Wikipedia

Search results

Saturday 30 March 2013

मुंबई विद्यापीठ University of Mumbai



मुंबई विद्यापीठ
University of Mumbai logo
ब्रीदवाक्य शीलवृतफला विद्या
स्थापना जुलै १८, इ.स. १८५७
कुलपती महाराष्ट्राचे राज्यपाल
ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
परिसर सांताक्रूझ
नियंत्रक नॅक, यु.जी.सी.
संकेतस्थळ mu.ac.in

मुंबई विद्यापीठ हे भारतातील विद्यापीठांपैकी एक जुने आणि प्रमुख विद्यापीठ आहे. "वुड्स शैक्षणिक योजने" अंतर्गत मुंबई विद्यापीठची स्थापना सन १८५७ मध्ये झाली आणि भारतातील प्रथम तीन विद्यापीठांपैकी एक असा मान मिळवला.
         "बाँम्बे" शहराचे "मुंबई" असे नामकरण झाल्यामुळे विद्यापीठाचे नाव "बाँम्बे विद्यापीठ" ऎवजी "मुंबई विद्यापीठ" असे झाले; सदर अधिसूचना ४ सप्टेंबर १९९६ रोजी महाराष्ट्र सरकार द्वारा लागू केलेल्या राजपत्रात प्रकाशित झाली.
 
इतिहास
चार्ल्स वुडच्या इ.स. १८५४च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार जॉन विल्सन यांनी १८५७ साली या विद्यापीठाची स्थापना केली. मुंबईमधील सेंट झेव्हियर्स महाविद्यालय इ.स. १८६८ साली या विद्यापीठाखाली आले. सुरुवातीला एलफिन्स्टन महाविद्यालयाची इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात आली होती. सन १९९६ पर्यंत हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे म्हणून ओळखले जात होते. इ.स. १९९६ साली शासनाच्या निर्णयानुसार या विद्यापीठाला मुंबई विद्यापीठ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. मुंबईबरोबरच ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबईच्या सांताक्रूझ विभागात २३० एकर परिसरात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय संकुल आहे. मुंबईच्याच फोर्ट भागात विद्यापीठाचे जे संकुल आहे तेथून फक्त प्रशासकीय कारभार पाहिला जातो.
               इ.स. २०१० साली नॅककडून या विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा देण्यात आला. जगातील सर्वोत्तम ५०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक लागतो.[१] अनेक नामांकित महाविद्यालये व वीरमाता जिजाबाई अभियांत्रिकी संस्था (जुने नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-VJTI), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च(TIFR) सारख्या शैक्षणिक संस्था या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात.
ग्रंथालय - विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय असून त्याला जवाहरलाल नेहरू ग्रंथालय असे नाव आहे. या ग्रंथालयात ८,५०,००० च्यावर पुस्तके आहेत. ग्रंथालयाची पुस्तकसूची संगणकीकृत केलेली आहे.
विद्यापीठाचे काही माजी कुलगुरू
    जॉन विल्सन.,    सर रेमंड वेस्ट,  सर अलेक्झांडर ग्रांट.
    विल्यम गायर. (इ.स. १८६९),    न्यायमूर्ती काशिनाथ त्रिंबक तेलंग. (इ.स. १८९२ ते इ.स. १८९३),    रामकृष्ण गोपाळ भांडारकर. (इ.स. १८९३ ते इ.स. १८९४.,   रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे.,   महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे.,    डॉ. जॉन मथाई. (इ.स. १९५५ ते इ.स. १९५७),    डॉ. स्नेहलता देशमुख. (इ.स. २०००), डॉ. भालचंद्र मुणगेकर. (इ.स. २००० ते इ.स. २००५),    डॉ. विजय खोले. (इ.स. २००५ ते इ.स. २००९).   डॉ. राजन वेलूकर. (इ.स. २०१०) (आजी)
मुख्य इमारत
विद्यापीठाची मुंबई फोर्टमधील मुख्य इमारत गॉथिक शैलीत बांधलेली आहे. या इमारतीच्या बाजूलाच २३० फूट उंचीचा प्रसिद्ध असा राजाबाई टॉवर आहे. लंडनमधील बिग बेन टॉवरला नजरेसमोर ठेवून ब्रिटिश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट याच्या देखरेखीखाली याचे काम इ.स. १८७० साली पूर्ण झाले. उद्योगपती प्रेमचंद रायचंद यांनीही या कामी आर्थिक मदत केली होती. त्यामुळेच त्यांच्या आईच्या राजाबाई या नावावरून टॉवरलाही राजाबाई टॉवर असे नाव दिले गेले.

मुंबई विद्यापीठाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने सिद्ध झालेला "मुंबई विद्यापीठ, शहराचे भूषण' हा देखणा व भव्य ग्रंथ म्हणजे या विद्यापीठाच्या सोनेरी इतिहासाचा संग्राह्य व डोळस मागोवा घेण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. इंग्रजी व मराठी या दोन भाषांत हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
विद्यापीठांची स्थापना होणे हे भारताने आधुनिक जगात टाकलेले पहिले पाऊल होते. पहिल्या तिन्ही विद्यापीठांची आज शैक्षणिक क्षेत्रातील भरारी पाहिली तर महासत्ता होणार्‍या आपल्या देशाच्या महत्त्वाकांक्षेची पायाभरणी करण्यात शिक्षण संस्था किती महत्त्वाच्या ठरतात, हे दिसून येते. कोलकता विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठाचे एका अर्थाने थोरले भावंडं! कोलकता विद्यापीठाने बंकिमचंद्र चॅटर्जींसारखे रत्न देशाला दिले. मुंबई विद्यापीठ तर त्यादृष्टीने प्रचंड समृद्ध आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, न्या. रानडे, डॉ. भांडारकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, रा. धों. कर्वे यांसारख्या विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा निर्माण केली. विद्यापीठाच्या सार्वकालीन प्रगतीच्या खुणा अधोरेखित करणार्‍या या ग्रंथातील लेख हाही स्वतंत्र लेखाचाच विषय ठरावा. वसंत आबाजी डहाके, अमृत गंगर यांनी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच्या मुंबईतील शैक्षणिक परिस्थितीचा अत्यंत अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. अमेरिकन मराठी मिशनने १८१५ मध्ये मुंबईत पहिली शाळा सुरू केली तेव्हापासूनचा हा इतिहास आहे. राजाबाई टॉवर, ग्रंथालय व पदवीदान सभागृह या विद्यापीठाच्या देखण्या इमारती बांधण्यासाठी त्यांनी त्या काळी लक्षावधींच्या देणग्या दिल्या, त्या सर कावसजी जहॉंगीर रेडिमनी व प्रेमचंद रायचंद यांच्या आठवणीही यानिमित्ताने ताज्या होतात.
या इमारतींची वास्तुरचना जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट या जगद्विख्यात वास्तुविशारदाच्या डिझाईन्सवर आधारित आहे. या सर्वच वास्तूंचे विवेचन विकास दिलावरी यांनी केले आहे. पुनरुज्जीवित गॉथिक शैलीतील या इमारतींमधील दगडातील व लाकडातील कोरीवकाम, छप्पर, टाइल्स, चित्रकाच या सर्वांचा सुरेख वेध दिलावरी यांनी घेतला आहे. पूर्व-पश्चिम अशा दिशांना बांधलेल्या या इमारती बांधताना स्कॉट यांनी उष्ण कटिबंधातील हवामान, युरोपातली विद्यापीठे आणि सामाजिक वास्तुकला यांचेही संदर्भ विचारात घेतले होते. या शिवाय विद्यापीठ परिसरातील वृक्षवल्लींवरील प्रशांत मोरे यांचा, तर दुर्मिळ कागदपत्रांवर विजय तापस आणि वर्षा माळोदे यांचा अभ्यासपूर्ण लेखही यात आहे.
मुंबईच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक जीवनाचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांना अर्पण केलेल्या या ग्रंथाची संकल्पना प्रकाश विश्वासराव व छायाचित्रे संदेश भंडारे यांची आहेत. विद्यापीठाची देखणी छायाचित्रे हे या ग्रंथाचे एक सामर्थ्य आहे. या छायाचित्रांतून विद्यापीठाचा कोपरान कोपरा जिवंत झाला आहे. ही छायाचित्रेच आपल्याशी बोलतात! हा एकूणच ग्रंथ संग्राह्य करण्यात या छायाचित्रांचा फार मोठा वाटा आहे. कुलगुरू डॉ. विजय खोले यांचे अभ्यासपूर्ण निवेदन यात आहे.

भारतातील मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे, जिथे लोककलांचा एक वर्षांचा पूर्ण वेळ शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम सुरू झालाय. मुंबई फेस्टिव्हल, अ. भा. मराठी नाटय़संमेलन, नवरत्न पुरस्कार, सरस महोत्सव, आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा, दिल्ली लावणी महोत्सव, रंगपरंपरा महोत्सव, शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे तमाशा प्रशिक्षण शिबीर, तसेच दशावतार शिबीर आणि पहिले लोककला संमेलन रवींद्र नाटय़मंदिर आणि दुसरे लोककला संमेलन कऱ्हाड येथे झाले. याद्वारे आपल्या कलागुणांची चुणूक दाखविण्यासाठी लोककला अकादमीद्वारे विद्यार्थ्यांना मुंबई, तसेच राज्यस्तरीय व्यासपीठ गेल्या चार वर्षांपासून लाभले.
                सलग सातव्या वर्षी ‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले. हा महोत्सव कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात  दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ८५ गुण पटकावत मुंबई विद्यापीठाच्या अष्टपैलू संघाने सलग सातव्यांदा सर्वसाधारण जेतेपदाचा ‘राधाबाई वसंतराव रांगणेकर चषक’ पटकावत जणू काही या इंद्रधनुष्यावर आपले सप्तरंगच उधळले. तर मुंबई विद्यापाठोपाठ मुंबईच्याच एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाने ५३ गुण मिळवत महाराष्ट्रातील या २० विद्यापीठांच्या कुंभमेळ्यामध्ये उपविजेतेपदाचा मान मिळवला.

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे भूमिपुजन


अनेक दिवस रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे येथील उपकेंद्राच्या प्रश्नावर लक्षवेधी सूचना मांडून औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र ठाण्यात व्हावे, यासाठी ठाण्याचे महापौर असताना राजन विचारे यांनी बाळकूम येथील जागा उपकेंद्रासाठी मिळवून दिली होती. मात्र नंतरच्या दोन अडीच वर्षात उपकेंद्राचे काम सुरु होऊ शकले नाही. ठाणे जिह्यातील सर्व मुलांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला विद्यापीठात जावे लागते, यात विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यासाठी ठाणे येथे उपकेंद्र सुरु करावे या मागणीकडे आमदार राजन विचारे यांनी लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येऊन अधिवेशन संपल्यावर तातडीने दुसऱयाच दिवशी 24 डिसेंबर रोजी मंत्रालयात ठाण्याच्या उपकेंद्राबाबत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मंत्री राजेश टोपेसह आमदार राजन विचारे मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. के. वेंकटरामानी तसेच एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. चंद्रा कृष्णमूर्ती आदी उपस्थित होते. आदि उपस्थित होते. ठाणे उपकेंद्राचे काम महिनाभरात सुरु करण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी बैठकीत दिले.

दरवर्षीच वाढणारी महाविद्यालये आणि कमी होत चाललेले कर्मचाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे कामाचा प्रचंड ताण वाढला आहे.
विद्यापीठाच्या कोणत्याही विभागात गेल्यानंतर एकाच अधिकाऱ्याकडे एकापेक्षा जास्त पदांचा कारभार आणि त्याच्या सोबतीला असलेल्या कर्मचाऱ्यांकडे भरमसाठ काम यामुळे विद्यापीठातील अंतर्गत कामकाजाचा प्रचंड ताण कर्मचाऱ्यांवर पडतो आहे. संशोधन, परीक्षा घेणे आणि निकाल लावणे ही कामे विद्यापीठात प्राधान्याने केली जातात. दररोज १० ते १२ तास कामामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेळोपत्रक कोलमडून पडले आहे. शिवाय विद्यापीठ एकूण सात ठिकाणी विखुरलेले असल्याने एखाद्या छोटय़ा कामासाठीही बराच वेळ लागणे आणि कामे लांबणीवर पडणे ही बाब तेथे सर्रास घडताना दिसते. विद्यापीठामध्ये जे कर्मचारी निवृत्त झाले. त्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया नसल्याने एकाच अधिकाऱ्याकडे विविध पदांची कामे एकवटल्याने अशा अधिकाऱ्यांना ‘हायपर टेंशन’, रक्तदाब वाढणे, हृदयविकार, मधुमेहासारखे आजार जडले आहेत.

