Wikipedia

Search results

Tuesday 2 April 2013

पूर (flood)

पूर (flood)


नदीचे पाणी जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा त्या स्थितीला पूर असे म्हणतात.
अलीकडे दर पावसाळ्यात, पुण्यामधे एक नवीनच प्रश्न उभा राहतो आहे. थोडा जोरात पाऊस एखाद्या दिवशी जरी पडला तरी सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. काही काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या तळमजल्यावरील वाहनतळांमधे तर कंबरेपर्यंतसुद्धा पाणी साचते. पूर्वी सुद्धा पुण्याला याच पद्धतीने पाऊस पडायचा. मधून मधून खूप जोरात पडायचा. पण तेंव्हा पाणी पटकन नदीकडे वाहून जायचे. पुण्याच्या पश्चिम भागात वेताळ टेकडी व आजूबाजूच्या टेकड्यांच्या रांगा आहेत. या टेकड्यांच्यावर पडलेले पावसाचे पाणी, असंख्य ओढे व नाले नदीकडे घेऊन जात. या ओढ्यांना प्रचंड पूर येत असे. काही वेळेला तर या ओढ्यांमधे, माणसे मोटरगाड्या सुद्धा पाण्याच्या जोराने वाहून जात असत. मात्र मागच्या पंधरा वीस वर्षापासून पुण्यात प्रचंड प्रमाणात गृहसंकुले बांधली जाऊ लागली आहेत. उपलब्ध जमीन मर्यादित असल्याने, बांधकाम व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या संगनमताने हे ओढे बुजवून त्यावरच आपली गृहसंकुले बर्‍याच ठिकाणी उभारली आहेत. या ठिकाणी मूलत: नैसर्गिक रित्याच खोलगट भाग असल्याने येथे ओढे निर्माण झाले असणार हे एखादा लहान मुलगा सुद्धा सांगू शकेल. हे ओढे बुजविले गेल्याने या खोलगट भागाकडे येणारे पावसाचे पाणी थोडेच थांबवता येणार आहे. ते पाणी तेथेच येणार आणि आतापर्यंत ज्या ओढ्यातून हे येणारे पाणी नदीकडे वाहून नेले जात असे तो ओढाच अस्तित्वात नसल्याने रस्त्यावरून वाहत येणारे हे पाणी मग गृहसंकुलांच्या तळमजल्यावर साठत राहते. त्याचा निचरा होतच नाही.

पूर येण्याची कारणे

हिमालयातून होणार्‍या भुस्खलनामुळे तसेच जमिनीचा वरचा थर सरकला जाण्यामुळे कोसीला दरवर्षी पूर येतो. खूप उंचावरून ही नदी येत असल्याने पावसाळ्यात तिच्या पाण्याचा प्रवाह नेहमीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी जास्त असतो. जमिनीचा वरचा थरच ती आपल्याबरोबर घेऊन येते. मैदाना प्रदेशात आल्यानंतर तिच्या प्रवाहाची गती कमी होते. पण तिला सामावून घेण्यासाठी नदीचे पात्र अपुरे पडत असल्याने तिचे पाणी सगळीकडे फैलावते. त्यातच पाऊस सुरू असल्यास नदी आजूबाजूचा प्रदेश गिळंकृत करत सुटते.
वातावरण बदलाचे" परिणाम
वातावरण बदलाचे बरेच दृश्य-अदृश्य परिणाम सांगता येतील पण थोडक्यात:
ग्लोबल वॉर्मिंगमुळे सामाजिक, आर्थिक विकासावर परिणाम होतो. वातावरणातील बदलामुळे प्रादेशिक हवामानामध्ये प्रत्यक्ष जैविक बदल झालेले आहेत. तसेच त्याचा गंभीर परिणाम सामाजिक व आर्थिक उन्नतीवर होत आहे. हवामान बदलामुळे समुद्रकिनार्‍याची पातळी वाढत चाललेली आहे. समुद्राजवळ राहणार्‍या २० टक्के लोकांना स्थलांतरित करण्याची गरज निर्माण झाली आहे. २५ टक्के लोकसंख्या पाहता वादळीवारा, पुराच्या संकटांशी सामना करावा लागत आहे.
    हिमनग वितळू लागले: दोनही धृवांपासून ते गंगोत्रीपर्यंत हिमनग वितळू लागले आहेत. परिणामी एकीकडे समुद्रातील पाणी वाढून समुद्राची पातळी वाढू लागली आहे आणि किनारपट्टी कमी होऊ लागली आहे तर इतर काही ठिकाणी नद्यांना पूर येणे वाढू लागले आहे.
    सुपीक जमिनीत पाणी वाढून तिची शेतीची क्षमता कमी होवू लागली आहे.
    समुद्राच्या तळातील पाण्याचे सरासरी तापमान वाढल्यामुळे चक्रीवादळांच्या जोराचे प्रमाण वाढू लागले आहे.
    सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम


