Wikipedia

Search results

Friday 10 January 2014

मुलांचा अभ्यास कसा घ्याल ?


मुलांचा सर्वांगीण विकास हा राष्ट्रीय दृष्टीनं साधयला हवा; यातूनच स्वावलंबनम सहकार्य, श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील. मूल हे शिक्षणचे केन्द्र आहे, व अभ्यासक्रम हे संस्कृतीसंवर्धनाचे साधन आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन बालविकास साधण्यासाठी शिक्षण संस्था आहेत. पालक प्रयत्नशील आहेत. समाजयंत्रणा योजना आखीत आहेत. पण या सर्व गोष्टी मुलाभोवती त्याच्या भावी जीवनाची पूर्वतयारी करण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत. याची जाणीव शिक्षकांना, पालकांना असेल तरच बाळांची उत्तम जडणघडण होऊ शकेल.

शाळेत येण्यापूर्वी मूल कोऱ्या पाटीप्रमाणे येत  नाही. वऱ्याचशा गोष्टी त्याने मिळवलेल्या सतात. जन्मल्यापासून मूल शिकतच असते. त्याला मदत करणे एवढेच पालकांचे, शिक्षकांचे काम आहे. पालकाला मोकळेपणी शिकू देणे, त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचण दूर करणे एवढेच काम आपले. मूल हे घरात राजा असते; त्याला सत्ता साऱ्या घरात चालते. त्याचे सिंहासन म्हणजे आईची कटी असते. राजा घरात हुकूम सोडतो. सर्वांना ते पाळावे लागतात. पण एकदा का मूल शाळेत गेले म्हणजे शाळेत त्याला शिक्षकाचे ऐकावे लागते. दुसऱ्याचे हुकूम पाळणे मुलाला भाग पडते, मूल गांगरून जाते. म्हणून आरंभी घर व शाळा हा दुवा जितक्या उत्कृष्ट तऱ्हेने सांधला जाईल तितका शिक्षणाचा पाया नकळत दृढ होत जाईल. म्हणूनच ही खबरदारी घेणारा शिक्षक मुलाचा खरा विकास साधू शकेल

मानसशास्त्रीय प्रगतशिक्षणपद्धती
बालमनाचे अवगाहन करून निरोगी वातावरणात पालकांचा सर्वांगीण विकास साधणे ही मानसशास्त्रीय दृष्टी समाजाला फार उशिरा आली. मानसशास्त्रदृष्ट्या जुन्याकाळी शिक्षणाकडे पाहिले जात नसे. मूल हे मोठ्या माण्सापेक्षा वेगळे आहे ही कल्पना काही वर्षापूर्वी नव्हती. प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ रुसो या फ्रेंच विद्वानाने ही कल्पना सर्व जगापुढे मांडली. त्याने मुलांचा अभ्यास तयार होतो. ही नैसर्गिक पद्धत प्रथम लोकांपुढे मांडली. स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध विद्वान पेस्टालॉजी व त्याचा शिष्य फ्रोबेल यांनी या द्रुष्टीने विचार करून ‘किंडन गार्डन’ पद्धत सुरू केली. मुलाचा विकास निव्वळ माहिती देण्याने होत नाही. तर त्याला अनुभव यायला पाहिजे ही गोष्ट या शिक्षणशास्त्रज्ञाने जगालापटवून दिली शिक्षण पद्धतीत शिक्षकाचे महत्त्व कमी झाले व मुलांचे महत्त्व वाढत गेले. हा पहिला मोठा फरक पडला. मुलांच्या स्वाभाविक प्रवृत्तीचा विकास होणे हे या शिक्षण विषयक कल्पनेचे परिणत स्वरूप होय.

