Wikipedia

Search results

Wednesday 24 April 2013

औषधी वनस्पती (medicinal plants)

अंबाडी-

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.तसेच हीची भाजी पण करुन खातात.
अंबाडीला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
वर्णन
ही सुमारे १.५ ते २ मिटर वाढणारी वनस्पती आहे.हे झाड सरळ वाढते.याची पाने चवीने आंबट असतात.कोवळी असतांना याच्या पाल्याची भाजी करतात.
 उत्पत्तिस्थान
भारतात विदर्भ,खानदेश,पंजाब चा काही भाग.
 उपयोग
सर्वसाधारण - दोर्‍या,सतरंज्या,कागद करण्यास उपयुक्त
आयुर्वेदानुसार - पित्त,जळवात,अजिर्ण इत्यादी रोगांवर
संदर्भ
वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री


कडुलिंब-
1. वर्णन
हा मोठा, ३०-६० फुट उंच वाढणारा छायादार वृक्ष असतो. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर,हिरव्या रंगाची २-३ इंच लांब,नोकदार,आरी सारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात. कडुलिंबाची फुले पांढरी,लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी असतात. जवळपास ३-४ इंच लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते. याच्या लाकडाचा वापर इमारत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो. कडुलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडु,विपाकी,शीतविर्य,लघु,मंदाग्निकर-खोकला,ज्वर,अरुची,कृमी,कफ,कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते.हा जणु कल्पवृक्षच आहे.
हे संपुर्ण भारतात आढळणारे,नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे.याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडु चविची फळे लागतात म्हणुन याचे नाव कडुलिंब.या झाडाची पाने, फळे,बीया,साल,मुळे सर्व कडु असतात.याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे.कडु असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी,पीक,मानव या सर्वांसाठी वापरल्या जातो.गुढीपाडव्याचे शुभ दिवशी याची कोवळी पाने,फुले,लहान कोवळी फळे,जिरे,मिरे,सैन्धव मिठ ओवा,गुळ,हिंग,चिंच हे सर्व एकत्र वाटुन त्याची गोळी करुन खातात.त्याने वर्षभर रोगमुक्त राहता येते.
2. उत्पत्तिस्थान
भारतात सर्वठिकाणी
3. उपयोग
सर्वसाधारण - काड्या दांत घासण्यास उपयोगी,लाकुड ईमारतीसाठी

आयुर्वेदानुसार - जंतुनाशक,सापाच्या विषावर,गर्मीवर,रक्तदोषहारक,विषमज्वरावर,कृमीनाशक,दाहावर,महारोगावर,बाळंतरोगावर, अफुच्या उतारास, जखमेवर, मुळव्याध,इ.अनेक रोगांवर
या पासुन बनणार्‍या औषधी - पंचनिंबचुर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक

आवळा -
    आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा लहान आकारातील आवळा हा रसपूर्ण नसल्याने त्याचा वीर्य वाढीच्या दृष्टीने पाहिजे तसा नसल्याने फायदा होत नाही. परंतु डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापर करू शकतो.

'सी' व्हिटॅमिनने पूर्ण-
आधुनिक रासायनिक विश्लेशषाच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्या अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात व संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त 'सी' व्हिटॅमिन आढळते.

रिदोषनाशक-
  डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आपण वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरब्बा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारावर औषध म्हणून वापरतो     
आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते.

आवळ्याचे अन्य गुण-
आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.