वरील परिणाम हे जागतिक पातळीवर होत आहेत पण त्यातील कदाचित दोन धृवांवरील बर्फ़ वितळण्याचा भाग सोडल्यास त्याचे सामाजिक-राजकीय-संरक्षण आणि आर्थिक परिणामांना भारतास आणि भारतीयांस सामोरे जावे लागणार आहे. उदाहरणादाखल बांगलादेशी विस्थापित/घुसखोर (जो काही योग्य-अयोग्य शब्द वाटेल तो) यांचा विचार करा. बांगलादेशात त्रिभूज प्रदेश आहेत. वातावरण बदलामुळे त्यातील भूभाग गंगेच्या वाढत्या पाण्याने कमी होत आहे. दुसरीकडे समुद्राच्या वाढ्त्या पाण्याने जमीने खारी आणि परिणामी नापीक होत आहे. बाकी कुठलेही कारण (धर्म, राजकारण, पैसा इत्यादी) असो-नसो अस्तित्वाचा लढा होत असलेल्या जमावाला जिथे जाणे शक्य आहे तिथे आणि ज्या पद्धतीने जावे लागेल तसे, जाणे भाग पडणार. परिणाम भारताच्या सुरक्षेवर, समाजकारण, अर्थकारण आणि राज्कारणावर पडणार, किंबहुना पडतो आहे.

मानवनिर्मित पूर

आतापर्यंत केवळ निसर्गाचा कोप म्हणून माहिती असलेले पूर आता मानवी चुका, चुकीची अभियांत्रिकी समीकरणे आणि क्षुल्लक अशा राजकारणामुळे मानवनिर्मित ठरले आहेत
वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे प्रशांत नंदा याला आपल्या अमूल्य अशा जमा केलेल्या पुस्तकांना वाचवणेही शक्य झाले नाही. जे बांधकाम करायला आम्हाला वर्षानुवर्षे लागली ते केवळ काही मिनिटांमध्ये नष्ट झाल्या. ते गेल्या दोन दशकांपासून येथे राहत होते मात्र असा अभूतपूर्व पूर त्यांनी कधीही पहिला नव्हता. पुराच्या धोक्याचा कोणताही इशारा आम्हाला मिळाला नाही, असे ओरिसातील संभलपूर इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील लेक्चरर नंदा सांगतात.
८ सप्टेंबर हिराकुंड धरणातून ११ लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले तेव्हा नंदा यांच्याप्रमाणेच सर्वांनाच आश्चर्य वाटले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे वरच्या भागातून त्यांच्या भागात पूराचे अभूतपूर्व असे पाणी वाहत आले. याबाबतचा कोणतीही इशारा देण्यात आला नव्हता. खालच्या बाजूला राहणाऱ्या लोकांबाबत जराही विचार करण्यात आला नव्हता. याचा परिणाम: ६८ जण ठार झाले, राज्यातील एकूण ३० जिल्हांपैकी १९ जिल्हे पूरामुळे प्रभावित झाली. ४५ लाख लोक निर्वासित झाले. ४.७८ लाख हेक्टर जमिनीवरील पीक नष्ट झाले. २९०० किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते नादुरूस्त झाले. हजारो लोक बेघर झाले आणि अन्न आणि निवारापासून वंचित झाले. ओरिसातील पूर म्हणजे उद्भवलेल्या परिस्थितीत घाबरून उमटलेली प्रतिक्रिया होती. धरणातील पाण्याच्या स्तराचे योग्य नियमन करण्याच्या अलिखित नियमाप्रती दाखविलेल्या अनादराचा तो परिणाम होता. नियमानुसार ऑक्टोबरच्या अखेरपर्यंतच्या धरणातील पाण्याच्या साठ्याने कमाल मर्यादा गाठायला हवी. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठड्यात पाण्याच हा स्तर ६२५ फूट होता, या कालावधीत तो ६०६ फूट असायला हवा होता. सांगितलेला पाण्याचा हा स्तर ठेवला असता तर पाण्याच्या जोरदार प्रवाहानंतरही पूराचे पाणी असे अचानक आणि अनपेक्षितरित्या सोडण्याची वेळ आली नसती. हा नियमही दोषमुक्त आहे असे नाही. वरच्या भागात पडणाऱ्या पावसाच्या नोंदीनुसार हा नियम तयार करण्यात आलेला आहे. तथापि, त्याची सर्वात शेवटची मोजणी १९८८ मध्ये करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये पाण्याचा जो साठा धरणात आला तो सर्वात जास्त असा होता आणि त्याने २००८ आणि १९८२ सालच्या विक्रमांनाही मागे टाकले. धरणाचे दरवाजे सलग दोन दिवस उघडे होते. या भागात हवामानाचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या भागात आधीच सततचा मुसळधार पाऊस सुरू होता. केवळ ४८ तासांमध्ये या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पौर्णिमा असल्यामुळे पाण्याचा सर्व प्रवाह बंगालच्या खाडीमध्ये वळला होता आणि त्यामुळे नव्या कोणत्याही भागात पुराचा धोका निर्माण झाला नाही.