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले शिक्षणाविषयक विचार चिंतनीय आहेत. शिक्षण म्हणजे ज्ञा देणे अगर माहितीचा प्रसार करणे नव्हे तर मानवाच्या अंतःकरणात खोलवर दडलेल्या एका आत्मीक शक्तीवर पोचण्याचे सामर्थ्यमानवाला प्राप्त होण्याप्रत त्याला आंतरमनाचा विचार करण्यास प्रवृत्त करणे, त्यामधून जो मनुष्य तयार होतो तो पूर्णत्वाला पोचलेला असतो, देवत्व प्राप्त झालेले असणे. प्लेटो या थोर महात्म्याने सांगितले आहे की शरीराचा विकास व्हावयास पाहिजे तर शरीराच्या निरनिराळ्य़ा अवयवास काम मिळाले पाहिजे.ही शिक्षणाची दृष्टी महात्मा गांधीच्या शिक्षणपद्ध्तीत उघड दिसून येते. निसर्ग, समाज व उद्योग ही ज्ञानाची भांडारे आहेत. त्यांच्या मधील ज्ञन केवळ, पुस्तकांच्या साहाय्याने न देता ते पक्के होते. ही गोष्ट विचारवंताना पटलेले आहे. त्यातही मुलाला मोठं महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.

प्रगत शिक्षणाचा विचार करता असे दिसून येईल की, नाट्य, काव्य, नृत्य, निसर्गदर्शन, खेळ, छंद इत्यादींनी मुलाभोवती मन मोकळे वातावरण निर्माण होते; व मुलांचा सर्वांगीण विकास होतो. वरील गोष्टी तात्त्विक दृष्टीने मांडलेल्या दिसतील पण सद्यःपरिस्थितीत अभ्यासक्रम, पुस्तके, शालेय शिस्त परीक्षा परीक्षेतील गुण यावर  भावी जीवनाकडे दृष्टी ठेवून पालक शिक्षक मुलांचा अभ्यास पुरा करून घेणे त्यांच्या व्यवहारी जीवनाकडे दृष्टी ठेवणे, अशा अनेक समस्या समाजापुढे आहेत; त्याकरिता सरकारी यत्रणेने शाळा शिक्षक शिक्षणपद्धती, परीक्षा पद्धती वगैरे बाबतीत केलेले नियम आणि वर निर्देशित केलेली पालकांच्या विकासाची द्रुष्टी यांचा मेळ घालताना मुलांचा विचार, मुलांचे समाधान मुलांची प्रगती मुलांची जिद्द, समाजात माणूस म्हणून त्याचा जगण्याचा हक्क दुसऱ्याच्या हितात आनंद मानण्याची व्रुत्ती त्याच्या अंगी बाणणे म्हणजेच खरा माणूस होणे या द्रुष्टीने आज शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शन पाहिजे. शिक्षक शाळेत तासन्तास शिकवतो. पालकांचा मुलागागे अभ्यासाचा तगादा या गोष्टींनी नकळत मुलांच्या नैसर्गिक प्रवृत्तीकडे दुर्लक्ष होण्याचा केव्हा केव्हा धोका निर्माण होतो.

जन्मापासूनचे अनुभव हेही एक शिक्षणच
शालेय अभ्यासक्रम तयार करणारी माणसे सूज्ञ असतात. अभ्यासक्रमाला पोषक अशी पुस्तके बनाणाऱ्या मंडळातील सभासदांचा लहान मुलांशी किती संबंध येतो याचाही विचार करायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षकाने फार मोठ्या जबाबदारीने काम केले पाहिजे. पालकांनी अभ्यास करून घेणे याबरोब्रच मुलांचे समाधान कायम ठेवणे, त्यांच्या आनंदात कमतरता होऊ न देणे, कोणत्याही थरातील मूल असले तरी त्याला कमी न लेखणे मूल बालरूपी परमेश्वर आहे या गोष्टीवर श्रद्धा असणे या गोष्टी तलमळीने साधल्या तर मुलांकडून पालकांच्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या साध्य झाल्याशिवाय राहणार नाहीत.

प्रस्तुत लेखकाने गेली ६० वर्षे अव्याहत सर्व थरातील मुलांशी आपला बराच संपर्क साधला, व कोठलेही मूल मागे पडत नाही याचा अनुभव घेतला. हलक्या वाटणाऱ्या थरातील मूल श्रेष्ठत्वाला गेलेले पाहण्याचे भाग्य मिळवले. आणि म्हणून शिकवणे, अभ्यास करून घेणे ही गोष्ट ग्रहण नाही. मुलालाशिकू देणे, दक्षतेने त्याच्या शैक्षणिक जीवनातील अडचणी दूर करणे, क्षणोक्षणी त्याची वृत्ती समाधानी ठेवणे, त्याच्या आनंदी वृत्तीत स्वतः समाधान मानणे एवढ्या गोष्टी साधल्या म्हणजे अभ्यासक्रम कोणताही असो, पुस्तके कोणतीही असोत, शैक्षणिक बंधने असोत. तरी पोटच्या मुलाकडे ज्या दृष्टीने आई पाहते ती दृष्टीच शिक्षणाचे साध्य साधते.