'गाजर'
'गाजर' आपल्या आरोग्यासाठी फारच गुणकारी आहे. आपल्या आरोग्यास लागणारी अनेक पोषकतत्त्वे गाजरामध्ये असल्याने त्याला 'आरोग्य रक्षक' ही म्हटले जाते. लाल, रसपूर्ण गाजरामध्ये आपल्याला उपयोगी असलेल्या अनेक गोष्टी लपलेल्या असतात. त्यामुळे कच्चे गाजर भरपूर प्रमाणात सेवन केले पाहिजे.
गाजराच्या सेवनाने होणारे फायदे -
१) कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते. गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये, कारण ते अधिक उष्ण असल्याने ऍसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो.
२) गाजर हृदयरोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करणे, वातदोषनाशक, पुष्टिवर्द्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे. मूळव्याध, पोटाचे विकार, मूतखडा आदी आजारांवर औषधी आहे.
३) शक्यतोवर गर्भवती महिलांनी गाजर जास्त खाऊ नये. उष्णता होण्याची शक्यता असते.
४) गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. जंत विकार नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे.
५) गाजर खाल्ल्यामुळे दृष्टी चांगली होते. कारण त्यामध्ये विटामीन 'ए' मुबलक प्रमाणात असते.
६) गाजर रक्त शुद्ध करते. 10-15 दिवसात गाजरचा रस प्यायल्याने रक्तविकार, गाठी, सूज व त्वचेसंदर्भात आजार बरे होतात. गाजर चावून चावून खाल्ल्याने दात व हिरड्या तंदरुस्त व स्वच्छ होतात.
७) गाजरचा कीस करून त्यात चवीनुसार मीठ टाकून खाल्ल्याने त्वचेचे आजार दूर होऊ शकतात.
८) गाजरच्या रसामध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं पूड, मिरे पूड व लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पाचनक्रियेसंदर्भातील अडचणी दूर होतात.
१०) गाजर हृदय विकारावरदेखील लाभदायी आहे.

हळदी-
आपल्याकडे हळदीचा उपयोग करण्याची सुरुवात अगदी देवघरापासून होते. त्याचबरोबर स्वयंपाक, लग्नसमारंभ, स्वागत समारंभ, औषधे, उत्पादने आदी मध्येही हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्याकडे सवाष्ण स्त्रीला निरोप देतानाआपण हळदीकुंकुच लावतो. आमच्याकडे लग्नसमारंभात हळदीचं तर वेगळंच महत्त्व असतं. हळद लावण्याचा एक कार्यक्रमच असतो. वधुवरांना हळद लावूनच स्नान घातले जाते. त्यात परंपरेचा भाग तर असतोच पण त्याचबरोबर एक सौंदर्यप्रसाधन म्हणून हळदीमध्ये असलेल्या गुणधर्माचाही विचार केला जातो. हळदीच्या वापराने त्वचा नितळ, मुलायम व सुंदर होते. एकूण वातावरणात प्रसन्नता निर्माण होते. यावरूनच आपल्याकडे 'पी हळद अन् हो गोरी' हा वाक्प्रचार उपयोगात आणला जातो. रोजच्या जेवणात आम्ही हळदीचा अनेक प्रकारे वापर करतो. केवळ रंग व चव यावी म्हणून हळद वापरली जात नाही. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण हळदीच्या वापरामुळे प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे.

आजीच्या औषधी बटव्यात हळद हा एक अविभाज्य भाग असतो. सहज हाताशी असणारी हळद प्रथमोपचाराचा एक भाग असते. जखम झाली तर रक्तप्रवाह थांबावा म्हणून हळद लावली जाते. रक्त थांबतेेच पण त्याचबरोबर हळदीचा उपयोग केल्याने जंतुसंसर्गही टाळता येतो. घसा दुखत असल्यास गरम दुधात हळद टाकून आपण घेतले तर नक्कीच उतार पडतो. थोडक्यात, औषध म्हणून हळदीचा उपयोग अनेक स्तरांवर होतो.

नैसगिर्क मूलतत्वे वापरून उत्पादने बनवताना हळद प्रमुख घटक असतो.हळदीने चेहरा तजेलदार होतो व त्वचेला एकप्रकारची कांती येते. कॉस्मेटिक्स वापरण्याऐवजी म्हणूनच हळदीसारख्या वनौषधींवर आधारित उत्पादने वापरणे केव्हाही चांगले. कारण कॉस्मेटिक्समध्ये कृत्रिम रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने शरीराला अपायकारक असतात. शिवाय त्याचे साईड-इफेक्ट्सही असतात.

आयुवेर्दशास्त्रात हळदीसारख्या अशा अनेक गोष्टींचा सुंदरर ऊहापोह केला आहे. पाश्चात्य देशांनाही आता आयुुवेर्दाचे महत्त्व पटू लागले आहे. आयुुवेर्दात सांगितलेल्या उपचारपद्धतीकडे पाहण्याचा त्यांंचा दृष्टीकोन आता बदलला आहे. जगातील अनेक देश आता या उपचारपद्धतीचा स्वीकार करू लागले आहेत. हळदीचं महत्त्व तर त्यांना अगोदरचं जाणवलं होतं. म्हणूनच तर हळदीचे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी मोठ लढाई दिली. परंतु ही लढाई ते हरले आणि हळदीचं पेटंट भारताला मिळालं.