वेधशाळा अशा वादळांचा आणि पावसाचा सतत पाठपुरावा करते. त्याच्या संभाव्य मार्गाबद्दल ठाम अंदाज व्यक्त केले जातात. त्यानुसार सुरक्षा साधने आणि जीवनावश्यक साधनांची जुळवाजुळव केली जाते. तसेच संकटकाळी बाहेर पडण्याच्या मार्गांचे नियोजन करून त्यांची प्रात्यक्षिकेही आधीच केली जातात.
ज्यावेळी हा पाऊस संकटाची पातळी गाठेल असे वाटते, तेव्हा ही डिझास्टर मॅनेजमेन्ट सिस्टीम पूर्णपणे कामाला लागते. सर्वप्रथम टीव्ही, रेडिओ, http://www.nhc.noaa.gov सारख्या इंटरनेट साइट आणि पोलिस यंत्रणेमार्फत संकटाची झळ पोहोचण्याची शक्यता असणाऱ्यांना पुन्हापुन्हा सूचना दिल्या जातात. त्याचसोबत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करून पर्यायी व्यवस्थांची अद्ययावत माहिती दिली जाते.
दरम्यानच्या काळात नागरिकांनी कोणत्या रस्त्यांनी बाहेर पडून ठराविक सुरक्षित स्थळी कसे पोहोचावे हे सातत्याने पोलिस व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने सांगितले जात असते. अशा सुरक्षित ठिकाणांचा आधीपासूनच शोध घेतला जातो आणि त्या ठिकाणी रेडक्रॉससारख्या संघटना तंबूंची व्यवस्था करतात. आपत्कालीन यंत्रणेद्वारे स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून अन्न, कपडे, औषधे आदी जीवनावश्यक गोष्टींची तरतूद केली जाते.
त्याचप्रमाणे पावसाआधी शाळा, कॉलेज, ऑफिसांमध्ये डिझास्टर मॅनेजमेन्ट यंत्रणेबद्दल परिसंवाद आयोजित केले जातात. जवळच्या सुरक्षित स्थळांबद्दल, संकटकाळी घ्यायच्या खबरदारीबद्दल माहिती दिली जाते. जास्तीत संपत्ती व सामान विम्याच्या संरक्षणाखाली कसे आणावे, ते कसे सुरक्षित राखावे याचे प्रात्यक्षिक सादर केले जाते. पावसाच्या काळात सरकारतर्फे पिण्याचे पाणी, पाण्याचे स्त्रोत यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
पावसाचा कहर थांबल्यानंतरही ही यंत्रण पुनर्वसनाच्या कामाला वाहून घेते. विस्थापितांना पुन्हा घरी आणणे, संपर्क जोडणे, पाणी, धान्याचा पुरवठा नियमित करणे आदींचा समावेश असतो. रोगराई रोखण्यासाठी आरोग्य पथके कामाला लागतात. विस्कटलेली घडी नीट बसत नाही तोपर्यंत ही यंत्रणा अशीच काम करत असते.
अतिवृष्टीनंतर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नौदल, हवाई दल, लष्कराची मदत घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टय़ा दिल्या जाणार नाहीत.
* सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपमध्ये साचणारा घनकचरा रोखला पाहिजे. प्लॅस्टिकच्या बॅगांवर बंदी, किंवा त्यांच्या कचऱ्यासाठी वेगळी व्यवस्था आवश्यक आहे.
* नद्यांच्या मार्गातील अनधिकृत बांधकामे दूर करावे लागतील. सागरी प्रतिबंधक कायद्याची कडक अमलबजावणी करावी लागेल.
* साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी पुरेशा प्रमाणात हलक्या टायरच्या बोटी तयार ठेवाव्यात.
* हॅम रेडिओसारखी यंत्रणा गावागावात कार्यान्वित करावी, तेथील तरुणांना त्याचे प्रशिक्षण द्यावे.

