Wikipedia

Search results

Saturday 18 January 2014

सिंधु नदी


 
सिंधु नदी : संस्कृत - सिंधु (नदी), ग्रीक - सिंथोस, लॅटिन - सिंदुस. हिमालयात उगम पावणारी एक मोठी नदी. लांबी सु. ३,००० किमी. पूर्वी हिचा उल्लेख ‘किंग रिव्हर’ असा केला जाई. तिबेटच्या नैऋर्त्य भागात असलेल्या कैलास पर्वताच्या उत्तर भागात सिंधू नदी उगम पावते. हे उगमस्थान मानसरोवराच्या उत्तरेला सु. १०० किमी. व सस. पासून सु. ५,५०० मी. उंचीवर आहे. उगमानंतर ती हिमालयाच्या उतारावरुन वायव्य दिशेला वाहत जाते. उगमापासून गार नदी मिळेपर्यंतचा तिचा सु. २५७ किमी. लांबीचा प्रवाह सिंग-क-बाब किंवा सिंग-गे-चू या तिबेटी नावाने ओळखला जातो. पुढे ती भारताच्या जम्मू व काश्मीर राज्याच्या आग्नेय दिशेकडून राज्यात प्रवेश करुन राज्याच्या साधारण मध्यातून वायव्येस वाहत जाते. येथील तिचे खोरे रुक्ष व निर्जन आहे. काश्मीरमध्ये उत्तरेकडील लडाख पर्वतश्रेणी व दक्षिणेकडील झास्कर पर्वतश्रेणी यांदरम्यानच्या खोल घळईतून वायव्येस वाहताना लेहजवळ तिला झास्कर पर्वतश्रेणी पार करुन आलेली झास्कर ही उपनदी मिळते. पुढे स्कार्डूजवळ श्योक ही उपनदी येऊन मिळते. बाल्टिस्तानमध्ये खैटाशो गावाजवळ झास्कर पर्वतश्रेणी पार करुन सिंधू अतिशय खोल घळईतून वाहत रहाते. येथील घळई ही जगातील सर्वांत खोल घळ्यांपैकी

एक आहे. काराकोरम पर्वतश्रेणीच्या पायथ्याजवळ तिला गिलगिट नदी मिळाल्यानंतर एक मोठे वळण घेऊन सिंधू नैऋर्त्यवाहिनी बनते. पुढे नंगा पर्वताच्या पश्चिमेस हिमाद्री श्रेणीतील खोल अशा घळईतून ती वाहू लागते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते सिंधू नदीचे पात्र जुने असून हिमालय उंचावला जात असताना नदीचे खणनकार्य प्रभावी राहिल्याने सिंधू नदीने आपले पात्र कायम ठेवले आहे. सिंधू नदीमुळे हिंदुकुश ही हिमालयाची शाखा हिमालयापासून अलग झाली आहे.
  जम्मू व काश्मीर राज्यातून पुढे सिंधू पाकिस्तानात प्रवेश करते. पाकिस्तानच्या उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशातून काहीशी दक्षिणेस वाहत जाते. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांतून सु. १,६६५ किमी. चा प्रवास करुन अटकजवळ पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून ती पंजाबच्या पठारी प्रदेशात येते. तिचा उगमाजवळचा भूप्रदेश सस. पासून ५,५०० मी. उंचीचा असून अटकजवळच्या भूभागाची उंची ३०५ ते ४५७ मी. आहे. अटकजवळच तिला काबूल व स्वात नद्या येऊन मिळतात. त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद म्हणजे सु. २४४ मी. रुंदीचे बनते. येथे तिच्यातील पाण्याची पातळीही बरीच वाढत असून प्रवाहही खूप वेगवान असतो. अटक ते कालाबागपर्यंतचा प्रवाह उच्चभूमी व खडकाळ प्रदेशातून वाहत असल्यामुळे द्रुतगती आहे. या मार्गावरील चुनखडीच्या टेकाडांमुळे तिचा प्रवाह निळसर दिसतो, म्हणून तिला नील-आब हे नाव मिळाले आहे. पुढे सॉल्ट रेंज डोंगररांग पार करुन पाकिस्तानातील अर्धओसाड पंजाब मैदानात ती प्रवेश करते. डेरा इस्माइलखानजवळ ती दक्षिणवाहिनी होते. मिठाणकोटजवळ तिला पंचनद म्हणजे भारतातून वाहत जाणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज यांचा संयुक्त प्रवाह मिळतो. त्यामुळे तिचे पात्र सु. २·५ किमी. पर्यंत रुंद बनले असून प्रवाह मंदगतीने

वाहू लागतो. मिठाणकोटपासून पुढचा प्रवाह खोल, रुंद व संथ आहे. त्याला मिहरान म्हणतात. मिठाणकोटनंतर सिंधू पुन्हा नैऋर्त्येस वळून सिंध प्रांतात शिरते आणि कराचीच्या आग्नेयीस अनेक फाट्यांनी अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. या त्रिभुज प्रदेशाची सुरुवात थत्ता (तत्ता) पासून होते. हा त्रिभुज प्रदेश विस्तृत असून त्यातील बराचसा भाग दलदलयुक्त आहे.


