Wikipedia

Search results

Friday 22 February 2013

स्वाभिमान और अहंकार - Selfrespect & Ego


स्वाभिमान का बहुत बड़ा फलक है। अभिमान तो बाद की बात है। प्रथम तो ‘स्व’ क्या है? हम मनुष्य हैं। यह हमारी पहचान है। हमारा स्व है। एक शरीर और एक मन है। यह हमारा स्व है। हम किसी के वंशज हैं। हमारा वंश हममें समाहित है। हमारा वह स्व है। हम भारतीय हैं। भारतीयता हमारा स्व है। हम मनुष्य हैं। मानवीयता हमारा स्व है। स्व के और भी आयाम हैं। वे सब जिनमें हमारा ‘स्व’ पहचाना जाता है। और इन सब के कारण हमारा ‘स्व’ है तो इसपर अभिमान होन का अर्थ है कि हमारी चेतना में वे सब समाए हैं, जिनसे हमारा ‘स्व’ भाव बना है। व्यक्ित के इस अभिमान पर किसी को ऐतराज नहीं होता। हमारे इस स्व के एहसास स कोई आहत नहीं होता। हम अपने इस अभिमान से किसी को किसी प्रकार की क्षति नहीं पहुंचाना चाहते। वरन अपने स्व की सुगंध से स्वयं आनंदित हैं। यह अभिमान भी हमारे उसी आनंद का प्रगटीकरण है। परंतु उसी आनंद का एक रूप अहंकार भी है। जैसे अंधेरे में हाथ को हाथ नहीं सूझता। आइना सामने रहते हुए भी अपना प्रतिविंब नहीं दिखता। उसी प्रकार अहंकार के आने पर ‘स्व’ की पहचान कराने वाली स्थितियाँ नहीं दिखतीं। आत्मप्रवंचना, आत्मप्रशंसा दिखता है। ‘मैं’ का आतंक है। स्व का अस्तित्व नहीं। यह ‘मैं’ हमें औरों से दूर करता है। अहंकार में आनंद का नहीं, प्रहार का भाव है। मानसिक प्रहार। अपन को ऊँचा उठाकर दूसरों को नीचा कर दिखाना। स्वाभिमान मनुष्य को दूसरों से जोड़ता है। स्वाभिमानी मनुष्य दूसरों के आदर और स्नेह का पात्र होता है। उनका प्ररक भी बनता है। अहंकारी मनुष्य से सभी कतराते हैं। उनमें अन्यान्य गुणों के रहते हुए उन्हें उसे आदर नहीं देते। स्वाभिमान और अहंकार एक ही मनुष्य में विद्यमान हो सकता है। जिन गुणों का अभिमान उसे प्रतिष्ठा दिलाता है, उन्हीं शक्ितयों का अहंकार उसे निंदा दिलाता है। दूसरों से दूर कराता है। स्वाभिमानी मनुष्य के साथ घनेरों लोग रहते हैं। अहंकारी अकेला हो जाता है।

भारत स्वाभिमान की देशभर में अलख जगाने निकले योग गुरू स्वामी रामदेव ने कहा कि उनका मुख्य उद्देश्य भारत को भष्टाचार मुक्त बनाने के साथ राष्ट्र को आध्यात्मिक दृष्टि से विश्व में प्रथम स्थान दिलाना है। वे जीवन पर्यन्त संघर्ष करते रहेंगे। वे गुरूवार को हल्दीघाटी स्थित महाराणा प्रताप संग्रहालय में आयोजित सभा को संबोधित कर रहे थे। उन्होंने वीर शिरोमणि महाराणा प्रताप के बारे में कहा कि देश के स्वाभिमान वीर प्रताप ने मातृभूमि के सम्मान तथा स्वाभिमान के लिए जीवन समर्पित कर राष्ट्रप्रेम की ऎसी अलख जगाई जो भारतीयों के दिलों में अब तक जल रही है। देश के नागरिकों का कर्तव्य है कि वे राष्ट्र के सम्मान तथा स्वाभिमान के लिए सदैव तत्पर रहें। उनके संबोधन पर महाराणा प्रताप की पूरी छाया रही। योग के बारे में स्वामी रामदेव ने कहा कि योग के बिना जीवन का कोई औचित्य नहीं है। विश्व भर में शीघ्र ही साढे छह करोड से अधिक लोग योग को अपना चुके होंगे। भ्रष्टाचार पर तीखे प्रहार करते हुए उन्होंने कहा कि वर्ष 2014 के चुनाव में वही व्यक्ति देश की कमान संभालेगा जो देश में भ्रष्टाचार को मिटाने के साथ राज्यवाद, भाषावाद, जातिवाद तथा परिवारवाद से ऊपर उठकर राष्ट्रहित की बात करेगा। राष्ट्र निर्माण में स्वयं के योगदान के बारे में उन्होंने कहा कि वे ऎसे राष्ट्र के निर्माण की परिकल्पना में लगे हैं जिसमें सभी को समान दर्जा मिले। संग्रहालय आगमन पर संस्थापक मोहनलाल श्रीमाली एवं उनके परिजनों ने मेवाडी पगडी पहना, भाला भेंटकर उनका सम्मान किया।
शिर्डी:

