Wikipedia

Search results

Monday, 19 May 2014

संस्‍कृत भाषा


संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, गीर्वाणवाणी, देवभाषा, अमरभारती इत्यादी नावे आहेत.
संस्कृत भाषेची निर्मिती

पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
 
प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा

‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.

संस्कृत भाषेत एका प्राण्याला, एका वस्तूला आणि एका देवाला अनेक नावे असतात.

संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक नावे देण्याची प्रथा होती, उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी नावे आहेत. सूर्याची १२ नावे, विष्णु सहस्रनाम, गणेश सहस्रनाम काही जणांना पाठही असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.
वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे

वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति ।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः ।’ ‘खादति रामः आम्रं ।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Rama eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Rama.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’)
 
एकात्म भारताची खूण

प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशीला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती

‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता ? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ?

इंडो-यूरोपियन भाषाकुलांतील एक प्राचीन भाषा. या इंडो-यूरोपियन भाषेच्या मूलस्थानाविषयी संशोधकांत अजून एकवाक्यता नाही. ते स्थान भारतात असावे, अशी प्रथम एक कल्पना होती; नंतर ते मध्य आशियात असल्याचे मानण्यात येऊ लागले आणि ते मूलस्थान यूरोपातच कुठेतरी बहुधा मध्य यूरोपात असावे, असे अलीकडे मानण्यात येते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते ती पूर्व यूरोपातील लहानशा प्रदेशात उगम पावली, ही गोष्ट त्यांच्या महत्त्वाच्या शब्दावलीवरुन सूचित होते. विशेषतः ह्यावरुन भौगोलिक वैशिष्ट्य सूचित होते. पण ते स्थान कुठेही असले, तरी तिथून इसवी सनापूर्वी सु. अडीच-तीन हजार वर्षे निघून, वाटेत इराणमध्ये काही काळ स्थिरावून, पुढे इसवी सनापूर्वी सु. १५०० च्या सुमारास ही भाषा बोलणारे लोक बाहेरुन भारतात आले असावेत, असे अनुमान करण्यास हरकत नाही. ही भाषा बोलणारे लोक एकाच वेळी भारतात न येता टोळ्याटोळ्यांनी निरनिराळ्या काळी आले असण्याचीही शक्यता आहे. भारतात येण्यापूर्वी संस्कृत भाषा बोलणाऱ्यांचे पूर्वज आणि प्राचीन इराणी भाषा (अवेस्ता) बोलणाऱ्यांचे पूर्वज काही काळ एकत्र राहिले असावेत, असे संस्कृत व प्राचीन इराणी (अवेस्ता) वाङ्‌मयातील भाषिक व काही प्रमाणात वैचारिक साम्यावरुन स्पष्ट होते.

संस्कृत भाषेचा अतिप्राचीन नमुना ऋग्वेदा तील मंत्रांत आढळतो. हे मंत्र इ. स. पू. सु. १५००-१२०० ह्या काळात रचले गेले असावेत, असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते. ह्या भाषेचा त्यानंतरचा सु. साडेतीन हजार वर्षांचा इतिहास निरनिराळ्या कालखंडांतील उपलब्ध वाङ्‌मयामुळे ज्ञात आहे. उदा., हल्ली मराठी भाषेत उपयोगात येत असलेला ‘ दूध ’ हा शब्द क्रमाने दुग्ध (संस्कृत) व दुद्घ (प्राकृत) ह्या अवस्थांतून उत्कांत झाला आहे, हे वाङ्‌मयीन पुराव्यावरुन कळते. परंतु संस्कृतपूर्व त्या शब्दाचे रुप काय असावे, हे जाणण्यास वाङ्‌मयीन पुरावा उपलब्ध नाही. तौलनिक आणि ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या आधारे ते रुप धुघ्त किंवा धुद्घ असे असावे, असे अनुमान करावे लागते.