एकेकाळी सिंधू नदी कच्छच्या रणातील दलदली प्रदेशाला जाऊन मिळत होती. तेव्हा ती सांप्रत पात्रापासून पूर्वेस सु. ११० किमी. वरुन, तसेच तिला समांतर वहात होती. कच्छचे रण हळुहळू भरुन आले आणि नदी पश्चिमेकडे सरकली. सक्कर धरणापासूनचा सिंधूच्या पूर्वेकडून वाहणारा पूर्व नार नावाचा एक फाटा पुढे कच्छच्या रणाकडे वाहत जातो, तर सिंधू नदीच्या मूळ पात्राच्या पश्चिमेस सु. १६ ते ३२ किमी. वरुन पश्चिम नार हा फाटा वाहतो.

श्योक, झास्कर, शिगर, गिलगिट, अस्तोर ह्या उपनद्या तसेच इतर अनेक प्रवाह मुख्य हिमालय श्रेणी, काराकोरम पर्वतश्रेणी, नंगा गिरिपिंड व कोहिस्तान उच्चभूमीवरील हिम व हिमाचे वितळलेले पाणी सिंधू नदीकडे वाहून आणतात. उत्तर पाकिस्तानातील काबूल, स्वात व कुर्र या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. टोची, गुल, झोब, विहोआ, संगर व रावनी या कमी लांबीच्या नद्या सुलेमान श्रेणीतून पूर्वेस वहात जाऊन सिंधूला मिळतात. भारतातून वहात येणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या सिंधूच्या सर्वांत मोठ्या उपनद्या आहेत. या पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह मिळाल्यानंतरचे सिंधूचे पात्र रुंद व उथळ बनले असून ती मंदगतीने वाहते. त्यामुळे तिच्या प्रवाहमार्गात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन होते. पुरापासून संरक्षण करण्यासाठी तिच्या काठावर बांध घातले आहेत; परंतु कधीकधी उत्प्रवाहाच्या वेळी पात्राबाहेर पाणी पसरुन मोठे नुकसान होते.

सिंधू नदीचे पाणलोट क्षेत्र ११,६५,५०० चौ. किमी. असून त्यांपैकी भारतातील क्षेत्र २७·५६ टक्के आहे. भारतातील सिंधूच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के जम्मू व काश्मीर राज्यात, १६ टक्के हिमाचल प्रदेशात, १६ टक्के पंजाबात, ५ टक्के राजस्थानमध्ये तर ३ टक्के हरयाणात आहे. तिचे वार्षिक प्रवाहमान नाईल नदीच्या प्रवाहमानापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. कारण सिंधूला काराकोरम, हिंदुकुश, मुख्य हिमालय पर्वतश्रेणी यांवरील हिमक्षेत्र व हिमनद्यांपासून तसेच हिमालयीन उप-नद्यांपासून पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात पावसामुळे व उन्हाळ्यात हिमालय पर्वतक्षेत्रांवरील बर्फ वितळून पाणीपुरवठा होत असल्यामुळे सिंधू बारमाही वाहणारी नदी आहे. तरीही ऋतुमानानुसार तिच्या पाण्याच्या पातळीत चढउतार आढळतात. हिवाळ्यात किमान प्रवाहमान असते. वसंत ऋतु व उन्हाळ्यात हिमनग वितळल्यामुळे प्रवाहमान वाढते, तर जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्यातील कालावधीत नदीला पूर येतात. काही वेळा हे पूर विनाशकारी ठरतात. इ. स. १८४१ मध्ये अटक येथे आलेल्या पुराच्या वेळी पाण्याची पातळी चार तासांत २५ मीटरने वाढून हजारो चौ. किमी. क्षेत्र पूरगस्त झाले होते. मैदानी प्रदेशातील उष्ण व कोरड्या हवामानामुळे पृष्ठीय जलाचा पुरवठा कमी होतो. तसेच तेथील बाष्पीभवनाचा जास्त वेग व जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याची पातळी कमी असते.

जगातील जलसिंचनासाठी सर्वाधिक उपयोग केल्या जाणाऱ्या नद्यांपैकी ही एक नदी आहे. पाकिस्तानात हिचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचन व जलविद्युत्शक्ती निर्मितीसाठी केला जातो. प्राचीन काळापासून सिंधूचा जलसिंचनासाठी वापर केला जात आहे. बिटिश शासनाने सन १८५० नंतर कार्यान्वित केलेली कालवा जलसिंचन पद्घती ही जगातील सर्वांत मोठ्या आधुनिक कालवा सिंचन प्रकल्पांपैकी एक मानली जाते. सक्कर व कोत्री ही प्रमुख धरणे आहेत. सक्कर येथील लॉइड धरण १९३२ मध्ये बांधून पूर्ण झाले असून ते विशेष महत्त्वाचे आहे. टार्बेला धरण हे जलसाठयच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. कालाबाग येथे सिंधू चुनखडीयुक्त घळईतून वाहते. येथील भक्कम तळभागामुळे येथे थळ हा जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आला आहे. पाकिस्तानातील ओसाड व निमओसाड प्रदेशाला पाणीपुरवठा करणारा सिंधू हाच प्रमुख स्रोत असून, त्यामुळेच येथील कृषी विकास घडून आला आहे. ईजिप्तमध्ये जसे नाईलला महत्त्व तसे पाकिस्तानात सिंधूला महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंधू खोरे हे प्रमुख कृषी क्षेत्र असून गहू, मका, तांदूळ, बारीक तृणधान्य, कापूस, खजूर व फळे ही या खोऱ्यातील प्रमुख पिके आहेत.

