री...स्टे फुलीश..हाच त्याच्या जगण्याचा मंत्र ..अवघ्या 56 वर्षाच्या आयुष्यात स्टीव नेहमी भूकेला राहिला त्यामुळेच तो यशाची शिखरं चढत राहिला. त्याला वेड होतं कामाचं, नाविन्याच्या शोधाचं...

एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थीनीच्या पोटी स्टीवचा जन्म झाला. म्हणजे स्टीव हे लग्नाशिवाय झालेलं अपत्य.  त्याला दत्तक देण्याचा निर्णय त्याच्या आईनं घेतला पण एका अटीसहीत. दत्तक आईवडील हे ग्रॅज्युएट असावेत. .पण तसं झालं नाही...ज्यांनी स्टीवला दत्तक घेतलं त्यांनी स्टीवच्या आईला वचन दिलं की एके दिवशी स्टीव नक्कीच कॉलेजमध्ये शिकायला जाईल...आणि गेलाही.

स्टीव १७ वर्षाचा असताना रीड कॉलेजात दाखल झाला..पण त्याचं मन काही तिथं रमेना. अवघ्या सहा महिन्यात तिथून तो बाहेर पडला. फार पैसा नसताना स्टीवनं केलेलं धाडस रस्त्यावर आणणारं होतं. झालयही तसच. संध्याकाळच्या एका जेवणासाठी स्टीवला काही मैलाची पायपीट करत हरे कृष्णा मंदीर गाठावं लागायचं. पण कॅलीग्राफीमध्ये स्टीव माहीर होता. मग काय स्टीवनं घराच्या गॅरेजमध्येच अॅपल कंपनी सुरु केली. सोबत होता मित्र वॉझ.दहा वर्षात अॅपलनं पहिला मॅकिन्टोश कंप्युटर जगाला दिला..त्यातील टायपोग्राफी ही स्टीवच्या कॅलिग्राफीची कमाल होती. वयाच्या तिशीत स्टीव दोन बिलियन डॉलर उलाढाल असलेल्या आणि चार हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचा मालक बनला
 पण स्टीवचा संघर्ष इथंच संपला नाही..वयाच्या तिशीत ज्या कंपनीची स्थापना  केली त्या अॅपलमधूनच स्टीवला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. कंपनीच्या मॅनेजमेंटशी त्याचा वाद झाला. स्टीव पुन्हा रस्त्यावर आला. परत पैशाचे वांदे झाले पण स्टीवकडं होता तो एक अफलातून मंत्री. स्टे हंग्री स्टे फुलीश.

काहीच महिन्यात स्टीवनं नेक्स्ट आणि पिक्सार या दोन नव्या कंपन्या सुरु केल्या. झपाटून कामाला सुरुवात केली...पिक्सारनं जगातील पहिली अॅनिमेटेड फिल्म तयार केली. जगातला सर्वात मोठा अॅनिमेशन स्टुडिओ याच कंपनीकडे आहे. काहीच वर्षात अॅपलनं नेक्स्ट खरेदी केली..स्टीव पुन्हा अॅपलमध्ये परतला.

स्टीवच्या आयुष्यात शांतता कधीच नांदली नाही..२००४ मध्ये स्टीवला कॅन्सर झाला...तोही स्वादुपिंडाचा...डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार स्टीव थोड्याच दिवसाचा साथीदार होता..पण एके दिवशी तपासणीदरम्यान अतिशय दुर्मिळ असलेल्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया केल्यास तो बरा होऊ शकतो असं डॉक्टरांच्या लक्षात आलं...

स्टीववर शस्त्रक्रिया झाली..काही दिवसांच्या विश्रांतीनंतर स्टीव पुन्हा कामात मग्न झाला. अॅपल कम्युटर, मॅकिन्टोश अशा उत्पादनांनी ऍपल आता जगप्रसिद्ध होती. पण आयफोन, आयपॅड, आयपॉड अशा अनेक शोधांनी स्टीव जगभरातल्या तरूणांचा आणि उद्योजकांचा ताईत झाला. खुद्द बिल गेटसनं कितीतरी वेळेस स्टीवच्या अॅपलची उत्पादनं मायक्रोसॉप्टपेक्षा किती तरी सरस असल्याचं कबुल केलं.  पण सौंदर्याला कदाचित शाप असावा. स्टीव आता छप्पन वर्षाचा झाला. पण गेल्या वर्षभरात त्याच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं. आता आपण फार काळ जगणार नाही, याची जाणीवही स्टीवला झाली असावी.

त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी त्यानं अॅपलच्या सीईओपदाचा राजीनामा दिला. कंपनीच्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण करू शकत नसल्याची खंत स्टीवनं व्यक्त केली. त्यावेळेस जग हळहळलं. अखेर काल अॅपलनं आणखी एक वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आयफोन ४ एस बाजारात आणला असतानाच त्याचं निधन झालं. स्टीव आता आपल्यात नाही पण त्यानं निर्माण केलेले प्रोडक्ट जगभरातल्या लोकांच्या हातात आहेत आणि ते एकच संदेश देत राहातात..स्टे हंग्री स्टे फुलीश.


 एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचा प्रमुख कार्यकारी अधिकारी (CEO) स्टीव जॉब्स यांचे पदवीदान समारंभातील भाषण आहे, जून १२, २००५