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डी येथे थोर संत श्री साईबाबा अनेक वर्षे राहिले. येथे राहूनच त्यांनी भक्तगणांना भक्तिमार्गाविषयी आपल्या कृतीतून मार्गदर्शन केले. श्रद्धा व सबुरी अशी दोन सुत्रे जगण्यासाठी देणार्‍या श्री साईबाबांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला शिर्डी येथे समाधी घेतली. पुढील काळात येथे प्रशस्त मंदिर बांधण्यात आले व श्री साईबाबांच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली.१९२२ साली हे मंदिर बांधले आहे. गेल्या काही वर्षात भाविकांची संख्या वाढते आहे. शिर्डी संस्थानात भाविकांसाठी निवास, भोजन, प्रसाद अशा सोयी केल्या आहेत. उत्कृष्ट व्यवस्था होण्यासाठी अनेक इमारती बांधल्या आहेत.

इटालीयन संगमरवरातील श्री साईबाबांची सुंदर, विशाल मूर्ती हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच संगमरवरातील समाधीस्थानही अतिशय पवित्र, देखणे आहे. नागपूरच्या गोपाळराव बुटींनी मुरलीधराच्या मंदिरासाठी शिर्डीत बांधकाम करून घेतले. परंतु साईबाबाच तेथील मुरलीधर झाले असे म्हटले जाते.

शिर्डीमध्ये बालयोग्याच्या रूपात पोहोचलेले साईबाबा जेथे राहत, त्याला द्वारकामाई म्हणतात.ते ज्या कडुनिंबाच्या झाडाखाली प्रथम दिसले त्याला गुरुस्थान असे नाव आहे. ज्या ठिकाणी ते झोपत, त्या स्थानाला चावडी म्हटले जाते. श्री साईबाबांनी दररोज पाणी घालून तयार केलेली बाग लेंडीबाग म्हणून जतन केली आहे. तिथे कडूनिंबाच्या झाडाखाली बाबा रोज विश्रांती घेत असत. मंदिराच्या परिसरातच श्री साईबाबा ज्यावर नेहमी बसत, ती शिळाही दर्शनासाठी ठेवलेली आहे.
साईबाबा
साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नन्तर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोंबर १९१९ रोजी बाबानी समाधी घेतली.
बाबा  शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.''

     बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत.

     ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता.
आज साईबाबांचे लाखो भक्त जगात आहेत. दर वर्षी मुंबईतील दादर ते शिर्डी अशी साईबाबांची पालखी निघते. जवळपास प्रत्यही ८००० ते १२००० साई भक्त साईबाबांच्या देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीस येतात.
श्रीसाईबाबा ज्या वस्तू दररोज वापरत, त्या व्यवस्थित ठेवून एक संग्रहालय केले आहे. साईबाबांचा पाण्याचा डबा, पादूका, जाते, हुक्कादाणी, कफनी, खडावा या वस्तू पाहण्यास मिळतात. त्यांचे दुर्मीळ फोटोही इथे पाहायला मिळतात.

मुंबईहून ३०० कि. मी. तर पुण्याहून सुमारे २०० कि. मी. वर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावजवळ शिर्डी हे ठिकाण आहे. मनमाड जंक्शनपासून फक्त ६० कि. मी. वर शिर्डी आहे. त्यामुळे रेल्वेने येथे सहज पोहोचता येते. जगभरातून लाखो लोक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येतात.