हिंदुस्थानच्या फाळणीमुळे सिंधू खोऱ्यातील सर्वाधिक पाण्याचा लाभ पाकिस्तानला झाला. सिंधूचे मुख्य खोरे पाकिस्तानात गेले, तर तिच्या प्रमुख उपनद्यांचे शीर्षप्रवाह भारतात राहिले. सिंधू व तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपावरुन भारत-पाकिस्तान दरम्यान अनेकदा वाद निर्माण झाले. त्या दृष्टीने १९६० मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान सिंधू पाणी वाटपासंदर्भातील करार करण्यात आला आहे.



सिंधू नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. खाद्योपयोगी मत्स्यप्रकारांस पल्ल असे म्हणतात. थत्ता, कोट्री व सक्कर ही पाकिस्तानातील प्रमुख मासेमारी केंद्रे आहेत. पूर्वी सिंधू नदीतून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक केली जाई; परंतु सिंधू खोऱ्यातून लोहमार्ग टाकण्यात आल्यापासून (१८७८) आणि जलसिंचन प्रकल्पांचा विस्तार करण्यात आल्यापासून व्यापारी जलमार्ग म्हणून सिंधूचे महत्त्व कमी झाले. सांप्रत केवळ खालच्या टप्प्यात लहानलहान बोटींचा वाहतुकीसाठी
वापर केला जातो.

सिंधू नदीचे खोरे हे पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे खोरे आहे. सिंधू नदीच्या तीरावरील व तीराजवळील पाकिस्तानमधील प्रमुख नगरे पुढीलप्रमाणे आहेत : कराची, कोत्री, ठठ्ठा, केंटा, हैदराबाद, सेहवान, सक्कर, रोहरी, मिठानकोट, डेरा गाझीखान, डेरा इस्माइलखान, मिआनवाली, कालाबाग, खुशालगढ व अटक. जम्मू व काश्मीर राज्यातील सिंधूच्या खोऱ्यात गिलगिट, स्कार्डू, लेह ही प्रमुख नगरे आहेत.

सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहें-जो-दडो, हडप्पा, चन्हुदारो इ. ठिकाणी केलेल्या उत्खननात एका अत्यंत प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले. ही प्राचीन संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती होय. या संस्कृतीचा उगम व विकास याच नदीखोऱ्यात झाला. या संस्कृतीचे मुख्य केंद्र सिंधू व हाका नद्यांच्या पूरमैदानात होते. या संस्कृतीचा विस्तार सांप्रत पाकिस्तान, उत्तर भारत व अफगाणिस्तानात होता. काही संशोधकांच्या मते सिंधूसंस्कृतीचा प्रसार कालांतराने दक्षिण भारतात झाला. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या वेगवेगळ्या कारणांपैकी हाका नदीचा वाढत गेलेला कोरडेपणा व सिंधू नदीने वारंवार बदललेले प्रवाहमार्ग हे एक कारण सांगितले जाते. महाकाव्ये, पुराणे इ. प्राचीन गंथातही या नदीचा महिमा वर्णिलेला आहे. वैदिक साहित्यात सिंधू नदीचा निर्देश अनेकदा झालेला आहे. ऋग्वेदाच्या काही ऋचांत सिंधू हा शब्द काही ठिकाणी सागर या अर्थी, तर काही ठिकाणी नदी या अर्थाने वापरला आहे. सिंधू या शब्दावरुनच हिंदू हे नाव उद्भवले आहे. बेहिस्तून येथील पहिल्या डरायसच्या प्रस्तरलेखात सिंधू नदीला हिंदू हेच नाव दिलेले आढळते. संस्कृत वाङ्मयात तिचा उल्लेख हिंदू असा केलेला आहे. आर्य लोक सिंधूला पवित्र मानत.