 आज तुमच्याबरोबर येथे जगातील एका सर्वोत्क्रुष्ट महाविद्यालयातील तुमच्या पदवीदान समारंभाला मला अतिशय अभिमान वाटत आहे.मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण केल नाही.खरं सांगायचं तर, महाविद्यालयीन पदवीशी माझा हाच एक सर्वात जवळचा संबंध आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगयच्या आहेत. येवढंच. फार काही नाही. फक्त तीन गोष्टी.
 पहिली गोष्ट आहे ठिपके जोडण्याची.
 मी रीड महाविद्यालयातून पहिल्या ६ महिन्यांनंनर बाहेर पडलो, पण नंतर पुर्णपणे सोडण्यआधी साधारण १८ महिने मी तसाच महाविद्यालयात पडीक होतो. मग मी का सोडून गेलो?
 ह्या गोष्टीला माझ्या जन्मआधी सुरुवात झाली. माझी जन्मदात्री आई एक तरुण, कुमारिका महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, आणि तिने मला दत्तक देऊन टाकायचे ठरविले. तिला असे प्रकर्षाने वाटले की मला महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्यांन्नी दत्तक घ्यावे, त्यामुळे या सगळ्याची एका वकिलाने आणि त्याच्या पत्नीने माझ्या जन्माच्या वेळीच तयारी केली होती. फक्त जेव्हा मी बाहेर आलो त्यान्नी आयत्या वेळी ठरवले की त्यान्ना खरेतर मुलगी हवी होती. त्यामुळे माझे आई वडील जे प्रतिक्षा यादिवर होते, त्यान्ना मध्यरात्री निरोप आला, आणि विचारलं: "आमच्याकडे अनपेक्षितपणे एक मुलगा झाला आहे; तुम्हाला तो हवा आहे का?" ते म्हाणाले: "नक्कीच". माझ्या जन्मदात्रा आईला नंतर कळाले की माझी आई कधीच महाविद्यालयात गेली नव्हती आणि माझे वडील कधीच माध्यमिक शाळेत गेले नव्हते. तिने शेवटच्या दत्तक विधानांवर सही करायला नकार दिला. थोड्या महिन्यांनी ती नरमली जेव्हा माझ्या पालकांनी वचन दिले की मी कधितरी महाविद्यालयात जाईन.
 आणि १७ वर्षांनंतर मी खरंच महाविद्यालयात गेलो. पण मी भोळसटासारखे असे महाविद्यालय निवडले जे जवळ जवळ स्टॅनफर्ड येवढेच महाग होते, आणि माझ्या मध्यमवर्गीय पालकांची सगळी बचत माझ्या महाविद्यालयाच्या शिक्षणमुल्यावर खर्च होत होती. सहा महिन्यांनंतर, मला त्यात काही तत्थ्य दिसेना. आयुष्यात मला काय करायचे आहे याची मला काहीच कल्पना नव्हती आणि महाविद्यालयात जाण्याने ते मला कसे शोधून काढता येईल याचिही काही कल्पना नव्हती. आणि इथे तर मी माझ्या आईवडिलांनी आयुष्यभर जमवलेले सगळे पैसे खर्च करून टाकत होतो. म्हणून मी असं ठरवलं की 'सगळं नीट होईल' असा भरवसा ठेवून शिक्षणाला रामराम ठोकायचा. त्यावेळी ते सगळंच खूप भीतिदायक वाटलं होतं, पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की तो माझा सर्वात चांगला निर्णय होता. महाविद्यालय सोडल्यावर मला नीरस वाटणारे पण सक्तीचे विषय मी टाळू शकलो अाणि अावडणाऱ्या विषयांच्या तासांना बसू लागलो.
 ते सगळं काही फारसं रोमहर्षक नव्हतं. मला वसतिगृहात खोली नव्हती म्हणून मी मित्रांच्या खोल्यांमधे फरशीवर झोपायचो, कोकच्या बाटल्या परत करून त्यावरचं पाच पाच सेंटचं डिपॉझिट गोळा करून त्यातून अन्न विकत घ्यायचो आणि दर रविवारी रात्री शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या हरे कृष्ण मंदीरात निदान एक तरी चांगलं जेवण मिळवण्यासाठी ७ मैल चालत जायचो. मला ते सगळं आवडीचं वाटलं. आणि माझं कुतूहल आणि अंतर्ज्ञान यांचा पाठपुरावा करून मला जे काही मिळालं ते बहुतेक सगळं पुढे अनमोल ठरलं. उदाहरणार्थ:
 त्यावेळी रीड कॉलेजातील लेखनशैलीचं शिक्षण बहुधा देशात सर्वोत्कृष्ट असावं. संपूर्ण अावारात प्रत्येक भित्तिचित्र, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हे सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं असे. मी महाविद्यालय सोडून दिले असल्याने आणि नेहेमीचे विषय घेत नसल्याने, मी लेखनशैलीचा विषय घेऊन ते शिकायचे ठरवले. मी सेरीफ आणि सान सेरीफ अक्षररचने बद्दल शिकलो, विविध अक्षरांमधील विविध अंतराच्या रचने बद्दल शिकलो, मी शिकलो कशी एक महान अक्षररचना महान होते. ते सुंदर आणि ऐतिहासिक होते, कलात्मकतेचा असा एक सुक्ष्म पैलू जो विज्ञान समजू शकत नाही, आणि तो मला आकर्षक वाटला.
 यातील कशाचाही माझ्या आयुष्यात काहीही व्यावहारीक उपयोग नव्हता.पण दहा वर्षांनी, जेव्हा आम्ही पहिल्या Macintosh व्यक्तिगत संगणकाची रचना करीत होतो, तेव्हा ते सगळे मला परत आठवले. आणि ते सगळे आम्ही Mac च्या रचनेत एकत्रित केले. सुंदर अक्षर रचना असलेला तो पहिला संगणक होता. जर मी महाविद्यालयात तो एक विषय घेतला नसता, तर Mac मधे कधीच विविध अक्षर रचना किंवा सम-अंतराची अक्षर रचना नसती. आणि Windows ने फक्त Mac ची नक्कल केली, त्यामुळे दुसरया कुठल्याही व्यक्तिगत संगणकात ती असण्याची शक्यता नाही. जर मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर मी कधीच सुलेखनाच्या तासिके मधे गेलो नसतो, आणि व्यक्तिगत संगणकात बहुतेक कधीच सुंदर अक्षर रचना आली नसती जी आत्ता आहे. खरंतर मी जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हा भविष्यकाळात पाहुन हे ठिपके जोडणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे वळून पाहताना, हे सर्व फारच स्वच्छ दिसत होते.
