Wikipedia

Search results

Monday 29 April 2013

मनाची एकाग्रता


विविध धर्माची जी शिकवण आहे ती शिकवण माणसाने भलेपणाने वागावे, एकमेकांशी चांगले संबंध ठेवावेत असे सांगणारी आहे. 'परमत सहिष्णुता' हा सर्वांना सुखाने जगु देणारा एक विचार आहे. किंबहुना तो अतिशय महत्त्वाचा आचार आहे. 'तू माझ्या मताचा नसशील तर तुला ह्या जगात राहाण्याचा अधिकार नाही,' असे म्हणणे म्हणजे दुसऱ्याच्या मताचा, त्याचा विचारांचा अनादर करणे होय. आपल्याला जसा आपल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आहे, आपला स्वतंत्र विचार बाळगण्याचा अधिकार आहे तसा दुसऱ्यालाही त्याच्यापुरता वेगळा विचार बाळगण्याचे स्वातंत्र्य आपण दिले पाहिजे, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. विशेषत: धर्मासारख्या नाजुक विषयात ह्या गोष्टीला अतिशय महत्त्व देणे अत्यंत गरजेचे आहे.

धर्मात काही आचार सांगितलेले आहेत. त्यापैकी प्रमुख आचार हा ईश्वरी उपासना हा होय. प्रत्येक धर्माची ईश्वरी संकल्पना ही वेगवेगळी आहे. म्हणजे सगळे लोक अंतिमत: ईश्वरी तत्त्व हे एकच आहे, असे मानतात पण तो 'एकच' सर्वांचा सारखा नाही. त्यामध्ये काही अंतर आहे आणि ह्या अंतरामुळेच विविध धर्माचे विविध आचार वेगवेगळया प्रकारचे झालेले आहेत. सांप्रतच्या युगाला अनुसरून ह्या सर्व आचारांमध्ये एक समानता आणण्याचा प्रयत्न करणे हे विचारवंतांसाठी मोठे आव्हान आहे. प्रत्येक धर्माने काही नित्य आचार सांगितले आहेत.

त्यात नित्य प्रार्थना हा महत्त्वाचा होय. हिंदुधर्मात नित्य पूजा हा विषय अतिशय महत्त्वाचा मानला गेला आणि प्राचीन धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावयाची झाली तर त्यासाठी लागणाऱ्या वेळेची, जागेची आणि इतर प्रकारची अनुकूलता आता सर्वांनाच लाभेल असे नाही. किंबहुना ती लाभणे इतके कठीण आहे की ते अशक्यच असे म्हटले पाहिजे. मग ही पूजा का करावयाची त्याचा विचार करून आपण त्यानुसार वागले पाहिजे. ह्या नित्यपूजेत परब्रह्मास्वरूप ईश्वराला आवाहन करून त्याचा पूजाविधीने गौरव करून सत्कार करणे हा अधिक महत्त्वाचा भाग असतो आणि त्यानंतर त्याची भक्त प्रार्थना करतो. ह्या प्रार्थनेत, 'तू माझे कल्याण कर, मला रोगमुक्त, चिंतामुक्त ठेव, माझे ईप्सित पूर्ण कर, मला मुलंेबाळें होऊ दे, ती चांगल्यारीतीने वाढू दे' जे हवे ते मागण्यासाठी म्हणून केलेली ही नित्यपूजा निश्चित फलदायी ठरते, असा पिढ्यानुपिढ्यांचा विश्वास असतो. आता ही पूजा पूवीर्च्या प्रमाणे करता येत नसेल तर काय करावयाचे? ईश्वराची प्रार्थना करून आपण आपले मागणे आणि म्हणणे त्याच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करावा. तो सर्वांंतर्यामी आहे, अशी श्रद्घा बाळगून आपण त्याला आपल्या चिंताविवंचना सांगावयाच्या आणि तो आपला सखासांगाती आहे, आपले कल्याण करणारा आहे, अशी दृढ श्रद्घा मनात बाळगून त्याची प्रार्थना करावयाची.

ही प्रार्थना करताना काही विचारवंतांनी मानसपूजेचा मार्ग फार पूवीर्च सांगितला आहे. जरी आपण देवाची पूजा प्रत्यक्षात करू शकत नसलो तरी ती मनात तशी भावना निर्माण करून केली असता तेवढीच पुण्यप्रद होते, हितप्रद ठरते, असे थोरामोठ्यांचे सांगणे आहे. प्रत्यक्ष आद्यशंकराचार्यांनीसुद्घा मानसपूजेचे श्लोक लिहिले आहेत. आपल्याकडचे सुप्रसिद्घ कवि चंदशेखर शिवराम गोऱ्हे ह्यांनी मराठी भाषेत अशी मानसपूजा लिहिली आहे.

दुसऱ्या अनेक कविंनीहि अशी मानसपूजा कविताबद्घ केलेली आहे. कविताबद्घ असल्यामुळे ती मनातल्या मनात म्हणून तसे उपचार देवाला अर्पण करणे सोपे जाते हे खरे पण कवितेचा आधार न घेता आपण मनातल्या मनात देवाची तशी पूजा करू शकतो. म्हणजे देवाला उपचार कोणत्या मार्गाने वाहायचे त्याचा निश्चित क्रम मनाशी ठरला असला पाहिजे किंवा असे उपचार अर्पण न करता त्याचे चिंतन करून मनोभावे नमस्कार करून आणि निमिषभर त्याच्यासमोर शांतपणे उभे राहून आपले म्हणणे त्याला सांगू शकतो. ह्या मार्गाने देवाचे रोज काहीतरी करणे, नामस्मरण करणे आपल्याला कितीतरी मोठ्या प्रमाणात आधारभूत ठरू शकते.

या गोष्टीला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी मिनिटेसुद्घा लागत नाहीत मात्र हा कार्यक्रम मनोभावे, श्रद्घापूर्वक झाला पाहिजे. ह्या साध्या गोष्टींनेही मनाला केवढा तरी आधार मिळू शकतो आणि क्षणभर मन एकाग्र करता आले तर ते मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी अत्युपयुक्त ठरते असे आधुनिक शास्त्रही सांगते. मनोवैज्ञानिक सांगतात, मन एकाग्र करण्याची सवय लागली की आपण हाती घेतलेल्या अन्य कोणत्याही कामावरसुध्दा त्याच ताकदीने मन एकाग्र करु शकतो. ईश्वराची प्रार्थना करताना मन एकाग्र करणे तुलनेने सोपे आहे. कारण ईश्वराची संकल्पना ही एका उच्च तत्त्वाच्या प्रांतात आपल्याला घेऊन जाण्यासाठी म्हणून निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या पातळीवर मनाने जाऊन मन एकाग्र करणे सहज शक्य होते हा अनेकांचा अनुभव आहे. 