पानशेत पूर
पानशेतच्या पुरात पाण्याखाली गेलेला पुण्यातील पुल
१२ जुलै, इ.स. १९६१ रोजी महाराष्ट्रातील पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुराचा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भाप्रवेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनार्‍यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली.

चीनमध्ये महापूर, ५० जण मृत्युमुखी
गेले दोन दिवस अखंड कोसळणा-या पावसाने चीनमध्ये महापूर आला आहे. झायनिंग शहराला पुराचा मोठा फटका बसला असून, देशभरातील सुमारे ५० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच पुराच्या या तडाख्यामुळे घरे वाहून गेल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत.
शुक्रवारपासून कोसळणा-या या पावसाची नोंद आतापर्यंत ३०० मीमी एवढी झाली असून, त्याने चीनमध्ये मागच्या दोन वर्षातील विक्रम बाद ठरवले आहेत. या पुरामुळे नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी भूस्खलनही झाले आहे.
झायनिंग हे शहर तर या पुराने वाहून गेले आहे. मृत लोकांमध्ये जास्तीत जास्त लोकांचा समावेश याच शहरातील आहे. तर शंभरहून अधिक लोक जखमी आहेत. तसेच प्रचंड मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली
या पूरामुळे शहरातील वीज आणि दूरध्वनीसेवाही खंडित झाली आहे. मदतकार्य वेगाने सूरू असून प्रशासकीय यंत्रणा लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. पण पावसाच्या संततधारेमुळे मदतकार्यातही अडथळे निर्माण झाले आहेत.

आळंदी - मावळ भागात पावसाचा जोर असल्याने इंद्रायणीला पूर आला आहे. नदीकिनाऱ्याच्या दगडी घाटावर पाणी आले असून, भक्त पुंडलिक मंदिर अर्धे पाण्यात आहे.
मावळ भागात गेली काही दिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे आळंदीतील इंद्रायणी दुथडी भरून वाहू लागली आहे. येथील दर्शनबारीसाठीचा भक्ती सोपान पूल पुराच्या पाण्यामुळे खचला असून, दोन दिवसांपूर्वी त्याचे दोन भाग झाले. सध्या पुरामुळे इंद्रायणीवरील दगडी घाटावर दोन्ही बाजूने पाणी आले आहे; तर नदीकिनारी असलेले भक्त पुंडलिक मंदिर सध्या अर्धे पाण्यात आहे. याशिवाय सिद्धबेट, जलशुद्धीकरण केंद्र, इंद्रायणीनगर, साधकाश्रम परिसरातील नागरिकांना धोक्‍याचा इशारा म्हणून महसूल खात्याच्या वतीने सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आळंदीतही दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे; तर पावसामुळे यात्रेकरूंचीही वर्दळ कमी आहे. पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधान आहे.
बिहारचा पूर आणि महाराष्ट्र