ईश्वर हा सर्वव्यापी आहे आणि तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो अशी समानतेची शिकवण देणारे आधुनिक संत शिर्डीचे साईबाबा. साईबाबांच्या वास्तव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावाला जागतिक ओळख दिली.
शिर्डी आणि साईबाबा हे आता समानार्थी शब्द झाले आहेत. साईबाबांचे हे मंदिर गावाच्या मध्यभागी वसले आहे. याशिवाय साईबाबाच्या वास्तव्याने पावन झालेल्या खंडोबा मंदिर, द्वारकामाई, चावडी अशा ठिकाणांना रोज हजारो भक्त भेट देतात. समाधीमंदिर हे मुख्य ठिकाण. याठिकाणी पुर्वी वाडा होता. साईबाबांचे वास्तव्य अखेरच्या काही दिवसात इथे होते. इथे साईबाबांची समाधी आहे. या मंदिरात शांत निवांतपणे बसलेल्या स्थितीतली पांढर्‍या शुभ्र संगमरवराची साईबाबांची मूर्ती आहे. समाधी मंदिराचे नित्य उपक्रम सकाळी ५ वा. सुरू होतात. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात घुमणारे भुपाळी स्वरांनी भक्त मंदिराकडे साईबाबांच्या ओढीने खेचला जातो.
याशिवाय भक्त दर्शन घेतात ते खंडोबा मंदिराचे. हे तेच मंदिर आहे ज्याठिकाणी साईबाबांनी शिर्डीत सर्वप्रथम दर्शन दिले होते. असे सांगतात की या मंदिराचे विश्वस्य आसलेल्या म्हाळसापती सोनारांनी कफनी घातलेल्या दाढी वाढलेल्या साईबाबांना पाहताक्षणी `या! साई` अशी हाक मारली आणि तेव्हापासून ते साईबाबा याच नावाने भक्तांना परिचित झाले. इथे एक मोठे वडाचे झाड आहे. आता इथे एक छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. त्यात साईबाबांच्या पादुका ठेवल्या आहेत.
त्यानंतर गुरुस्थानाचे दर्शन भक्त मोठ्या श्रध्देने घेतात. साईबाबांच्या सांगण्याप्रमाणे याठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांच्या गुरुची समाधी आहे. इथे अजूनही ते कडुनिंबाचे झाड बहरले आहे. इथे एक शिवलिंग आहे आणि साईबाबांची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर दर मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी धुनी पेटवण्यात येते. गुरुस्थान हे आत्मीक शांती देणारे ठिकाण आहे.
द्वारकामाई! हे आणखी एक महत्त्वाचे ठिकाण. साईबाबा जिथे राहायचे त्या ठिकाणाला ते द्वारकामाई म्हणून संबोधायचे. असं सांगतात की, साईबाबा लग्नाच्या वर्‍हाडासोबत शिर्डीला आले आणि उतरले ते याच ठिकाणी आणि अखेरपर्यंत ते इथेच राहिले. इथल्या धुनीची उदी भक्तांना द्यायचे. द्वारकामाईला लागून एक संग्रहालय साई संस्थानाने विकसित केले आहे. याठिकाणी साईबाबांच्या रोजच्या वापरातले पाण्याचे भांडे, कांबळे, जाते इ.वस्तू ठेवल्या आहेत. शिवाय ज्या दगडावर बसून साईबाबा भक्तांचे दु:ख निवारत तो मोठा दगडही इथे ठेवला आहे. साईबाबांचे एक मोठे पोट्रेट याठिकाणी आहे.
ज्या ठिकाणी साईबाबा झोपायचे त्याठिकाणाला ते चावडी म्हणायचे. ही चावडी द्वारकामाईला लागूनच आहे. इथेही साईबाबांचे एक मोठे पोट्रेट लावले आहे. समाधी मंदिर आणि इतर संबंधित ठिकाणांचे दर्शन एक आत्मशांतीचा अनुभवन देणारे आहे.
'चावडी' म्हणजे ग्रामकार्यालय.शिर्डी श्री साईबाबा मंदिरात चावडी श्री द्वारकामाई च्या उजव्या बाजुस स्थायिक आहे. श्री साईबाबा आपल्या शेवटच्या काळात या चावडीत झोपायचे.चावडी ही सकाळी ५ ते सध्याकळी ९ वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते.च्वळीत साईबाबांचे एक मोठे छायाचित्र आहे: तिथे एक लाकडी पलंग आहे ज्यावर द्वारकामाईत श्री साईबाबांनी आपली जीवनलीला संपवन्या आदी शेवटचे स्नान केले होते.तसेच तिथे पाय दुमडुन बसलेल्या साईबाबांचे छायाचित्र आहे जे सणाच्या दिवशी आणी प्रत्येक रविवारी ठेवड्यात येते.    
शिर्डीला जाण्यासाठी उत्कष्ठ वेळ :
          शिर्डी हे पवित्र स्थान आहे जिथे प्रत्येक दिवशी देश-परदेशातून हजारो भाविक प्रचंड संख्येने दर्शनासाठी येत असतात. श्री साईबाबांच्या दर्शनाकरीता आपण कधीही शिर्डी जाउ शकता पण सर्वात उत्तम वेळ जून ते ऑगस्ट महिन्यात असते.ह्यामागे कारण असे की हा काळ अतिशय आनंद दायक आणि उल्लासित असतो .भक्ताना गरम वातावरण किवा रखरखील ऊनाची चिंता करण्याच काही कारण नाही कारण ह्या वेळी हवामान पाउसामुळे थडं असतो यामुळे आपल शिर्डीचा प्रवास आनंददायक होतो तसेच हिवाळा हा काळ सुद्दा आतिशय उत्तम आहे.शिर्डीचा वातावरण ह्या वेळी ७ डिग्री असते.