Friday 10 January 2014

ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्याच रंगाची दुनिया दिसते

प्रचि
ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्याच रंगाची दुनिया दिसते. जर उदास, नैराश्याच्या चष्मा घातला तर सगळीकडे फक्त उदासी आणि नैराश्यच दिसेल, याउलट जर प्रसन्नतेचा चष्मा असेल तर सगळं जगच सुंदर दिसेल. अशीच एक प्रसन्न भटकंती करून घरी परतताना लोकल ट्रेनच्या खिडकीवरची कळकट्ट जाळी देखील सुंदर भासली.
 प्रचि
आणि मग अशाच जाळीतुन जग आणखीनच सुंदर दिसायला लागले.
 प्रचि
"
आयुष्य कितीही खडतर असलं तरी ते आनंदाने फुलवत रहा" हे या खडकावरल्या अंकुराकडुन आपणांस शिकता येईल.
 प्रचि
"
आयुष्य किती क्षणभंगुर आहे" हे ह्या फोटोला पाहिल्यावर मला नेहमीच जाणवणार. एकदा देवळांच्या भटकंतीला गेलो असता पायर्यांवर मला हि भेटली. तीचे मस्त फोटोसेशन केल्यानंतर जवळ पास अर्धा पाऊण तास देवळाच्या परिसरात भटकलो. परतीच्या वाटेवरती, या कालावधीत गोगलगायीने किती अंतर पार केले हे पाहण्यासाठी तेथे गेलो असता, कुणाच्यातरी पायाखाली येऊन तीचे अस्तित्वच संपले होते. खुप वाईट वाटले, त्यापेक्षा स्वतःचा राग जास्त आला. वाट वर्दळीची आहे हे माहित असुनही मी तिला जवळच्या झाडीत उचलुन ठेवले नाहि. ...........कदाचित एक जीव वाचला असता. अरेरे
प्रचि
"
कट्टा" सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. काहि क्षण मित्रमंडळी एकत्र येणार. गप्पांचे फड रंगणार आणि परत सगळे आपआपल्या मार्गी जाणार. उरणार तो एकटा वृक्ष, या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन. आपलं आयुष्यहि थोडसं असच असतं ना?, "यथा काष्ठंच काष्ठंच . . . . . " या संस्कृत श्लोकाप्रमाणे.
काहि व्यक्ती आयुष्यात येतात, दोन-चार क्षणांची सोबत करतात आणि निघुन जातात. उरतात त्या फक्त आठवणी आणि आपण, "पारावरच्या त्या वृक्षासारखे" एकटेच.
 प्रचि
रंगपंचमीच्या दिवशी लाल रंग लावल्यामुळे रडकुंडीला आलेली हि चिमुरडी. पण पुढे आयुष्यात राग, लोभ, मद, मत्सर, मोह, यश, अपयश, द्वेष या सार्या रंगात रंगायचेच आहे हे जर तिला माहित असते तर या कृत्रिम रंगाची भिती कदाचित तिला वाटली नसती.
 प्रचि
"..........
वार्ध्यक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी". आयुष्यातील सुखदु:खांचा हिशोब मांडताना, हातावर हात ठेवून, हताश होऊन, देवाला स्मरत बसलेले हे आजोबा.
 प्रचि
"
आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?".आमच्यासाठी सध्यातरी हे चाक आणि हा खेळ हेच आयुष्य आहे आणि तेच आमचे विश्व आहे. पुढंच पुढे बघु. हेच तर चिडवून सांगत नसेल ना हा?
 प्रचि
खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे
तिच्या आणि त्याच्या आयुष्यातील हळुवार पण तितकाच महत्वाचा एक क्षण.आयुष्यभरासाठी त्याच्या हातात विश्वासाने हात देणारी ती आणि तितक्याच विश्वासाने तिला साथ देणारा तो.
 प्रचि१०
संथ पाण्यात सहजच मारलेला एक दगड आणि त्यामुळे पाण्यावर उठलेले असंख्य तरंग.
आपल्या जीवनातही असंच असतं, येणारे एखादे दु: किंवा संकट हे एकटे येता सोबत अनेक दु:खे/संकट घेऊन येतात ज्यामुळे कित्येकदा आयुष्य ढवळुन निघते. अर्थात हे त्या पाण्यावरच्या तरंगासारखेच कायम रहाता काहिवेळानंतर निवांत होतात.
 प्रचि11
रोज रोज त्याच त्याच आयुष्याचा (सुंदर सुंदर फुलांवर बसण्याचा) कंटाळा आला असेल कदाचित म्हणुन for a change हे फुलपाखरू चक्क मातीत बसले. अर्थात "मातीची" ओढ सगळ्यांनाच असते.
 प्रचि12
"
जो सब करते है यारो, वो क्यों हम करे".सगळे जे करतात ते मी का करू? कधी कधी प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे हा हि आयुष्याचाच एक भाग आहे ना?
 प्रचि13
कुणाला हा फोटो, निष्पर्ण, उजाड, उदास वाटेल,कुणाला हा फक्त एक झाडाचा फोटो वाटेल, मला हा फोटो काढताना मोराच्या फुललेल्या पिसार्याची आठवण झाली होती. अर्थात आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो.

 

मुलांचा अभ्यास कसा घ्याल ?


मुलांचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय दृष्टीनं साधयला हवा; यातूनच स्वावलंबनम सहकार्य, श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील. मूल हे शिक्षणचे केन्द्र आहे, व अभ्यासक्रम हे संस्कृतीसंवर्धनाचे साधन आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन बालविकास साधण्यासाठी शिक्षण संस्था आहेत. पालक प्रयत्नशील आहेत. समाजयंत्रणा योजना आखीत आहेत. पण या सर्व गोष्टी मुलाभोवती त्याच्या भावी जीवनाची पूर्वतयारी करण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत. याची जाणीव शिक्षकांना, पालकांना असेल तरच बाळांची उत्तम जडणघडण होऊ शकेल.