एकेकाळी मुंबई विद्यापीठाची जगभर प्रतिष्ठा व नाव होते. आता त्यातले काहीच उरले नाही. उलट अनेक कारस्थानी कुलगुरूंमुळे ही प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. एवढेच नाही, तर विद्यापीठाचा सारा कारभार दिरंगाई आणि द्वेषाने भरलेला आहे. विद्याथीर् आणि पालकांना तर कोणी वालीच नाही. ही स्थिती कोणी बदलू शकेल?
विद्यापीठाचे नियम प्रत्येक सत्रासाठी बदलत असतात, त्यामुळे मोर्चा, रॅली अटेंड करणे हा सर्वांसाठी कॉमन टाईमपास आहे.
२. परीक्षेचे वेळापत्रक कधीच नियमित नसते. हे कदाचित ऐकण्यास नवीन नसावे, परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर देखिल पुढे ढकलल्या जातात! सर्वात वाईट दृश्य म्हणजे परीक्षा प्रिपोन (वेळेअगोदर होण्याचे) होण्याचे.
३. मुंबई विद्यापीठात कोणालाच एखाद्या विषयाचा एखाद्या शाखेसाठी असलेला निश्चित पाठ्यक्रम माहीत नसतो. विद्यार्थी अंधारात तीर मारल्यासारखे कोचिंग क्लासने दिलेल्या अथवा सीनिअर विद्यार्थ्याच्या नोटस् वापरत असतात.
जरी नियमानुसार विद्यापीठाने परीक्षा उरकल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करावयाचा असला तरी, एकही निकाल वेळेवर लागत नाही..... जवळपास सर्वच निकाल तीन महिन्यांनंतरच लागतात! इतर विद्यापीठाचे बी. ई. चे विद्यार्थी जॉब मिळवत असतात तेव्हा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी निकालाची वाट बघत असतात.
              विद्यापीठाचे अधिकारी, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या संघटना या विद्यापीठाच्या विकासासाठी झटत नाहीत. अन्यायग्रस्त विद्याथीर्, त्यांचे पालक, कर्मचारी व शिक्षक यांना विद्यापीठात कोणीही वाली नाही. अभ्यासक्रम किंवा प्रशासनाबद्दल 'ब्र'ही न काढणारे प्राचार्य स्वत:ची वणीर् निरनिराळ्या समित्यांवर जाण्यासाठी तसेच कुलगुरूंच्या मजीर्त जाण्यासाठी धडपडत असतात. कोणत्याही विषयाची सविस्तर माहिती न घेता, सखोल अभ्यास न करता टिपणी करण्यात पटाईत असणारे प्राचार्य सर्वांनाच माहीत आहेत.
त्यातच बऱ्याच काळापासून हे विद्यापीठ कुलगुरूंविनाच आपला गाडा कसाबसा हाकत आहे. विद्यापीठाच्या आजवरच्या प्रतिष्ठेस विद्यापीठाला वेळोवेळी लाभलेले महान कुलगुरू आणि त्यांचे कार्य हेच कारणीभूत ठरल्याचे सर्वश्रुत आहे. अर्थात, अलीकडल्या काळात गुणवत्ता नसणारेही काही कुलगुरू विद्यापीठात केवळ राजकीय आधाराच्या जोरावर येऊन गेले आणि त्यांच्या कटकारस्थानांमुळेच विद्यापीठ बदनाम झाले. तरीही सध्याची कुलगुरू निवडीबाबत सुरू असलेली दिरंगाई ही आपल्याला शोभणारी बाब नाही. कारणे काहीही असोत; परंतु डॉ. विजय खोले यांची मुदत २८ सप्टेंबर, २००९ रोजी संपणार हे सर्वांना माहीत होते. कारण कुलगुरूंची निवड ही विशिष्ट कालावधीची असते, हे माहीत असूनही त्या दिवशी नवीन कुलगुरू आले नाहीत. कुलगुरू निवडण्यासाठी जी शोधसमिती स्थापली, तीच खऱ्या अर्थाने बेकायदा ठरली. असे का झाले? याचे उत्तर तत्कालीन कुलगुरूंना चांगलेच ठाऊक होते.

Thursday 28 March 2013

महिलांसाठीचे कायदे

महिलांसाठीचे कायदे

शासन मुलीच्या-महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायदयांचा एक आढावा.
हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१- राज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘हुंडाबंदी दिन’ म्हणून साजरा केला जात असून हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकार्‍याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.
‘कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक’कायद्याची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. या कायद्यान्वये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, प्रांतअधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना संरक्षण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. राज्यभरातील ही संख्या ३,६२५ इतकी असून यामध्ये २५७ महिला आहेत. या कायद्याची अंमलबजावणी करतांना महिलांसाठी ७२ आश्रय गृहे तर ८२ संस्थांना सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत आतापर्यंत १६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ‘राज्य महिला आयोगा’ मार्फतही महिलांच्या हक्क आणि अधिकारांची जपणूक केली जात आहे
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून ‘विशाखा गाईड लाईन्स’ ची अंमलबजावणी राज्यात सुरु आहे. यासाठी राज्यभर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली असून महिला, मुली आणि बालकांचा अवैध मानवी व्यापार रोखण्यासाठी ‘राज्य कृतिदलाची’ स्थापना करण्यात आली आहे.
राज्यात ‘देवदासी प्रतिबंधक कायदा’ मंजूर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे. देवदासींचे आणि त्यांच्या मुलांचे पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचे मार्ग प्रशस्त करण्याच्यादृष्टीने हा कायदा उपयुक्त ठरत आहे. या सर्व कार्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या स्वतंत्र योजना कार्यान्वित आहेत.
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटतांना दिसत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी ‘गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक’ कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. यातील सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र करण्यात आले आहेत. या कायद्यान्वये गर्भातील लिंग तपासणी करणार्‍या व्यक्तीला आणि अशी तपासणी करणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकाला दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात ‘बालविवाह प्रतिबंधक कायद्या’ ची अंमलबजावणी सुरु आहे. यांसह अन्य महत्वाच्या कायदयांवर एक दृष्टीक्षेप
स्त्रियांचे संवैधानिक अधिकार(भारतीय राज्य घटनेनुसार असलेले अधिकार)
मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३,  हिंदू विवाह कायदा १९५५,    हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा १८५६,,,आनंद विवाह कायदा १९०९
आर्य विवाह विधिवत कायदा १९३७,   मुस्लीम विवाह कायदा,  मुस्लीम स्त्री (घटस्फोट हक्क संरक्षण कायदा) १९८६,  भारतीय ख्रिस्तीविवाह कायदा १८७२,   पारसी विवाह व घटस्फोट कायदा १९३६,  विशेष विवाह कायदा १९५४   विदेश विवाह कायदा १९६९
धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा १८६६,   भारतीय घटस्फोट कायदा १८६९,  हिंदू दत्तक व निर्वाह कायदा १९५६
हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६,  विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा १९५९,  मुस्लीम स्त्रियांचा मालमत्ता व वारसा हक्काचा कायदा, ख्रिश्चन स्त्रियांचे मालमत्ता व वारसा हक्क,  पारसी स्त्रियांचे मालमत्ता व वारसा हक्क,  फौजदारी कायदे, भारतीय दंडविधान कायद्यातील स्त्रियांसंबंधित महत्वाची कलमे, स्त्रियांचे अश्लिल,  प्रदर्शन प्रतिबंधक कायदा १९८६, अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६, वैद्यकीय गर्भपात कायदा १९२९ ,सती प्रथा प्रतिबंध कायदा १९८७, मातृत्व लाभासंबंधीचा कायदा १९६१
यांसर्व कायदयांच्या प्रभवी अंमलबजावणीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या कायदयांमार्फत महिलांना संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Wednesday 27 March 2013

फूटबॉल

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. खेळाचे स्वरूप-
हा खेळ एका गोलाक्रुती चेंडूने खेलला जातो. यात ११ जणाच्या दोन टीम असतात. हा खेल नवद्द मिनिटाचा असतो.
 मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
इ. स. १८६३ मध्ये फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यत: हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या जाळयात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दीष्ट आहे. गोलकिपर वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळयात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.

इ. स. १८६३ मध्ये फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक होय.
    फूटबॉल ह्या खेळाला अत्यंत प्राचीन इतिहास आहे. इतिहासामध्ये एक अशी दंतकथा आहे की डॅनिश सरदाराने इंग्लंडवर हल्ला केला. या हल्ल्यात डॅनिश सरदाराचे डोके इंग्लिश रहिवाशांनी उडविले आणि त्या सरदाराचा अपमान करण्याच्या हेतूने ते मुंडके एकाने लाथेने उडविले. त्यानंतर इतरांनी त्याचे अनुकरण केले व मुंडके पायाने लाथाडण्यास सुरूवात केली. दृश्य पाहून तेथे जमलेल्या लोकांना मौज वाटली. त्यानंतर एका कल्पक माणसाने कल्पना लढवून लाकडी गोल चेंडू तयार केला. तो चेंडू लाथाडण्याचा खेळ लोक खेळू लागले. तेव्हा ह्या खेळास इंग्लंडमध्ये 'किकिंग दी डेव्हस हेड' असे म्हणत. काहींच्या मते २५०० वर्षांपूर्वी चीनमध्ये हा खेळ खेळला जात असे, तर काही तज्ञांम्प्;ाांच्या मते ग्रीस किंवा रोम या ठिकाणी या खेळाची सुरूवात झाली असे म्हणतात. चीनमध्ये ह्या खेळाला - या नावाने संबोधत तर काही इतिहास तज्ञांम्प्;ाांच्या मते ५०० वर्षांपूर्वी हा खेळ युध्दशास्त्राचा एक भाग म्हणून सैनिकांना शिकवला जात असे. राजेराजवाड ांच्या वाढदिवसप्रसंगी फुटबॉलचे सामने भरविले जात, आणि विजयी संघास बक्षिसे दिली जात व हरणार्‍या संघास शिक्षा दिली जाई. रोमन लोक या खेळाला 'हरपास्टम' या नावाने संबोधत, तर ग्रीक या खेळाला 'हेपिस्कूरोस' असे म्हणत. ग्रीक लोकांचा फूटबॉल हा आजच्या फूटबॉलपेक्षा आकाराने मोठा होता. दोन संघांमध्ये खेळ होत असे. दोन्ही संघांच्या मागे सरळ रेषा असे. ही सरळ रेषा फुटबॉलकडून ओलांडली जाई, तेव्हा गोल झाला असे मानण्यात येत असे. वेळेचे कुठल्याही प्रकाराचे बंधन नव्हते. तसेच कुठल्याही प्रकाराचे नियम नसल्यामुळे खेळाडू अक्षरश: एकमेकांवर तुटून पडत. त्यामुळे साहजिकच खेळाडूंना दुखापती होऊन ते गंभीररित्या जखमी होत. बॉल हा शक्यतो पायानेच लाथाडला जात असे. त्यावरून ह्या खेळाला 'फूटबॉल' असे नाव पडले.