अंजीर :
अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

जांभूळ
जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.

एरंडेल :
शास्त्रीय वर्गीकरण
एरंड (इंग्लिश: Castor; लॅटिन ) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.
एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे. अशा वनस्पतीचा परिचय माहित असणे जरून आहे. एरंडेल तेलास अमृताची उपम दिली आहे. अंगास लावल्यास, पोटात घेण्यास डोके व तळ पायांना शांतता येण्याकरीता हे तेल अवश्य वापरतात. या तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो. यामध्ये तांबडा अशा दोन जाती आहेत. दोन्हीहि जाती श्रेष्ठ आहेत.
गुणधर्म :

तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, वृष्य, जड, स्वादू, सारक आहे. वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ति, मस्तक यातील शूल दमा अनाह, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्त, मेद, वृषण वृद्धी, रक्तदोष, अरुचि, कृमि, अर्श, मुत्रकूच्छ यांचा नाश करणारा आहे.
कमला ( कावीळ ) :
सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटुन तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.
शूल :
पोटात बारीक बारीक व राहून राहून दूखत असेल तर, भुक लागत नाही, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हींग, पादेलोण, व सुंठीची पूड घालून निदान चार सप्तके द्यावा.
रक्तदोष :
अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे.
दमा :
सारखा श्वास लागतो. चावत नाही छाटी भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकऱ्यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची सुद्धता झाली म्हणजे श्वास कमी होतो.
गंडमाळा :
गळ्याभोवती गाठी उठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचित प्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.



काकडी -

    काकडीचे दोन प्रकार असतात. लहान आणि मोठी. दोन्हीचा रस उपयुक्त असतो. काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.
गुणधर्म :
काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.
उपयोग :
काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.
फायदे :
काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेह ह्यांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.
जीवनसत्वे :
‘बी’ ९०%

दुर्वा -
श्री गणेशाला प्रिय असणारी दुर्वा ही वनस्पती ! गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींमध्ये सर्वाधिक आरोग्यदायी असणारी ही वनस्पती आपल्या अंगी अनेक गुणधर्म बाळगून आहे. त्यामुळे ती केवळ गणपतीला अर्पण करून चालणार नाही, तर तिच्यात असलेले औषधी गुणधर्म समजून घेऊन त्यांचा शरीरासाठी उपयोगही करून घ्यायला हवा.

दुर्वा या शरीरातील पित्तदोष कमी करणाऱ्या आहेत. अर्थात, त्या गुणाने थंड असून शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. हातापायांची आग होत असेल, लघवीला जळजळ होत असेल तर दुर्वाचा रस काढून त्याचे सेवन केल्यास चांगला परिणाम दिसतो. उष्णता वाढल्यामुळे नाकातून येणारे रक्त कमी करण्यासाठी असाच दुर्वाचा रस उपयुक्त ठरतो. तो नाकातून टाकण्यासाठी वापरतात. आयुर्वेद शास्त्राने दुर्वाचे असे अनेक गुण वर्णन केले आहेत. अंगावर लाल जाणे या स्त्रियांच्या विकारावर दुर्वाच्या रसाचा तसेच दुर्वाचा रस घालून सिद्ध केलेल्या (उकळलेल्या) दुर्वासिद्ध तुपाचा औषध म्हणून आयुर्वेदात उपयोग केला जातो. अंगावर येणाऱ्या पित्तावरही याचा उपयोग होतो. सतत येणारे तोंड, चेहऱ्यावर उष्णतेमुळे येणारे फोड यांवरही दुर्वाचा उपयोग होतो. हे दुर्वाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ल्याने त्यांचा मानवी आरोग्यासाठी उपयोग करून घ्यायचे या निमित्ताने लक्षात ठेवायला हरकत नाही.