आपण ज्या भाषेला संस्कृत म्हणून ओळखतो, तिच्यातील सर्व प्राचीन वाङ्‌मय ऋग्वेदा तील मंत्रांत आढळते. त्या भाषेची ऐतिहासिक दृष्ट्या स्थूलमानाने तीन रुपे आढळतात. पहिले रुप वेदांच्या संहिता भागांत दिसणारे; दुसरे उत्तर वैदिक म्हणजे बाह्मणे, आरण्यके व उपनिषद हे ग्रंथ व वेदांग वाङ्‌मय यांत आढळणारे व जिचे पाणिनीने वर्णन केले आहे ती ‘ भाषा ’; आणि तिसरे पाणिनीनंतरच्या ग्रंथांतून विशेषत: कालिदासादी कवींच्या काव्यांत आढळणारे. ‘ संस्कृत ’ शब्दाचा प्रयोग ती भाषा प्राकृतापासून- म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या नेहमीच्या बोलीभाषेहून - भिन्न असल्याचे दर्शविण्याचा असावा. ‘ संस्कार ’ हा शब्द यास्क त्याच्या निरुक्त ग्रंथांत वापरतो (तद्यत्र स्वरसंस्कारौ समार्थौ ....). तिथे त्याचा अर्थ वैयाकरणांना संमत अशी भाषेतले शब्द सिद्घ करण्याची प्रक्रिया असा आहे. त्यावरुन ‘ संस्कृत ’ म्हणजे ‘ व्याकरणशुद्घ ’, ‘ घडविलेली ’, अतएव सुशिक्षितांच्या बोलण्यात येणारी शिष्टसंमत भाषा, असा अर्थ होऊ शकेल. त्या दृष्टीने जिला संस्कृत म्हणता येईल, त्या भाषेच्या तीन ऐतिहासिक अवस्था वर सांगितल्या पण व्यवहारात मात्र वैदिक संस्कृत व अभिजात संस्कृत अशा दोनच अवस्था कल्पिण्यात येतात. ह्याखेरीजही संस्कृत भाषेची दुसरी दोन रुपे उपलब्ध आहेत. पैकी एक रुप रामायण - महाभारत ह्या सूतवाङ्‌मयात आढळते, तर दुसरे रुप महावस्तुसारख्या बौद्घसंस्कृत ग्रंथांतून आढळते. पहिल्या रुपाला सूतसंस्कृत असे म्हणता येईल. ह्यात अपाणिनीय रुपे बरीच दिसतात. (जसे - सेवति, अदसि, श्रृत्य, चिंत्य, प्रस्थापयित्वा इ.). दुसऱ्या रुपाला बौद्घ संस्कृत किंवा मिश्र संस्कृत हे नाव देता येईल. ह्यात दिन्न (सं. दत्त), आणत्त (सं. आज्ञप्त) अशा प्राकृत शब्दांखेरीज ऋषिस्य, भिक्षुस्य, पिबित्वा अशी मिश्र रुपेही आढळतात.