काही इतिहासकारांच्या मते सुरूवातीला डुकरांच्या ब्लॅडरमध्ये हवा भरून ब्लॅडरचे तोंड सुतळीने बांधून ब्लॅडर पायाने उडविण्यास सुरूवात झाली. पण ह्या ब्लॅडरमध्ये हवा फार काळ टिकन नसे. म्हणून एका चांभाराच्या मुलाने एक नामी कल्पना काढली. त्याने ब्लॅडरला चामड ाचे वेष्टन दिले. त्यामुळे हवा जास्त काळ टिकू लागली व हा खेळ खेळला जाऊ लागला. ह्या खेळाची लोकप्रियता जसजशी वाढू लागली. तसतसे लोक आपला कामधंदा सोडून हा खेळू लागले. त्यामुळे इतर खेळांकडे दुर्लक्ष होऊ लागले. ह्यामुळे सन १३१४ या वर्षी एडर्वड (दुसरा) याने लंडनच्या सडकेवर फूटबॉल खेळण्यास बंदी घातली. यानंतर १३३९मध्ये दुसरा रिर्चड या राजाने सुध्दा या खेळास मनाई केली होती. ही मनाई जवळजवळ चारशे वर्षे होती. हा कालावधी फुटबॉलसाठी मारक मानला जातो. सुरूवातीच्या काळातील फूटबॉलकडे आपण मागे वळून पाहिले असता आपणास फूटबॉलची कथा ही रोचक व रोमहर्षक वाटल्यास नवल नाही. फूटबॉल खेळात संघर्ष हा ओतप्रोत भरलेला आपणास दिसून येतो. यानंतर या खेळाला आकारबध्द व नियमबध्द करण्याची गरज संघटकांना वाटू लागली, व ह्या विचाराने प्रेरित होऊन २३ ऑक्टोबर १८६३ साली अकरा क्लब्जच्या सदस्यांनी एकत्र येऊन फूटबॉल असोसिएशनची स्थापना केली. आज तो फूटबॉल खेळ अस्तित्वात आहे तो अधिक सुटसुटीत, नियमबध्द, चैतन्यशील व गतिमान झाला आहे. सन १९०६ साली अथेन्स (ग्रीस) येथील ऑलिंपिक सामन्यात फूटबॉल खेळाला सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आले. २१ मे १९०४ रोजी फूटबॉलवर नियंत्रण करणारी आंतरराष्ट्रीय संघटना पॅरिस येथे अस्तित्वात आली. आशिया खंडातही विश्वचषक फूटबॉल स्पर्धांच्या तोडीचे सामने भरविले जातात. हे सामने मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे दर वर्षी घेण्यात येतात. सन १९५९ पासून भारत या स्पर्धामध्ये भाग घेतो. भारतात फूटबॉल खेळावर नियंत्रण करणारी 'फूटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया'ही संस्था असून ती आंतरराष्ट्रीय फूटबॉल संस्थेशी संलग्न आहे व तिचे कायदेकानून आपल्या देशातील सर्व फूटबॉल खेळाडू व संघटना यांना लागू आहेत.

सन १९३० पासून जागतिक पातळीवर फूटबॉलच्या विश्वचषक स्पर्धा झाल्या. 'फिका' (फेडरेशन इंटरनॅशनल डी असोसिएशन) मार्फत होणारी पहिलीच स्पर्धा आयोजित करण्याचा मान 'ऊरूग्वे' या देशाने मिळाविला. त्या वेळी या जागतिक स्पर्धेत फक्त अकरा देशांनी भाग घेतला होता. या स्पर्धांसाठी 'ज्युलेस रिमेट' हा संपूर्ण सोन्याचा कप अजिंक्य ठरणार्‍या राष्ट्रास बहुमान म्हणून सन १९३४पासून देण्यात येत आहे. हा चषक फिरता असून अजिंक्य संघाकडे चार वर्षे राहतो व पुढील विश्वचषक स्पर्धेच्या वेळी नवीन अजिंक्य ठरणार्‍या संघाकडे जातो. आता संघाची संख्या २००च्या वर गेली आहे. त्यामुळे स्पर्धा आयोजित करण्यास योग्य देश आठ वर्षे अगोदर निश्चित केला जातो.

असा हा गतिमान, रोमहर्षक, चापल्य वाढविणारा, प्रेक्षकांना ९०मिनिटे खिळवून ठेवणारा, क्षणोक्षणी उत्कंठा शिगेस पोहोचविणारा फूटबॉल खेळ जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. दिवसेंदिवस तो अधिकाधिक प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेऊन लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान होत आहे.

Friday 8 March 2013

लिअँडर एड्रीअन पेस

लिअँडर एड्रीअन पेस (जन्म: जून १७, १९७३) हा दुहेरी आणि मिश्र दुहेरी टेनिस मधील सर्वात यशस्वी भारतीय खेळाडूंपैकी एक आहे.

पेस १९९१ मध्ये व्यावसायिक टेनिसपटू बनला. १९९५ च्या ऑलिंपिक मध्ये एकेरी सामन्यांमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले. पेसचे वडील व्हेस पेस यांनीही १९७४ च्या ऑलिंपिक मध्ये हॉकीमध्ये भारतातर्फे सांघिक कांस्यपदक मिळवले होते. ऑलिंपिकच्या इतिहासातील ही एक आगळी वेगळी घटना आहे.
सप्टेंबर २००८ मधील यु.एस. ओपन मध्ये, सेरा ब्लॅक(झिंबाब्वे) च्या साथित त्याने जेमी मुरे (ब्रिटन) व लिझेल ह्युबर (अमेरिका) मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवले.

जिगरबाज, लढवय्या, जिद्दी, गुणी ही सारीच विशेषणं टेनिसपटू लिअँडर पेसला शोभणारी आहेत. वयाच्या ३६व्या वषीर्ही त्याचा उत्साह, खेळ तरुणासारखा आहे. खेळाची त्याची भूक कमी झालेली नाही. 'मी अजूनही टेनिसचा विद्याथीर्च आहे', असं तो अकरावे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्यावरही सहजच म्हणतो. तेव्हा त्याच्या यशाचं रहस्य उघड होतं.

कोलकात्यात नांदणाऱ्या वेस व जेनिफर पेस यांच्यासारख्या कसलेल्या खेळाडूंचा लिअँडर मुलगा. लिअँडरची इच्छा होती फूटबॉलपटू बनण्याची. पण वडलांच्या आग्रहापायी त्यानं हातात टेनिसची रॅकेट धरली. १९७२मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे वेस मिडफिल्डर! तर, आई जेनिफरने १९८०च्या आशियाई बास्केटबॉल स्पधेर्त भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलं. त्यामुळे लिअँडरही खेळाडूच होणार हे जवळपास निश्चित होते. गोवन कॅथलिक असल्याने कुटुंबात तसं बिनधास्त वातावरण. पेसही तसा स्वच्छंदी पण, खेळ असो किंवा जीवन त्यानं शिस्त सोडली नाही. हा गुणही त्याला आई, बाबांकडून मिळाला.

टेनिसपटू व्हायचं म्हटल्यावर डॅड वेसनी त्याला १९८५मध्ये ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकादमीत भरती केलं. लिअँडरला खेळ शिकायला फारसा वेळ लागलाच नाही. अवघ्या पाच वर्षांत म्हणजे १९९०मध्ये विम्बल्डन ज्युनियरचे अजिंक्यपद त्यानं पटकावलं. मग मागे वळून पाहिलं नाही. अर्थात, यशाचा हा मार्ग सोपा नव्हता. सतत प्रतिकूल परिस्थितीचा सामना त्याला करावा लागला. टेनिस कोर्ट असो की खासगी आयुष्य, अनेक वादळं लिअँडरपुढे उभे ठाकली. पण; तो डगमगला नाही. कारकिदीर्च्या ऐनभरात २००३मध्ये 'सिस्टिसेकोर्सिस' हा मेंदूचा आजार त्याला झाला; पण या पठ्ठ्याने निधड्या छातीने त्याचा मुकाबला केला. डॉक्टरांचं यश व कुटुंबीय, चाहत्यांच्या शुभेच्छांच्या बळावर तो पुन्हा कोर्टवर उतरला. औषधांमुळे सूज आली. आजारात वजनही वाढलं. लढाऊ लिअँडरनं वजन घटवलं. तो फीट बनला.

तोवर इकडे एकेकाळचा जिवाभावाचा मित्र व दुहेरीचा जोडीदार महेश भूपतीशी भांडण झालं. हे दु:ख पचवूनही तो उभा राहिला. वर्षभरापूवीर्च भारताच्या डेव्हिस कप संघाने लिअँडर हुकूमशहा असल्याची तक्रार केली. त्याला कर्णधारपदावरून काढण्याची मागणी टेनिस असोसिएशनकडे केली. असं एकटं पाडूनही तो डगमगला नाही. देशासाठी तो याच तथाकथित साथीदारांच्या खांद्याला खांदा लावून खेळत राहिला आणि आजही खेळतोय..

पैलवान खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक ब्राँझपदक मिळवणारा लिअँडर पहिला भारतीय! १९९६मध्ये अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यानं ही करामत केली.

खरेतर या पठ्ठ्याचा एकेरीचा प्रवास झकास सुरू होता. न्यूपोर्ट स्पर्धा लिअँडर जिंकला. तर न्यू हेवन स्पधेर्त त्याने पीट सॅम्प्रसला पराभवाची धूळ चारली. जागतिक रँकिंगमध्येही ७३वा क्रमांक गाठला. पण; महेश भूपतीशी त्याची मैत्री झाली अन् दोघांनी दुहेरीवर लक्ष केंदित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना फळला! १९९८मध्ये तीन ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत त्यांनी धडक मारली. १९९९मध्ये तर चारही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेऱ्या गाठताना पेस-भूपती यांनी फ्रेंच ओपन व विम्बल्डनचे जेतेपदही पटकावले. पण, यशाची शिखरे गाठणाऱ्या या जोडीला न जाणे कोणाची नजर लागली आणि त्यांनी एकत्र खेळणे थांबवले. काहींच्या मते प्रोफेशनॅलिझम तसेच बक्षिसांच्या रकमांवरून खटके उडाले तर काहींच्या मते गर्लफ्रेंड्सचा मुद्दा कारण ठरला. डेव्हिस कप, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, एशियाड या क्रीडा स्पर्धांमध्ये पेस-भूपती आजही दुहेरीत उतरतात; पण त्यांच्यात आजही ती भांडणाची अंधुक 'लक्ष्मणरेषा' दिसतेच.
मित्र दुरावल्याने लिअँडर दुखावला तसंच महिमा चौधरीच्या मैत्रीनेही चचेर्त राहिला. त्यांचं पाटीर्त एकत्र असणं, परस्परांविषयी आस्थेनं बोलणं तसंच पेस उपचार घेताना महिमानं सावलीप्रमाणे साथ करणं, यामुळे ही दोघं लवकरच विवाह करणार, अशा बातम्या येऊ लागल्या. दोघांनी वृत्तपत्रांच्या मुलाखतीतून भावी संसाराची स्वप्नंही रंगवली. पण का कोण जाणे माशी शिंकली. हा हंसांचा जोडा वेगळा झाला. लिअँडरला आता महिमाचा विषयही नको असतो.
पत्रकार व 'आर्ट ऑफ लिव्हिंगची इन्स्ट्रक्टर' रिया पिल्लई व मुलगी अयानासह लिअँडर सध्या सुखानं नांदतोय. '२००४ची गोष्ट. र्वल्ड यूथ पीस समीटसाठी मी यावं, यासाठी रिया आमंत्रण द्यायला आली. तेव्हा तिची पहिली भेट झाली. त्या भेटीतच तिच्या प्रेमात मी आकंठ बुडालो,' लिअँडर सांगतो.
सध्या तो दुहेरीत ल्युकास दलॉहीसह तर, मिश्रमध्ये कारा ब्लॅकसह खेळतोय. लिअँडर व दलॉही यांच्यात दहा वर्षांचं अंतर; पण कोर्टवरील त्यांचा समन्वय बॉब व माईक या जुळ्या ब्रायनबंधूंसारखा आहे. माटिर्ना नवरातिलोवाच्या साथीतही लिअँडरने ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावलीत. माटिर्ना व लिअँडरची मैत्री आजही कायम आहे. लिअँडरचा खेळ पाहण्यासाठी ती मुद्दाम वेळ काढते.
असे जगभरचे मित्र व चाहत्यांच्या शुभेच्छांच्या जोरावर लिअँडरला आणखी खूप खेळायचंय. वेल डन लिअँडर!