बिहारमध्ये आलेल्या महापुराने कहर केला असून जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकले आहे. पंतप्रधानांनी अखेर या पुरामुळे बिहारमध्ये 'राष्ट्रीय आपत्ती' घोषित केली आहे. पण यासार्‍या प्रकोपासाठी कारणीभूत ठरली ती कोसी नदी. बिहारचे अश्रू ही आपली ओळख या नदीने सार्थ केली आहे. दरवर्षी या नदीला येणार्‍या पुराचे दूरगामी परिणाम होत आहेत. त्याचा संबंध महाराष्ट्राशीही आहे. कसा ते पाहू.
कोसीचा उगम हिमालयात होतो. नेपाळमधून ती बिहारमध्ये प्रवेश करते. येताना ती आपल्याबरोबर बरीच वाळूही आणते. त्यामुळे बिहारमध्ये शेतकरी हैराण झाले आहेत. या वाळूमुळे जमिनीची नापिकी वाढली आहे. महर्षी विश्वामित्राचा संबंध या नदीशी जोडला जातो. महाभारतात कौशिकी म्हणून जिचा उल्लेख सापडतो, ती हिच नदी.
या नदीला सप्तकोसी असेही संबोधले जाते. कारण हिमालयातून निघालेल्या कोसीत सात नद्या येऊन मिसळतात. सन कोसी, तमा कोसी, दूध कोसी, इंद्रावती, लिखू, अरूण व तमार अशी या नद्यांची नावे आहेत. या सगळ्यांच्या संगमामुळेच तिला सप्तकोसी म्हणतात. कोसीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा प्रवाह कधीही बदलू शकतो. त्यामुळेच लोकांची दाणादाण उडते. सध्या झालेल्या प्रकोपाचे कारणही तिचा प्रवाह बदलणे हेच आहे. गेल्या दोनशे वर्षांत कोसीने पूर्वेकडून पश्चिमेकडे १२० किलोमीटर प्रवाह सरकवला आहे.
त्यामुळे प्रत्येक वर्षी एक नवा भाग कोसी गिळंकृत करत जाते. बिहारमधील पूर्णिया, अररिया, मधेपुरा, सहसरा, कटिहार या जिल्ह्यांत कोसीच्या अनेक शाखा आहेत. कोसी बिहारमध्ये महानंद व गंगेला मिळते. त्यामुळेसुद्धा पाण्याचा फुगवटा वाढतो.
बिहारमधील पूर्णिया व कटिहार हे जिल्हे कोसीचे प्रमुख प्रभावक्षेत्र आहे. एकीकडे प्रलय माजविणार्‍या या नदीचे दुसरीकडे मात्र गुणगाणही गायले जाते. बिहारमधल्याच मिथिलांचल भागात या नदीशी संबंधित लोककथा, लोकगीते आहेत.

हे सर्व होण्याची अनेक कारणे आहेत. पण दोन पटकन सांगाविशी वाटणारी कारणे:
    वास्तवीक श्रावण (राखी/नारळी) पौर्णिमेनंतर कमी होणारा पाऊस हा अजूनच अतिवृष्टीकडे वळत आहे. याचा संबंध काही प्रमाणात वातावरण बदल/क्लायमेट चेंज शी लावता येऊ शकतो. तसा आहे देखील...
    पाऊस हा कधीतरी जास्त पडतो / पडू शकतो (मग तो पावसाळ्यात असेल अथवा इतर कारणांमुळे इतर वेळेस असेल!) इतके जरी मान्य केले तरी आजच्या या परीस्थितीस जबाबदार कोण आहेत या वर विचार केल्यास वाटते - वाटेल तेथे वाटेल तशा इमारती बांधणारे बिल्डर्स, त्याला परवानगी देणारे सरकार/नोकरदार आणि त्याचा विचार न करता ते घेणारे सामान्य नागरीक...
    नद्यांना नियमितपणे पूर येऊ देणे आवश्यक आहे. यामुळे मोठा पूर येईल तेंव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल.निदान काही ठिकाणी तरी नदीकाठचा पाणथळ प्रदेश परत पूर्वीसारखा ठेवणे आवश्यक आहे यामुळे पूर आला की काही ठिकाणी तरी नदीचे पात्र रुंदावू शकेल.
    नदीचे बांध काही ठिकाणीच ठेवावे व त्यांची व्यवस्था योग्य प्रकारे व्हावी.
    नदीकाठी झाडे लावणे अतिशय महत्वाचे आहे. या झाडांच्यामुळे जमीन घट्ट धरून राहते व पुराचा परिणाम कमी त्रासदायक होतो. मागच्या काही दशकात नदी काठची झाडे नष्ट करण्यात आलेली आहेत.
परंतु हे सगळे होईल का यासंबंधी हे तज्ञ एकूण निराशावादीच आहेत. हे सगळे होणे गरजेचे असले तरी हे एवढे मोठे बदल आहेत की ते करण्याची क्षमता पाकिस्तानी शासनात असेल असे त्यांना वाटत नाही.



