Wikipedia

Search results

Saturday 17 August 2013

राजन खान

राजन खान

मराठीतले नावाजलेले कथा आणि कादंबरीकार.
त्यांनी ग्रामीण भागातील दलित आणि मुस्लिम समाजाचे (मुख्यतः स्त्रियांचे) प्रश्न, व स्वार्थी राजकारणी लोकांनी त्यांचा घेतलेला गैरफायदा ह्याचे विदारक पण अतिशय वास्तव चित्र कादंबऱ्यांद्वारे मांडले आहे.
प्रकाशित साहित्य

  •     सत्‌ ना गत (कादंबरी)
  •     हिलाल (कादंबरी)
  •     जिनगानी (ललित)
  •     बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी
  •     एडनच्या बागेतील सर्प (कथा संग्रह)
  •     पिढी (वैचारीक)
  •     पांढऱ्या जगातला अंधार
  •     बाई जात (कथा संग्रह)
  •     ग्वाही आणि वेगळी नसलेली गोष्ट (एकत्र २ कादंबऱ्या)
  •     गूढ (कथा संग्रह)
  •     जिरायत (ललित)
  •     इह (माहितीपर)
  •     मीच मला माहिती नाही (कादंबरी)
  •     किंबहुना (ललित)
  •     सध्या सारं असं चालू आहे (कथा संग्रह)
  •     तत्रैव (कथा संग्रह)
  •     एक लेखक खर्च झाला (कथा संग्रह)
  •     अजब गजब जगणं वागणं (वैचारिक)
  •     एकूण माणसांचा प्रदेश (कथा संग्रह)
  •     बीजधारणा (कादंबरी)
  •     काळ (कादंबरी)
  •     गाठी गाठी जीव (कादंबरी)
  •     जन्मजंजाळ (कथा संग्रह)
  •     हयात आणि मजार (कादंबरी)
  •     यतीम (कादंबरी)
  •     जातवान आणि विनशन (कादंबरी)
  •     वळूबनातली कामधेनू (कादंबरी)
  •     चिमूटभर रुढीबाज आभाळ (कादंबरी)


पुरस्कार
    महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पटकथा पुरस्कार (चित्रपटः धुडगूस, २००९)

इतर
    २००८ साली मराठी साहित्य संमेलनाच्या उमेदवारांपैकी एक (विरुद्ध: प्रा. हातकणंगलेकर)
    राजन खान यांनी २००९ साली मी संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते.

राजन खान यांचे घणाघाती भाषण

 

