Wikipedia

Search results

Friday 1 March 2013

भारतीय वायुसेना



भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.
इतिहास - ८ नोव्हेंबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स झाले.
 विमाने - इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन बनावटीची लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली.
सद्य काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली आयुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.
संस्था-   वायुसेनेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. वायुसेनेच्या कर्मचार्‍यांच्या मुख्याला खालील मुख्य अधिकारी वर्गाकडून सहाय्य केले जाते.
१) वायुसेनेचा उपप्रमुख, २) डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ, ३) वायुसेना अधिकारी प्रमुख (व्यवस्थापन), ४) एअर ऑफिसर इन्चार्ज, पर्सोनेल, ५) एअर ऑफिसर इन्चार्ज (मेंटेनन्स)
भारतीय वायुसेनेमधील कार्यरत विभाग :
१) पश्चिमी वायुसेना कमान, २) दक्षिण - पश्चिमी वायुसेना कमान, ३) मध्य वायुसेना कमान, ४) पूर्वीय वायुसेना कमान, ५) दक्षिणी वायुसेना कमान,
भारतीय वायुसेनेमधील सहाय्यक विभाग :
१) प्रशिक्षण कमान, २) मेंटेनन्स कमान
नुकतीच भारतीय वायुसेनेत सुखोई ३० विमाने दाखल झाली असून त्यांच्या समावेशाने भारतीय वायुसेनेची क्षमता वाढली आहे. याशिवाय 'फोर्स मल्टीप्लायर' म्हणून ओळखली जाणारी फाल्कन ही अ‍ॅवॅक्स रडार प्रणाली भारताने इस्त्रायलकडून मिळवली आहे. ही प्रणाली -७६ या रशियन बनावटीच्या विमानांवर बसविण्यात येणार आहे.
संशोधन आणि विकास
१) पृथ्वी : हे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याची प्रथम चाचणी १९८८ साली श्रीहरिकोट्टा येथे झाली. भारतीय लष्करामध्ये याचा प्रवेश १९९३ साली झाला.
२) त्रिशूल : हे छोटया पल्ल्याचे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याची मारा करण्याची क्षमता ५ - ९ कि. मी. इतकी आहे. १९८८ साली याची यशस्वीरीत्या चाचणी झाली.
३) आकाश : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. एका वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करु शकण्याची याची क्षमता आहे. याची मारा करण्याची क्षमता २५ कि.मी. इतकी आहे. १९९० साली याची यशस्वीरीत्या चाचणी झाली.
४) नाग: हे तिसर्‍या पिढीतील रणगाडा भेदी क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता ४ कि.मी. इतकी आहे. याची यशस्वी चाचणी १९८८ साली झाली.
५) अग्नी: हे जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता २,५०० कि. मी. इतकी आहे. १९८९ साली याची चाचणी झाली. या जातीचे क्षेपणास्त्र असलेला भारत हा पाचव्या क्रमांकाचा देश ठरला. इतर चार देश खालीलप्रमाणे - अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन.

१९७४ मध्ये भारताने राजस्थानच्या वाळवंटात भूमिगत अणुस्फोट करुन मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या गटात स्थान मिळविले. मे १९९८ मध्ये पोखरण येथेच पुन्हा अणुचाचण्या करुन भारताने विज्ञान तंत्रज्ञाम्प्;ाान क्षेत्रातील आपली प्रगती सिध्द केली आहे. अणुशक्ती शांततेच्या कारणासाठी वापरावयाची असे देशांचे धोरण असले तर वेळप्रसंगी अणुबॉम्ब तयार करायचीही देशाची क्षमता आहे. मार्च १९७५ मध्ये भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. यानंतरच्या गेल्या २९ वर्षात अनेक उपग्रह देशाने अवकाशात पाठवले आहेत. यातील काही उपग्रहांचा (उदा. रिमोट सेनसिंग) लष्करी कारणांसाठी वापर करणे शक्य आहे. २५ फेब्रुवारी १९८८ रोजी पृथ्वी या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणाखाली यशस्वी चाचणी घेण्यात आली. देशात क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत जमिनीवरुन आकाशात मारा करणारी, तसेच रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा विकास चालू आहे. फेब्रुवारी १९८८ मध्ये चक्र ही पहिली अणुपाणबुडी भारतीय नौदलात दाखल झाली. ही पाणबुडी रशियन बनावटीची असून भारतीय नौदल हे अणुपाणबुडी असणारे जगातील सहावे नौदल ठरले आहे. डिसेंबर १९८७ मध्ये मिग २९ हे मिग मालिकेतील सर्वात आधुनिक विमान भारतीय हवाईदलात दाखल झाले आहे. रशिया सोडल्यास मिग -२९ विमानांचा समावेश असणारे भारतीय हवाईदल जगातील पहिले हवाईदल आहे. नजीकच्या भविष्यात नाशिकजवळील ओझरच्या विमान कारखान्यात ही विमाने बांधली जाणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील संशोधनासाठी डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन या संघटनेची १९५८ मध्ये स्थापना करण्यात आली. नवीन आधुनिक शस्त्रे व उपकरणांची निर्मितीी व संशोधन हे या संघटनेचे प्रमुख कार्य आहे. या संघटनेच्या अंतर्गत देशभर ५१ प्रयोगशाळा व संशोधन संस्था संरक्षणविषयक संशोधनाचे काम करीत आहेत.
संरक्षण संशोधन क्षेत्रात १९९० मध्ये बरीच नवी प्रगती झाली. ऑगस्ट १९९० मध्ये मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरुन आकाशात मारा करणार्‍या आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बालासोर जिल्हयातील तळावर (ओरिसा) घेण्यात आली. १९८३ साली सुरु झालेल्या या कार्यक्रमात हा महत्वाचा टप्पा गाठला गेला. याच मालिकेतील अग्नी, पृथ्वी, त्रिशूळ, आकाश, पिनाक, निशांत या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी यापूर्वीच झाली आहे. या संशोधनात बहूतांश भारतीय तंत्रज्ञाम्प्;ाान व साधनसामग्रीचा वापर करण्यात आला आहे. हे विशेष.

4 comments:

  1. राजू वेर्णेकर

    उत्कृष्ट लेख. याच बरोबर भारतीय हवाई दलात वारंवार विमान दुर्घटना का होतात या वर प्रकाश झोत टाकावा....राजू वेर्णेकर ९८२० ६४० ७०२

    ReplyDelete
  2. Nice Sir 💯%👌🏻👌🏻

    ReplyDelete