मूल जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून स्वतः शिकतच असते. निरीक्षण, अनुभव, कल्पना, विचार व निर्णय ही पंचपदी मुलाला शिक्षण तेत असते. जन्मल्यापासून मूल भाषा शिकते, गणित शिकते सामान्यज्ञानही शिकते. आजच्या कोणताही विषय शिकत असते. ही गोष्ट जिव्हाळ्याच्या शिक्षकाला सतत दिसून येते. मुलाच्या मानसिक शक्ति वाढण्यास त्याच्या स्वाभिमानास धक्का लागता कामा नये हे व्रत संबंधितांनी पाळले पाहिजे. स्वाभिमानात शीला उगम आहे. पालक सच्छील बनण्यास मदत करणे त्याचा स्वाभिमान राखला तरच शक्य आहे. त्याप्रमाणेच पालकाला काही छंद असतात. छांदात विकासाचे केन्द्र साठविलेले असते. बालकांचे छंद जोपासले पाहिजेत व त्यातून त्याची प्रगत्ती नकळत साधली पाहिजे. यासाठी संबंधितांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे.मुलांना आपण शाळेत पाटवतो, मुले पुस्तकातून शिकतात. तयार करून परीक्षा पास होतात. ही परंपरा चाललीच आहे.

पण यातून साधावयाचे काय ?
मुलांचा विकास कोणत्या गोष्टीत झाला पाहिजे ते सदैव दृष्टीसमोर ठेवणे पाहिजे. मुलांचा शारीरिक बौद्धिक मानसिक, नैतिक, सामाजिक, सांस्कृविकास राष्ट्रीय दृष्टीने साधला गेला पाहिजे. हे सदैव मुलांभोवती असणारांनी आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि त्यातूनच स्वावलंबन सहकार्य श्रम, सेवा आणि त्याग ही महान जीवनमूल्ये मुलांच्या अंगी बाणतील अशी खबरदारी घेतली पाहिजे. नकळत ती त्यांच्या अंगी उतरली पाहिजेत. मुलांना सदोदित त्यांच्या आवडीच्या विषयाट ठेवणे स्वच्छता राखणे वगैरे बाबतीत मुले आई-वडलांस मदत करण्यास उत्सुक असतात. त्यांचा तो उत्साह कमी होऊ नये. मूल जास्तीत जास्त आईवडिलांच्या सहवासात असले पाहिजे. पालकांनी मुलांना आपले भांडवल करू नये. म्हणजे पालकांच्या मताप्रमाणे  मुलाने डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे व्हावे अशी पालकांनी त्यांच्या वर शक्ती करू नये. मुलांना आवडेल तो पेशा पत्करण्याची त्यांना मुभा द्यावी. असे झाले तरच मुलांचा खरा विकास साधून तो राष्ट्राचा उपयुक्त घटक बसू शकेल. शाळेत मूल आल्यापासून शिक्षकांनीही पुधील गोष्टी नजरेसमोर ठेवल्या पाहिजेत. आजच्या लेखात लहान मुलांचा प्रश्न आहे म्हणून ओझरते लिहिण्याचे धाडस करतो.

खर पाहिले तर शाळा ही शिशूवर्गापासून एस.एस.सी. पर्यंत एकसंच असली पाहिजे. तरच बालकाच्या शिक्षणाची साखळी पूर्ण होऊ शकेल.पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक असे वेगळे खंड असू नये. एकसंच शाळा बालकांची जलदगतीने प्रगती साधू शकतात मुलांत शक्ती निर्माण करतात. निर्भयवृत्तीने मूल सामर्थ्यवान बनते. शिशूवर्ग व पहिली या दोन वर्गात मुलांना शाळेचे आकर्षण वाटेल असे वातावरण तयार झाले पाहिजे. दुसरी, तिसरी या दोन वर्गात म्हणजे मुले ७/८ वर्षांची होई पर्यंत आकर्षणाबरोबरच अभ्यासाची गोडी निर्माण पाहिजे. चौथी ते सातवी या वर्गात शिक्षणाची बैठक घातली गेली पाहिजे. त्याच्या पुढील वर्गात मूठ स्वाध्यायाने शिकण्यास सामर्थ्यवान बनले पाहिजे. त्यानंतर मुलाच्या मनाप्रमाणे त्याला शिकू देणे, मूल चारित्र्यवान बनेल. आपले जीवन समृद्ध करील, या बाबतील लक्ष ठेवणे, संयमाचा त्याला आकार देणे त्याचा द्रुष्टीकोण विशाल बनवणे हे साधले म्हणजे शाळेत व घरात शिक्षकांनी व पालकांनी अभ्यास कसा करून घ्याला याचा उलगडा आपोआप होईल.मूल हे घराचा बहुमोल अलंकार  आहे. व राष्ट्राचा खराखुरा आधारस्तंभ आहे या दोन गोष्टी सदैव नजरेसमोर असल्या म्हणजे सर्व काही साधेल, या गोष्टींवर श्रद्धा असावी.