 

महात्मा - फुल

आधुनिक भारताचे पहिले समाजक्रांतिकारक !
१९ व्या शतकाचा शेवटचा कालखंड; धर्मसुधारणा, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचा काळ ! या काळात काहीशा वेगाने सामाजिक बदलांची प्रक्रिया घडत होती. या चळवळींचे नेतृत्व सखोल चिंतन करणार्‍या, समाजहित जपणार्‍या व धडक कृतीशील असणार्‍या महात्मा फुले यांच्याकडे होते.  शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याची मूळ प्रेरणा स्पष्ट होते.
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला. त्या वेळी संपूर्ण भारतात बहुजन समाज अंध:कारात चाचपडत होता. अज्ञान, अंधश्रद्धा व अस्पृश्यता यांचे भयंकर चटके सोसत होता. स्त्री आणि (तत्कालीन) अस्पृश्य समाज हे या समाजव्यवस्थेतील सर्वाधिक उपेक्षित घटक होते. त्यामुळेच स्त्रीशिक्षण व अस्पृश्योद्धार हे त्यांचे जणू जीवितकार्यच झाले. त्या वेळच्या स्त्रिया ह्या शिक्षण नसल्यामुळे स्वत:ची मूळ अस्मिताच हरवून बसल्या होत्या. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता होती. मुळात समाजोद्धारासाठी शिक्षण हेच प्रमुख अस्त्र आहे हे ज्योतिरावांनी ओळखले. एक स्त्री सुशिक्षित म्हणजे पुढच्या सर्व पिढ्या सुशिक्षित हे समीकरण त्यांनी जाणले व या पवित्र कार्याची सुरुवात आपल्या पत्नीला शिक्षण देऊन त्यांनी केली. १८४८ साली हिंदुस्थानातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे त्यांनी सुरू केली. त्यांनी व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, लोकविरोधाला उत्तर देत १८५१ ,१८५२ साली व पुढील काळात अनेक कन्या शाळा सुरू केल्या.
स्त्रियांना सबला बनविण्यासाठी, स्त्रीउद्धारासाठी त्यांनी बालविवाह, कुमारीविवाह, विधवांचे केशवपन या परंपरांना प्रचंड विरोध केला. या परंपरांच्या विरोधात जाऊन त्यांनी १८६४ साली पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. ही एक क्रांतिकारक अशी घटना होती. त्याचबरोबर त्यांनी केशवपनाच्या विरोधी आंदोलन करून नाभिकांचा अभिनव असा संप घडवून आणला. पण तरीही पुनर्विवाह समाजाला पचणे अवघड होते. एखाद्या विधवेला दुर्दैवी परिस्थितीत संतती झाल्यास त्या विधवेस भ्रूणहत्या किंवा आत्महत्येशिवाय पर्याय राहत नसे. ही समस्या ओळखून त्यांनी १८६३ साली पुण्यात पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले. त्यांनी याच प्रतिबंधक गृहातील एक मुलगा दत्तक घेतला. यावरूनच त्यांचे स्त्रीविषयक विचार किती आधुनिक व पुरोगामी होते हे स्पष्ट होते. आजच्या समाजाचे स्त्रीविषयक विचार, दृष्टीकोन पाहता त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते.
स्त्री उद्धाराबरोबरच अस्पृश्योद्धार व अस्पृश्यता निर्मूलन हा त्यांचा ध्यास होता. त्या वेळीचा अस्पृश्य समाज हा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हक्कांपासून वंचित होता. त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या प्राथमिक मानवी हक्कांच्या प्राप्तीसाठी ते सामाजिक समता चळवळीचे आद्य प्रवर्तक बनले. १८५२ साली त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली. अस्पृश्यांसाठी त्यांनी पाण्याचा हौद खुला केला. गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब या ग्रंथांतून त्यांनी जातिव्यवस्थेवर प्रहार केला. अस्पृश्य समाजामध्ये आमिविश्र्वास निर्माण होण्यासाठी, समस्यांची जाणीव निर्माण होऊन विकासाकडे वाटचाल होण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची इ.स. १८७३ मध्ये पुणे येथे स्थापना केली. या संस्थेच्या स्थापनेतून त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाचे बीज रोवले.
पिढीजात चालत आलेल्या अमानवी अशा धार्मिक रूढी व परंपरा बंद झाल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक सुधारणांसाठी व्यापक योगदान देऊन, आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुले यांनी केले. आजच्या आधुनिक भारतातील समाजात झालेल्या सामाजिक सुधारणांचे मूळ हे महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यातच आहे.

`निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’

हा त्यांचा सत्यधर्माचा व मानवताधर्माचा संदेश आजही अनुकरणीय ठरतो.

जायकवाडी धरण

हिराकुड
जगातील सर्वात लांब धरण. ओरीसा राज्यातील महानदीवर संबलपुर पासुन १५ कि.मी. अंतरावर हे धरण बांधलेले आहे. हे धरण १९५६ साली बांधले गेले. १९३७ साली आलेल्या महापुरामुळे या धरणाची संकल्पना सर विश्वेश्वैरय्या यांनी मांडली. ह्या धरणाच्या सर्वेक्षणासाठी एक समिती नेमुन सर्वे करण्यात आला. या धरणाची कोनशिला ओरीसाया राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते १५ मार्च १९४६ साली ठेवली गेली. हिराकुड धरणाचे उद्घाटन १३ जानेवारी १९५७ साली पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते झाले. या धरणाला एकुण खर्च १००.०२ करोड आला आहे. १९५६ पासुन शेतीला पाणीपुरवठा करण्याला सुरूवात झाली. आणि वीज उत्पादन १९६६ सालापासून सुरु झाली.

जायकवाडी धरण
जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे. विदर्भातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
 दरवाजे  ,प्रकार : S - आकार ,   लांबी : ४७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२६५६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २७, (१२.५० X ७.९० मी)
धरणाचा उद्देश - सिंचन, जलविद्युत
प्रवाह     गोदावरी नदी
स्थान     पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस -७५५ मि.मी.
लांबी     ९९९७.६७ मी..   उंची     ४१.३ मी.
बांधकाम सुरू- इ.स. १९६५  , उद्‍घाटन दिनांक -इ.स. १९७६
ओलिताखालील क्षेत्रफळ -३५००० हेक्टर
जलाशयाची माहिती-  क्षमता     २१७० दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ -३५० वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती  -  टर्बाइनांची संख्या-१  ,  स्थापित उत्पादनक्षमता -    १२ मेगावॉट.
पाणीसाठा  -  वापरण्यायोग्य क्षमता  : २१७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३५००० हेक्टर,  ओलिताखालील गावे  : १०५
वीज उत्पादन-
जलप्रपाताची उंची  : ९४ फूट
जास्तीतजास्त विसर्ग  : ५० क्यूमेक्स ,   निर्मीती क्षमता  : १२ मेगा वॅट  ,  विद्युत जनित्र  : १

औरंगाबादचे जायकवाडी धरण हे देशातील धरणांपैकी एक महत्वाचे धरण आहे. जायकवाडी धरण हिवाळ्यात परदेशी पक्षांचे हक्काचे घर समजले जाते. या धरणात हजारो विदेशी पक्षी दाखल झाले आहेत या परदेशी पाहुण्यांना पाहण्यसाठी पर्यटकांनी जायकवाडी धरणावर गर्दी केली आहे.
हे पक्षाचे थवे कधी संथ गतीने नाथ सागरावर मुक्त विहार करताना पाहावयास मिळतात तर कधी आकाश कवेत घेताना दिसतात. हे परदेशी पक्षी काही दिवस पाहुणे म्हणून जायकवाडी धरणावर येतात आणि पक्षी मित्रांच्या मनात घर करून जातात.
अगदी रशिया, मध्य रशिया, सैबेरिया, युरोप, बलुचिस्तान यासह अन्य प्रांतातून हे पक्षी स्थंलतर करून हिवाळ्यात जायकवाडी धरणावर येतात. यामध्ये सर्वसाधारणपणे पिनटेल, शॉवेलर, व्हीजन, कॉमन टिल, ब्ल्यू विंग टिल, टफटेड पोचार्ड या बदकांची संख्या अधिक असते. तर गॉडवीट, गीन शॅंक, रेड शॅंक, सॅडपायपर, स्टीलट करल्यू, रफ ऍड रिव्ह, स्नाई या वेडर्स प्रकारातील पक्ष्यांचा मुक्त संचार असतो.
हे पक्षी काही कालावधीसाठी जायकवाडी धरणात थांबतात. जायकवाडी आणि परिसरात उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पुन्हा सुरू होतो परतीचा प्रवास, आपल्या हक्काच्या घराकडे. औरंगाबादचे पक्षीमिञ दरवर्षी या पक्षाची जनगणना करतात.
सह्याद्रीच्या कुशीतील धरणांच्या पाण्याची वाफ होत असताना जायकवाडी धरण मात्र कोरडे आहे. केवळ शासकीय धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीतील धरणाचे पाणी जायकवाडीत सोडण्यात यावे, अशी मागणी गोदावरी पाणी हक्क संघर्ष समितीने केली आहे.
परभणी जिल्ह्यातील सिचनाचे क्षेत्र आता केवळ कागदावरच शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांची अवस्था बिकट आहे. वेळेवर पाणी मिळत नाही. आता तर जायकवाडीचे पाणी कायमचेच बंद झाल्यासारखी अवस्था आहे. जायकवाडीचे पाणी नसल्याने शेतकरी नैराश्येच्या गर्तेत आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या वरच्या बाजूस ११२ टी.एम.सी. पाण्याचा वापर मंजूर असताना सुमारे १८७ टीएमसी पेक्षा जास्त पाणी अडविण्यात येते. त्यामुळे जायकवाडी धरण कधी तरी भरते. निळवंडे धरण ९९ टक्के भरलेले असून, या धरणाला कालवेच नाहीत. त्यामुळे धरणातील पाण्याची वाफ होत आहे. अशीच परिस्थिती भंडारदरा आणि दारणा या धरणांची आहे. सह्याद्रीच्या कुशीतील या धरणांची वाफ होत असताना मराठवाड्यातील गोदाकाठ मात्र पाण्याअभावी कोरडाठाक आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने समन्यायी तत्वाने जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परभणी येथून करण्यात आली आहे.
जवळपास ३०० द.ल.घ.मी. पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात यावे व एप्रिल व मे महिन्यात किमान ३ रोटेशन पाणी लाभक्षेत्रात उपलब्ध करून द्योव, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाक्रा नानगल
भारतातील पंजाब, हरयाणा व राजस्थान या तीन राज्यांनी संयुक्तपणे सतलज नदीवर उभारलेला सर्वात मोठा बहूद्देशीय प्रकल्प. हिमाचल प्रदेश राज्यातील बिलासपूरच्या वायव्येस भाक्रा येथे एक भारस्थायी काॅंक्रीटचे धरण बांधण्यात आले. भाक्रा धरणाच्या खालच्या बाजूस सु. १३ किमी. अंतरावर रुपार जिल्हयातील नानगल येथे दुसरे धरण बांधण्यात आले. त्यातील पाण्याचा उपयोग मुख्यत्वे विजनिर्म्ाितीसाठी करुन घेण्यात आलेला आहे.

भाक्रा नानगल प्रकल्पास १९४६ मध्ये प्रारंभ झाला. यातील भाक्रा व नानगल ही दोन्ही धरणे तसचे नानगल हायडेल चॅनेल यांचे बांधकाम जुलै १९५४ मध्ये पूर्ण करण्यात आले. जानेवारी १९५५ मध्ये नानगल वीज उत्पादनकेंद्राच्या पूर्ततेनंतर प्रकल्पाची एकूण प्रतिष्ठापित वीज उत्पादनक्षमता ४८,००० किवॉ. होती. ती जुलै १९५६ मध्ये १९५८-५९ मध्ये भाक्रा धरणातून कालव्यांद्वारे पंजाब व राजस्थान राज्यांच्या काही भागांस पाणीपुरवठा होऊ लागला. हा २३६ कोटी रु. खर्चाचा संपूर्ण प्रकल्प १९६३ मध्ये पूर्ण होऊन २२ ऑक्टोबर १९६३ रोजी पंडीत नेहरुंच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला. हा प्रकल्प म्हणजे 'देशाच्या प्रगतीचे प्रतीक' असे गौरवोदगार पंडितजींनी काढले. या प्रकल्पामुळे हरयाणा राज्यातील सर्व गावांना वीज उपलब्ध झाली, तसेच पंजाब व हरयाणा या दोन्ही राज्यांची कृषिक व औद्योगिक प्रगती शक्य झाली. राजस्थान राज्य व केंद्रशासित प्रदेश दिल्ली या दोघांनाही या प्रकल्पामुळे वीज उपलब्ध झाली आहे.


कोयना
पश्चिम महाराष्ट्र्रातील एक प्रचंड जलविद्युत् प्रकल्प. महाबळेश्वर येथे कृष्णा नदीच्या उगमाजवळच कोयना नदीचा उगम आहे. कृष्णा नदी पूर्ववाहिनी आहे. कोयना मात्र उत्तर दक्षिण दिशेने ६४ किमी. जाऊन व प्रतापगडला वळसा घालून हेळवाकजवळ पुर्वभिमुख होते. तेथून ५६ किमी. वरील कराडजवळ कोयनेचा कृष्णेशी संगम (प्रीतिसंगम) झाला आहे. कोयनेच्या ८९२.० चौ. किमी. क्षेत्रफळाच्या खोर्‍यात सु. ५०८ सेंमी. पाऊस पडतो. कोयना खोरे सहयाद्रीच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून ४२७ मी. उंच आहे. या ठिकाणी जलविद्युत् प्रकल्प उभारण्याच्या योजनेस १९५४ च्या जानेवारीत प्रारंभ झाला.

मुंबई प्रांताच्या बांधकाम खात्यातील एक स्थापत्यविशारद बिल यांनी १९०८-०९ साली महाराष्ट्र्रात दौरा करून तत्कालीन सरकारला निरनिराळया ३२ पाटबंधारे योजना सुचविल्या. त्यांत कोयना पाटबंधारे योजनेचा समावेश होता. परंतु त्याबाबतीत सरकारने कार्यवाही केली नाही. जमशेटजी टाटा यांनी १९२०-२५ सालांत पूर्ण केलेल्या मुळशी योजनेनंतर कोयना धरण योजना हाती घेण्याचा संकल्प सोडला होता. परंतु मुळशी धरणाविरूध्द सेनापती बापट यांनी उभारलेल्या सत्याग्रहामुळे टाटांची योजना बारगळली. अखेरीस स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात जागतिक बॅंकेने दिलेल्या १२ कोटी रू. किंमतीच्या परदेशी हुंडणावळीच्या साहाय्याने कोयना प्रकल्पास सुरूवात झाली.

कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विधमाने चालविला जातो.
सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातुन लेक टेपिंग पध्द्तीने १००० MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.
कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. या लक्ष्मीचे कथास्तोत्र उषा तांबे यांनी 'कहाणी कोयनेची' या पुस्तकातून अतिशय साध्या, सोप्या व समर्पक मराठी भाषेत सांगितली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी अपार परिश्रम, निष्ठा, हातोटी, कसोटी लागते. प्रकल्पाची संकल्पना, योजना, आखणी, सर्वेक्षण याचा एएतिहासिक मागोवा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय, सामाजिक, अभियांत्रिकी औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातील अनेकांची तपश्चर्या पुस्तकरूपाने प्रकाशात आणली नि कोयना प्रकल्प निर्मितीचा आनंद सर्वांपर्यंत पोचविला. बांधकामाची तांत्रिक पद्धत किचकट असते. त्यातून कोयना प्रकल्पाच्या बांधकामात बोगद्याचे काम प्रचंड प्रमाणात असल्याने अधिकच क्लिष्ट होती, तरीही अभियंत्यांनी अनेक संकटांना सामोरे जात प्रकल्प यशस्वी केला. भूगर्भ; तसेच भूपृष्ठ सर्वेक्षण, आखणी, बांधणी, बोगद्याचे खोदाईकाम आदी बांधकामांची माहिती हे तपशील अत्यंत सुबोध भाषेत वर्णन केले आहेत.

ऊर्जाविषयाची मूलतत्त्वे देऊन वीज-ऊर्जेची ओळख, औष्णिक वीज व जलविद्युत यांचे सैद्धांतिक आर्थिक मुदद्यांसह तौलनिक विश्लेषण केले आहे. वीज वितरण व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करताना वीजबचतीचा उल्लेख केला आहे. कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील जलाशयविधन (सेक टॅपिंग) या अभिनव धाडसी प्रयत्नातील नाटय व थरार सांगून या शाआरYयगाथेच्या मानकरी अभियंत्यांचा गौरव केला आहे.
विस्थापितांचे पुनर्वसन हा आजही एएरणीवर असलेला प्रश्न, भूसंपादन, जंगलनाश, पर्यावरण, नुकसानभरपाई, रोजगार, शेती, रस्ते, शाळा, आरोग्य, कौटुंबिक-सामाजिक-सांस्कृतिक जीवन, मानसिकता आदी बाबींचे वर्णन शासनास व समाजास मार्गदर्शन करणारे आहे. रक्षण निसर्गाचे का माणसाचे, असा प्रश्न उपस्थित करून धरणामुळे निसर्गाचा असमतोल होत नाही हे जागतिक अनुभवांनी स्पष्ट केले आहे. कोयना भूकंप संकटांची कथा सांगताना प्राणहानी, वित्तहानी, लोकांचे धआरYय, पुनर्वसन, धरण मजबुती बांधकाम आदी माहिती दिली आहे. धरणामुळे भूकंप होत नाही ही तज्ज्ञांची ग्वाही स्पष्ट केली आहे.

धनराज पिल्ले

विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातील भारतीय हॉकिची उज्ज्वल परंपरा नव्या सहस्त्रकातही टिकवुन राहील अशी आशादायी कामगिरी धनराज पिल्ल्ेाने करून दाखवली ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकि खेळात आठ सुवर्णपदकांची कामगिरी करणारा भारत युरोपियन देशांच्या वेगवार हॉकिसमोर मागे पडत असताना धनराज पिल्लेने भारताची शान राखण्याचा आटो कात प्रयत्न केला.
पूण्यात जन्मलेल्या धनराज पिल्लेने घरातुन हॉकिचं बाळकूड मिळालं त्याचे तीनही भाऊ चांगले हॉकिपटू होते . मोठा भाऊ रमेशने त्याला हॉकिचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं परिणामी वयाच्या तेराव्या वर्षी धनराजने कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यानंतर धनराजने जोकीन काव्र्होलो यांच्याकडे व्यावसायिक हॉकीचं प्रशिक्षण घेतानांच राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या.
एकोणिसाव्या वर्षी धनराजने पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवली. विश्वकरंडक, आशियाई आणि ऑलिम्पिक अशा सर्व जागतिक स्पर्धांत धनराजने भारताचं प्रतिनिधित्व केलं. आघाडीच्या फळीत राहून वेगवान खेळ आणि अचूक डि्रबलिंग हे त्याच्या खेळाचं वैशिष्टय ठरलं. १९९९ साली भारताने धनराजच्या नेतृत्वाखाली बॅंकॉक आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. अर्जुन पुरस्कारप्राप्त धनराजला भारत सरकारने २००० साली 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित केलं.
कोलकाता। भारतीय हॉकी के मजबूत स्तंभ रहे धनराज पिल्ले का कहना है कि भारतीय हॉकी टीम को कोचिंग देने के लिए वे सबसे उचित व्यक्ति हैं। स्पेनिश कोच जोएस ब्रासा का कार्यकाल खत्म होने के बाद कोच की तलाश कर रही भारतीय हॉकी के लिए पिल्ले का बयान राहत भरा हो सकता है।कोलकाता में पत्रकारों से पिल्ले ने कहा कि भारतीय टीम को कोचिंग देने के लिए वे सबसे फिट हैं । विदेशी कोचों के बारे में पिल्ले ने कहा कि पूर्व ऑस...


कोलकता, दि. ११ : हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष केपीएस गिल यांनी देशी प्रशिक्षक नियुक्त करण्याची गरज व्यक्त करताच माजी कर्णधार धनराज पिल्ले याने आपण प्रशिक्षकपदासाठी इच्छूक असल्याचे म्हटले आहे.
जोस ब्रासा यांचा प्रशिक्षकपदाचा करार संपल्यानंतर भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा 'शोध' सुरू झाला आहे. याचदरम्यान प्रशिक्षकपदासाठी आपणच योग्य व्यक्ती असल्याचे खुद्द धनराजनेच म्हटले आहे.
भारताच्या सर्वोत्कृष्ठ हॉकीपटूपैकी एक असलेला धनराज म्हणाला की, ऑस्ट्रेलियाचे रिक चार्ल्सवर्थ यांची उचलबांगडी करून ब्रासा यांना प्रशिक्षकपदावर बसविणे ही घोडचूक होती. ब्रासा यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल विचारले असता सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मीच सर्वांत योग्य व्यक्ती असल्याचे धनराज म्हणाला. विदेशी प्रशिक्षकांऐवजी भारताच्याच अनेक खेळाडूंत या पदासाठी योग्यता असल्याचेही तो म्हणाला.
विदेशी प्रशिक्षकांपैकी फक्त चार्ल्सवर्थच चांगले होते, मात्र त्यांना हटवून आम्ही घोडचूकच केली. ते जर पुन्हा प्रशिक्षक होऊ शकत नसतील तर आमच्यापैकी एका खेळाडूला हे पद द्यावे, असेही तो म्हणाला. भारतातील अनेक माजी खेळाडूंना विदेशी कोचपेक्षा अधिक माहिती आहे. भारतीय प्रशिक्षकांवर इतकाच पैसा खर्च केल्यास आपला संघ अधिक प्रगती करू शकेल, असा विश्वास धनराजने व्यक्त केला. ग्वांगझू एशियामध्ये भारताला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. यावर तो म्हणाला की संघाची निवड चुकीची होती.

अजय अतुल

अजय- अतुल ही भारतीय संगीतातील आघाडीची संगीतकार जोडी आहे. त्यांनी भारतीय संगीतक्षेत्रात विविध हिंदी, मराठी, तेलुगू सारख्या विविध भाषांमधील चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. "विश्वविनायक" या संगीत संचीकेद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण केले. अजय अतुल हे संगीत दिग्दर्शानासोबत संगीत संयोजन, पार्श्वसंगीत व पार्श्वगायन देखील करतात.अतुल अशोक गोगावले व अजय अशोक गोगावले या जोडगोळीने सावरखेड एक गाव|, अगं बाई अरेच्या !, जत्रा, जबरदस्त, चेकमेट,साडे माडे तीन, उलाढाल, एक डाव धोबीपछाड, जोगवा आणि नटरंग सारखे मराठी चित्रपट तर विरुद्ध ,गायब सारखे हिंदी व शॉक सारख्या तेलुगू चित्रपटांना संगीतबद्ध केले आहे. राजीव पाटील दिग्दर्शित जोगवा या चित्रपटाच्या संगीतासाठी २००९ च्या उत्कृष्ठ संगीताच्या राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांचे नाव शिक्कामोर्तब केले गेले.

बालपण
  अतुल अशोक गोगावले (११ सप्टेंबर, १९७४) आणि अजय अशोक गोगावले (२१ ऑगस्ट, १९७६) यांचा जन्म पुणे (महाराष्ट्र) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतुल दोघांपैकी थोरला. वडलांची सरकारी नोकरी असल्याकारणाने गावोगावी बदली होत असे.त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण शिरूर, राजगुरुनगर, पुणे येथे झाले.लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची आवड होती.दहावीच्या प्राथमिक परीक्षेत अतुलने गणिताच्या परीक्षेत चित्रे काढली होती.[४] सांगीतिक वारसा नसला तरी घरात संगीतमय वातावरण असे. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे व कलाकार दादा कोंडके उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी गायलेल्या पोवाड्याचे शाल, श्रीफळ वा हार देऊन कौतुक केले गेले होते, त्यांनी ते हार काही दिवस पाणी शिंपडून जतवुन ठेवले होते. एन सी सी च्या एका कार्यक्रमात शिकवलेली धुन न वाजवता त्यांनी मनाला वाटलेली धुन वाजवून पुरस्कार पटकावला होता.सांगीतिक जडण घडणीची ही सुरूवात होती.[४] संगीत क्षेत्रात पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता पण संगीत वाद्ये विकत घेणे त्यांना शक्य नव्हते.म्हणून ते ज्या मित्रांकडे वाद्ये असत त्यांच्याशी मैत्री करत. मंदिरात,शाळेत व बँड पथकां सोबत फिरून सांगीतिक भूक भागाविली जाई.[५] कॉलेज शिक्षणापर्यंत वडिलांनी की बोर्ड आणून दिला जी त्यांची सर्वात आवडती भेट ठरली व संगीताचे प्रयोग सुरू झाले.शिक्षणा नंतर त्यांनी मुंबई गाठली व टाइम्स म्यूज़िक च्या विश्वविनायक या गणपतीच्या संचीकेने त्यांचा संगीत क्षेत्रात श्री गणेशा झाला.

संगीत शिक्षण
   अजय अतुल यांनी शास्त्र-शुद्ध पणे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही.[४] पण काळानुरूप व संगीताच्या प्रदीर्घ आवडीमुळे त्यांनी संगीतात प्रयोग करणे सुरू केले.व तीच प्रयोगशीलता रसिकांना आवडू लागली. ईलाई राजा यांना ते आपले गुरुस्थानी मानतात.[४] जे श्रवणीय वाटलं, हृदयाला भिडलं ते संगीत.जे काळजाला भिडतं आणि आत्म्याला अंतर्मुख करतं, तेच खरं संगीत.अशी त्यांची संगीताबद्दल भावना आहे.

