Wikipedia

Search results

Saturday 2 March 2013

अस्मिता

                                          ।। श्रीयोगेश्वरोविजयतेतराम्।।

अगदी सुरुवातीला एक काळ असा होता की , मानव टोळ्यांनी रहात असे. त्यात समर्थ आणि असमर्थ यांत नेहमी लढाया होत. समर्थ असमर्थाला लुटत असे , मारत असे. might is right. ताकदवान असलेला आपले राज्य , आपली सत्ता गाजवीत असे. अजूनही ताकदीचा कायदाच चालू आहे. बाहुबलानंतर बुद्धिचा might आला. त्यानंतर संख्येचा might आला व त्याही मागे वित्ताचा might आला. मानव अजूनही might is right मधून बाहेरच येत नाही. उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्यांनी सांगितले survival of the fittest म्हणजे समर्थानी जगावे व असमर्थानी मरावे. unfit माणसे ही समर्थाचे खाद्य म्हणूनच जन्माला आली आहेत. म्हणून असमर्थांना गुलाम बनवीत. पुढे माणूस थोडा सुसंस्कृत झाला. त्याला वाटू लागले की , माणसानेच माणसाला खावे हे काही चांगले नाही. आपण जगले पाहिजे आणि दुसऱ्याला जगू दिले पाहिजे. ' जगा आणि जगू द्या. ' live and let live चा काळ आला ; पण प्रत्यक्षात समर्थ जास्त कमवतो आणि असमर्थ कमवूच शकत नाही. जगा आणि जगू द्या हे काही मोठे तत्त्वज्ञान नाही.

एक मुलगी होती. खूप शिकली , पुढे तिने क्कद्ध. ष्ठ. केली. नंतर तिचे लग्न झाले. कालांतराने तिला प्रसूतीगृहात जावे लागले. बाळंतीण झाली. बिछान्यावर पडली होती. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली ' बाई तुमचं मूल रडतय. ' तेव्हा तिने सांगितलं- ' हे बघा मी ' जगा आणि जगू द्या ' या विषयावर प्रबंध लिहिला आहे. मुलाला रडू दे आणि मला झोपू दे! ' हे चालेल का ? तिला आई म्हणू का आपण ? आई ती जी मुलाकरीता झोप उडवते. जगा आणि जगू द्या हे जर जीवनाचे तत्त्वज्ञान झाले असते , तर आपण कोणीच लहानाचे मोठे झालो नसतो.

मी तुला जगवीन , मी तुला मोठा करीन , तुला चालता येत नाही , उभं रहाता येत नाही. तुला स्वत:च्या पायावर या जगाच्या अंगणात उभं करीन. त्याच्याकरिता खटपट करीन , जाग्रणं करीन. ही वृत्ती असते ती आई. unfit ला fit करणे हे आईचे हृदय आहे.

fitting the unfit to survive. हे जे काम आहे , ते काम करणारा तो धर्म. त्यासाठी ' धर्म ' आला. मातृहृदयाच्या ऋषिंनी तळमळीतून तो उभा केला.

म्हणून माणसाला उभं करतो तो धर्म. ' मी कोणी तरी आहे ' हे समजावणारा , बुद्धित उतरवणारा तो धर्म. धर्माचे हे पहिले लक्षण. ' मी कोणी तरी आहे ' हा जीवनाचा पहिला आधार ( stand) आहे. ही अस्मिता जागृत करण्याचं काम धर्म करतो.

' मी आहे तसा दुसराही आहे ' हा जीवनाचा दुसरा stand. ' माझ्याबद्दल अस्मिता आणि दुसऱ्याचा सन्मान दुसऱ्याबद्दल भाव ' धर्म जागृत करतो. या दोनही जाणिवा हा जीवनाचा पाया आहे. या जाणिवा प्रत्येक माणसात उभं करण्याचं काम धर्म करतो.

माणसाची अस्मिता जागी झाली , तरच त्याचा कणा मजबूत होईल. जीवन हिमतीने जगण्यासाठी अस्मिता आवश्यक आहे. पण ही अस्मिता कशाची बाळगायची ? आमच्याकडे नाही शिक्षण , नाही पैसा , नाही सत्ता- मग ? धर्म प्रत्येकाला समजावतो की , ' देव माझ्याबरोबर आहे. ' म्हणून मला किंमत आहे. धर्म प्रत्येकाला किंमत देतो. ही जाणिव झाली की त्यातूनच ' मी होऊ शकतो. '

' मी करू शकतो ' ही भावना निर्माण होते. मानवाला या गोष्टी अत्यावश्यक आहेत.

पण फक्त अस्मिता जागृत झाली , तर माणूस राक्षस बनेल- दुसऱ्याचा विचारही करणार नाही. त्यासाठी समर्पणाची दृष्टी धर्म देतो. त्यासाठी माझा आणि दुसऱ्याचा संबंध कोणता ? माझे आणि समाजाचे नाते काय ? माझ्यात देव आहे , तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून आम्ही समान झालो. सगळ्यांचा बाप एकच. इथे भेदभावच रहात नाही. आजही माणसाला ' मूलभूत हक्क ' कायदा सांगतो ते मुळात कोणी दिले ? खोल जाऊन विचार केला , तर समजेल की हे धर्मानी दिले आहेत.

मी कोणीच नाही , कसलाच नाही , कशाचाच नाही , असे सांगणारा धर्म असूच शकत नाही. मी कोणीतरी आहे , मी जगले पाहिजे , मी चांगल्या रीतीने जगले पाहिजे. ही जीवनाची दिशा धर्म देतो.

धर्मामध्ये कृतीचे नियमन करण्याची शक्ती आहे. काही लोक म्हणतात , ' धर्म घरात ठेवा. ' त्यांना विचारले पाहिजे की , जर धर्म घरातच ठेवायचा असेल , तर ऑफिसमध्ये गेल्यावर मी पैसे का खाऊ नयेत , याचे उत्तर काय ? कायद्याला पकडता येणार नाही , असे डोके चालवून पैसे खाईन. आज तेच चालले आहे. धर्म घरी ठेवायचा , तर नैतिकता कशी आणणार माणसात ?

त्या पुढे जाऊन धर्म शिकवतो की , माझ्या कर्माची जबाबदारी माझी आहे. ती स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. आज सगळ्या क्षेत्रांत प्रत्येक जण अपयशाची , अध:पतनाची जबाबदारी दुसऱ्यावर नाहीतर परिस्थितीवर टाकतो आहे. विद्याथीर् , शिक्षक , मालक , कामगार , सरकार , जनता कोणीच स्वत:ची जबाबदारी उचलायला तयार नाही. जोपर्यंत मानव स्वत:ची जबाबदारी स्वत: उचलायला तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही देशात , कोणत्याही काळात त्याची आध्यात्मिक किंवा भौतिक उन्नतीही होत नाही. म्हणून भगवान कृष्ण समोर असूनही अर्जुनाला स्वत: लढावंच लागलं.

या ज्या मानवी उत्कर्षाला मूलभूत गोष्टी आहेत त्या समजावतो , मानवाला मानवाजवळ घेऊन जातो तो धर्म. हे काम जर धर्म करत नसेल , तर धर्म काय कामाचा ? धर्म मूलत: माणसाला हिमतीने जगाच्या अंगणात उभा करतो.


- पांडुरंगशास्त्री आठवले 



अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता 

No comments:

Post a Comment