(अभ्यास आणि व्यायाम या दोन्हीही गोष्टी मुलांकडून करून घेणं आवश्यक आहे. ) (खरी ईश्वरसेवा  :- आपल्या मुलांचं पालनपोषण करणं हीच स्त्रीची ईश्वरसेवा होय. आपल्या मुलांच्याद्वारेच ती ईश्वराची सेवा करीत असते. मुलांना जन्म देणं, त्यांचं पालनपोषन करणं याबरोबरच त्यांना सत्य, मानवतेची शिकवणूक देणं हेच तिचं परमकर्तव्य होय. – काउंट लिओ टॉल्सटाय )

क्रिएटिव्ह जाहिराती, मराठी तरुणांनो राहू नका पाठी!

‘अमुल बटर’च्या एकसे एक जाहिराती बनवणारे, ‘हिंग्लिश’ भाषा लोकप्रिय करणारे, मराठी नाटक, कलाकारांना ग्लोबल लेव्हलला नेणारे आणि भारतानंतर आता टांझानियामध्ये जाहिरात क्षेत्र पादाक्रांत करणारे सुप्रसिद्ध अॅड-गुरू भरत दाभोळकर देत आहेत मराठी तरुणांना जाहिरात क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्याचा कानमंत्र!

जाहिरातीच्या जगाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जाहिरात कलेचं आता रितसर प्रशिक्षण भारतात सुरू झाल्यामुळे अनेक ट्रेन्ड अॅडव्हर्टायझर अॅड-वर्ल्डमध्ये दाखल झाले आहेत. मराठी मुलांची संख्याही या क्षेत्रात वाढत आहे. मराठी तरुण जाहिरातीच्या जगात आपला ठसा उमटवत आहेत. मराठी माणूस मुळातच प्रचंड क्रिएटिव्ह आहे. टॅलेंटच्या बाबतीत मराठी माणूस इतररांपेक्षा सरस आहे. पण, तरीही जाहिरात क्षेत्रात मराठी माणसाचं ‘डॉमिनेशन’ का नाही?

आज जाहिरात क्षेत्रात एक प्रमुख आव्हान असतं ते तुमचा टार्गेट ग्रुप ओळखण्याचं. आपण जाहिरात कुणासाठी बनवतोय, हे आपल्याला समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा होतं असं, की जाहिरातदार आणि त्यांचे क्लायंट्स हे एवढे श्रीमंत, हाय-फाय असतात, की आपल्या व्यतिरिक्त भारतात मध्यमवर्गीय, सामान्य लोक राहातात, हेच त्यांच्या लक्षात येत नसतं. मर्सिटिजमधून फिरत असताना किंवा एखाद्या मोठ्या क्लबमध्ये बसून जाहिराती डिझाइन केल्या जातात आणि त्यात देशभरातल्या जनतेला डोळ्यांसमोर ठेवल्याचा आव आणला जातो. पण, तुम्हाला जाहिरात करायची असेल, एखाद्या अशा उत्पादनाची जिचा ग्राहक सातारा-सांगली ते यूपी, बिहारमधल्या गावांमध्ये आहे. तर, तुम्ही त्याच्या भावना जाणून घेणार कशा? बस, ट्रेनने प्रवास करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती मर्सिडीजमध्ये बसून नाही डिझाइन करता येत, हे समजलं पाहिजे.