१. मला एक जण भेटायला आला तो ढोंगीपणे शिवाजी महाराज म्हणायच्या आधी 'छत्रपती' हा शब्द वापरत होता. प्रत्येकवेळेस छत्रपती म्हणताना त्याची देहबोली मी पाहात होतो. तो उच्चार ढोंगी होता. तसेच प्रत्येक वेळेस तुकारामांचा उल्लेख करताना तो जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणत होता. मी त्याला म्हणालो की महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुर्‍हाणपूर या गावापलीकडेही तुकारामांचे नांव कुणाला माहीत नाही. ते जगद्गुरू कसे? जगात सहाशे पन्नास कोटी लोक राहतात व महाराष्ट्रात दहा कोटी! म्हणजे बाकीच्या सहाशे चाळीस कोटी लोकांना जवळपास माहीतही नसलेला संत आपण जगद्गुरू म्हणून नावाजतो याला काही अर्थ आहे का?
२. मराही साहित्यात मुसलमान कायम क्रूर म्हणून रेखाटला गेलेला आहे. मुसलमानांची वागणूक, राहणी याची अजिबात कल्पनाही नसताना मुसलमान रेखाटणारे मराठी साहित्याचाच अपमान करत आहेत.
३. मराठी लेखक 'स्वतःच्या बाहेर जाऊन' काहीही लेखन करत नाही. संशोधन करणे, कष्ट काढून जीवनचे इतर पैलू तपासणे, अभ्यासणे व नंतर रेखाटणे हे प्रकार तो करतच नाही. ब्राह्मणाला सांगीतले की महार माणूस लेखनात चितार, तर तो ग्रामीन शब्दांचा समावेश असलेले लेखन करतो इतकेच! प्रत्यक्षात महाराची जीवनशैली तपासण्याची इच्छा नसते. उलटे महाराला जर सांगितले की ब्राह्मण माणसे कशी असतात हे लेखनात चितार, तर तोही आजवर वाचलेल्या साहित्याचा पगडा म्हणून तसेच लिहितो. तो कधीही ब्राह्मणाचे आचरण जवळून पाहात नाही. ज्यांनी कोणी असे परजातीय चित्रण केलेले आहे तेही त्यांच्या अनुभवात जे आहे तितकेच! त्या पलीकडे जाऊन नाही.
४. मराठीतीत बहुतेक साहित्य हे असेच आहे. आजवर मी (मी म्हणजे राजन खान), हमो व आणखीन काही समकालीन माणसांनी वयाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राने, मराठी भाषेने गौरवलेले साहित्य वाचले. मात्र आज या टप्यावर आम्हाला असे वाटते की आपण नेमके काय वाचले? तर ते साहित्य, ज्यात 'मी' व 'मी पाहिलेले आयुष्य' या पलीकडे काहीही नाही? कल्पनाविस्तार, संशोधन, प्रवास, अनोळखी जगाचा परिचय, त्यात वास्तव्य, सखोलतेची अशी पातळी की जेथे मानवजमातीतील कोणत्याही प्रदेशात, वंशात त्या साहित्याचे मूल्य अमूल्य ठरावे असे मराठी साहित्यात काही मिळाले नाही. एखाद्याने लेखन केले तर त्याच्या कथेत महार किंवा एखादे ग्रामीण पात्र जरूर असते. ते पात्र म्या, व्हय, नाय असे शब्दही बोलते. मात्र फक्त ग्रामीण भाषेचा बाज हे ग्रामीण जीवन नाहीच.
५. जागतिक पातळीवरच्या लेखकांचे लेखन महाराष्ट्रात गौरवले जाते. आजही जगाच्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे शेक्सपिअरचा एक खेळ चाललेलाच असतो. महाराष्ट्राचे साहित्य मात्र जागतिक पातळीवर गेलेले नाही. याला मराठी रसिकांच्या कोत्या आणि लेखकांच्या मत्सरी प्रवृत्ती कारणीभूत आहेत. तसेच, मराठी भाषेने आजवर लेखकाला भौतिक श्रीमंती प्रदान केलेली नाही. ज्या रस्त्यावर प्रकाशक गाडीतून फिरतो त्या रस्त्यावर लेखक फुटपाथवरून पुढच्या कथेचा विचार करत चाललेला असतो व दुसरा विचार त्याच्या मनात हा असतो की पैसे आणले नाहीत म्हणून बायको किती आणि कशी बोलेल?
६. काळाच्या पुढचे, निदान शंभर वर्षे पुढचे असे लेखन मराठी माणूस करतच नाही. तो त्याच्याच जीवनाचे चित्रण करत राहतो. अशा साहित्यामुळे ते साहित्य वाचणारा समाजही तेथेच राहतो. उलट, काही महान महाराष्ट्रीय साहित्यिकांचे साहित्य वाचून तर समाज मागेच जातो. समाजाच्या बौद्धिक प्रगतीसाठी व नवीन आव्हाने स्वीकारण्याच्या वृत्तीच्या वाढीसाठी साहित्यात नवेपणा, नवीन पैलू, काळाच्याही पुढचे सोचण्याची क्षमता साहित्यिकांमध्ये असायला हवी व असल्यास ती त्यांनी जोपासायला हवी व समाजाने त्या साहित्यिकांना आधार द्यायला हवा.
७. मोठमोठे कवी, मोठमोठे लेखक जे प्रचंड गौरवले गेले व ज्यांचे साहित्य अभ्यास म्हणून अभ्यासण्यात आले व ज्यांनी साहित्याच्या दर्जा
देव ,धर्म आणि जात सगळे काल्पनिक : राजन खान


 

मी कुठल्याच धर्माचा नाही , देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे . देव , धर्म आणि जात काल्पनिक आहे . असे प्रतिपादन राजन खान यांनी संजीवनी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले .

त्यांनी यावेळी सांगितले की , आजपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव , धर्म मानणा - या लोकांनीच केला आहे . या देशातील ६० टक्के लोक गरीब आहेत . सर्व देव मानणारे आहेत . देव त्याचं भल्ल का करत नाही ? गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत . भ्रष्टाचारी अधिका अधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि देवबाप्पा काहीच करायला तयार नाही . हि या देशाची वाईट अवस्था आहे . या जगात एक ही मुसलमान खरा मुसलमान नाही , एक ही हिंदू खरा हिंदू नाही , एक ही ख्रिश्चन खरा ख्रिश्चन नाही . त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत . गर्वसे कहो म्हणणारे तेवढ्या पुरतेच त्या त्या धर्माचे आहेत .

धर्म त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होइल . प्रत्येक धर्म मुलभूत पणे एक शिकवण देतो , दुस - या माणसाला माणूस म्हणून वागव , किमंत दे . धर्माचा गर्व मानणारे , सर्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत . खरे धार्मिक नहीत . दोन पर्याय आहेत , एक धर्म सोडा जे जगायचे आहे तसे जगा . किवा विनंती पूर्ण सागणे आहे कि जो धर्म आहे तरी नीट पाळा , इमानदारीत पाळा . कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही . मारण्या आधी जगणार का हा प्रश्न आहे . मला वाटते बिनधर्माचं नैतिक जगता येते . नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुस - या माणसाशी मायेने , आपुलकीने आणि माणसा सारखं वागणे म्हणजे नैतिकता . पाळायचा असेल तर खरोखर धर्म पाळा , नाहीतर धर्म सोडा . आपला धर्म शोधा त्याचा अभ्यास करा त्याचे पालन करा , असे खान यांनी स्पष्ट केले . मनोज पाटील यांनी प्रास्ताविक पाहुण्याची ओळख करून दिली . अध्यक्षस्थानी पंढरीनाथ नाईक होते . सूत्रसंचलन कोमल जोशी यांनी केले . ईशस्तवन तेजल पाटील यांनी सादर केले .