शाळेत येण्यापूर्वी मूल कोऱ्या पाटीप्रमाणे येत  नाही. वऱ्याचशा गोष्टी त्याने मिळवलेल्या सतात. जन्मल्यापासून मूल शिकतच असते. त्याला मदत करणे एवढेच पालकांचे, शिक्षकांचे काम आहे. पालकाला मोकळेपणी शिकू देणे, त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचण दूर करणे एवढेच काम आपले. मूल हे घरात राजा असते; त्याला सत्ता साऱ्या घरात चालते. त्याचे सिंहासन म्हणजे आईची कटी असते. राजा घरात हुकूम सोडतो. सर्वांना ते पाळावे लागतात. पण एकदा का मूल शाळेत गेले म्हणजे शाळेत त्याला शिक्षकाचे ऐकावे लागते. दुसऱ्याचे हुकूम पाळणे मुलाला भाग पडते, मूल गांगरून जाते. म्हणून आरंभी घर व शाळा हा दुवा जितक्या उत्कृष्ट तऱ्हेने सांधला जाईल तितका शिक्षणाचा पाया नकळत दृढ होत जाईल. म्हणूनच ही खबरदारी घेणारा शिक्षक मुलाचा खरा विकास साधू शकेल

मानसशास्त्रीय प्रगतशिक्षणपद्धती
बालमनाचे अवगाहन करून निरोगी वातावरणात पालकांचा सर्वांगीण विकास साधणे ही मानसशास्त्रीय दृष्टी समाजाला फार उशिरा आली. मानसशास्त्रदृष्ट्या जुन्याकाळी शिक्षणाकडे पाहिले जात नसे. मूल हे मोठ्या माण्सापेक्षा वेगळे आहे ही कल्पना काही वर्षापूर्वी नव्हती. प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ रुसो या फ्रेंच विद्वानाने ही कल्पना सर्व जगापुढे मांडली. त्याने मुलांचा अभ्यास तयार होतो. ही नैसर्गिक पद्धत प्रथम लोकांपुढे मांडली. स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध विद्वान पेस्टालॉजी व त्याचा शिष्य फ्रोबेल यांनी या द्रुष्टीने विचार करून ‘किंडन गार्डन’ पद्धत सुरू केली. मुलाचा विकास निव्वळ माहिती देण्याने होत नाही. तर त्याला अनुभव यायला पाहिजे ही गोष्ट या शिक्षणशास्त्रज्ञाने जगालापटवून दिली शिक्षण पद्धतीत शिक्षकाचे महत्त्व कमी झाले व मुलांचे महत्त्व वाढत गेले. हा पहिला मोठा फरक पडला. मुलांच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा विकास होणे हे या शिक्षण विषयक कल्पनेचे परिणत स्वरूप होय.

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले शिक्षणाविषयक विचार चिंतनीय आहेत. शिक्षण म्हणजे ज्ञा देणे अगर माहितीचा प्रसार करणे नव्हे तर मानवाच्या अंतःकरणात खोलवर दडलेल्या एका आत्मीक शक्तीवर पोचण्याचे सामर्थ्यमानवाला प्राप्त होण्याप्रत त्याला आंतरमनाचा विचार करण्यास प्रवृत्त करणे, त्यामधून जो मनुष्य तयार होतो तो पूर्णत्वाला पोचलेला असतो, देवत्व प्राप्त झालेले असणे. प्लेटो या थोर महात्म्याने सांगितले आहे की शरीराचा विकास व्हावयास पाहिजे तर शरीराच्या निरनिराळ्य़ा अवयवास काम मिळाले पाहिजे.ही शिक्षणाची दृष्टी महात्मा गांधीच्या शिक्षणपद्ध्तीत उघड दिसून येते. निसर्ग, समाज व उद्योग ही ज्ञानाची भांडारे आहेत. त्यांच्या मधील ज्ञन केवळ, पुस्तकांच्या साहाय्याने न देता ते पक्के होते. ही गोष्ट विचारवंताना पटलेले आहे. त्यातही मुलाला मोठं महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.

प्रगत शिक्षणाचा विचार करता असे दिसून येईल की, नाट्य, काव्य, नृत्य, निसर्गदर्शन, खेळ, छंद इत्यादींनी मुलाभोवती मन मोकळे वातावरण निर्माण होते; व मुलांचा सर्वांगीण विकास होतो. वरील गोष्टी तात्त्विक दृष्टीने मांडलेल्या दिसतील पण सद्यःपरिस्थितीत अभ्यासक्रम, पुस्तके, शालेय शिस्त परीक्षा परीक्षेतील गुण यावर  भावी जीवनाकडे दृष्टी ठेवून पालक शिक्षक मुलांचा अभ्यास पुरा करून घेणे त्यांच्या व्यवहारी जीवनाकडे दृष्टी ठेवणे, अशा अनेक समस्या समाजापुढे आहेत; त्याकरिता सरकारी यत्रणेने शाळा शिक्षक शिक्षणपद्धती, परीक्षा पद्धती वगैरे बाबतीत केलेले नियम आणि वर निर्देशित केलेली पालकांच्या विकासाची द्रुष्टी यांचा मेळ घालताना मुलांचा विचार, मुलांचे समाधान मुलांची प्रगती मुलांची जिद्द, समाजात माणूस म्हणून त्याचा जगण्याचा हक्क दुसऱ्याच्या हितात आनंद मानण्याची व्रुत्ती त्याच्या अंगी बाणणे म्हणजेच खरा माणूस होणे या द्रुष्टीने आज शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शन पाहिजे. शिक्षक शाळेत तासन्तास शिकवतो. पालकांचा मुलागागे अभ्यासाचा तगादा या गोष्टींनी नकळत मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तीकडे दुर्लक्ष होण्याचा केव्हा केव्हा धोका निर्माण होतो.

