Wikipedia

Search results

Friday 8 August 2014

भूकंप

भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होवून पृथ्वी च्या पृष्ठभागाची हालचाल होण्यात होते. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात.
चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भुकंपाची नोंद घेणार्‍या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास होउफेंग डिडोंग यी असे नाव होते.
  भुकंपाची तिव्रता मोजण्याच्या यंत्रास "सिस्मोग्राफ" अथवा "सिस्मोमिटर" असे नाव आहे तसेच भुकंप मोजण्यासाठी "रिष्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. ३ रिष्टर स्केल वा त्या पेक्षा कमी तिव्रतेचे भुकंप धोकादायक नसतात. तिव्रता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होवू शकते.
समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भुकंप प्रलयांकारी त्सुनामी निर्माण करू शकतो.
भुकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालील पैकी कोणत्याशी कारणाने भूगर्भातील हालचाल व भुकंप होवू शकतो.
    * ज्वालामुखी जागृत झाल्याने.
    * खाणींमध्ये केलेले कृत्रिम स्फोट.
    * अणूचाचण्या.
भुकंपमापक रिष्टर परीमाण
 भुमध्याजवळील(एपिसेंटर)वेगवेगळ्या तिव्रतेच्या होणार्‍या भुकंपाचे परीणामांचे वर्णन खाली दिले आहे. या तक्त्याचा विशेष काळजीपुर्वक अभ्यास करावयास हवा कारण, भुकंपाची तिव्रता व तदानुषंगाने होणारे त्याचे परीणाम फक्त त्याच्या तिव्रतेवरच अवलंबुन नसुन त्याचे भुमध्यापासुनचे अंतर,भुमध्याखालील त्याच्या केंद्राचे(फोकस) अंतर,व भौगोलीक परीस्थिती यावरही अवलंबुन असते.(काही प्रदेश भुकंपाच्या संकेतांची(सिग्नलस्) तिव्रता वाढवतात.
जलाशयामुळे भूकंप
१७  व १८ डिसेंबर २००९च्या दोन लेखांमध्ये ‘लोकसत्ता’ने खरे तर दोन वेगळे विषय मांडले होते. प्रतिक्रिया देताना भूगर्भतज्ज्ञ रत्नाकर पटवर्धन यांनी (१८ जानेवारी २०१०) दोन्ही लेखांमधील हा अंत:प्रवाह ओळखलेला दिसत नाही. भूकंप हे अटळ वास्तव आहे. जेथे धरण बांधले आहे, तेथे भूकंप होतात. तसेच जेथे धरणच नाही तेथेही भूकंप होतात. समुद्राच्या तळाशीही भूकंप होतात. उत्तुंग पर्वताच्या खालीही भूकंप होतात. १७ डिसेंबरच्या लेखात कोयना-वारणा क्षेत्रातील भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात सरकल्याची माहिती दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. या परिसरातील भूकंपाच्या नोंदींचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते. या क्षेत्रातील सध्याचे ९० टक्केपेक्षा जास्त भूकंपांचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आढळून येतात. तर १८ डिसेंबर २००९च्या संपादकीय लेखात सर्वसामान्य जनतेचा भूकंपाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा; भूकंपपीडित जनतेने मदत याचना करताना शासनाकडूनच सर्व अपेक्षा करण्याची मनस्थिती कशी बदलावी; भूकंपाची वास्तविकता स्वीकारून त्याला सामोरे जाण्याची सज्जता ठेवण्याकडे मनोबल कसे वळवावे याबाबतचे मत अत्यंत डोळसपणे मांडले आहे.
  समाजाने वास्तव स्वीकारून जगले पाहिजे. त्यात शासन-प्रशासनही आलेच. धरणासह सर्व बांधकामे ही भूकंपात टिकतील अशी बांधायला हवीत. भूकंपापूर्वी, भूकंपादरम्यान व भूकंपानंतर काय करावे, काय करू नये याबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे, याबाबत कोणाचेही वाद असण्याचे कारण नाही.
आता थोडे ‘जलाशयामुळे होणारे भूकंप’ फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ या पटवर्धन यांच्या लेखनातील वादग्रस्त मुद्याविषयी. वास्तविक त्यांनी केलेला शब्दप्रयोगदेखील आता कालबाहय़ झालेला आहे. हे खरे आहे, की हूवर धरण बांधल्यानंतर १९४०च्या दशकापासून काही मोजके भूगर्भतज्ज्ञ हे ‘धरणामुळे भूकंप होतात’ या दृष्टिकोनाचे प्रवर्तक होते. परंतु हळूहळू            यांचा उत्साह मावळला. जगामध्ये सुमारे ४० हजार धरणांपैकी डझनभर धरणेदेखील यांच्या मताला दुजोरा देणारी ठरली नाहीत. तेव्हा त्यांनी फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ (            या संकल्पनेचा त्याग करून फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ (फकर) जलाशय उद्युक्त भूकंप असा शब्दप्रयोग सुरू केला.