अंजन -
वर्णन
अंजनाचा वृक्ष सर्वसाधारणपणे शुष्क पानझडीच्या वनांत आढळतो. अंजनाचा वृक्ष सरासरी १५ ते २५मीटर उंच वाढतो. खोड खरबरीत तपकिरी रंगाचे असून साल भेगाळलेली दिसते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे खोडाचा रंग गडद होत जातो. पाने संयुक्तपर्णी, दोन पर्णिकांची मिळून बनलेली असतात.
अंजन आणि कांचन एकाच कुळातील असल्यामुळे प्रथमदर्शनी दोघांमधे गफलत होण्याची शक्यता असते. परंतु कांचन आणि अंजनाच्या पानांमधील मुख्य फरक म्हणजे पर्णिकांची रचना. अंजनाचे पान दोन देठविरहीत पर्णिकांचे बनलेले असून दोन्ही पर्णिका एकमेकांपासून पूर्णपणे सुट्या असतात याउलट कांचनाच्या पर्णिका मध्यशिरेला जोड्ल्या जाऊन मध्यावर घडी पडणारे पान तयार होते. अंजनाच्या पर्णिका साधारणपणे ५-६ सेमी विस्ताराच्या असतात. फुले छोटी, नाजूक, पिवळसर रंगाची सहज नजरेत न भरणारी असतात. शेंगा चपट्या, लांबट आकाराच्या, दोन्ही टोकांकडे निमुळत्या, आणि खालच्या टोकाजवळ एक बी धारण करणार्‍या असतात.

1. 2. हंगाम
एप्रिलमधे पानझड होऊन मे ते ऑगस्ट दरम्यान नवी पालवी फुटते. साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर हा अंजनाच्या फुलण्याचा काळ असतो. यानंतर लगेचच फळे तयार होऊन ती पुढील हंगामापर्यंत झाडावर टिकतात.

1. 3. नैसर्गिक अधिवास
अंजनाचा वृक्ष शुष्क प्रदेशांत नैसर्गिकरित्या आढळतो. उथळ, वालुकामिश्रीत, खडकाळ जमीन याच्या वाढीसाठी पोषक असते. अंजनाची लांब मुळे जमिनीत खोलवर शिरून खडकांच्या भेगांमधून लांबवर पसरतात या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने पाण्याशिवायही झाड व्यवस्थितपणे जिवंत राहू शकते.

1. 4. उपयोग
    धागे: अंजनाच्या सालीपासून मिळणार्‍या धाग्यांपासून बळकट दोर तयार करतात.
    चारा: पानांमधे साधारण ९% प्रथिने असतात, त्यामुळे जनावारांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापर केला जातो.
    इमारतीचे लाकूड: भारतात मिळणार्‍या लाकडांच्या प्रकारांपैकी अंजनाचे लाकूड अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. अंजनाचे लाकूड प्रामुख्याने शेतीची उपकरणे, बैलगाड्या, चाकं, बांधकामासाठी वापरले जाते.
    इंधन: जळणासाठी तसेच कोळसा तयार करण्यासाठी अंजनाचे लाकूड उपयोगी आहे.




निसर्गाने विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे जणू भांडारच भरलेले असते. जर यांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्याच नव्हे, तर सौंदर्य वर्धन होण्यास त्यापासून उपयोगच होणार असतो. रोज फळे खाताना आवडणारे त्याच प्रकारचे फळ न खाता ती जरा बदलून खावीत. त्यामुळे प्रत्येकात असलेले भिन्न पोषक तत्व पोटात जाऊन आरोग्य व सौंदर्य या दोहोंचे वर्धन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जर उपवास केला असेल, तर नेहमीच तो फळे खाऊनच सोडावा. यामुळे पचनास मदत होते. तसेच जर अपचन, गॅसेस्‌ इ. मुळे पोटास त्रास होत असेल, तर पोट व पचन पूर्ववत्‌ करण्यासाठी २-३ दिवस फलाहारच करावा.


काकडी
    काकडीचे दोन प्रकार असतात. लहान आणि मोठी. दोन्हीचा रस उपयुक्त असतो. काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.
गुणधर्म :

काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.
उपयोग :

काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.
फायदे :

काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेह ह्यांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.
जीवनसत्वे :
‘बी’ ९०%

आंबा :

आंबा हा फळांचा राजा तो फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावा, असे आयुर्वेदाच्या अभ्यासकांचे सांगणे आहे. हे फळ शक्तिवर्धक आहे. अन्नाबद्दल रूचि उत्पन्न करणे व भूक वाढविणे हे त्याचे प्रमुख गुण होत तसेच शरीराची आग होत असल्यास आंबा उपयुक्त ठरतो. यावरून उन्हाळ्यात आंबा खाणे योग्य आहे. हे दिसून येते. अतिसार म्हणजे वारंवार शौचास होणे. या व्याधीवर आंब्याची साल व कोय उपयुक्त आहे. साल ठेवून तिचा काढा तयार करून घेतात. तसेच कोय भाजून तिचे चूर्ण करून मधातून दिल्यास विशेषतः लहान मुलांचा अतिसर दूर होतो.