जन्मापासूनचे अनुभव हेही एक शिक्षणच
शालेय अभ्यासक्रम तयार करणारी माणसे सूज्ञ असतात. अभ्यासक्रमाला पोषक अशी पुस्तके बनाणाऱ्या मंडळातील सभासदांचा लहान मुलांशी किती संबंध येतो याचाही विचार करायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षकाने फार मोठ्या जबाबदारीने काम केले पाहिजे. पालकांनी अभ्यास करून घेणे याबरोब्रच मुलांचे समाधान कायम ठेवणे, त्यांच्या आनंदात कमतरता होऊ न देणे, कोणत्याही थरातील मूल असले तरी त्याला कमी न लेखणे मूल बालरूपी परमेश्वर आहे या गोष्टीवर श्रद्धा असणे या गोष्टी तलमळीने साधल्या तर मुलांकडून पालकांच्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या साध्य झाल्याशिवाय राहणार नाहीत.

प्रस्तुत लेखकाने गेली ६० वर्षे अव्याहत सर्व थरातील मुलांशी आपला बराच संपर्क साधला, व कोठलेही मूल मागे पडत नाही याचा अनुभव घेतला. हलक्या वाटणाऱ्या थरातील मूल श्रेष्ठत्वाला गेलेले पाहण्याचे भाग्य मिळवले. आणि म्हणून शिकवणे, अभ्यास करून घेणे ही गोष्ट ग्रहण नाही. मुलालाशिकू देणे, दक्षतेने त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचणी दूर करणे, क्षणोक्षणी त्याची वृत्ती समाधानी ठेवणे, त्याच्या आनंदी वृत्तीत स्वतः समाधान मानणे एवढ्या गोष्टी साधल्या म्हणजे अभ्यासक्रम कोणताही असो, पुस्तके कोणतीही असोत, शैक्षणिक बंधने असोत. तरी पोटच्या मुलाकडे ज्या दृष्टीने आई पाहते ती दृष्टीच शिक्षणाचे साध्य साधते.

मूल जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून स्वतः शिकतच असते. निरीक्षण, अनुभव, कल्पना, विचार व निर्णय ही पंचपदी मुलाला शिक्षण तेत असते. जन्मल्यापासून मूल भाषा शिकते, गणित शिकते सामान्यज्ञानही शिकते. आजच्या कोणताही विषय शिकत असते. ही गोष्ट जिव्हाळ्याच्या शिक्षकाला सतत दिसून येते. मुलाच्या मानसिक शक्ति वाढण्यास त्याच्या स्वाभिमानास धक्का लागता कामा नये हे व्रत संबंधितांनी पाळले पाहिजे. स्वाभिमानात शीला उगम आहे. पालक सच्छील बनण्यास मदत करणे त्याचा स्वाभिमान राखला तरच शक्य आहे. त्याप्रमाणेच पालकाला काही छंद असतात. छांदात विकासाचे केन्द्र साठविलेले असते. बालकांचे छंद जोपासले पाहिजेत व त्यातून त्याची प्रगत्ती नकळत साधली पाहिजे. यासाठी संबंधितांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे.मुलांना आपण शाळेत पाटवतो, मुले पुस्तकातून शिकतात. तयार करून परीक्षा पास होतात. ही परंपरा चाललीच आहे.

पण यातून साधावयाचे काय ?
मुलांचा विकास कोणत्या गोष्टीत झाला पाहिजे ते सदैव दृष्टीसमोर ठेवणे पाहिजे. मुलांचा शारीरिक बौद्धिक मानसिक, नैतिक, सामाजिक, सांस्कृविकास राष्ट्रीय दृष्टीने साधला गेला पाहिजे. हे सदैव मुलांभोवती असणारांनी आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्यातूनच स्वावलंबन सहकार्य श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील अशी खबरदारी घेतली पाहिजे. नकळत ती त्यांच्या अंगी उतरली पाहिजेत. मुलांना सदोदित त्यांच्या आवडीच्या विषयाट ठेवणे स्वच्छता राखणे वगैरे बाबतीत मुले आई-वडलांस मदत करण्यास उत्सुक असतात. त्यांचा तो उत्साह कमी होऊ नये. मूल जास्तीत जास्त आईवडिलांच्या सहवासात असले पाहिजे. पालकांनी मुलांना आपले भांडवल करू नये. म्हणजे पालकांच्या मताप्रमाणे  मुलाने डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे व्हावे अशी पालकांनी त्यांच्या वर शक्ती करू नये. मुलांना आवडेल तो पेशा पत्करण्याची त्यांना मुभा द्यावी. असे झाले तरच मुलांचा खरा विकास साधून तो राष्ट्राचा उपयुक्त घटक बसू शकेल. शाळेत मूल आल्यापासून शिक्षकांनीही पुधील गोष्टी नजरेसमोर ठेवल्या पाहिजेत. आजच्या लेखात लहान मुलांचा प्रश्न आहे म्हणून ओझरते लिहिण्याचे धाडस करतो.