 परत मुद्दा असा की, तुम्ही ठिपके पुढे भविष्यकळात पाहुन जोडू शकत नाही, तुम्ही फक्त ते मागे वाळून पाहताना जोडू शकता. म्हणून तुम्ही फक्त खात्री बाळगली पाहिजे की भविष्यकाळात हे ठिपके एका प्रकारे जोडले जातील. तुम्ही काही गोष्टिंवर विश्वास ठेवला पाहिजेत - तुमची अंतर्भावना, नशीब, जीवन, कर्म, जे काही. या द्रुष्टिकोणाने माझी कधीच निराशा केली नाहिये, आणि यानेच माझ्या जीवनात आमुलाग्र बदल केला आहे.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि नुकसाना बद्दल.
 मी नशीबवान होतो - मला ज्याची आवड होती ते मला आयुष्यात लवकर सापडले. मी जेव्हा २० वर्षांचा होतो, तेव्हा वॉझ आणि मी माझ्या आई वडिलांच्या गॅरेज मधे एप्पल चालू केली. आम्ही खुप मेहेनत केली, आणि १० वर्षांत आमच्या दोघांच्या गॅरेज मधील कामापासून एप्पल एक २ अब्ज डॉलर्स ची ४००० पेक्षा जास्त लोकांची कंपनी झाली. आम्ही आमचं सर्वोत्क्रुष्ट निर्माण - मॅकिंतोश - एका वर्षापूर्वी सुरू केलं होतं, आणि मी तेव्हाच ३० वर्षांचा झालो होतो. आणि त्यानंतर मला काढून टाकलं. तुम्ही सुरू केलेल्या कंपनी मधुन तुम्हाला कसं काढुन टाकता येईल? खरंतर, जशी एप्पल वाढली तशी आम्ही अश्या एकाला कामावर घेतलं जो, मला वाटलं, माझ्या बरोबर कंपनी चालवण्यासाठी खुप हुशार होता, आणि साधारण पहिल्या वर्षासाठी सर्व गोष्टी ठीक झाल्या. पण मग आमची भविष्याबाबतची द्रुष्टि वेगळी होऊ लागली आणि शेवटी आमच्यात वितुष्ट आले. आणि असं जेव्हा झालं, तेव्हा आमच्या संचालक मंडळाने त्याची बाजू घेलती. अश्याप्रकारे ३० व्या वर्षी मी कंपनीच्या बाहेर होतो. आणि खुपच सार्वजनिक रित्या बाहेर होतो. माझ्या संपुर्ण प्रौढ जिवनाचे जे लक्ष्य होते ते गेले होते, आणि हे सर्व विनाशक होते.
 काय करावे हे पुढचे काही महिने मला खरंच माहित नव्हते. मला असं वाटलं की मी आधिच्या पिढीच्या उद्योजकांना निराश केले होते - कारण मी माझ्याकडे सुपुर्त केलेली छडी टाकली होती. मी डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नॉईस ना भेटलो आणि अश्या मोठ्या प्रकारे अपयशी ठरल्याबद्दल माफी मागितली. मी एक खुपच सार्वजनिक अपयश होतो, आणि मी तर वॅली मधून पळून जाण्याचाही विचार केला. पण काही गोष्टी हळुहळू मला लक्षात येऊ लागल्या - मला अजुनही मी जे काम केले त्याबद्दल आत्मियता होती. एप्पल मधे झालेल्या घटनांनी ती एक गोष्ट बदललेली नव्हती. मला धुडकावून लावलं होतं, पण मला अजुनही त्याबद्दल आत्मियता होती. आणि म्हणून मी परत सुरुवात करायची ठरवली.
 मला त्यावेळी ते दिसलं नाही, पण असं होतं की एप्पल मधून काढलं जाणं ही माझ्या जिवनात घडलेली एक सर्वात चांगली गोष्ट होती. नवखेपणातील हलकेपणाने यशस्वी होण्याच्या वजनदार पणाची जागा घेतली होती, सर्वच बाबतीत कमी शाश्वती. त्याने मला माझ्या जिवनातील एका सर्वात कल्पक कालावधित प्रवेश करायला मुक्त केलं होतं.
 पुढच्या पाच वर्षांत, मी नेक्स्ट कंपनी चालू केली, अजून एक पिक्सार नावाची कंपनी चालू केली, आणि मी एका वेगळ्याच स्त्रीच्या प्रेमात पडलो. पिक्सार ने जगातील पहिली संगणकीय एनिमेशन चा चित्रपट बनविला, टॉय स्टोरी, आणि ती कंपनी आता जगातील एक सर्वात यशस्वी एनिमेशन गृह आहे. काही उल्लेखनीय घटनांच्या कलाटणी मधे, एप्पल ने नेक्स्ट विकत घेतली, मी एप्पल मधे परत आलो, आणि आम्ही जे तंत्रज्ञान नेक्स्ट साठी विकसित केले होते ते आता एप्पलच्या नवनिर्मितीचा प्रमुख स्थानी आहे. आणि लॉरेन आणि माझे एक सुंदर कुटुंबं आहे.
 मला खात्री आहे की जर मी एप्पल मधून काढला गेलो नसतो तर या पैकी काहिही झाले नसते. ते एक भयानक चवीचे औषध होते, पण मला वाटतं ती रोग्याची गरज होती. कधी कधी जीवन तुमच्या डोक्यावर एखाद्या विटेने आघात करतं. विश्वास सोडू नका.हे नक्की की, जे मी करत होतो ते मला आवडत होतं आणि केवळ त्यामुळेच मी ते करत राहू शकलो.तुम्हाला जे आवङतं ते नेमकं तुम्ही शोधलं पाहिजे,जसं आपण आपल्याला आवङेल असाच जोङीदार शोधतो तसे आवङेल असेच काम शोधले पाहिजे. तुमचं काम तुमच्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा असणारे, आणि समाधानी होण्याचा एकमेव मार्ग आहे असं काम करायचं जे तुम्हाला महान वाटतं. आणि महान काम करण्याचा एकमेव मार्ग आहे की तुम्ही जे करताय ते तुम्हाला आवडलं पाहिजे. तुम्हाला जर ते अजून मिळालं नसेल तर शोधत राहा. शांत बसू नका.जसं मनाच्या सगळ्या बाबतीत होतं तसं, जेव्हा तुम्हाला ते मिळेल तुम्हाला ते कळेल.आणि, कुठल्याही सुंदर नात्याप्रमाणे, जशी वर्ष उलटतात तसं तसं ते आणखी सुंदर होत जातं.