  
वाई, दि. 31 : धोम धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे मंगळवारी प्रति सेकंद 3 हजार 200 क्युसेक्स पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले. बुधवारीधरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हे दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता पी. डी. जाधव यांनी दिली. यावेळी शाखा अभियंता पी. एस. पाटील उपस्थित होते.
धोम धरणाची पातळी 747.70 मीटर असून मंगळवारी सायंकाळी  6 वाजता 747.06 मीटर पातळी वाढली. धरणात 13 टीएमसी पाणी असल्याने ते 96 टक्के भरले होते. त्यामुळे 3 हजार 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावेळी धरणाचे पाचही दरवाजे 20 से. मी. ने उघडण्यात आले. आज दिवसभर हा विसर्ग सुरू होता. मात्र धोम धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सायंकाळी 6 वाजता पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला.
यापूर्वी 2008 मध्ये धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर तीन वर्षांनी मंगळवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे कृष्णा नदीस पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. महागणपती मंदिरास पाणी लागले असून पुराचे दृष्य पाहण्यासाठी आज दिवसभर लोकांनी गर्दी केली होती. काही हौशी तरूण या पुरात पोहून गर्दीचे लक्ष वेधून घेत होते. नदीपात्रातील व पात्राच्या बाजूची गेली तीन वर्षे साठून राहिलेली घाण   आजच्या पुराने धुवून गेली. नदीपात्राच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी सांगितले.

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. प. बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात ढगफुटीमुळे नद्यांना पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरात १०० प्रवाशाना घेऊन जाणारी बस वाहून गेली. १२ प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याचे वृत्त आहे.

बांकुरा जिल्ह्यातील झरगाम येथून दुर्गापूर येथे बस जात होती. भैरव बाकी नदी पार करीत असताना आलेल्या पुराच्या लोंढ्यात बस वाहून गेली. १०० प्रवाशांपैकी बारा जणांना वाचवण्यात आले आहे. मात्र, बाकीचे प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत.

ढगफुटीमुळे पश्‍चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात ठिकठिकाणी पूर आला आहे. सखल भागांमध्ये पुराचे पाणी अडकून पडल्याने अनेक गावांची संपर्क तुटला आहे.

यवतमाळमध्ये पावसामुळे शेतीचं नुकसान
यवतमाळ: पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते, मात्र विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

यवतमाळला पाणी पुरवठा करणारं निलोना धरण भरुन वाहत आहे. तर अडाण, अरुणावती या नद्यांना पूर आला असून नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

जिल्ह्यातील पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दिग्रस, आर्णी, दारव्हा, घाटंजी या तालुक्यांमध्ये शेतीचं नुकसान सर्वाधिक झालं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर हिवरी, बोरीगोसावी, सदोबा सावली, पहूर नस्करीसह अनेक गावात नाल्य़ातील पाणी घुसल्याने घरांची पडझड झाली आहे.

त्याचप्रमाणे चंद्रपुर जिल्ह्यामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे बल्लारपूर, राजूरा, गडचांदूर या तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. धोनोरा नाल्यावरच्या पुलावरुन पाणी वाहत आहे.

3 comments: