Wikipedia

Search results

Sunday 28 April 2013

साहित्यकार रवींद्रनाथ ठाकूर

रवींद्रनाथ ठाकूर
टोपणनाव     गुरुदेवजन्म     मे ७, १८६१कोलकाता, भारतमृत्यू     ऑगस्ट ७, १९४१कोलकाता, भारत
कार्यक्षेत्र     साहित्य, संगीत, तत्वज्ञान, नाटक
राष्ट्रीयत्व     भारतीय Flag of India.svgभाषा     बंगालीसाहित्यप्रकार     कविता, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती     जन गण मन, गीतांजली
प्रभावित     द.रा.बेन्द्रे,पु.ल.देशपांडे
पुरस्कार     Nobel prize medal.svg साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)
वडील     देबेंद्रनाथ टागोर
आई     सरला देवी
पत्नी     मृणालिनी देवी
(विवाहः डिसेंबर ९, १८८३ )
स्वाक्षरी    

रवींद्रनाथ ठाकूर  (७ मे, इ.स. १८६१ - ८ ऑगस्ट, इ.स. १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.[१]

बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा.

कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात [२][३][४] जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८व्या वर्षी लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने ब-याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.

No comments:

Post a Comment