Wikipedia

Search results

Friday 8 March 2013

लिअँडर एड्रीअन पेस

लिअँडर एड्रीअन पेस (जन्म: जून १७, १९७३) हा दुहेरी आणि मिश्र दुहेरी टेनिस मधील सर्वात यशस्वी भारतीय खेळाडूंपैकी एक आहे.

पेस १९९१ मध्ये व्यावसायिक टेनिसपटू बनला. १९९५ च्या ऑलिंपिक मध्ये एकेरी सामन्यांमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले. पेसचे वडील व्हेस पेस यांनीही १९७४ च्या ऑलिंपिक मध्ये हॉकीमध्ये भारतातर्फे सांघिक कांस्यपदक मिळवले होते. ऑलिंपिकच्या इतिहासातील ही एक आगळी वेगळी घटना आहे.
सप्टेंबर २००८ मधील यु.एस. ओपन मध्ये, सेरा ब्लॅक(झिंबाब्वे) च्या साथित त्याने जेमी मुरे (ब्रिटन) व लिझेल ह्युबर (अमेरिका) मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवले.

जिगरबाज, लढवय्या, जिद्दी, गुणी ही सारीच विशेषणं टेनिसपटू लिअँडर पेसला शोभणारी आहेत. वयाच्या ३६व्या वषीर्ही त्याचा उत्साह, खेळ तरुणासारखा आहे. खेळाची त्याची भूक कमी झालेली नाही. 'मी अजूनही टेनिसचा विद्याथीर्च आहे', असं तो अकरावे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्यावरही सहजच म्हणतो. तेव्हा त्याच्या यशाचं रहस्य उघड होतं.

कोलकात्यात नांदणाऱ्या वेस व जेनिफर पेस यांच्यासारख्या कसलेल्या खेळाडूंचा लिअँडर मुलगा. लिअँडरची इच्छा होती फूटबॉलपटू बनण्याची. पण वडलांच्या आग्रहापायी त्यानं हातात टेनिसची रॅकेट धरली. १९७२मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे वेस मिडफिल्डर! तर, आई जेनिफरने १९८०च्या आशियाई बास्केटबॉल स्पधेर्त भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलं. त्यामुळे लिअँडरही खेळाडूच होणार हे जवळपास निश्चित होते. गोवन कॅथलिक असल्याने कुटुंबात तसं बिनधास्त वातावरण. पेसही तसा स्वच्छंदी पण, खेळ असो किंवा जीवन त्यानं शिस्त सोडली नाही. हा गुणही त्याला आई, बाबांकडून मिळाला.

टेनिसपटू व्हायचं म्हटल्यावर डॅड वेसनी त्याला १९८५मध्ये ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकादमीत भरती केलं. लिअँडरला खेळ शिकायला फारसा वेळ लागलाच नाही. अवघ्या पाच वर्षांत म्हणजे १९९०मध्ये विम्बल्डन ज्युनियरचे अजिंक्यपद त्यानं पटकावलं. मग मागे वळून पाहिलं नाही. अर्थात, यशाचा हा मार्ग सोपा नव्हता. सतत प्रतिकूल परिस्थितीचा सामना त्याला करावा लागला. टेनिस कोर्ट असो की खासगी आयुष्य, अनेक वादळं लिअँडरपुढे उभे ठाकली. पण; तो डगमगला नाही. कारकिदीर्च्या ऐनभरात २००३मध्ये 'सिस्टिसेकोर्सिस' हा मेंदूचा आजार त्याला झाला; पण या पठ्ठ्याने निधड्या छातीने त्याचा मुकाबला केला. डॉक्टरांचं यश व कुटुंबीय, चाहत्यांच्या शुभेच्छांच्या बळावर तो पुन्हा कोर्टवर उतरला. औषधांमुळे सूज आली. आजारात वजनही वाढलं. लढाऊ लिअँडरनं वजन घटवलं. तो फीट बनला.