तिमिराकडून प्रकाशाकडे..

 
करिअरच्या संघर्षांच्या टप्प्यावर असणाऱ्या अनेकांना दिवाळीचे दिवस आनंदाचे, उत्साह दुणावणारे वाटतातच असे नाही. अशा वेळेस उत्कट जीवनानुभव देणारा हा सण साजरा करण्याच्या प्रथेकडे डोळसपणे पाहिले तर आपली क्षमता आणि आत्मविश्वास जपण्याचे बळ मिळते आणि आपला प्रवास तिमिराकडून प्रकाशाकडे सुरू होतो.
दिवाळीची लगबग सुरू होते. सगळं जग उत्साहात असतं. टीव्हीवर सोनं, कार, मोबाइल इत्यादींच्या जाहिरातींचा मारा सुरू असतो. 'यंदा दिवाळीला काय नवीन?' ची चर्चा घराघरात चालू असते. बाजारपेठा गर्दीनं फुललेल्या असतात. या आनंदानं भरलेल्या वातावरणात काहीजण मात्र अस्वस्थ असतात. त्यांच्या अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळं, विपरीत घडलेलं असतं. कष्टांना अपेक्षित फळ नसतं किंवा कष्ट कमी पडलेले असतात.   
'पुढच्या दिवाळीला माझ्या कमाईचा मस्त ड्रेस आणीन तुला,' असा गेल्या दिवाळीत बहिणीला दिलेला शब्द कुणाला आठवत असतो. तेव्हा सगळं नीट चाललं होतं, पण स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही. कुठला जॉब आणि कुठली ओवाळणी? कुणाला नोकरीत अचानक ब्रेक मिळालेला असतो, त्यामुळे यंदा पाडवा नेहमीसारखा होणार नाही, याचं वाईट वाटत असतं. एखाद्या छोटय़ा उद्योजकानं क्लाएंटला वेळेवर डिलिव्हरी देऊनही ऐनवेळी 'सॉरी, अडचण आहे एवढा महिना' असं म्हणत क्लाएंटने पार्ट पेमेंट केलेलं असतं. आता स्वत:ची खरेदी दूरच, उलट कर्मचाऱ्यांच्या वेतनाची चिंता असते. खूप हरल्यासारखं वाटत असतं. कशातच भाग घेऊ नये, काहीच करू नये, दूर पळून जावं अशी भावना असते. आतून कुठलीच प्रेरणा, उभारी येत नाही. दिवाळीच्या दिव्यांकडे पाहून पुन:पुन्हा चिडचिड होत असते.
कशाचा तरी प्रचंड राग येत असतो. कधी स्वत:चा, तर कधी अडचणीत आणणाऱ्यांचा. 'आपण कमी पडतो आहोत' या पराभूत भावनेतून आलेला असहाय संताप काढायला दिव्यांचंही निमित्त पुरतं. अशा वेळी हवा असतो खांद्यावर एका मत्रीच्या स्पर्शाचा आधार. 'मला समजतेय तुझी तगमग,' असं सांगणारी एक समंजस नजर. अशा व्यक्ती आजूबाजूला असतातही, पण आपला इगो (स्वाभिमान) आड येतो. हळवेपण लपवण्यासाठी आपण रागाचा आधार घेतो. 'माझं दु:ख कुणालाच समजणार नाही,' असं ठरवून सगळ्याकडे पाठ फिरवतो. 'आपल्याला किती निर्थक वाटतंय' याचं स्वत:पाशीच उदासपणे किंवा रागाने घोळवत राहतो. मग काही करायची प्रेरणाच उरत नाही.
स्वत:ला असं विझलेपण येतं तेव्हा किंवा उदासपणाच्या अंधारात बुडालेले लोक दिसतात तेव्हा आठवण येते, 'प्रेरणा' या विषयावरच्या एका मुक्त चच्रेची.   
'अतिशय अवघड परिस्थिती असूनही तुम्ही आजपर्यंत जिथे काहीतरी खूप चांगलं केलंत ते कशामुळे केलं? त्यामागची प्रेरणा कुठली होती?' असा प्रश्न एका चच्रेला घेतला होता. अनेक उत्तरं आली, 'माझ्या आवडीचं काम होतं, त्यानेच प्रेरणा दिली' 'कामात १०० टक्के द्यायचे, असं माझ्या आई/ वडील / गुरू / कुणीतरी सांगितलं होतं, ते मी मनापासून पाळलं', 'माझ्या पत्नीने, मुलाने, कुटुंबाच्या विचाराने प्रेरणा दिली', 'मी कुठलंही काम तसंच करते' अशी विविध उत्तरं आली. एकजण म्हणाला, 'व्यवसायाच्या एका अवघड टप्प्यावर होतो. काहीच करू नये अशी हतबलता आली होती. आत्मविश्वास पार संपला होता. अशा वेळी 'आता तू यातून उठत नाहीस, संपलास!' असे एका सहव्यावसायिकाने आव्हान दिले. मला संताप आला. 'आता कसं जमत नाही तेच बघतो' या जिद्दीनं पेटलो. प्रत्येक समस्येला भिडलो, सामोरा गेलो, कामात पूर्ण जीव घातला आणि जिंकलो.' 
'कुणाशी जिंकलास?'
'त्याच्याशी. आव्हान देणाऱ्याशी.' तो म्हणाला. तसे संवादक (फॅसिलिटेटर) हसले.
'तू स्वत:शी जिंकलास मित्रा. तुझ्या हतबलतेशी जिंकलास. अक्षमतांशी, आळसाशी, मनातल्या सबबींशी जिंकलास. तो आव्हान देणारा सहव्यावसायिक फक्त निमित्त होता, ज्यानं तुला शंभर टक्के द्यायला लावलं. येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो तुझी प्रेरणा झाला त्या वेळी.' थोडं थांबून संवादकांनी विचारलं, 'तू जेव्हा जेव्हा अपेक्षेपेक्षा काहीतरी खूप चांगलं करतोस तेव्हा तेव्हा असंच काहीतरी घडलेलं असतं का?'
'..हो. बहुधा..' तो आठवत आठवत म्हणाला.
'म्हणजे कुणी आव्हान केलं नाही तर तुझ्या हातून काही विशेष घडणारच नाही? कठीण परिस्थितीबद्दल तक्रार करत चिडचिडत राहशील? वेगळ्या मार्गाचा विचारच करणार नाहीस?'
संवादकानं टाकलेला गुगली लक्षात येऊन तो विचारात पडला.
'खुन्नस घेण्यानं शक्ती येते, हे खरं. प्रेरणा येण्यासाठी कधीतरी खुन्नसची मदत घ्यावीही लागते. पण दर वेळी खुन्नसनं काम करावं लागणं ही काही फारशी चांगली सवय नाही. एकदा आपली क्षमता आपल्याला समजली, काम करण्याची इच्छा प्रामाणिक आहे, तर मग प्रेरणा कुठूनही घेता यायला हवी. कोणीतरी आव्हान देईल, याची दर वेळी वाट बघत थोडेच बसणार? मग तुम्ही फक्त कुणाला तरी दाखवण्यासाठीच काम करता, स्वत:साठी करत नाही. तुमच्यातल्या क्षमतेचे नियंत्रण तुम्हाला उचकवणाऱ्या कुणाच्या तरी हातात आहे, असाच त्याचा अर्थ 
होतो ना?'
संवादकांच्या प्रश्नावर गटातले सगळे विचारात पडले. कधी ना कधी, कुठे ना कुठे प्रत्येकानं हा अनुभव घेतलेला होता.  