संगीत कारकीर्द
   शिक्षणानंतर त्यांनी मुंबईत येऊन टाइम्स म्युझिक च्या विश्वविनायक या संगीत संचिकेसाठी काम सुरू केले.ज्यात एस. पी. बालसुब्रमणीयम, शंकर महादेवन सारख्या आघाडीच्या कलाकारांचा समावेश होता. या संचीकेत आदिदैवत श्री गणेशावर संस्कृत गीते गायली आहेत. त्या काळी चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर आधारित भक्तिगीतांची लाट सुरू असल्याकारणाने यात नवीनपणा जपण्याचा प्रयत्न त्यांनी या संचीकेद्वारे केला.[४] ही संचिका प्रसिद्ध व्हायला काही काळ गेला. व त्यानंतर त्यावर प्रतीक्रिया सुरू झाल्या. यानंतर तोंडी प्रसिद्धीने या संचीकेस उत्तम प्रतिसाद मिळाला.[४] यातले श्री गणेशाय धीमही हे शंकर महादेवन यांनी गायलेले गीत प्रचलित झाले. यानंतर त्यांनी राम गोपाळ वर्मा यांच्या गायब व महेश मांजरेकर यांच्या विरुद्ध या चित्रपटास संगीत दिग्दर्शन केले. या सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपट व रंगभूमी वरील नाटकांकडे कल घेतला.या वेळी त्यांनी केदार शिंदेच्या सही रे सही हे नाटक संगीतबद्ध केले. व यासाठी त्यांनी अल्फा गौरव(नंतर झी गौरव) चा पुरस्कार पटकावला. याच काळात त्यांची वर्ल्ड म्यूज़िक द्वारे मीराच्या पारसी भजनांची मीरा कहे नावाने व तरुणाईला उद्देशून सागरिका म्यूज़िक द्वारे बेधुंद या दोन संचिका बाजारात आल्या. केदार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्चा! चित्रपटाच्या संगीतानंतर त्यांनी रसिकांच्या मनात घर करायला सुरूवात केली. या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेल्या मन उधाण वार्‍याचे , अजय गोगावले व शाहीर साबळे यांच्या आवाजातले मल्हारवारी , व वैशाली सामंत च्या आवाजातले चम चम सारखी गीते रसिकांच्या पसंतीस उतरली.यातली दुर्गे दुर्घट भारी ही आरती त्यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून गाऊन घ्यावयाची होती पण काही कारणास्तव योग जुळाला नाही व ते गीत अजय गोगावले च्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले.[४] त्यांनी याच काळात श्रियुत गंगाधर टिपरे व बेधुंद मनाच्या लहरी सारख्या झी मराठी व ई टीव्ही मराठीच्या चर्चित मालिकांसाठी पार्श्वसंगीत दिले.
   राजीव पाटील यांच्या सावरखेड एक गाव या चित्रपटात कुणाल गांजावाला यांनी वार्‍यावरती गंध पसरला हे गाणे गायले जे रसिकांना भावले. तर याच चित्रपटातील आई भवानी हे अजय गोगावले ने गायलेले गोंधळ खुप गाजले. केदार शिंदे यांच्या जत्रा या विनोदी चित्रपटातील अजय गोगावले च्या आवाजातले ये गो ये मैना व वैशाली सामंत व आनंद शिंदे यांचे कोंबडी पळाली ही गाणी तुफान गाजली.
  नंतर त्यांनी संग संग हो तुम, कॉलेज कॉलेज व तेलुगू भक्तिगीतांचा विश्वात्मा अश्या संचिका बाजारात आणल्या. बेधुंद संचिकेतले स्वप्निल बांदोडकर याने गायलेले गालावर खळी (जे परत मराठीत बनवले गेले) हे गाणे तरुण पिढीला खूपच पसंत पडले. याच काळात त्यांनी दाक्षिणात्य संगीत क्षेत्रात उडी घेतली व राम गोपाळ वर्मा यांच्या शॉक या चित्रपटास संगीतबद्ध केले.ज्यात चक्रि,चित्रा, श्वेता पंडित, एस. पी. बालसुब्रमणीयम, कौशल्या सारख्या नामवंत पार्श्वगायकांचा समावेश होता.ज्यांची गाणीही विक्रमी खपाने प्रसिद्ध झाली.[६] नंतर त्यांनी महेश कोठारे यांच्या जबरदस्त या चित्रपटास संगीत दिले. ज्यात त्यांनी पाश्च्यात संगीतावर भर दिली. ज्यात प्रामुख्याने स्वप्निल बांदोडकर ,अजय गोगावले व रॅपर अर्ल डीसुझा यांच्या गाण्यांचा समावेश होता. याच चित्रपटातले आयचा घो हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. त्याच वर्षी त्यांनी बंध प्रेमाचे नावाच्या चित्रपटाला संगीतबद्ध केले ज्यात शंकर महादेवन, सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रीती कामत सारख्या गायकांचा समावेश होता. तर २००७ चे विशेष आकर्षण ठरलेला झी टॉकीजच्या साडे माडे तीन या चित्रपटाच्या शीर्षक गीतास त्यांनी संगीत दिले.
  २००८ मध्ये संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात त्यांनी संगीत शैलीमध्ये विविधता राखली. प्रसिद्ध छायाचित्रकार,दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चेकमेट या चित्रपटाचे शीर्षक गीत त्यांनी वेस्टर्न व रॅप पद्धतीने रॅपर अर्ल डिसूझा कडून गाऊन घेतले. तर याउलट तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं सारख्या चित्रपटात नवरी आली सारखी टाळ्यांच्या आधारावरली व काळी धरती, चांगभलं सारखी पारंपरिक गीते देखील त्यांनी साकारली. त्याच वर्षी त्यांनी मुंबई आमचीच सारख्या वादग्रस्त चित्रपटास देखील संगीतबद्ध केले. अजय सरपोतदार निर्मित उलाढाल या चित्रपटात त्यांनी मोरया मोरया सारख्या श्री गणेशाच्या आरतीचे धविमुद्रण प्रसिद्ध ढोल पथक शिवगर्जनाच्या गजरात केले.हे गीत आजही सर्व ठिकाणी गणपतीच्या नावाने जल्लोषात वाजवले जाते. तर त्याच चित्रपटातील दे ना पैसा देना,सब धोखा हैं सारखी पाश्चिमात्य संगीतावर आधारलेली हिंदी गीते गायक कुणाल गांजावाला कडून गाऊन घेतली.
   २००९ हे वर्ष त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरले. सतीश राजवाडे यांचा एक डाव धोबीपछाड, ज्ञानेश भालेकर यांचा बेधुंद व राजीव पाटील यांचा ऑक्सिजन व जोगवा हे चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केले. बेधुंद मधले चायला तिच्या मायला हे कुणाल गांजावाला व अजय च्या आवाजातले गाणे प्रसिद्ध झाले. राजीव पाटील यांचा जोगवा चित्रपट त्यांच्या आत्तापर्यंत च्या कारकिर्दीतला सर्वात विशेष चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या उत्कृष्ठ संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच याच चित्रपटातील जीव दंगला या गाण्यासाठी , मराठी संगीतात पदार्पण करणारे हरिहरन यांना उत्कृष्ठ पार्श्वगायक व श्रेया घोषाल यांना उत्कृष्ठ पार्श्वगायिका म्हणून सन्मानित करण्यात आले. जीव दंगला खेरीज या चित्रपटात अजय गोगावले यांच्या आवाजात लल्लाटी भंडार हे गोंधळ गीत, आनंद शिंदे यांच्या आवाजात हरीणीच्या दारात व श्रेया घोषाल यांच्या आवाजात मन रानात गेलं ही गाणी विशेष लोकप्रिय ठरली.याच चित्रपटासाठी त्यांना संस्कृती कला दर्पण, महाराष्ट्र टाईम्स सन्मान सारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
   २०१० च्या सुरुवातीस त्यांनी संगीतबद्ध केलेला चित्रपट नटरंग प्रदर्शित झाला. ज्याच्या पारंपरिक तमाशा,लावणी, गवळण, कटाव या प्रकारात मोडणार्‍या संगीतास समीक्षक, रसिक सगळ्यांकडून विशेष कौतुकाची दाद मिळाली. यात त्यांच्या,बेला शेंडे व अजय च्या आवाजातल्या वाजले की बारा, अप्सरा आली ह्या लावण्या विशेष लोकप्रिय ठरल्या. तसेच कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी व खेळ मांडला या गीतांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार, झी गौरव,महाराष्ट्र टाईम्स सन्मान, संस्कृती कला दर्पण, राज्य शासन चित्रपट ई. पुरस्कार सन्मानित करण्यात आले.त्यानंतर छायाचित्रकार, दिग्दर्शक संजय जाधव यांच्या रिंगा रिंगा या चित्रपटास त्यांनी संगीत दिले ज्यात सुखविंदर सिंग यांनी घे सावरून हे गाणे, तर बायगो बायगो हे पाश्चात्य संगीतशैलीवर बेतलेले गाणे कुणाल गांजावाला यांनी गायले.
  

नेताजी पालकर

नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.
    पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.[स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथानमधून घेतलेली आहे.]
प्रतापराव गुजर
लढाऊ आयुष्य
शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.
सुरूवातीचा लढा
पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
शहाजीराजांना अटक
शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यांनी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.
शिवाजीराजांनी मुघल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
जावळी प्रकारण
आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
पश्चिम घाटावर नियंत्रण
इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ल्यांवर विजय मिळविला होता.

Tuesday 5 March 2013

जल संसाधन

साइप्रस करेगा पानी का आयात

कभी सुना है कोई देश पानी का आयात कर रहा है? जी हाँ पानी का आयात. साइप्रस आजकल पानी का आयात कर रहा है। अगर आप नहीं जानते हैं तो आपकी जानकारी के लिए बता दूँ की साइप्रस भूमध्य सागर में स्थित एक छोटा सा द्वीप देश है। साइप्रस पूर्वी भूमध्य सागर में तीसरा सबसे बड़ा द्वीप है। यंहा पानी का मुख्य स्रोत वर्षा और हिमपात है। सभी भूमध्य सागर तटीय देशों की तरह यहां पर बारीश सर्दियों में होती है। पिछले ३-४ सालों में साइप्रस में बारीश काफी कम हुई है और परिणाम स्वरूप यहाँ के जलस्रोत सूख गए हैं। यह ख़बर लिखे जाने के समय साइप्रस के जलाशयों में पानी की मात्रा उसकी कुल भण्डार क्षमता की ९ प्रतिशत ही रह गई है।

जलचक्र The Water Cycle
धरती पर कितना पानी उपलब्ध है?
o एक जानकारी के अनुसार धरती पर 2,94,000,000 क्यूबिक मीटर पानी उपलब्ध है, जिसमें से सिर्फ़ 3% पानी ही शुद्ध और पीने लायक है।
o पृथ्वी पर पानी अधिकतर तरल अवस्था में उपलब्ध होता है, क्योंकि हमारी धरती (सौर व्यवस्था) “सोलर सिस्टम” की सीध में स्थित है, अतः यहाँ तापमान न तो इतना अधिक होता है कि पानी उबलने लगे न ही तापमान इतना कम होता है कि वह बर्फ़ में बदल जाये।
o जब पानी जमता है तब वह विस्तारित होता है यानी फैलता है, जबकि ठोस बर्फ़ तरल पानी में तैरती है।
मुक्त पानी की गतिविधि
• वातावरण में भाप के रूप में
• बारिश, ओस, बर्फ़ आदि के रूप में धरती पर वापस आता है
• धरती पर बहते हुए अन्त में पुनः समुद्र में मिलता है

भारत का जल संसाधन
क्या आप सोचते हैं कि जो कुछ वर्तमान में है, ऐसा ही रहेगा या भविष्य कुछ पक्षों में अलग होने जा रहा है? कुछ निश्चितता के साथ यह कहा जा सकता है कि समाज जनांकिकीय परिवर्तन, जनसंख्या का भौगोलिक स्थानांतरण, प्रौद्योगिक उन्नति, पर्यावरणीय निम्नीकरण, और जल अभाव का साक्षी होगा। जल अभाव संभवत: इसकी बढ़ती हुई माँग, अति उपयोग तथा प्रदूषण के कारण घटती आपूर्ति के आधार पर सबसे बड़ी चुनौती है। जल एक चक्रीय संसाधन है

हवा-पानी की आजादी

हवा-पानी की आजादीहवा-पानी की आजादीआजादी की 62वीं वर्षगांठ, हर्षोल्लास के माहौल में भी मन पूरी तरह खुशी का आनन्द क्यों महसूस नहीं कर रहा है, एक खिन्नता है, लगता है जैसे कुछ अधूरा है। कहने को हम आजाद हो गए हैं, जरा खुद से पूछिए क्या आपका मन इस बात की गवाही देता है नहीं, क्यों? आजाद देश उसे कहते हैं जहां आप खुली साफ हवा में अपनी मर्जी से सांस ले सकते हैं, कुदरत के दिए हुए हर तोहफे का अपनी हद में रहकर इस्तेमाल कर सकते हैं लेकिन यहां तो कहानी ही उलट है। आम आदमी के लिए न पीने का पानी है न खुली साफ हवा, फिर भी हम आजाद हैं?