परिचय
श्री क्षेत्र शिर्डीमधे ज्याप्रमाणे भाविकांना भक्ति ,उपासना सेवा,यांची दिव्य प्रचीती येते तशीच अनुभूती विरारच्या इच्छापुरती साईबाबा मंदिरात भक्तगनांनी मंदिर व्यवस्थापनच्या सहकार्याने चालविलेल्या विविध उपक्रमान्द्वारे अनुभवावयास मिळते.
      भक्ति आणि सेवाभावातून चालविले जाणारे विविध धार्मिक आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम आणि त्यातून मंदिर परिसराचा झालेला कायापालट पाहिल्यास भक्ति मधे किती अफाट शक्ति आहे हे सहजपणे लक्षात येते.
      श्री साईधाम मंदिर ट्रस्ट,विरार या संस्थेच्या व्यवस्थापणाखालील या मंदिरातील श्री साईबाबांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना माहे माघ शुक्ल ५ (वसंती पंचमी,गुरुपूष्या मृत) शके १९०८ अर्थात १२ फेब्रुवरी १९८७ रोजी श्री गणेश व दत्त गुरू यांच्या मुर्तीसह षोडोपचारे,विधिपूर्वक मोठ्या थाटामाटात,उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली होती. गेल्या २ दशकाणहून अधिक काळ अविरत कार्य करणार्याय श्री साईधाम मंदिर ट्रस्ट, विरार या संस्थेच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सेवाभावी कार्याची ही संक्षिप्त माहिती.

ठाकुरांच्या विरारमधून दरवर्षी एक हजार साई भक्त पालखी घेउन शिर्डीला साईंच्या दर्शनाला जातात.मात्र शिर्डीतील वाढती गर्दी पाहता हितेद्र ठाकूर आणि भाई ठाकूर यांनी विरारच्या पालखीसाठी शिर्डीत पालखी निवारा बांधण्याचे ठरविले. त्यानूसार हितेंद्र ठाकूर हे २००७ साली शिर्डीला आले.आपल्या पालखी निवार्‍यांसाठी फक्त २० गुंठे जागा घेण्याचे ठरले.मात्र शिर्डीत रोज येणारे पदयात्री आणि पालख्यांची संख्या पाहता हितेंद्र ठाकूर यांनी एकूण ९ एकर जागा विकत तर ३ एकर जागा भाडेपट्टीवर घेतली. या विस्तीर्ण जागेवर कशा पद्धतीचे बांधकाम करायचे,वास्तु कशी असावी,या वास्तुचा जास्तीत जास्त किती भक्तांना लाभ मिळेल. याचा सारासार विचार करुन हितेंद्र ठाकूरांनी या साई पालखी निवारा बांधकामाला सुरुवात केली
      शिर्डी देवस्थानापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेला हा भव्य-दिव्य साई पालखी निवारा प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.या साईपालखी निवार्‍याचे प्रवेशद्वारच आकर्षक आहे. तर आतील वास्तू मन मोहून टाकते.या विस्तीर्ण जागेत एकूण ३० हजार चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये पालखी निवारा,प्रसादालय,मंगल कार्यालय,राहण्याचे उत्तम वसतीगृह बांधण्यात आले आहे.