Wikipedia

Search results

Tuesday 28 May 2013

निजामशाही


अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
 स्थापना

इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्या बहमनी सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.

२८ मे, इ.स. १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामांतर केले.

पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. चांद बिबी ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अंबर हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.
घराणे
या सल्तनतीच्या अधिकारारूढ सुलतानांना निजामशाह या किताबाने उल्लेखले जाई.
नाव     कार्यकाळ (इ.स.)
अहमद निजामशाह     १४९० - १५०८
बुऱ्हाण निजामशाह     १५०८ - १५५३
हुसेन निजामशाह     १५५३ - १५६५
मूर्तझा निजामशाह     १५६५ - १५८८
मिरान हुसेन     १५८८ - १५८८
इस्माइल निजामशाह     १५८८ - १५९०
दुसरा बुऱ्हाण निजामशाह     १५९० - १५९५
इब्राहिम निजामशाह     १५९५ - १५९६
दुसरा अहमद निजामशाह     १५९६ - १५९६
बहादुर निजामशाह     १५९६ - १६०५
दुसरा मूर्तझा निजामशाह     १६०५ - १६३१

मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे औरंगाबाद) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.

सुरुवातीचा काळ

मलिक अंबर हा जन्माने हबशी होता.[१] त्याच्या आई-वडीलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वत:चे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
 महसूल व्यवस्था

दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. अनेक वर्षांच्या प्रशासनाच्या अनुभवातून प्रत्येक जमिनीच्या तुकड्याचे सरासरी उत्पन्न त्याने निश्चीत केले आणि ह्या उत्पन्नाच्या दोन पंचमांश उत्त्पन्न महसूल म्हणून गोळा करण्यास त्याने सुरुवात केली. इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरुपात न गोळा करता पैशाच्या रुपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रक्कमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली.

त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
मृत्यू
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला

No comments:

Post a Comment