'असं सणकीसरशी काही करणं तात्पुरतं असतं. तेवढा वेळ ती ऊर्जा जिद्दीनं टिकवली जाते. पण जोरदार उसळी मारून डोंगर चढल्यानंतर पुढे दरीच असते. असं खाली-वर हेलकावणं फार वेळा होत राहिलं की, पुढे 'तणाव व्यवस्थापना'च्या शिबिराला जाणे किंवा रक्तदाबाच्या गोळ्या घेणे अटळ असते. शांतपणा आपल्या आतूनच मिळवता यायला हवा.'
'परिस्थिती जशी असते, तशीच असते मित्रहो! फरक पडतो तो त्याकडे बघण्याच्या आपल्या अ‍ॅप्रोचमुळे. समोर उभी असणारी प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तू आपल्याला काहीतरी देऊ शकत असते. अवघड परिस्थितीतही काहीतरी चांगलं असतंच. ते शोधायला शिकल्यानंतर आपल्याला रस्ता सापडत जातो. छाती धडधडायला लागली की, आपण हातपाय गाळून बसतो की 'ऑल इज वेल' म्हणत स्वत:तला विश्वास जागवतो यावर सगळं ठरतं.' 
त्या मुक्त चच्रेनं एक नवी नजर दिली. कुठल्याही गोष्टीत खोलवर जाण्याची शक्ती दिली. आपल्याला जे कमी पडतंय ते भोवतालात शोधायला शिकवलं. आपण उत्साहात आहोत म्हणून समोरच्या पणतीच्या ज्योती तेजाळणार नसतात किंवा उदास आहोत, म्हणून विझणारही नसतात. परिस्थिती तशीच राहणार असते. तरीपण त्या दीपज्योतींकडून काय घ्यायचं आपण?
तर पणतीचं स्नेहल तेवणं. वातीच्या मदतीनं पणती जवळच्या इंधनाचा पर्याप्त वापर करते. तिच्यात सगळं पेट्रोल क्षणभरात खाक करणारा भडका नसतो, तर एक मंद शांतपण असतं आणि म्हणून सातत्य. त्या शांतीतही अग्नी असतोच, ज्यामध्ये दुसरी पणती पेटवण्याची क्षमता असते किंवा काहीही जाळण्याचीदेखील. पण जवळची ऊर्जा नीट वापरणं हा पणतीचा 'बाय डिफॉल्ट' गुणधर्म असतो. म्हणून तेवत्या ज्योतीकडे नुसतं पाहूनही मनाला शांत वाटतं.
ज्योतीच्या प्रतीकाकडे कधीतरी अशा दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर दिवाळी म्हणजे मनाला उजळवणारा, तिमिरातून तेजाची दिशा दाखवणारा, विलक्षण सौंदर्यदृष्टी असलेला, एक परिपूर्ण, स्थिर विचार वाटला. दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाच्या प्रथेमागे कुणा ना कुणासाठी कृतज्ञता आहे किंवा कुठल्या ना कुठल्या नात्याची जपणूक आणि जोडीला निसर्गासोबतची अनुभूती. दिवाळी अतिशय समग्रतेनं उत्कट जीवनानुभव देते. फक्त त्याकडे तसं पाहायला हवं.
वसुबारसेला सवत्स धेनूची पूजा - आपल्या मुलाबाळांना दूध देणाऱ्या गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच आई-मुलांच्या नात्याचं दृढीकरण. धनत्रयोदशीला एकीकडे धन्वन्तरी जयंती आणि सोबत यम-दीपदानदेखील. नरक चतुर्दशीमागची मुख्य संकल्पना आहे, अनिष्ट प्रवृत्तींचा नाश. पण अभ्यंगस्नानाची प्रथा आणखीही बरंच काही देते. ऐन थंडीत भल्या पहाटे आई-आजीनं घरातल्या लहान-थोरांना तेल-उटणं लावून देण्यात प्रत्येक वयाच्या स्पर्शाच्या गरजेचा विचार आहे. अनुभवलीच पाहिजे अशी आश्विनातली सुखदायी थंडी. त्या थंडीत पाठीवरून, अंगावरून फिरणारा तो मायेचा स्पर्श ऊब देतो, नि:शब्दपणे आधार देतो. तसंच नातं बळकट करतो पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान करणारा पाडवा आणि भाऊ-बहिणींची भाऊबीज.
सण आणि प्रथांमध्येच हे बांधून टाकल्यामुळे प्रत्येक घराला आणि प्रत्येक व्यक्तीला हे भाग्य निश्चितपणे मिळणारच. या सर्वाच्या सोबतीला सतत पाश्र्वभूमीवर आहे पणतीची ज्योत. नव्हे, दीपांची आवली. त्यामुळे नात्यांमधली समग्रताही पणतीच्या प्रतीकासोबत आपोआप जोडली गेली आहे.
दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासोबतही असंच बरंच जोडलेलं. धनलक्ष्मीच्या पूजेआधी 'लक्ष्मी' म्हणून नव्या केरसुणीची पूजा करण्यामागे स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलंय. लक्ष्मीपूजनाला आश्विनातल्या अमावास्येचा मुहूर्त शोधून पूर्वसुरींनी अमावास्येला शुभदायी तर केलंच वर त्या रात्रीच्या सौंदर्याचा विशेष सन्मान केलाय. दिवाळी म्हणजे निसर्ग आणि मानवाच्या परस्परपूरकतेचा एक परिपूर्ण अनुभव वाटतो.
दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तशी या समग्र, सर्वसमावेशक विचारातली परिपूर्णता टप्प्याटप्प्यानं जाणवत गेली. आता 'दिवाळी' या शब्दासोबत एक चित्र (व्हिज्युअल) माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं.   
अमावास्येच्या रात्री एक एकांडा प्रवासी पाठीवर बरंच ओझं घेऊन अंधारातून चालला आहे. अंधारात चेहरा स्पष्ट दिसत नाही, पण कल्पनाचित्रात सहसा ते आपणच असतो. तो प्रवासानं थकला आहे. त्याच्या मनात एक अस्वस्थता आहे. 'कधी संपेल हा थकवणारा प्रवास? की संपणारच नाही? कधी पोहोचेन मुक्कामाला? मुक्कामाच्या गावातले लोक कसे असतील?' अशी साशंकताही त्याला मधूनमधून छळते आहे. वातावरणात थोडी बोचरी, पण सुखद थंडी आहे. त्या अंधारात प्रवाशाला दूरवर दिव्यांच्या ठिपक्यांची ओळ दिसते. अपरात्री अचानक मुक्काम दिसल्यावर तो घाईनं गावापाशी पोहोचतो. वर निरभ्र आकाशात चंद्र नसताना एकेक तारा आणखी लखलखीत चमकत असतो आणि खाली प्रत्येक दारात असतात उजळत्या दीपमाला. घराघरांच्या कोनाडय़ांत लावलेल्या मंद दिव्यांच्या ज्योती त्याचं नि:शब्दपणे स्वागत करत असतात. त्या ज्योतींकडे पाहून त्याला अतिशय शांत वाटतं. त्याच्या मनात त्या गावाबद्दलच एक विश्वास जागतो. ते अनोळखी गाव त्याला एकदम आपलं वाटतं. दिव्याच्या ज्योतींकडून आकाशातल्या ज्योतींकडे पाहताना त्याचे हात आपोआप जोडले जातात आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, दीपज्योती नमोस्तुते!