अंजीर :

अंजीर ह्या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथात तसेच बायबलमध्ये उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतुत अंजीराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.

अपचन ऍसिडीटी, गॅसेसचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळ-संध्याकाळ १ ते २ अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल. अंजीर खाल्यानी बौद्धिक व शारिरीक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन-चार अंजीर नियमितपणे खावीत यामुळे मुत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचे रस अथवा खाल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारात आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते.

अननस :

अननस खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे पोटात केस गेल्यावर अंजीर खाल्यामुळे त्याचे पाणी होते, असे म्हणतात. अंजीर शक्तीवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन थोडे पाणि प्यावे. थोड्याच दिवसात तक्रार दूर होते.

आवळा :
आवळा हे फळ हे फळ बहुगुणी आहे. हे मुख्यतः पित्तशामक आहे. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीच्या विकारांवर हे परिणामकारक औषध आहे. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. आवळा उपलब्ध नसल्यास त्या पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूज उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. रोज नियमाने मोरावळ्यातले दोन आवळे खाण्यामुळे, ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे.

ऊस :

ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो उपयुक्त ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे औषध नाही. काविळीचे रोग्याने रोज दोन वेळा जेवणापूर्वी ऊस खावा. चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात घेतल्यास उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे कलिंगड हे एक थंड फळ आहे. त्याबद्दल एकच काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडीवर मिळणाऱ्या उघड्या फोडी खाल्यामुळे एखाद्या वेळी अपाय होण्याचा संभव असतो. कारण त्याच्यावर माशा बसून व रस्त्यातील धूळ उडून त्या दूषित झाल्या असण्याचा संभव असतो.

द्राक्षे :

द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेला मनुकाही एक चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. घसा जळजळणे, घशाशी येणे, पोटदुखी, आंबट ढेकरा, उलटी या अपचन व आम्ल पित्ताच्या लक्षणावर द्राक्षे खावी. मूठभर द्राक्षे व मूठभर बडीशेप ठेचून कपभर पाण्यात रात्री भिजत घालून ठेवावी व सकाली कुसकरून थोडी खडीसाखर घालून सेवन केल्याने वरील सर्व तक्रारी दूर होतात. मोठ्या तापानंतर आलेल्या अशक्ततेवर मनुका मनुका उपयुक्त आहेत. रोज सकाळी १०-१५ मनुका बिया काढुन खाव्या आणि त्यावर १-१.५ कप दूध घ्यावे. त्यामुळे भूक वाढते. अन्न पचन होते व शक्ति येते. घसा बसणे, कावीळ व अन्नाबद्दल रूचिहीन वाटणे या विविध विकारांमध्ये मनुका खाण्याने फायदा होतो. मनुका तुपावर परतून व त्यात चवीपुरते सैंधव घालून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते. मनुका, जेष्ठमध व गुळवेल समप्रमाणात एकत्र करून तयार केलेला काढा पित्तावर उपयुक्त ठरतो. क्षय इत्यादी छातीच्या विकारांत खोकल्याबरोबर रक्त पडते, त्या वेळी हा काढा घ्यावा क्षयरोगांमध्ये येणारी अशक्तता मनुक खाण्यामुळे कमी होते.

पपई े :
Papaya

पपई हे फार मोठे औषध आहे. रोज नियमाने खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न पचते. पपईचा चीक गजकर्ण, खरूज, नायटा या त्वचारोगावर लावल्यास उपयुक्त ठरतो. जंतावर हे एक चांगले औषध आहे. हा चीक व मध दोन दोन चमचे एकत्र घोटावा. त्यात दुपट्ट गरम पाणी घालून थंड झाल्यावर लहान मुलांना अर्धा चमचाभर ओळीने तीन दिवस द्यावा. जंत पडून जाताट. गर्भवती स्त्रियांनी पपई खाऊ नये. त्यांना ती अपायकारक असते.

लिंबु :

लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

जांभूळ :
Jamun

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. परंतु ते तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

जांभूळ हे अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करावा. व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घ्यावा. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाच रस काढून बरणीत भरून ठेवता व एक वर्ष जाऊ द्यावे. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव तर वेळेव अर्धा तोळा चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.