जल संसाधन परिचय
विश्व जलविश्व जलसामान्य तथ्य: पृथ्वी के लगभग तीन चौथाई हिस्से पर विश्र्व के महासागरों का अधिकार है। संयुक्त राष्ट्र के अनुमानों के अनुसार पृथ्वी पर जल की कुल मात्रा लगミग 1400 मिलियन घन किलोमीटर है जो कि पृथ्वी पर 3000 मीटर गहरी परत बिछा देने के लिए काफी है। तथापि जल की इस विशाल मात्रा में स्वच्छ जल का अनुपात बहुत कम है। पृथ्वी पर उपलब्ध समग्र जल में से लगभग 2.7 प्रतिशत जल स्वच्छ है जिसमें से लगभग 75.2 प्रतिशत जल ध्रुवीय क्षेत्रों में जमा रहता है और 22.6 प्रतिशत भूजल के रूप में विद्यमान है। शेष जल झीलों, नदियों, वायुमण्डल, नमी, मृदा और वनस्पति में मौजूद है। जल की जो मात्रा उपभोग और अन्य प्रयोगों के लिए वस्तुतः उपलब्ध है, वह नदियों, झीलों और भूजल में उपलब्ध म

भारत में पानी
सामान्य तौर पर देखने से ऐसा लगता है कि भारत में पानी की कमी नहीं है। एक व्यक्ति को प्रतिदिन 140 लीटर जल उपलब्ध है। किन्तु यह तथ्य वास्तविकता से बहुत दूर है। संयुक्त राष्ट्र विकास संघ (यूएनडीओ) की मानव विकास रिपोर्ट कुछ दूसरे ही तथ्यों को उद्घाटित करती है। रिपोर्ट जहां एक ओर चौंकाने वाली है, वहीं दूसरी ओर घोर निराशा जगाती है।

इस रिपोर्ट के अनुसार भारतीय आंकड़ा भ्रामक हैं वास्तव में जल वितरण में क्षेत्रों के बीच, विभिन्न समूहों के बीच, निर्धन और धनवान के बीच, गांवों और नगरों के लोगों के बीच काफी विषमता है।

संग्रहण
वर्षाजल संग्रहण अथवा एकत्रीकरण की इस प्रणाली में घरों की छतों पर पड़ने वाले वर्षा जल को गैलवेनाईज्ड आयरन, एल्यूमिनियम, मिट्टी की टाइलें अथवा कंक्रीट की छत की सहायता से जल एकत्रीकरण के लिये बने टंकियों अथवा भूजल रिचार्ज संरचना से जोड़ दिया जाता है। इस प्रकार एकत्रित जल का प्रयोग सामान्य घरेलू उपयोग के अलावा भूजल स्तर बढ़ाने में भी किया जाता है।

विपथक बंध (Diversion bunds) / नालियां
इनका निर्माण वर्षाजल अपवाह को सुरक्षित जल संग्राहक तालाबों / बांधो में पहुंचाना होता है। ये एक प्रकार की नालियां होती है जिन्हें ढलान के निचले हिस्से में 0.5 प्रतिशत से 1.0 प्रतिशत तक का ढाल देकर बनाया जाता है। यह जल संग्रहण तालाबों (Water harvesting ponds) का अभिन्न हिस्सा है। विपथक बंधों को स्थायित्व प्रदान करने के लिये सिमेन्ट लाईनिंग, ईंट की दीवार अथवा घास पर्त का प्रयोग किया जाता है


वर्षा जल के संरक्षण और इसके सुचारू वितरण की मिसाल देखनी हो नागौर के निकट बासनी बेहलीमा गांव में चले आइए। उम्दा प्रबंधों के चलते बासनी में तालाब सबकी प्यास बुझा रहे हैं। जिला प्रशासन भी बासनी की तर्ज पर विभिन्न गांवों में जल प्रबंधन लागू करने की सोच रहा है।

नागौर से आठ किलोमीटर दूर बसे मुस्लिम बहुल इस गांव में 22 साल पहले तत्कालीन सरपंच हाजी उस्मान की पहल पर जल संरक्षण की शुरूआत हुई। जिसके बूते गांव के 3900 परिवारों के हलक तर हो रहे हैं।

कौमी फंड के बासनी चेरिटेबल ट्रस्ट ने 1985 में गांव में तालाबों के संरक्षण की शुरूआत बापोड़ मार्ग पर खेत में तालाब खुदवाकर की। यही गोवर्घन तालाब गांव का प्रमुख जलस्त्रोत है। वार्ड पंच अब्दुल रहमान गहलोत का कहना है कि गांव में पांच तालाब हैं, इनमें तीन तालाबों का पानी ग्रामीण पीते हैं। भंगीनाडा और सुननाडा का पानी पशुओं के काम आता है।

कोई नहीं तोड़ता नियम
तालाबों को साफ-सुथरा रखने के लिए कडे नियम हैं, जिनकी कोई अवहेलना नहीं करता। उप सरपंच शौकत अली बताते हैं कि ट्रस्ट पांचों तालाबों की देखरेख करता है। गंवई नाडी से महिलाओं को सिर्फ घड़े में पानी ले जाने की अनुमति है। वहां पुरूष प्रवेश नहीं कर सकता। जानवरों को रोकने के लिए चौकीदार है। तालाबों की आगोर भूमि को साफ-सुथरा रखा जाता है। गंदगी फैलाने वाले पर जुर्माने का प्रावधान है।

राशन की तरह वितरण
पानी के लिए ट्रस्ट ने गांव के 3900 परिवारों को कार्ड जारी कर रखे हैं। पानी भरपूर हो तो कार्ड दिखाने पर गोवर्घन तालाब से प्रत्येक परिवार को माह में एक टैंकर, पानी कम होने पर दो माह में एक टैंकर या तीन माह में एक टैंकर पानी भरने की इजाजत दी जाती है। अप्रेल- मई में जलस्तर कम होने पर टैंकर बंद कर दिए जाते हैं और गांव में 20 स्थानों पर सार्वजनिक जलापूर्ति की जाती है। शाम होते ही तालाब के मुख्य दरवाजों पर ताले लगा दिए जाते हैं। अनुकरणीय कार्य।

बासनी बेहलीमा गांव में पेयजल संरक्षण के कार्य अनुकरणीय हैं। प्रदेश में ऎसे प्रयास ग्रामीणों के स्तर पर शायद ही और कहीं हों। हमने इस बारे में राज्य सरकार को अवगत कराया है। ऎसा प्रबंध अन्य गांव व शहरों में करने का प्रयास करेंगे।

Sunday 3 March 2013

गारफिल्ड सोबर्स



सर गारफिल्ड सोबर्स
West Indies Cricket Board Flag.svg वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव गारफिल्ड सेंट ऑबर्न सोबर्स
उपाख्य गॅरी सोबर्स
जन्म २८ जुलै, इ.स. १९३६ (वय  ७६)

ब्रिजटाउन,बार्बाडोस
उंची ५ फु ११ इं (१.८ मी)
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत डावखुरा मध्यमगती/धीम्या गतीचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (८४) ३० मार्च १९५४: वि इंग्लंड
शेवटचा क.सा. ५ एप्रिल १९७४: वि इंग्लंड
आं.ए.सा. पदार्पण (११) ५ सप्टेंबर १९७३: वि इंग्लंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९५२ – १९७४ बार्बाडोस
१९६८ – १९७४ नॉटिंगहॅमशायर
१९६१ – १९६४ दक्षिण ऑस्ट्रेलिया
१९६१ – १९६२ एम.सी.सी.
कारकिर्दी माहिती

कसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.
सामने ९३ ३८३ ९५
धावा ८०३२ २८३१४ २७२१
फलंदाजीची सरासरी ५७.७८ ०.०० ५४.८७ ३८.३२
शतके/अर्धशतके २६/३० ०/० ८६/१२१ १/१८
सर्वोच्च धावसंख्या ३६५* ३६५* ११६*

चेंडू २१५९९ ६३ ७०७८९ ४३८७
बळी २३५ १०४३ १०९
गोलंदाजीची सरासरी ३४.०३ ३१.०० २७.७४ २१.९५
एका डावात ५ बळी ३६
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ६/७३ १/३१ ९/४९ ५/४३
झेल/यष्टीचीत १०९/– १/– ४०७/– ४१/–
१३ सप्टेंबर, इ.स. २००७
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासातील एक परिपुर्ण सर्वश्रेष्ठ अष्टपैलु क्रिकेटपटू म्हणून वेस्ट इंडिजच्या गारफिल्ड सोबर्स याच्याकडे निर्देश केला जातो फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रांतील त्याची कामगिरी देदीप्यमान अशीच त्याचप्रमाणे आपल्या कूशल नेतृत्वांन वेस्ट इंडिज संघाची भरभक्कम उभारणी करण्याचं श्रेयही गॅरी सोबर्स यालाचं दिलं जातं त्याच्या असामान्य कर्तृत्वाची दखल घेऊन त्याला सर या किताबानं बहूमानित करण्यात आलं.

गॅरी सोबर्स याचा जन्म २८ जुलै १९३६ रोजी बार्बाडोस येथे झाला .वयाच्या सतराव्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.फलदाजी मधील आक्रमक व बचावात्मक दोन्ही तंत्र अवगत असलेल्या या डावखोरा फलंदाजाने आपल्या ९३ कसोटी सामन्यात ५७७८ च्या लक्षणीय सरासरीने ८०३२ धावा जमवल्या त्याने पाकिस्तानविरूद्व केलेल्या नाबाद ३६५ धावा हि त्याची सर्वोच्या धावसंख्येचा त्याचा विक्रम हा ब्रायन लारा ३७५ धावा करून हा विक्रम मोडला.द

सोबर्सच्या क्रिकेटमधील अशा कर्तृत्वामुळे १९६४ साली त्याचा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर हा प्रतिष्ठाप्राप्त किताब देऊन सन्मान करण्यात आला. तसेच २००० साली विस्डेन फाइव्ह क्रिकेटर्स ऑफ सेंच्युरी या क्रिकेटविश्वातील सर्वोच्च बहूमानानेही त्याला सन्मानित करण्यात आलं.

पहिल्या क्षणापासून काय जाणवलं असेल तर त्याची बुद्धिमत्ता, त्याची विनोदबुद्धी, त्याचा प्रोफेशनॅलिझम, त्याचं क्रिकेटच अफाट ज्ञान (तो ज्ञानाचा समुद्र होता. कितीही खोलवर गेलं तरी तळच लागायचा नाही.) आणि ते व्यक्त करण्याची हातोटी. त्याचा प्रोफेशनॅलिझम आपल्या इथले एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे क्रिकेटपटूही दाखवत नाहीत. हा राजाधिराज इथे भारतात येण्यापूर्वी दहा दिवस भारतीय क्रिकेटचा अभ्यास करत होता. जुन्या आठवणी पुन्हा त्याने चाळवल्या. आजच्या पिढीतल्या खेळाडूंच्या फिल्म पाहिल्या. त्यामुळे ज्ञानाच्या बाबतीत एकदम अपटुडेट होता. इथे आल्यावर त्याला साधारण काय प्रश्न विचारणार हे त्याने मला विचारलं. आणि कार्यक्रमाच्या वेळी तो तयारीत होता. त्याची तयारी पाहून हा माणूस मॅचच्या आधी नेट प्रॅक्टिस करायचा नाही, त्याला नेट प्रॅक्टिसचा तिटकारा होता, ह्यावर विश्वासच बसायचा नाही.