Wednesday 25 September 2013

मोझेस


मोझेस
येथे जा: सुचालन, शोधयंत्र
मायकेल अ‍ॅँजेलो याने घडवलेले मोझेसचे शिल्प

मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.

मोझेस : (इ. स. पू. सु. चौदावे-तेरावे शतक). ज्यू राष्ट्रसंस्थापक, सर्वश्रेष्ठ ज्यू प्रेषित व ज्यूंना त्यांची धार्मिक-नैतिक सामाजिक संहिता देणारा एक श्रेष्ठ नेता. मोझेस (हिब्रू मोशे) हा शब्द ईजिप्शियन भाषेत ‘मोसे’ म्हणजे मुलगा या अर्थाचा आहे. त्याचा जन्म ईजिप्तमध्ये झाला. मोझेसचा पिता अम्राम व आई जोशेबेद. हे दोघेही लेव्ही जमातीचे ज्यू होते. परंतु ज्या दुसरा रॅमसीझ (कार. इ. स. पू. सु. १३०४-१२३७) ह्या ईजिप्ती राजाच्या (फेअरो) राज्यात ते गुलाम म्हणून राहत होते, त्याने ज्यूंच्या मुलांना नाईल नदीत बुडवून मारावे असा हुकूम काढला होता. मोझेसला त्याच्या आई-वडिलांनी तीन महिने कसेतरी गुप्तपणे सांभाळले; परंतु शेवटी त्यांनी त्याला गवताच्या पेटाऱ्यात ठेवून नाईल नदीत सोडून दिले. सुदैवाने फेअरीची राजकन्या नदीवर आंघोळीस आली असता तिला हे मूल आढळले व ते तिला इतके आवडले, का तिने त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे पालनपोषण केले व त्याचे नाव ‘मोझेस’ असे ठेवले. मोझेस मोठा झाल्यावर एकदा त्याने एक ईजिप्शियन माणूस एका ज्यूचा छळ करीत असताना पाहिले. लगेच त्याने त्या माणसास ठार केले. मोझेसच्या रक्तातला हा गुण उत्तरोत्तर अधिक प्रगट होऊ लागला. फेअरोच्या हाती सापडण्यापूर्वीच तो तेथून पळाला व जेथ्रो ह्या मीडियनच्या धर्मगुरूकडे आला. तिथे त्याने त्या धर्मगुरूची मुलगी झिप्पोरा हिच्याशी लग्न केले. मोझेसपासून जेरशोम व एलिएझर हे दोन पुत्रही झाले. तिथेच मोझेसने चाळीस वर्षे मेंढपाळाचा व्यवसाय केला. एकदा होरेब पर्वतावर मेंढ्या चारीत असता मोझेसला एका झुडपात अग्निज्वाला दिसली आणि तरीही ते झुडूप जळत नव्हते. तो जवळ गेला तेव्हा त्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला व ईजिप्तला परत जाऊन आपल्या भाऊबंदांना सोडवून आणण्याचा परमेश्वरी आदेश मिळाला. त्याप्रमाणे तो ईजिप्तला आला. तिथे त्याला त्याचा भाऊ ⇨ एअरन  भेटला. ज्यूंना सोडून देण्यासाठी फेअरोचे मन वळविणे कठीण आहे असे दोघा भावांना पटले. मग मोझेसच्या दैवी शक्तीमुळे येहोवाने ईजिप्तवर दहा वेळा प्लेगच्या साथी आणल्या. शेवटी ईजिप्शियन लोकांनी ज्यूंचा छळ थांबवून त्यांना सोडून दिले. मग सारे ज्यू आपली मेंढरे घेऊन सुएझच्या दक्षिणेकडे वसाहत करण्यासाठी निघाले. त्यांचे नेतृत्व मोझेसने केले. हा प्रसंग ‘एक्झोडस’ म्हणून बायबलमध्ये व इतिहासातही प्रख्यात आहे. त्यांच्यावर अनेक संकटे आली; पणे त्यांना ईश्वराने-येहोवाने सांभाळले. सिनाई येथे सारे आले तेव्हा त्यांचे मोठे स्वागत झाले. इथेच या पर्वताच्या शिखरावर (जेबेल मूसा) मोझेसला ईश्वरी साधात्कार झाला व ईश्वराने त्याला आपल्या ‘दशाज्ञा’ वा दहा नीतिनियम दिले. सिनाई पर्वतावर मोझेस ४० दिवस ईश्वराच्या सान्निध्यात होता. नंतर खाली येऊन त्याने आपल्या भाईबंदांना कादेश येथे नेले. तेथून ३८ वर्षांनंतर ते पूर्वेकडे निघाले. एसौ व मोआब याच्या प्रदेशातून त्यांना सुखरूपाणे जाता आले; परंतु पुढे त्यांच्या मार्गात प्रतिबंध आला. जॉर्डन नदी ओलांडून पलीकडे कॅनन प्रदेशात जाता येणार नाही व आपला अंत काळही जवळ येऊन ठेपला आहे असे पाहून मोझेसने आपल्या साऱ्या बांधवांना बोलावून त्यांना शेवटचा संदेश दिला (‘ड्यूटेरोनॉमी’ वा ‘पेंटाट्यूक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बायबलमधील  पहिल्या पाच पुस्तकांत हा संदेश ग्रंथित आहे) नंतर सर्वांना आशीर्वाद देऊन तसेच जोशुआ आपला वारस नियुक्त करून मोझेस नेबो पर्वतावरील पिसगाह शिखरावर गेला व तिथे त्याने वयाच्या एकशेविसाव्या वर्षी देह ठेवला. इ. स. पू. सु. १३९२ ते सु. १२७२ असा त्याचा आयुकाल अभ्यासक मानतात.



ज्यू धर्माप्रमाणे येहोवाने इझ्राएल राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोझेसला प्रेषित बनविले होते व त्याच्या द्वारा ईश्वर आपल्या साऱ्या आज्ञा ज्यू जनतेला कळवीत राहिला. मोझेस हा स्वभावाने अत्यंत शांत होता, असे त्याचे वर्णन आढळते. ‘ज्याने ईश्वराला समोरासमोर पाहिले असा धर्मप्रेषित एकटा मोझेसच होय’, अशी त्याची थोरवी गायिली जाते. ज्या काळात मोझेसने आपल्या बांधवांची एकी घडवून आणली त्या काळात येहोवा या देवाचा नाममहिमा नुकताच सुरू झाला होता. अशा काळात मोझेसच्या प्रयत्नांमुळे ज्यू जनतेने ईश्वरावर श्रद्धा ठेवली. ‘सिनाई पर्वतावरून जे वादळ आले त्यामुळे साऱ्या वाळवंटावर पावसाचा वर्षाव झाला व जिकडे तिकडे पिके डवरून आली’, या त्यांच्या उद्‌गारावरून मोझेसने ज्या ईश्वरावर त्यांना श्रद्धा ठेवायला सांगितले, त्याने अनेक चमत्कार केल्याच्या कथा आहेत. मोझेस खरोखरच त्यांना मदत करणारा ठरला. मोझेसची खरी कीर्ती त्याने घालून दिलेल्या नियमामुळे विशेष झाली आहे. मोझेसच्या ड्यूटेरोनॉमीतल्या नियमांमुळे ज्यू लोकांची एकी झाली, त्यांच्यात राष्ट्रीय भावना निर्माण झाली; इतकेच नव्हे, तर धर्माची खरी कसोटी विधी आणि पूजा यांवर अवलंबून नसून नैतिक आचारणावर आहे, हा दृष्टिकोन त्यांना प्रथम मोझेसकडून मिळाला.