जागतिक साहित्य निर्मितीसाठी सर्व भेद सोडावे लागतील- राजन खान
 जागतिक साहित्य मानवतावादी व विज्ञानवादी असते. ते निर्माण करण्यास सर्व भेद सोडावे लागतील, असे प्रतिपादन २० व्या नवोदित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन खान यांनी केले.
पुष्पक मंगल कार्यालयातील महात्मा फुले साहित्यनगरीत आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे, मराठा सेवासंघाचे प्रदीप साळुंके, सतीश मडके आदींची उपस्थिती होती. पोटाला आधार देण्याची धमक मराठी भाषेत आहे. मात्र, शिक्षणसम्राट असलेले नेते व त्यांच्यामागे धावणारे तथाकथित लेखक यांच्यामुळे मराठी भाषा अडचणीत आली आहे. साहित्यात इंग्रजी भाषेचा वापर करणारे बांडगे साहित्यिकच भाषेच्या मुळावर उठले असल्याचे खान यांनी सांगितले.
बोराडे यांनी साहित्य म्हणजे माणसाच्या जगण्याचा इतिहास असतो. तो तटस्थपणेच मांडायला हवा, असे सांगून विशिष्ट स्थितीत होत असलेल्या संमेलनातून इतिहासात कधी नव्हे, इतक्या तीव्र स्वरूपात निर्माण झालेल्या पाणी, चारा व रोजगार टंचाईचे प्रतििबब उमटणे गरजेचे आहे, असे नमूद केले. स्वागताध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी भीषण परिस्थितीला लेखणीच्या माध्यमातून पर्याय मिळावा. वास्तव सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी संधी म्हणून संमेलन आयोजित केल्याची भूमिका मांडली.
कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी साहित्य परिषदेच्या कामांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ यादव यांनी आभार मानले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना संमेलनाध्यक्ष खान व बोराडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘आता सावध राहा’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी हरी नरके समितीने केंद्राकडे प्रस्ताव दिला. वर्ष-दीड वर्षांत त्याला मंजुरी मिळेल. मराठीचे भाषिक संवर्धन करण्यासाठी केंद्राकडून दरवर्षी ५०० कोटींचा निधी उपलब्ध होईल, असे सांगून खान यांनी आता सावध राहा, असा सल्ला दिला. राज्यातील अनेक िशगारू संस्था या ५०० कोटींकडे डोळे लावून बसल्या आहेत. नाही तर पुन्हा मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकीर असे घडेल आणि अनेक फकीर सध्या पुण्यात संस्था काढून बसले असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राने संत तुकाराम, ज्ञानेश्वर या कवींची देवळे बांधली. त्यांची नित्यनियमाने पूजा केली जाते. मात्र, त्यांनी दिलेला विचार देवळांमध्येच कोंडला असल्याची खंतही खान यांनी व्यक्त केली.

Monday 5 August 2013

जिवलग मित्र

जिवलग मित्र

मैत्री म्हणजे काय हे शब्दात सांगता येत नाही.
जिवलग मित्र हा नशीबानेच मिळू शकतो
इतर कोणत्याही नात्यापेक्षा
मैत्री खूपच चांगलं नांत....
जिवलग मित्र
तोच... जो आपल्या सुखात आणि दु:खातही सोबत करतो.
मित्राची खरी कसोटी संकटाच्याच वेळी होत असते.
मित्र हा आपल्या मैत्रीसाठी कोणताही त्याग करू शकतो
ज्या व्यक्तिला अशी मैत्री भेटली तो भाग्यवानच..... 

 
सत्याची कास सोडू नये
होउदे मनास किती त्रास
डोक्यातून अश्रू सांडू नये
प्रयत्त्नाने यश लाभेलच
त्यासाठी वेळ वाया दवडू नये
करावी मैत्री निरपेक्ष,
स्वार्थीपण मैत्रीत असूच नये...

मैत्रीचा निर्मळ धागा काही
काळापुरता जोडणारा नसावा
तर ती अनंत काळची असावी.
मैत्रीमधूनच काही नाती निर्माण होतात ती
गुलाबासारखी निर्मळ असावी
आणि मोगर्‍याच्या फुलासारखी सुंगधित असावी. 

\


मैत्री की प्रेम...?


कधी न संपणारी फक्त मैत्रीच असते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच न संपणारे
मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन् फसवा
मैत्री नाजूक धागा अन् अतूट बंधन
प्रेम कितीही नाजूक
पण...
तुटतेच कधीतरी
मैत्रीचे तसे नाही
मैत्री दोघही निभावतात
   मैत्रीनेच प्रेमाला सुरुवात होते
माझ्या मैत्रीत प्रेम आहे
पण माझ्या प्रेमात मैत्री
कधीच नसणार
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की
प्रेमापेक्षा जास्त मैत्री
मग तुम्ही काय मागाल?
मैत्री की प्रेम?