वैदिक संस्कृतची जी दोन स्थित्यंतरे झाल्याचे वर सांगितले, ती होताना त्यांचा परिणाम संस्कृतच्या वर्णव्यवस्थेवर फारच तुरळक स्वरुपाचा झाला. उदा., ऋग्वेदा त स्वरांतरी ड व ढ ह्यांऐवजी येणाऱ्या ळ व ळ्‌ह ह्या वर्णांना पाणिनीच्या सूत्रांत स्थान नाही. तसेच वैदिक संस्कृतच्या मानाने अभिजात (क्लासिकल) संस्कृतात मूर्धन्य वर्ण जास्त आढळतात. ह्याउलट संस्कृतनंतर जेव्हा लोकांच्या बोलीभाषेतून प्राकृत भाषांचा उदय झाला, तेव्हा भाषेच्या वर्णव्यवस्थेवर फारच मोठा परिणाम घडून आला. वैदिक संस्कृतातही काही प्रयोग प्रादेशिक बोलीभेद दर्शवितात. उदा., ऋग्वेदात सूरो दुहिता ह्या अपेक्षित संधीऐवजी एका ठिकाणी सूरे दुहिता (ऋ. १.३ ४.५) असा संधी आढळतो; तो प्राकृतामुळे असावा, अशी अभ्यासकांची कल्पना आहे. तथापि वैदिक संस्कृत ही प्राय: त्या काळी प्रचलित असलेल्या पश्चिमेकडच्या बोलीभाषेवर आधारलेली अशी एकजिनसी भाषा मानण्यात येते. ह्याचे एक यमक म्हणजे वैदिक संस्कृतात इंडो-यूरोपियन ‘ल’ वर्णाच्या ऐवजी ‘र’ वर्णाचा वापर आढळतो. वैदिक संस्कृत व अभिजात संस्कृत ह्यांमध्ये वर्णव्यवस्थेच्या दृष्टीने जरी सारखेपणा असला, तरी त्यांच्यात मुख्य भेद आढळतो, तो त्यांच्या व्याकरणात व शब्दसंपत्तीत. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिल्यास वैदिक संस्कृतच्या मानाने अभिजात संस्कृत ‘ निर्धन ’ मानावी लागेल. नामे व आख्याने ह्यांच्या रुपांत वैदिक संस्कृतात खूपच विविधता आहे. अकारान्त नामांचे उदाहरण घेतल्यास वैदिक संस्कृतात त्याच्या प्रथमेच्या व द्वितीयेच्या द्विवचनांची देवा-देवौ, प्रथमेच्या बहुवचनाची देवास:-देवा:, तृतीयेच्या एकवचनाची देवा-देवेन, तृतीयेच्या बहुवचनाची देवेभि:-देवै: अशी भिन्न रुपे आढळतात. अभिजात संस्कृतात ह्यांपैकी एकेकच रुप अवशिष्ट राहिले आहे. वैदिक भाषेत हेत्वर्थाची दृशे, चक्षसे, सनये, पीतये, कर्तवे, गन्तवै, पिबध्यै, दावने, आरभम्, प्रष्टुम्, संपृच:, गन्तो: अशी विविध प्रत्यययुक्त रुपे  आढळतात. ह्यांपैकी अभिजात संस्कृतात फक्त एकच प्रकार (प्रष्टुम्) शिल्ल्क राहिला आहे. वैदिक भाषेत प्रचलित असलेली लेट् ची रुपे (जसे भवाति) पुढील वाङ्‌मयात नाहीत. अभिजात संस्कृतात उपसर्ग हे नेहमी क्रियापदाशी संबंधित व क्रियापदापूर्वी उपयोगात येते. वैदिक वाङ्‌मयात उपसर्ग व क्रियापद ह्यांच्यातला संबंध त्या मानाने शिथिल आहे. एक तर उपसर्ग व क्रियापद ह्यांमध्ये इतर शब्द येऊ शकतात, उदा., स देवाँ एह (आइह) वक्षति (ऋ. १.१.२). दुसरे म्हणजे उपसर्ग क्रियापदानंतरही येऊ शकतो - जसे म गदूजिभिरा (वाजेभि: आ) सन: (ऋ. १.५.३). वैदिक भाषेत सामासिक पदे फार नसतात आणि जी असतात, ती बहुधा इन्द्रावरुणा, युक्तगावा अशी दोन पदांची असतात. ह्याउलट अभिजात संस्कृतात समासांचे बंड इतके वाढले की, दंडीला ‘ ओज: समासभूयस्त्वमेत गद्यस्य जीवितम् ’, असे म्हणून गद्यवाङ्‌मयात समासांचे महत्त्व कबूल करावे लागले.
 
संस्कृतच्या वैदिक व अभिजात ह्या दोन अवस्थांत शब्दसंपत्तीच्या दृष्टी-नेही मोठा भेद आढळतो. वैदिक काळातले पुष्कळसे शब्द नंतरच्या काळी प्रचारातून गेल्यामुळे त्यांचे अर्थ नीटसे कळेनासे झाले हे यास्काच्या निरुक्ता वरुन लक्षात येते. परंतु त्यापूर्वीच्या बाह्मणग्रंथाचे नीट वाचन केले असता, तिथेही ओकस्, दुर्य, पितु ह्यांसारखे जुने शब्द उपयोगांतून जात असल्याचे व त्यांच्याऐवजी गृह, अन्न ह्यांसारखे शब्द प्रचलित होऊ लागल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. ह्याखेरीज दुसरा एक फरक भाषिक उसनवारीमुळे घडून आला. संस्कृतभाषक लोक भारतात येऊन स्थायिक झाल्यावर त्यांचा जो एतद्देशीयांशी संबंध आला, त्यामुळे ह्या भिन्न भाषक समूहांत शब्दांची देवाणघेवाण होणे अपरिहार्य होते. संस्कृत भाषेत प्रचलित असलेले कित्येक शब्द एतद्देशीय द्राविड किंवा मुंडा भाषासमूहांतले असल्याचे संशोधकांनी दाखविले आहे. उदा., अनल (अग्नि), कुन्तल (केस), कुवलय (कमळ), नीर (पाणी), मीन (मासा), तीर (किनारा) इत्यादी. ह्यांखरीज आणखी एक फरक घडून आला; तो मात्र लेखनाची एक नवी शैली प्रचारात आल्यामुळे. व्याकरणशास्त्राने मान्य केलेली पुष्कळशी क्रियापदांची रुपे पाणिनी- नंतरच्या काळात लोकांच्या बोलीत वापरली जात नव्हती, हे पतंजलीच्या महाभाष्यावरुन कळते. उदा., परोक्षभूताची द्वितीयपुरुषी बहुवचनी ऊष, तेर, चक्र ह्यांसारखी रुपे न वापरता त्यांऐवजी उषिता:, तीर्णा:, कृतवन्त: अशी धातुसाधित विशेषणे लोक वापरु लागले होते. पुढेपुढे ही प्रवृत्ती इतकी वाढत गेली की, लोकांच्या लेखनात क्रियापदांचा वापर खूपच कमी होऊ लागला. ह्या नव्या शैलीला रा. गो. भांडारकरांनी ‘ नामप्रधान शैली ’ (नॉमिनल स्टाइल) असे अन्वर्थक नाव दिले आहे.