मायकेलअँजेलो या प्रसिद्ध कलावंताने तयार केलेल्या मोझेसच्या पुतळ्यात मोझेसच्या कपळातून शिंगे बाहेर आलेली दाखविली आहेत. मोझेसच्या कपाळावरील शिंगाची कल्पना मूळ हिब्रूवरून लॅटिनमध्ये झालेल्या चुकीच्या भाषांतरामुळे आली आहे. ’जेव्हा मोझेस सिनाई पर्वतावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावरील कातडी चमकत होती’ या बायबलच्या वाक्यातील मूळ हिब्रूतील ‘चमकत होती’ या अर्थाचा शब्दप्रयोग ‘(तिच्यातून) किरणे निघत होती’ असा आहे. लॅटिनमध्ये ‘किरण’ व ‘शिंग’ यांचा घोटाळा केला गेला. मोझेसच्या जीवनातील प्रसंगांवर अनेक प्रख्यात चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी आपल्या चित्र-शिल्पाकृती तयार केल्या आहेत.

Saturday 17 August 2013

राजन खान

राजन खान

मराठीतले नावाजलेले कथा आणि कादंबरीकार.
त्यांनी ग्रामीण भागातील दलित आणि मुस्लिम समाजाचे (मुख्यतः स्त्रियांचे) प्रश्न, व स्वार्थी राजकारणी लोकांनी त्यांचा घेतलेला गैरफायदा ह्याचे विदारक पण अतिशय वास्तव चित्र कादंबऱ्यांद्वारे मांडले आहे.
प्रकाशित साहित्य

  •     सत्‌ ना गत (कादंबरी)
  •     हिलाल (कादंबरी)
  •     जिनगानी (ललित)
  •     बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी
  •     एडनच्या बागेतील सर्प (कथा संग्रह)
  •     पिढी (वैचारीक)
  •     पांढऱ्या जगातला अंधार
  •     बाई जात (कथा संग्रह)
  •     ग्वाही आणि वेगळी नसलेली गोष्ट (एकत्र २ कादंबऱ्या)
  •     गूढ (कथा संग्रह)
  •     जिरायत (ललित)
  •     इह (माहितीपर)
  •     मीच मला माहिती नाही (कादंबरी)
  •     किंबहुना (ललित)
  •     सध्या सारं असं चालू आहे (कथा संग्रह)
  •     तत्रैव (कथा संग्रह)
  •     एक लेखक खर्च झाला (कथा संग्रह)
  •     अजब गजब जगणं वागणं (वैचारिक)
  •     एकूण माणसांचा प्रदेश (कथा संग्रह)
  •     बीजधारणा (कादंबरी)
  •     काळ (कादंबरी)
  •     गाठी गाठी जीव (कादंबरी)
  •     जन्मजंजाळ (कथा संग्रह)
  •     हयात आणि मजार (कादंबरी)
  •     यतीम (कादंबरी)
  •     जातवान आणि विनशन (कादंबरी)
  •     वळूबनातली कामधेनू (कादंबरी)
  •     चिमूटभर रुढीबाज आभाळ (कादंबरी)


पुरस्कार
    महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पटकथा पुरस्कार (चित्रपटः धुडगूस, २००९)

इतर
    २००८ साली मराठी साहित्य संमेलनाच्या उमेदवारांपैकी एक (विरुद्ध: प्रा. हातकणंगलेकर)
    राजन खान यांनी २००९ साली मी संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते.

राजन खान यांचे घणाघाती भाषण

 

१. मला एक जण भेटायला आला तो ढोंगीपणे शिवाजी महाराज म्हणायच्या आधी 'छत्रपती' हा शब्द वापरत होता. प्रत्येकवेळेस छत्रपती म्हणताना त्याची देहबोली मी पाहात होतो. तो उच्चार ढोंगी होता. तसेच प्रत्येक वेळेस तुकारामांचा उल्लेख करताना तो जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणत होता. मी त्याला म्हणालो की महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुर्‍हाणपूर या गावापलीकडेही तुकारामांचे नांव कुणाला माहीत नाही. ते जगद्गुरू कसे? जगात सहाशे पन्नास कोटी लोक राहतात व महाराष्ट्रात दहा कोटी! म्हणजे बाकीच्या सहाशे चाळीस कोटी लोकांना जवळपास माहीतही नसलेला संत आपण जगद्गुरू म्हणून नावाजतो याला काही अर्थ आहे का?
२. मराही साहित्यात मुसलमान कायम क्रूर म्हणून रेखाटला गेलेला आहे. मुसलमानांची वागणूक, राहणी याची अजिबात कल्पनाही नसताना मुसलमान रेखाटणारे मराठी साहित्याचाच अपमान करत आहेत.
३. मराठी लेखक 'स्वतःच्या बाहेर जाऊन' काहीही लेखन करत नाही. संशोधन करणे, कष्ट काढून जीवनचे इतर पैलू तपासणे, अभ्यासणे व नंतर रेखाटणे हे प्रकार तो करतच नाही. ब्राह्मणाला सांगीतले की महार माणूस लेखनात चितार, तर तो ग्रामीन शब्दांचा समावेश असलेले लेखन करतो इतकेच! प्रत्यक्षात महाराची जीवनशैली तपासण्याची इच्छा नसते. उलटे महाराला जर सांगितले की ब्राह्मण माणसे कशी असतात हे लेखनात चितार, तर तोही आजवर वाचलेल्या साहित्याचा पगडा म्हणून तसेच लिहितो. तो कधीही ब्राह्मणाचे आचरण जवळून पाहात नाही. ज्यांनी कोणी असे परजातीय चित्रण केलेले आहे तेही त्यांच्या अनुभवात जे आहे तितकेच! त्या पलीकडे जाऊन नाही.
४. मराठीतीत बहुतेक साहित्य हे असेच आहे. आजवर मी (मी म्हणजे राजन खान), हमो व आणखीन काही समकालीन माणसांनी वयाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राने, मराठी भाषेने गौरवलेले साहित्य वाचले. मात्र आज या टप्यावर आम्हाला असे वाटते की आपण नेमके काय वाचले? तर ते साहित्य, ज्यात 'मी' व 'मी पाहिलेले आयुष्य' या पलीकडे काहीही नाही? कल्पनाविस्तार, संशोधन, प्रवास, अनोळखी जगाचा परिचय, त्यात वास्तव्य, सखोलतेची अशी पातळी की जेथे मानवजमातीतील कोणत्याही प्रदेशात, वंशात त्या साहित्याचे मूल्य अमूल्य ठरावे असे मराठी साहित्यात काही मिळाले नाही. एखाद्याने लेखन केले तर त्याच्या कथेत महार किंवा एखादे ग्रामीण पात्र जरूर असते. ते पात्र म्या, व्हय, नाय असे शब्दही बोलते. मात्र फक्त ग्रामीण भाषेचा बाज हे ग्रामीण जीवन नाहीच.
५. जागतिक पातळीवरच्या लेखकांचे लेखन महाराष्ट्रात गौरवले जाते. आजही जगाच्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे शेक्सपिअरचा एक खेळ चाललेलाच असतो. महाराष्ट्राचे साहित्य मात्र जागतिक पातळीवर गेलेले नाही. याला मराठी रसिकांच्या कोत्या आणि लेखकांच्या मत्सरी प्रवृत्ती कारणीभूत आहेत. तसेच, मराठी भाषेने आजवर लेखकाला भौतिक श्रीमंती प्रदान केलेली नाही. ज्या रस्त्यावर प्रकाशक गाडीतून फिरतो त्या रस्त्यावर लेखक फुटपाथवरून पुढच्या कथेचा विचार करत चाललेला असतो व दुसरा विचार त्याच्या मनात हा असतो की पैसे आणले नाहीत म्हणून बायको किती आणि कशी बोलेल?
६. काळाच्या पुढचे, निदान शंभर वर्षे पुढचे असे लेखन मराठी माणूस करतच नाही. तो त्याच्याच जीवनाचे चित्रण करत राहतो. अशा साहित्यामुळे ते साहित्य वाचणारा समाजही तेथेच राहतो. उलट, काही महान महाराष्ट्रीय साहित्यिकांचे साहित्य वाचून तर समाज मागेच जातो. समाजाच्या बौद्धिक प्रगतीसाठी व नवीन आव्हाने स्वीकारण्याच्या वृत्तीच्या वाढीसाठी साहित्यात नवेपणा, नवीन पैलू, काळाच्याही पुढचे सोचण्याची क्षमता साहित्यिकांमध्ये असायला हवी व असल्यास ती त्यांनी जोपासायला हवी व समाजाने त्या साहित्यिकांना आधार द्यायला हवा.
७. मोठमोठे कवी, मोठमोठे लेखक जे प्रचंड गौरवले गेले व ज्यांचे साहित्य अभ्यास म्हणून अभ्यासण्यात आले व ज्यांनी साहित्याच्या दर्जा
देव ,धर्म आणि जात सगळे काल्पनिक : राजन खान