एकाग्रता पध्दती

यशासाठी, मन शांत करावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण पध्दती
मैनेला, तिचा आवाज;
मोराला, त्याचा पिसारा;
वाघाला, त्याची नखं,
तशी माणसाला - त्याची ‘एकाग्रता’!
सृष्टीमध्ये प्रत्येक प्राण्याचं काही वैशिष्ट्य आहे. माणसाची तर अनेक गुणवैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी त्याला उच्च कोटीला नेणारं एक गुण-वैशिष्ट्य म्हणजे ‘एकाग्रता’.
एकाग्रतेमुळे आपल्या मनाची खूप शक्ती वाढते. ती आपल्याला अन्यत्र उपयोगी पडते. एकाग्रतेमुळे आपली कार्यक्षमताही वाढते आणि यश लौकर प्राप्त होतं.
सचिन तेंडुलकरसारखा जगविख्यात फलंदाज असं सांगतो की, “माझ्या यशात, एकाग्रतेचा मोठा वाटा आहे. मी फलंदाजी करताना मला समोरचा अंपायर, रनर किंवा अन्य कोणीही दिसत नाही. दिसतो तो फक्त गोलंदाजाचा हात व त्यातील चेंडू. त्यावरच माझं सगळं लक्ष एकाग्र झालेलं असतं.” असं त्याने एका मुलाखतीत संागितलं होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
थोडक्यात ‘यश’ आणि ‘एकाग्रता’ यांचं अतूट नातं आहे. कला-क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग-व्यापार, राजकारण, युध्द, अध्यात्म, ध्यान-साधना, इत्यादी सर्वच छोट्या-मोठ्या क्षेत्रांमध्ये, यशासाठी एकाग्र प्रयत्न आवश्यक असतात. एकाग्रतेचं महत्त्व हे असं सर्वव्यापी आहे.
परंतु, ‘एकाग्रता’ किंवा ‘ध्यान’ हा विषय आला की, ‘मन एकाग्र होत नाही’ , मनात अनेक विचार येतात’ अशीही अनेकांची तक्रार असते. तेव्हा, आपलं हे चंचल मन एकाग्र कसा करावं, एकाग्रतेतून शांती कशी मिळवावी हे समजून घेताना, प्रथम एकाग्रतेची व्याख्या पाहू.
एकाग्रतेच्या दोन व्याख्या सांगता येतील; त्या अशा -
1. आपल्याला आवश्यक त्या गोष्टीकडे संपूर्णपणे लक्ष देण्याची व त्याचवेळी अन्य गोष्टींकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
2. 2. आपली भावनिक आणि बौध्दिक शक्ती एकवटून, ती इच्छित काळापर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टांवर, ध्येयावर स्थिर ठेवण्याची क्षमता, म्हणजे एकाग्रता.
मात्र, ध्यान आणि एकाग्रता यात एक मूलभूत फरक आहे. तो फरक ‘हेतूचा’ आहे. सामान्यत:, एकाग्रता ही बाह्य यशासाठी- म्हणजे दैनंदिन व्यवहारात यश मिळवण्यासाठी- उपयुक्त अशी प्रक्रिया आहे. तर ध्यान ही आपल्या अंतर्मनाच्या शोधाची, तसंच शुध्दीचीही प्रक्रिया आहे. अशा या दोन्हीचा समन्वय साधून, ‘मनशक्ती प्रयोग केंद्राने’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच, एकाग्रता आणि मन:शांतीसाठी विविध पध्दती विकसित केलेल्या आहेत.
विविध व्रते, निश्र्चय आणि मन:शांती यांचा परस्पर संबंध असतो. या पार्श्र्वभूमीवर, स्वामी विज्ञानानंद लिखित “मन:शांती = 16 सोप्या पध्दती” या पुस्तकातील, मन:शांती व स्वशुध्दीच्या सोळापैकी दोन पध्दती, पुढे दिलेल्या आहेत. त्याने साधना शुध्द होईल. मनाच्या अनेक विकल्पांनी शरीराव होणारे आघात आणि रोग, कमी त्रासदायक होऊ शकतील; अधिक अभ्यासाने टळूही शकतील. विविध व्यावसायिक, वैज्ञानिक, बुध्दिवादी, नास्तिक, तसेच सर्वसामान्यांनाही या पध्दती उपयोगी पडतील.
प्रत्येक वेळेला सुचविलेल्या प्रकारांपैकी कोणता प्रकार तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक उपयुक्त वाटतो, याकडे लक्ष ठेवा. कोणता तरी एक साधनाप्रकार तुम्हाला एकदम, अतीव समाधान आणि शंाती देईल, तुमच्या जीवनात नवे परिवर्तन होईल.
या पध्दती वापरून, अनेकांना लाभ झालेला आहे. आपणही अनुभव घेऊन पहा.

No comments:

Post a Comment