खर पाहिले तर शाळा ही शिशूवर्गापासून एस.एस.सी. पर्यंत एकसंच असली पाहिजे. तरच बालकाच्या शिक्षणाची साखळी पूर्ण होऊ शकेल.पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक असे वेगळे खंड असू नये. एकसंच शाळा बालकांची जलदगतीने प्रगती साधू शकतात मुलांत शक्ती निर्माण करतात. निर्भयवृत्तीने मूल सामर्थ्यवान बनते. शिशूवर्ग व पहिली या दोन वर्गात मुलांना शाळेचे आकर्षण वाटेल असे वातावरण तयार झाले पाहिजे. दुसरी, तिसरी या दोन वर्गात म्हणजे मुले ७/८ वर्षांची होई पर्यंत आकर्षणाबरोबरच अभ्यासाची गोडी निर्माण पाहिजे. चौथी ते सातवी या वर्गात शिक्षणाची बैठक घातली गेली पाहिजे. त्याच्या पुढील वर्गात मूठ स्वाध्यायाने शिकण्यास सामर्थ्यवान बनले पाहिजे. त्यानंतर मुलाच्या मनाप्रमाणे त्याला शिकू देणे, मूल चारित्र्यवान बनेल. आपले जीवन समृद्ध करील, या बाबतील लक्ष ठेवणे, संयमाचा त्याला आकार देणे त्याचा द्रुष्टीकोण विशाल बनवणे हे साधले म्हणजे शाळेत व घरात शिक्षकांनी व पालकांनी अभ्यास कसा करून घ्याला याचा उलगडा आपोआप होईल.मूल हे घराचा बहुमोल अलंकार  आहे. व राष्ट्राचा खराखुरा आधारस्तंभ आहे या दोन गोष्टी सदैव नजरेसमोर असल्या म्हणजे सर्व काही साधेल, या गोष्टींवर श्रद्धा असावी.

(अभ्यास आणि व्यायाम या दोन्हीही गोष्टी मुलांकडून करून घेणं आवश्यक आहे. ) (खरी ईश्वरसेवा  :- आपल्या मुलांचं पालनपोषण करणं हीच स्त्रीची ईश्वरसेवा होय. आपल्या मुलांच्याद्वारेच ती ईश्वराची सेवा करीत असते. मुलांना जन्म देणं, त्यांचं पालनपोषन करणं याबरोबरच त्यांना सत्य, मानवतेची शिकवणूक देणं हेच तिचं परमकर्तव्य होय. – काउंट लिओ टॉल्सटाय )

क्रिएटिव्ह जाहिराती, मराठी तरुणांनो राहू नका पाठी!

‘अमुल बटर’च्या एकसे एक जाहिराती बनवणारे, ‘हिंग्लिश’ भाषा लोकप्रिय करणारे, मराठी नाटक, कलाकारांना ग्लोबल लेव्हलला नेणारे आणि भारतानंतर आता टांझानियामध्ये जाहिरात क्षेत्र पादाक्रांत करणारे सुप्रसिद्ध अॅड-गुरू भरत दाभोळकर देत आहेत मराठी तरुणांना जाहिरात क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्याचा कानमंत्र!

जाहिरातीच्या जगाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जाहिरात कलेचं आता रितसर प्रशिक्षण भारतात सुरू झाल्यामुळे अनेक ट्रेन्ड अॅडव्हर्टायझर अॅड-वर्ल्डमध्ये दाखल झाले आहेत. मराठी मुलांची संख्याही या क्षेत्रात वाढत आहे. मराठी तरुण जाहिरातीच्या जगात आपला ठसा उमटवत आहेत. मराठी माणूस मुळातच प्रचंड क्रिएटिव्ह आहे. टॅलेंटच्या बाबतीत मराठी माणूस इतररांपेक्षा सरस आहे. पण, तरीही जाहिरात क्षेत्रात मराठी माणसाचं ‘डॉमिनेशन’ का नाही?