 

मी कुठल्याच धर्माचा नाही , देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे . देव , धर्म आणि जात काल्पनिक आहे . असे प्रतिपादन राजन खान यांनी संजीवनी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले .

त्यांनी यावेळी सांगितले की , आजपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव , धर्म मानणा - या लोकांनीच केला आहे . या देशातील ६० टक्के लोक गरीब आहेत . सर्व देव मानणारे आहेत . देव त्याचं भल्ल का करत नाही ? गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत . भ्रष्टाचारी अधिका अधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि देवबाप्पा काहीच करायला तयार नाही . हि या देशाची वाईट अवस्था आहे . या जगात एक ही मुसलमान खरा मुसलमान नाही , एक ही हिंदू खरा हिंदू नाही , एक ही ख्रिश्चन खरा ख्रिश्चन नाही . त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत . गर्वसे कहो म्हणणारे तेवढ्या पुरतेच त्या त्या धर्माचे आहेत .

धर्म त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होइल . प्रत्येक धर्म मुलभूत पणे एक शिकवण देतो , दुस - या माणसाला माणूस म्हणून वागव , किमंत दे . धर्माचा गर्व मानणारे , सर्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत . खरे धार्मिक नहीत . दोन पर्याय आहेत , एक धर्म सोडा जे जगायचे आहे तसे जगा . किवा विनंती पूर्ण सागणे आहे कि जो धर्म आहे तरी नीट पाळा , इमानदारीत पाळा . कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही . मारण्या आधी जगणार का हा प्रश्न आहे . मला वाटते बिनधर्माचं नैतिक जगता येते . नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुस - या माणसाशी मायेने , आपुलकीने आणि माणसा सारखं वागणे म्हणजे नैतिकता . पाळायचा असेल तर खरोखर धर्म पाळा , नाहीतर धर्म सोडा . आपला धर्म शोधा त्याचा अभ्यास करा त्याचे पालन करा , असे खान यांनी स्पष्ट केले . मनोज पाटील यांनी प्रास्ताविक पाहुण्याची ओळख करून दिली . अध्यक्षस्थानी पंढरीनाथ नाईक होते . सूत्रसंचलन कोमल जोशी यांनी केले . ईशस्तवन तेजल पाटील यांनी सादर केले .

जागतिक साहित्य निर्मितीसाठी सर्व भेद सोडावे लागतील- राजन खान
 जागतिक साहित्य मानवतावादी व विज्ञानवादी असते. ते निर्माण करण्यास सर्व भेद सोडावे लागतील, असे प्रतिपादन २० व्या नवोदित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन खान यांनी केले.
पुष्पक मंगल कार्यालयातील महात्मा फुले साहित्यनगरीत आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे, मराठा सेवासंघाचे प्रदीप साळुंके, सतीश मडके आदींची उपस्थिती होती. पोटाला आधार देण्याची धमक मराठी भाषेत आहे. मात्र, शिक्षणसम्राट असलेले नेते व त्यांच्यामागे धावणारे तथाकथित लेखक यांच्यामुळे मराठी भाषा अडचणीत आली आहे. साहित्यात इंग्रजी भाषेचा वापर करणारे बांडगे साहित्यिकच भाषेच्या मुळावर उठले असल्याचे खान यांनी सांगितले.
बोराडे यांनी साहित्य म्हणजे माणसाच्या जगण्याचा इतिहास असतो. तो तटस्थपणेच मांडायला हवा, असे सांगून विशिष्ट स्थितीत होत असलेल्या संमेलनातून इतिहासात कधी नव्हे, इतक्या तीव्र स्वरूपात निर्माण झालेल्या पाणी, चारा व रोजगार टंचाईचे प्रतििबब उमटणे गरजेचे आहे, असे नमूद केले. स्वागताध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी भीषण परिस्थितीला लेखणीच्या माध्यमातून पर्याय मिळावा. वास्तव सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी संधी म्हणून संमेलन आयोजित केल्याची भूमिका मांडली.
कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी साहित्य परिषदेच्या कामांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ यादव यांनी आभार मानले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना संमेलनाध्यक्ष खान व बोराडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘आता सावध राहा’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी हरी नरके समितीने केंद्राकडे प्रस्ताव दिला. वर्ष-दीड वर्षांत त्याला मंजुरी मिळेल. मराठीचे भाषिक संवर्धन करण्यासाठी केंद्राकडून दरवर्षी ५०० कोटींचा निधी उपलब्ध होईल, असे सांगून खान यांनी आता सावध राहा, असा सल्ला दिला. राज्यातील अनेक िशगारू संस्था या ५०० कोटींकडे डोळे लावून बसल्या आहेत. नाही तर पुन्हा मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकीर असे घडेल आणि अनेक फकीर सध्या पुण्यात संस्था काढून बसले असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राने संत तुकाराम, ज्ञानेश्वर या कवींची देवळे बांधली. त्यांची नित्यनियमाने पूजा केली जाते. मात्र, त्यांनी दिलेला विचार देवळांमध्येच कोंडला असल्याची खंतही खान यांनी व्यक्त केली.