तोवर इकडे एकेकाळचा जिवाभावाचा मित्र व दुहेरीचा जोडीदार महेश भूपतीशी भांडण झालं. हे दु:ख पचवूनही तो उभा राहिला. वर्षभरापूवीर्च भारताच्या डेव्हिस कप संघाने लिअँडर हुकूमशहा असल्याची तक्रार केली. त्याला कर्णधारपदावरून काढण्याची मागणी टेनिस असोसिएशनकडे केली. असं एकटं पाडूनही तो डगमगला नाही. देशासाठी तो याच तथाकथित साथीदारांच्या खांद्याला खांदा लावून खेळत राहिला आणि आजही खेळतोय..

पैलवान खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक ब्राँझपदक मिळवणारा लिअँडर पहिला भारतीय! १९९६मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यानं ही करामत केली.

खरेतर या पठ्ठ्याचा एकेरीचा प्रवास झकास सुरू होता. न्यूपोर्ट स्पर्धा लिअँडर जिंकला. तर न्यू हेवन स्पधेर्त त्याने पीट सॅम्प्रसला पराभवाची धूळ चारली. जागतिक रँकिंगमध्येही ७३वा क्रमांक गाठला. पण; महेश भूपतीशी त्याची मैत्री झाली अन् दोघांनी दुहेरीवर लक्ष केंदित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना फळला! १९९८मध्ये तीन ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत त्यांनी धडक मारली. १९९९मध्ये तर चारही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेऱ्या गाठताना पेस-भूपती यांनी फ्रेंच ओपन व विम्बल्डनचे जेतेपदही पटकावले. पण, यशाची शिखरे गाठणाऱ्या या जोडीला न जाणे कोणाची नजर लागली आणि त्यांनी एकत्र खेळणे थांबवले. काहींच्या मते प्रोफेशनॅलिझम तसेच बक्षिसांच्या रकमांवरून खटके उडाले तर काहींच्या मते गर्लफ्रेंड्सचा मुद्दा कारण ठरला. डेव्हिस कप, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, एशियाड या क्रीडा स्पर्धांमध्ये पेस-भूपती आजही दुहेरीत उतरतात; पण त्यांच्यात आजही ती भांडणाची अंधुक 'लक्ष्मणरेषा' दिसतेच.
मित्र दुरावल्याने लिअँडर दुखावला तसंच महिमा चौधरीच्या मैत्रीनेही चचेर्त राहिला. त्यांचं पाटीर्त एकत्र असणं, परस्परांविषयी आस्थेनं बोलणं तसंच पेस उपचार घेताना महिमानं सावलीप्रमाणे साथ करणं, यामुळे ही दोघं लवकरच विवाह करणार, अशा बातम्या येऊ लागल्या. दोघांनी वृत्तपत्रांच्या मुलाखतीतून भावी संसाराची स्वप्नंही रंगवली. पण का कोण जाणे माशी शिंकली. हा हंसांचा जोडा वेगळा झाला. लिअँडरला आता महिमाचा विषयही नको असतो.
पत्रकार व 'आर्ट ऑफ लिव्हिंगची इन्स्ट्रक्टर' रिया पिल्लई व मुलगी अयानासह लिअँडर सध्या सुखानं नांदतोय. '२००४ची गोष्ट. र्वल्ड यूथ पीस समीटसाठी मी यावं, यासाठी रिया आमंत्रण द्यायला आली. तेव्हा तिची पहिली भेट झाली. त्या भेटीतच तिच्या प्रेमात मी आकंठ बुडालो,' लिअँडर सांगतो.
सध्या तो दुहेरीत ल्युकास दलॉहीसह तर, मिश्रमध्ये कारा ब्लॅकसह खेळतोय. लिअँडर व दलॉही यांच्यात दहा वर्षांचं अंतर; पण कोर्टवरील त्यांचा समन्वय बॉब व माईक या जुळ्या ब्रायनबंधूंसारखा आहे. माटिर्ना नवरातिलोवाच्या साथीतही लिअँडरने ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावलीत. माटिर्ना व लिअँडरची मैत्री आजही कायम आहे. लिअँडरचा खेळ पाहण्यासाठी ती मुद्दाम वेळ काढते.
असे जगभरचे मित्र व चाहत्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर लिअँडरला आणखी खूप खेळायचंय. वेल डन लिअँडर!

 

No comments:

Post a Comment