पहिल्या क्षणापासून काय जाणवलं असेल तर त्याची बुद्धिमत्ता, त्याची विनोदबुद्धी, त्याचा प्रोफेशनॅलिझम, त्याचं क्रिकेटच अफाट ज्ञान (तो ज्ञानाचा समुद्र होता. कितीही खोलवर गेलं तरी तळच लागायचा नाही.) आणि ते व्यक्त करण्याची हातोटी. त्याचा प्रोफेशनॅलिझम आपल्या इथले एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे क्रिकेटपटूही दाखवत नाहीत. हा राजाधिराज इथे भारतात येण्यापूर्वी दहा दिवस भारतीय क्रिकेटचा अभ्यास करत होता. जुन्या आठवणी पुन्हा त्याने चाळवल्या. आजच्या पिढीतल्या खेळाडूंच्या फिल्म पाहिल्या. त्यामुळे ज्ञानाच्या बाबतीत एकदम अपटुडेट होता. इथे आल्यावर त्याला साधारण काय प्रश्न विचारणार हे त्याने मला विचारलं. आणि कार्यक्रमाच्या वेळी तो तयारीत होता. त्याची तयारी पाहून हा माणूस मॅचच्या आधी नेट प्रॅक्टिस करायचा नाही, त्याला नेट प्रॅक्टिसचा तिटकारा होता, ह्यावर विश्वासच बसायचा नाही. स्टेजवर बोलावल्यावर त्याने १९७१च्या भारतीय संघातल्या बहुतेक खेळाडूंचं विनोदी शैलीत वर्णन केलं. प्रसन्नाचं सडेतोडपणे कौतुक करताना त्याने वेंकटच्या अस्तित्वाची पर्वा केली नाही. आणि वेंकटचं योग्य वर्णन करताना प्रसन्नाला काय वाटेल हे पाहिलं नाही. बापू नाडकर्णींना कंजूष गोलंदाज म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरचे चिडवण्याचे भाव बापू नाडकर्णींच्या चेहऱ्यावर स्मित झळकावून गेले. सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना तो झहिर खानला विसरला नाही. त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना तो हाफ व्हॉली येणार हे माहीत असल्यासारखा तयार होता. त्याच्या मुखातून क्रिकेटची ज्ञानगंगा वहायची. त्याचबरोबर तो हास्याच्या ज्या लाटा निर्माण करायचा त्या लाजवाब असायच्या. देव जेव्हा बोलतो तेव्हा तो सामान्यासारखा थोडाच बोलणार? एकदा व्यावसायिकदृष्टय़ा करार झाल्यावर कटकट नाही, की नखरे नाहीत. प्रायव्हेट पार्टीमध्ये तर तो भलताच खुलायचा. हास्यविनोदाला भरती यायची.
त्याची स्मरणशक्ती काही बाबतीत प्रचंड ग्रेट आहे. १९५३ साली भारतीय संघ वेस्ट इंडिजला गेला होता. सोबर्स त्या मालिकेत खेळला नाही. कारण त्याची निवड झाली नाही. पण त्या मालिकेतलं भारतीय क्षेत्ररक्षकांचं क्षेत्ररक्षण त्याला आठवत होतं. तो म्हणाला, ‘‘कव्हर्समधे चंदू गडकरी आणि दत्ता गायकवाड असायचे. त्यांना भेदून चेंडू पार करणं शक्यच नव्हतं. कुठे आहेत दोघे आता?’’
क्रिकेटच्या विश्वातलं शिखर असलेला गॅरी सोबर्स हा त्याच्या रंगील्या आयुष्यासाठीही ख्यातनाम आहे. त्याची अनेक लग्नं झाली आहेत. त्यामुळे या रगेल आणि रंगेल माणसात कधी कौटुंबिक अंश दिसेल असं कुणाला स्वप्नात देखील वाटणं शक्य नव्हतं. मात्र सर गॅरीच्या आयुष्यातला हा कौटुंबिक अंश आणलाय त्याच्या नातवाने. हा कुठल्या मुलाचा मुलगा याबद्दल गॅरी सांगत नाही. पण या त्याच्या नातवामध्ये तो मनाने फार गुंतलाय. जगभर धम्माल करत फिरणारा हा आजोबा ठायी ठायी आता आपल्या नातवाची आठवण काढतो.
या नातवाचा एक किस्सा म्हणजे शाळेतल्या त्याच्या वर्गमित्रांना वाटत होतं की गॅरी सोबर्स आज हयात नाही. त्यामुळे सोबर्स हयात असल्याचं दाखवण्यासाठी नातवाने एक दिवस हट्टाने आजोबांना शाळेत नेलं.
गॅरी आता मनाने आजोबा झालाय. तो या आजोबाच्या भूमिकेत कायम असतो. पुण्याला साबडे यांच्या तीन मजली सायकलच्या दुकानात त्याला आपल्या या नातवाची प्रकर्षांने आठवण झाली. या दुकानाचे मालक साबडे यांनी लगेच एक फोल्डिंगची सायकल सोबर्स यांच्या नातवासाठी भेट म्हणून दिली.
चंदू बोर्डे यांनी सोबर्स यांना पुणेरी पगडी भेट म्हणून दिली. पगडीबद्दल समजून घेताना गॅरीला पुन्हा आपल्या नातवाची आठवण झाली. हा आजोबा झालेला सर गारफिल्ड सोबर्स अनेकांसाठी नवा होता.

Saturday 2 March 2013

अस्मिता

                                          ।। श्रीयोगेश्वरोविजयतेतराम्।।

अगदी सुरुवातीला एक काळ असा होता की , मानव टोळ्यांनी रहात असे. त्यात समर्थ आणि असमर्थ यांत नेहमी लढाया होत. समर्थ असमर्थाला लुटत असे , मारत असे. might is right. ताकदवान असलेला आपले राज्य , आपली सत्ता गाजवीत असे. अजूनही ताकदीचा कायदाच चालू आहे. बाहुबलानंतर बुद्धिचा might आला. त्यानंतर संख्येचा might आला व त्याही मागे वित्ताचा might आला. मानव अजूनही might is right मधून बाहेरच येत नाही. उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्यांनी सांगितले survival of the fittest म्हणजे समर्थानी जगावे व असमर्थानी मरावे. unfit माणसे ही समर्थाचे खाद्य म्हणूनच जन्माला आली आहेत. म्हणून असमर्थांना गुलाम बनवीत. पुढे माणूस थोडा सुसंस्कृत झाला. त्याला वाटू लागले की , माणसानेच माणसाला खावे हे काही चांगले नाही. आपण जगले पाहिजे आणि दुसऱ्याला जगू दिले पाहिजे. ' जगा आणि जगू द्या. ' live and let live चा काळ आला ; पण प्रत्यक्षात समर्थ जास्त कमवतो आणि असमर्थ कमवूच शकत नाही. जगा आणि जगू द्या हे काही मोठे तत्त्वज्ञान नाही.

एक मुलगी होती. खूप शिकली , पुढे तिने क्कद्ध. ष्ठ. केली. नंतर तिचे लग्न झाले. कालांतराने तिला प्रसूतीगृहात जावे लागले. बाळंतीण झाली. बिछान्यावर पडली होती. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली ' बाई तुमचं मूल रडतय. ' तेव्हा तिने सांगितलं- ' हे बघा मी ' जगा आणि जगू द्या ' या विषयावर प्रबंध लिहिला आहे. मुलाला रडू दे आणि मला झोपू दे! ' हे चालेल का ? तिला आई म्हणू का आपण ? आई ती जी मुलाकरीता झोप उडवते. जगा आणि जगू द्या हे जर जीवनाचे तत्त्वज्ञान झाले असते , तर आपण कोणीच लहानाचे मोठे झालो नसतो.

मी तुला जगवीन , मी तुला मोठा करीन , तुला चालता येत नाही , उभं रहाता येत नाही. तुला स्वत:च्या पायावर या जगाच्या अंगणात उभं करीन. त्याच्याकरिता खटपट करीन , जाग्रणं करीन. ही वृत्ती असते ती आई. unfit ला fit करणे हे आईचे हृदय आहे.

fitting the unfit to survive. हे जे काम आहे , ते काम करणारा तो धर्म. त्यासाठी ' धर्म ' आला. मातृहृदयाच्या ऋषिंनी तळमळीतून तो उभा केला.

म्हणून माणसाला उभं करतो तो धर्म. ' मी कोणी तरी आहे ' हे समजावणारा , बुद्धित उतरवणारा तो धर्म. धर्माचे हे पहिले लक्षण. ' मी कोणी तरी आहे ' हा जीवनाचा पहिला आधार ( stand) आहे. ही अस्मिता जागृत करण्याचं काम धर्म करतो.

' मी आहे तसा दुसराही आहे ' हा जीवनाचा दुसरा stand. ' माझ्याबद्दल अस्मिता आणि दुसऱ्याचा सन्मान दुसऱ्याबद्दल भाव ' धर्म जागृत करतो. या दोनही जाणिवा हा जीवनाचा पाया आहे. या जाणिवा प्रत्येक माणसात उभं करण्याचं काम धर्म करतो.

माणसाची अस्मिता जागी झाली , तरच त्याचा कणा मजबूत होईल. जीवन हिमतीने जगण्यासाठी अस्मिता आवश्यक आहे. पण ही अस्मिता कशाची बाळगायची ? आमच्याकडे नाही शिक्षण , नाही पैसा , नाही सत्ता- मग ? धर्म प्रत्येकाला समजावतो की , ' देव माझ्याबरोबर आहे. ' म्हणून मला किंमत आहे. धर्म प्रत्येकाला किंमत देतो. ही जाणिव झाली की त्यातूनच ' मी होऊ शकतो. '

' मी करू शकतो ' ही भावना निर्माण होते. मानवाला या गोष्टी अत्यावश्यक आहेत.

पण फक्त अस्मिता जागृत झाली , तर माणूस राक्षस बनेल- दुसऱ्याचा विचारही करणार नाही. त्यासाठी समर्पणाची दृष्टी धर्म देतो. त्यासाठी माझा आणि दुसऱ्याचा संबंध कोणता ? माझे आणि समाजाचे नाते काय ? माझ्यात देव आहे , तसा दुसऱ्यातही आहे. म्हणून आम्ही समान झालो. सगळ्यांचा बाप एकच. इथे भेदभावच रहात नाही. आजही माणसाला ' मूलभूत हक्क ' कायदा सांगतो ते मुळात कोणी दिले ? खोल जाऊन विचार केला , तर समजेल की हे धर्मानी दिले आहेत.

मी कोणीच नाही , कसलाच नाही , कशाचाच नाही , असे सांगणारा धर्म असूच शकत नाही. मी कोणीतरी आहे , मी जगले पाहिजे , मी चांगल्या रीतीने जगले पाहिजे. ही जीवनाची दिशा धर्म देतो.

धर्मामध्ये कृतीचे नियमन करण्याची शक्ती आहे. काही लोक म्हणतात , ' धर्म घरात ठेवा. ' त्यांना विचारले पाहिजे की , जर धर्म घरातच ठेवायचा असेल , तर ऑफिसमध्ये गेल्यावर मी पैसे का खाऊ नयेत , याचे उत्तर काय ? कायद्याला पकडता येणार नाही , असे डोके चालवून पैसे खाईन. आज तेच चालले आहे. धर्म घरी ठेवायचा , तर नैतिकता कशी आणणार माणसात ?

त्या पुढे जाऊन धर्म शिकवतो की , माझ्या कर्माची जबाबदारी माझी आहे. ती स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. आज सगळ्या क्षेत्रांत प्रत्येक जण अपयशाची , अध:पतनाची जबाबदारी दुसऱ्यावर नाहीतर परिस्थितीवर टाकतो आहे. विद्याथीर् , शिक्षक , मालक , कामगार , सरकार , जनता कोणीच स्वत:ची जबाबदारी उचलायला तयार नाही. जोपर्यंत मानव स्वत:ची जबाबदारी स्वत: उचलायला तयार होत नाही तोपर्यंत कोणत्याही देशात , कोणत्याही काळात त्याची आध्यात्मिक किंवा भौतिक उन्नतीही होत नाही. म्हणून भगवान कृष्ण समोर असूनही अर्जुनाला स्वत: लढावंच लागलं.

या ज्या मानवी उत्कर्षाला मूलभूत गोष्टी आहेत त्या समजावतो , मानवाला मानवाजवळ घेऊन जातो तो धर्म. हे काम जर धर्म करत नसेल , तर धर्म काय कामाचा ? धर्म मूलत: माणसाला हिमतीने जगाच्या अंगणात उभा करतो.


- पांडुरंगशास्त्री आठवले 



अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता   अस्मिता  अस्मिता   अस्मिता