आज जाहिरात क्षेत्रात एक प्रमुख आव्हान असतं ते तुमचा टार्गेट ग्रुप ओळखण्याचं. आपण जाहिरात कुणासाठी बनवतोय, हे आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा होतं असं, की जाहिरातदार आणि त्यांचे क्लायंट्स हे एवढे श्रीमंत, हाय-फाय असतात, की आपल्या व्यतिरिक्त भारतात मध्यमवर्गीय, सामान्य लोक राहातात, हेच त्यांच्या लक्षात येत नसतं. मर्सिटिजमधून फिरत असताना किंवा एखाद्या मोठ्या क्लबमध्ये बसून जाहिराती डिझाइन केल्या जातात आणि त्यात देशभरातल्या जनतेला डोळ्यांसमोर ठेवल्याचा आव आणला जातो. पण, तुम्हाला जाहिरात करायची असेल, एखाद्या अशा उत्पादनाची जिचा ग्राहक सातारा-सांगली ते यूपी, बिहारमधल्या गावांमध्ये आहे. तर, तुम्ही त्याच्या भावना जाणून घेणार कशा? बस, ट्रेनने प्रवास करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती मर्सिडीजमध्ये बसून नाही डिझाइन करता येत, हे समजलं पाहिजे.

जाहिरात क्षेत्र म्हणजे ग्लॅमर, पार्ट्या, गलेलठ्ठ पगार असं वाटतं. पण, त्यासाठी मेहनतही तेवढीच घ्यावी लागते. यात वाईट किंवा चुकीचं काहीच नाही. मराठी तरूण टॅलेंटेड असूनही तो मागे का राहतो? इथे भाग असतो तो आत्मविश्वासाचा. जाहिरात क्षेत्रातलं हाय-फाय इंग्लिश पाहून बऱ्याच जणांना भीती वाटते. पण, त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो. मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिलं इंग्लिश वाक्य बोललो होतो. मला इंग्लिश बोलताना जेव्हा अडायला व्हायचं, तेव्हा मी सरळ त्यात मराठी किंवा हिंदी शब्द घुसडायचो. पण, पुढे हिच भाषा लोकांना पसंत पडली. तिला ‘हिंग्लिश’ म्हटलं जाऊ लागलं. क्रिएटिव्हिटीला भाषेचं बंधन नसतं. भारतीय लोकांसाठी आपण अॅड बनवत असतो. भारतीय लोकांची भाषा इंग्रजी नाही. एक अॅड इंग्लिशमध्ये लिहून ती नंतर चौदा भारतीय भाषांमध्ये भाषांतरासाठी दिली जाते. पण, याउलट ती एखाद्या भारतीय भाषेत लिहूनही नंतर इंग्रजीत ट्रांसलेट करता येऊ शकते ना! आज भारतीय जाहिरात क्षेत्रात जे दिग्गज मानले जातात, ते कमलेश पांडे, पियुष पांडे, प्रसून जोशी ही मंडळी हिंदीमध्ये शिकली होती. त्यांनाही इंग्रजीचं ज्ञान सुरूवातीपासून नव्हतं. पण तरीही हे हिंदी भाषक जाहिरातींवर देशी छाप पाडून मोठे झालेच ना! मग मराठी माणूस का आपल्या भाषेमुळे मागे राहतोय? जाहिरात क्षेत्रात येण्यासाठी इंग्लिश येणं आवश्यक नाही. मात्र, जर तुम्हाला इंग्लिश येत असेल, तर तुम्हाला वेगळा आत्मविश्वास मिळतो. अमराठी क्लायंट इंग्रजीत जेव्हा ब्रीफ देतो, तेव्हा ते तुम्हाला व्यवस्थित समजू शकतं. यासाठी तरी इंग्लिश शिकावंच.

आज जाहिरात क्षेत्रांमध्ये आर्ट डिरेक्टर, व्हिज्युअलायझर यांसारख्या मोठ्या पोस्टवर मराठी लोकांचं अधिराज्य आहे. कमर्शियल आर्टिस्ट्स हे बहुतेकवेळा मराठीच असतात. जे जे स्कूल ऑफ आर्ट, रचना सांसद सारख्या कॉलेजांमधून अनेक टॅलेंटेड, क्रिएटिव्ह मराठी तरुण/ तरुणी जाहिरात क्षेत्रात येतात आणि आपलं स्थान निर्माण करतात. पण... मॅनेजरिअल पोस्टसाठी हे लोक प्रयत्न करत नाहीत. मराठी माणसाचा मुळातच प्रॉब्लेम असा असतो, की सेटल झाले की ते समाधानी होतात. आपल्या कम्फर्ट झोन पलिकडे जाऊन चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न करायला ते घाबरतात. मॅनेजरिअल पोस्टसाठी मराठी माणसं प्रयत्नच करत नाहीत! तिथे सगळे अमराठी लोक पाहायला मिळतात. त्यामुळे जाहिरात क्षेत्रामध्येही मराठी माणसांच्या डोक्यावर अमराठी लोक बसलेले दिसतात. हे चित्र बदलणं मराठी मुलांच्याच हातात आहे.

नुसत्या मुंबईत तीन हजारांच्या आसपास अॅड एजन्सीज आहेत. मराठी प्रतिभेला इथे चांगला वाव आहे. आज विविध ठिकाणी मराठी माणसाने आपला ठसा उमटवला आहे. जाहिरात क्षेत्रातही तितक्याच दिमाखात मराठी पाऊल पुढे पडायला हवं. सो, ऑल द बेस्ट!