   पटवर्धन यांनी हे कोयना, भातसा, किल्लारी याबरोबरच चणकापूर येथील धरणाचाही उल्लेख करून या सर्व ठिकाणी धरणे बांधून त्यात पाणी साठविल्यानंतर भूकंप झाल्याचे लिहितात. तसेच हे भूकंप ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर असे पावसानंतर आणि धरणे भरलेली असताना होतात, याकडे लक्ष वेधले आहे. बहुधा त्यांनी हे विधान ऐकीव गोष्टीच्या आधारे केले असावे असे वाटते. उत्कृष्टपणे गोळा व जतन होत असलेल्या कोयनेच्या भूकंपाच्या नोंदी पाहिल्या असता असे दिसून येते, की मार्च, एप्रिल व मे या महिन्यांतही तेवढेच किंवा काही वेळा इतर महिन्यांपेक्षा जास्त भूकंप झाले आहेत. ते म्हणतात तसे जलाशय भरणे व रिकामे होण्याच्या प्रक्रियेशी किंवा काही जण म्हणतात त्याप्रमाणे ज्या गतीने जलाशय भरतो किंवा रिकामा होतो त्या गतीशी भूकंपाचा काहीही संबंध नाही, हे भूकंपप्रवण क्षेत्रातील कोणत्याही धरणाच्या आकडेवारीवरून सिद्ध करता येऊ शकते व तसे यापूर्वी केलेही आहे.
  पटवर्धन यांनी, महाराष्ट्रातील बेसॉल्ट हा खडक, त्याची रचना आणि गुणधर्म लक्षात घेता धरणामुळे, त्यातील पाणीसाठय़ामुळेच भूकंप होतात, असे वाटू लागते तसेच ५० वर्षांत झालेले भूकंप नवीन निर्माण केलेल्या धरणांमुळेच घडले असल्याचे धाडसी विधान केले आहे. वास्तविक महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडकाच्याच रचना व गुणधर्मामुळे धरणाचा किंवा पाणीसाठय़ाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही असे ठामपणे म्हणता येईल! विशेषत: भूकंप जमिनीखाली ज्या खोलीवर निर्माण होतात, तेथपर्यंत या धरणाचा किंवा जलाशयाच्या पाण्याचा यत्किंचितही परिणाम पोहोचू शकणार नाही, असे दिसून आले आहे. जलाशय उद्युक्त भूकंप या तत्त्वाचे प्रणेते ज्या वैज्ञानिक तत्त्वाचा आधार घेण्याचे प्रयत्न करतात त्याबद्दलची
वस्तुस्थिती खालीलप्रमाणे-
दिसली ना पाण्याचा झिरपा१. धरणामुळे होणाऱ्या पृथ्वीवरील वजनवाढीमुळे खडकातील स्ट्रेन एनर्जी बाहेर पडून भूकंपनिर्मिती होते, असे सांगितले जाते. वास्तविक कोणत्याही धरणामुळे पडणारा जमिनीवरील दाब हा ३-४ मजली इमारतीच्या पायाच्या दाबापेक्षा कित्येक पटीने कमी असतो हे सिद्ध करता येऊ शकेल.
२. जलाशयातील पाण्याचा खोलवर झिरपा होऊन खडकामधील घर्षण कमी झाल्याने भूकंप होतात असेही म्हटले जाते. भूकंपाची निर्मिती जमिनीखाली काही किलोमीटर खोलवर होते. तेथपर्यंत पाण्याचा झिरपा पोहोचणे केवळ अशक्य आहे. कोयना जलाशयाच्या खाली बोगद्यांचे जाळे खणण्यात आले आहे. ते जलाशयाखाली ५० मीटरपेक्षा कमी खोलीवर आहे. त्या ठिकाणी काम सुरू असताना तेथील खडकांमध्ये ना स्ट्रेसलेव्हलमध्ये वाढ  आढळला
  हैदराबाद येथील एका संस्थेच्या वैज्ञानिकांनी असेच सिद्धान्त मांडून पाण्याची पातळी जेव्हा जेव्हा उच्चांक गाठेल त्या त्या वेळेस पूर्वी मोठे भूकंप झाल्याचे लिहून कोयना परिसरात डिसेंबर २००५ पूर्वी असा मोठा भूकंप होणार असल्याचे भाकित सप्टेंबर २००५ मध्ये वर्तविले होते. तसेच १५ दिवसांच्या अंतराने दोन मध्यम स्वरूपाचे भूकंप (चार रिश्टर स्केल) झाल्यास पुढील तीन महिन्यांत पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होतो आणि त्यामुळेच डिसेंबर २००५ पर्यंत पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होईल, अशी बातमी माध्यमापर्यंत सप्टेंबर महिन्यात पोहोचल्याने घबराटीचे वातावरण होते; तेव्हा जलसंपदा विभागाने व कोयना प्रकल्पाने या वृत्ताचे खंडन करून अभिलेखावरील भूकंप नोंदी, जलाशयाच्या पाण्याची पातळी, जलाशय भरण्याचा व रिक्त होण्याचा दर या कोणत्याच निकषावर हे सिद्धान्त खरे ठरत नसल्याचे ऑक्टोबर व नोव्हेंबर २००५मध्ये दाखविले होते. संबंधित शास्त्रज्ञांना हैदराबाद येथे भेटून  कोयना येथे बोलावून त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली होती.