जाहिरात क्षेत्र म्हणजे ग्लॅमर, पार्ट्या, गलेलठ्ठ पगार असं वाटतं. पण, त्यासाठी मेहनतही तेवढीच घ्यावी लागते. यात वाईट किंवा चुकीचं काहीच नाही. मराठी तरूण टॅलेंटेड असूनही तो मागे का राहतो? इथे भाग असतो तो आत्मविश्वासाचा. जाहिरात क्षेत्रातलं हाय-फाय इंग्लिश पाहून बऱ्याच जणांना भीती वाटते. पण, त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो. मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिलं इंग्लिश वाक्य बोललो होतो. मला इंग्लिश बोलताना जेव्हा अडायला व्हायचं, तेव्हा मी सरळ त्यात मराठी किंवा हिंदी शब्द घुसडायचो. पण, पुढे हिच भाषा लोकांना पसंत पडली. तिला ‘हिंग्लिश’ म्हटलं जाऊ लागलं. क्रिएटिव्हिटीला भाषेचं बंधन नसतं. भारतीय लोकांसाठी आपण अॅड बनवत असतो. भारतीय लोकांची भाषा इंग्रजी नाही. एक अॅड इंग्लिशमध्ये लिहून ती नंतर चौदा भारतीय भाषांमध्ये भाषांतरासाठी दिली जाते. पण, याउलट ती एखाद्या भारतीय भाषेत लिहूनही नंतर इंग्रजीत ट्रांसलेट करता येऊ शकते ना! आज भारतीय जाहिरात क्षेत्रात जे दिग्गज मानले जातात, ते कमलेश पांडे, पियुष पांडे, प्रसून जोशी ही मंडळी हिंदीमध्ये शिकली होती. त्यांनाही इंग्रजीचं ज्ञान सुरूवातीपासून नव्हतं. पण तरीही हे हिंदी भाषक जाहिरातींवर देशी छाप पाडून मोठे झालेच ना! मग मराठी माणूस का आपल्या भाषेमुळे मागे राहतोय? जाहिरात क्षेत्रात येण्यासाठी इंग्लिश येणं आवश्यक नाही. मात्र, जर तुम्हाला इंग्लिश येत असेल, तर तुम्हाला वेगळा आत्मविश्वास मिळतो. अमराठी क्लायंट इंग्रजीत जेव्हा ब्रीफ देतो, तेव्हा ते तुम्हाला व्यवस्थित समजू शकतं. यासाठी तरी इंग्लिश शिकावंच.

आज जाहिरात क्षेत्रांमध्ये आर्ट डिरेक्टर, व्हिज्युअलायझर यांसारख्या मोठ्या पोस्टवर मराठी लोकांचं अधिराज्य आहे. कमर्शियल आर्टिस्ट्स हे बहुतेकवेळा मराठीच असतात. जे जे स्कूल ऑफ आर्ट, रचना सांसद सारख्या कॉलेजांमधून अनेक टॅलेंटेड, क्रिएटिव्ह मराठी तरुण/ तरुणी जाहिरात क्षेत्रात येतात आणि आपलं स्थान निर्माण करतात. पण... मॅनेजरिअल पोस्टसाठी हे लोक प्रयत्न करत नाहीत. मराठी माणसाचा मुळातच प्रॉब्लेम असा असतो, की सेटल झाले की ते समाधानी होतात. आपल्या कम्फर्ट झोन पलिकडे जाऊन चौकटीबाहेर जाऊन प्रयत्न करायला ते घाबरतात. मॅनेजरिअल पोस्टसाठी मराठी माणसं प्रयत्नच करत नाहीत! तिथे सगळे अमराठी लोक पाहायला मिळतात. त्यामुळे जाहिरात क्षेत्रामध्येही मराठी माणसांच्या डोक्यावर अमराठी लोक बसलेले दिसतात. हे चित्र बदलणं मराठी मुलांच्याच हातात आहे.

नुसत्या मुंबईत तीन हजारांच्या आसपास अॅड एजन्सीज आहेत. मराठी प्रतिभेला इथे चांगला वाव आहे. आज विविध ठिकाणी मराठी माणसाने आपला ठसा उमटवला आहे. जाहिरात क्षेत्रातही तितक्याच दिमाखात मराठी पाऊल पुढे पडायला हवं. सो, ऑल द बेस्ट!

No comments:

Post a Comment