डाळींब :
Dalimb Anar

डाळिंबात अनेक औषधी गुण आहेत. डाळिंबाचा रस व खडीसाखर एकत्र करून घेतल्यास पित्त कमी होते. अपचन दूर होते. आणि त्यामुळे निर्माण झालेला शौचाचा विकार (संगहणी) बरा होतो. काविळीवरही हे एक चांगले औषध आहे. हृदयविकारामुळे छातीत दुखत असल्यास डाळींबाचा रस उपयोगी पडतो. डाळींबाचा रस, मध, साखर यांचे चाटण लहान मुलांचा खोकला बरे करते. फार बोलण्याने आवाज बसला असल्यास तो सुधारतो.

केळे :
Banana

केळे हे शक्तिवर्धक आहे. पण पचण्यास जड असते. हे लक्षात ठेवावे. तसेच ते थंड असल्यामुळे अंगाची आग कमी करते. वारंवार पित्त होण्याची तक्रार असल्यास केळे खाण्याने उपयोग होतो. तरूण वयात उद्भवणाऱ्या स्वप्नावस्थेच्या विकारावररोज जेवणानंतर १ ते २ केळी खाल्याने १५-२० दिवसांत उपाय होतो.

स्ट्रॉबेरी :
Strawberry

चवीस आंबट, किंचित गोड, जिभेची चुणचुण करणारी स्ट्रॉबेरी आंबट चवीमुळे पित्त वाढविणारी व रक्ताची निर्मिती करणारी आहे. त्यामुळे अजीर्ण, मळमळ, त्यामुळे अन्नपचन न होणे अशा वेळी स्ट्रॉ चावून खावी. वर पाणी पिऊ नये. रक्तवाढीसाठी अर्थात पंडुरोग किंवा ऍनिमियामध्ये लोहाच्या कल्पांबरोबर स्ट्रॉबेरीचा वापर केल्यास लोहाच्या औषधांचे दुष्परिणाम टाळता येतात.

छातीत धडधड, भीती वाटणे, आत्मविश्वासाचा अभाव, थोड्या श्रमाने थकवा येणे असा वेळी स्ट्रॉबेरी रस व खडीसाखर हे मिश्रण थोडे थोडे सायंकाळी घ्यावे. एकदम पिऊ नये. उपयोग उत्तम होतो.

स्ट्रॉबेरीचे आईसक्रीम, मिल्कशेक हे प्रकार खाऊ नयेत. त्याने आम्लपित्त, त्वचा विकार, मूळव्याध होऊ शकते. सर्दी खोकला असतांना वापरू नये. पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरी वापरू नये.

बोरे :
Bor Ber

आंबट-गोड बोरात व्हिटॅमिन ए, सी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी जीवनाश्यक सत्वे आढळतात. यांच्या नियमित सेवनाने मुत्रपिंडातील खडा, अतिसार, हगवण, वातविकार यावरती अतिशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे घ्या आणि ग्लासभर पाण्यामध्ये उकळत टाका. निम्या प्रमाणात पानी आटले की ते पाणी थंड करा. हा बोरांचा काढा अशाप्रकारे तयार करावा. त्यात चवीसाठी साखर किंवा मध टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन स्मरणशक्ती वाढते. हे सर्वात स्वस्तच प्रभावी ‘ब्रेनटॉनिक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून त्याचे भस्म व लगदा यांच्या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस टाकून मलग तयार करा. हे मलम चेहऱ्यावरच्या मुरमांवर लावल्यास मुरमे नाहीशी होतात.

12 comments:

  1. औषधी वनस्पती लागवड व विक्री माहिती मिळेल का

    ReplyDelete
  2. ni3 sawant sir aap agri / farmer

    ReplyDelete
  3. ni3 sawant sir aap agri / farmer

    ReplyDelete
  4. औषधी वनस्पती लागवड बी रोपे व विक्री विषयी मार्गदर्शन हवे

    ReplyDelete
  5. मला आवळा लागवड आणि मार्केट, कंपनी करार बद्दल माहीती हवी आहे

    ReplyDelete
  6. मला शतावरी व सफेदमुसली करार शेती माहीती व सहकार्य करा

    ReplyDelete
  7. ऊस लागवडविषयक (लागण) माहिती द्या ?

    ReplyDelete
  8. औषधी वनस्पती उद्दिष्टे

    ReplyDelete
  9. लिंबू मिळेल खूप लागत असेल तर कॉल करा 9405405066

    ReplyDelete
  10. वेताचे झाड मिळेल का?

    ReplyDelete