भारतात संस्कृतचा उपयोग वाङ्‌मयीन निर्मितीसाठी प्रथम होऊ लागला; त्याकाळचे पहिले उपलब्ध वाङ्‌मय धार्मिक स्वरुपाचे आहे. नंतरच्या काळात ‘ वेदांग ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रीय स्वरुपाच्या ग्रंथांतही संस्कृतचा उपयोग आढळतो. त्यानंतर मात्र संस्कृत भाषेत काव्य नाटकादी ललित वाङ्‌मय, कथासरित्सागर, पंचतंत्र इ. कथावाङ्‌मय, गद्य- पद्यमय चंपूकाव्ये, शतककाव्ये, अर्थशास्त्र, कामशास्त्र इ. शास्त्रीय ग्रंथ आणि विविध टीका अशी नाना प्रकारची विपुल ग्रंथरचना झाली.

मेहेंदळे, म. अ.

भाषावैज्ञानिक व व्याकरणिक वैशिष्ट्ये : प्राचीन वैदिक कालखंडात लेखनपद्घती अस्तित्वात होती किंवा कसे, याबद्दलचे उल्लेख उपलब्ध होत नाहीत; कारण सर्व वैदिक वाङ्‌मय मौखिक काटेकोर उच्चरण पद्घतीने परंपरेने जतन करुन ठेवले गेले. इ. स. पू. पाचव्या शतकातील बौद्घ वाङ्‌मयात अक्षरिक, लेखक (रेखा-रेघ काढणे) असे शब्द आढळतात. इ. स. पू. चौथ्या शतकातील ⇨ ब्राह्मी लिपी तील अतिप्राचीन ताम्रपट गोरखपूर जिल्ह्यात सोहगौरा येथे सापडला. ब्राह्मी लिपी भारतीय आहे किंवा काय, याबद्दल उलटसुलट मते आहेत. इ. स. पू. तिसऱ्या शतकातील सम्राट अशोकाचे पस्तीस शिलालेख आहेत. त्यांतील दोन शिलालेख ⇨ खरोष्ठी लिपी त आहेत. उर्वरित बरेच ब्राह्मी लिपीत आहेत. आज संस्कृत भाषा अन्य लिप्यांतही लिहिली जाते. त्यांपैकी ज्या ⇨ नागरी लिपीत किंवा देवनागरी लिपीत लिहिली जाते, त्या लिपीची सुरुवात सहाव्या-सातव्या शतकांत आढळते. लिपीच्या सोपेपणाने ती अल्पावधीत सर्वत्र पसरली. दक्षिण भारतामध्ये याच दरम्यान ग्रंथलिपीचा वापर तालपत्रांवर किंवा भूर्जपत्रांवर लिहिण्यासाठी केला जात असे.

संस्कृत भाषेतील स्वर आणि व्यंजने उच्चरताना दोन प्रकारचे प्रयत्न करावे लागतात - बाह्य आणि आभ्यन्तर. अ, इ, उ, ऋ, लृ हे पायाभूत स्वर. यांना उदात्त, अनुदात्त व स्वरित असे स्वराघात असतात. परत अनुनासिक, निरनुनासिक, ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत असेही भेद असतात. ए, ओ, ऐ, औ हे संधिस्वर असून त्यांचेही वरीलप्रमाणे प्रकार होतात.

  
बाह्यप्रयत्न (११)
विवार, श्वास, 
अ घोष,
अल्पप्राण 
विवार, श्वास, 
अ घोष,
महाप्राण 
संवार, नाद, 
घोष,
अल्पप्राण 
संवार, नाद, 
घोष,
महाप्राण 
उदात्त,  
अनुदात्त,
स्वरित
, च, ट, त, प
, छ, ठ, थ, फ, श, ष, स
सर्व स्वर, ज, ञ् , ब, म, ग, ङ्, ड, ण, द, न, य, र, ल, व 
, भ, घ, ढ, ध, ह
सर्व स्वर,
आभ्यन्तर प्रयत्न 
स्पृष्ट 
ईषत्स्पृष्ट 
विवृत 
संवृत 
क ते म 
(स्पर्श) 
, र, ल, व 
अन्त:स्थ 
सर्व स्वर 
,ष,स,ह 
प्रयोगावस्थेतील अकार 

या दोन्ही प्रयत्नांचा विचार तैत्तिरीय प्रातिशाख्या मध्ये सूक्ष्म रीतीने केलेला आहे. वेगवेगळ्या वर्णांचे उच्चरण होत असताना छातीपासून ते ओठापर्यंत श्वासाचे आघात कुठे व कसे होतात, याचा विशेष विचार प्रातिशाख्यांनी केला. त्यावर भाषाशास्त्रातील ध्वनिव्यवस्थेची उभारणी झालेली आहे. जोडाक्षरे हेही संस्कृत भाषेचे एक वैशिष्ट्य आहे.

वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या कमाला महत्त्व नाही. प्रत्ययांवरुन कर्ता, कर्म समजते. विशेषणे, सर्वनामे, धातुसाधिते, समास, संबद्घशब्द, अव्यये असे शब्दप्रकार असतात. अव्यये व काही धातुसाधिते अविकारी असतात.

नामे व विशेषणे स्त्रीलिंगी, पुपुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी तसेच एकवचनी, द्विवचनी किंवा अनेकवचनी असतात. ती एकूण आठ विभक्तींमध्ये व्यक्त केली जातात. प्रत्येक विभक्तीचे तीन वचनांतील प्रत्यय वेगवेगळे असतात. विशेषणांमध्ये तर- तम-भाव दाखविण्यासाठी प्रत्यय आहेत. उदा., अल्प - अल्पियस् - अल्पिष्ठ. संस्कृत भाषेत गुणवाचक, संख्यावाचक तसेच क्रमवाचक विशेषणे आहेत. देव हे नाम व पूज्य हे त्याचे विशेषण यांची विभक्तिरुपे अशी :

एकवचन 
द्विवचन 
बहुवचन 
प्रथमा 
द्वितीया 
तृतीया 
चतुर्थी 
पंचमी 
षष्ठी 
सप्तमी 
पूज्य: देव:
पूज्यम् देवम् 
पूज्येन देवेन 
पूज्याय देवाय 
पूज्यात् देवात् 
पूज्यस्य देवस्य 
पूज्ये देवे 
पूज्यौ देवौ 
पूज्यौ देवौ 
पूज्याभ्याम् देवाभ्याम् 
पूज्याभ्याम् देवाभ्याम् 
पूज्याभ्याम् देवाभ्याम् 
पूज्ययो: देवयो:
पूज्ययौ: देवयौ: 
पूज्या: देवा:
पूज्यान् देवान् 
पूज्यै: देवै:
पूज्येभ्य: देवेभ्य:
पूज्येभ्य: देवेभ्य:
पूज्यानाम् देवानाम् 
पूज्येषु देवेषु 

तिन्ही लिंगांतील नामांचे स्वरान्त व व्यंजनान्त असे गट केलेले असून त्या त्या गटाला विशिष्ट प्रत्यय लागतात. 

क्रियापदे दहा प्रकारची कल्पिली आहेत. ती अशी : वर्तमान, विध्यर्थ, संकेतार्थक, स्य भविष्यकाळ, तास् भविष्यकाळ, आज्ञार्थ, वैदिक आज्ञार्थी इच्छार्थक (नंतर लुप्त), भूतकाळ, परोक्षभूत, तृतीयभूत. नामांप्रमाणे क्रियापदांनाही प्रत्यय लागतात. हे प्रत्यय वरील दहांपैकी अर्थ, काल,कर्ता किंवा कर्म वचन व पुरुष (प्रथम, द्वितीय व तृतीय) दाखवितात.अर्थाचे एकाहून अधिक घटक एका प्रत्ययातून दिसतात. हे संस्कृत भाषेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. नाम व क्रियापदे यांच्या प्रत्ययांचा मूळ आराखडा असून त्यानुसार त्यांची इष्ट रुपे तयार होतात. त्यामुळेच संस्कृत व्याकरणाला उत्पादनक्षम (जनरेटिव्ह) व्याकरण म्हणतात.

एकवचन 
द्विवचन 
अनेकवचन 
प्रथम पुरुष - 
द्वितीय पुरुष - 
तृतीय पुरुष - 
गच्छामि 
गच्छसि 
गच्छति 
गच्छाव: 
गच्छथ: 
गच्छत: 
गच्छाम: 
गच्छथ 
गच्छन्ति 

गच्छामि ’ यातील ‘ मि ’ हा प्रत्यय वर्तमानकाळ, कर्ता व प्रथम पुरुष असे घटक दाखवितो. धातुपाठानुसार सर्व धातू दहा गटांमध्ये विभागलेले आहेत. ते आत्मनेपदी, परस्मैपदी किंवा उभयपदी असून सकर्मक किंवा अकर्मक असतात. त्यांना प्र, परा, अप, अनु यांसारखे उपसर्ग जोडले असता त्यांच्या अर्थांत फरक पडतो उदा., भू (असणे) या धातूला ‘ अनु ’ हा उपसर्ग जोडला असता, अनुभवणे अशा अर्थाचे क्रियापद बनते. वाक्यरचनेत कर्तरी, कर्मणि व भावे, कर्मकर्तरि असे प्रयोग असतात.

सर्वनामे यद् - तद् (जे - ते), अस्मद् - युष्मद (मी-तू), किम् (प्रश्नार्थक), एतद् - इदम् (हा, ही, हे), अदस् (तो, ती, ते), सर्व इ. असून ती तीनही लिंगांमध्ये आहेत. धातूंपासून केलेली रुपे म्हणजे धातुसाधित विशेषणे क्रियापदाचे काम करतात.

मास हे संस्कृत भाषेचे मोठे वैशिष्ट्य आहे. दोन किंवा अधिक पदे नियमांनुसार एकत्र आली की, समास तयार होतो. समासाचे चार प्रमुख प्रकार (द्वंद्व, अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुवीही) आहेत. त्यांपैकी अव्ययीभाव समासाचा अव्ययाप्रमाणे वापर होतो. उर्वरित समास विशेषणांप्रमाणे वापरले जातात. विधाने एकमेकांना जोडण्यासाठी च, परं, परंतु, किंतु, अपिच, अपिवा इ. संबद्घशब्द वापरले जातात.

अव्यये स्थलवाचक (यत्र-तत्र), कालवाचक (रात्रौ, दिवा, सर्वदा), संबद्घवाचक (यथा- तथा), अन्यथा तसेच सह, विना, नम:, बहिः स्वस्ति अशा प्रकारची आहेत. त्यांबरोबर विशिष्ट विभक्तीतील शब्द वापरावे लागतात.

संधी हे आणखी एक वैशिष्ट्य. दोन शब्दांचा संधी होतो व या शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असते. त्यांचे स्वरसंधी, विसर्गसंधी व व्यंजनसंधी असे प्रकार आहेत. सुप्रसिद्घ अमेरिकन भाषावैज्ञानिक लेनर्ड ब्लूमफील्ड याने संस्कृतेतर पाश्चात्त्य भाषांना संधिनियम लावून तशी रुपे सिद्घ करता येतात, हे दाखवून भाषाशास्त्रात मोलाची भर घातली.

Thursday, 13 March 2014

नेहरू तारांगण


मुंबईतील वरळी येथील नेहरू तारांगण आपल्याला एका अद्भुत दुनियेत घेऊन जाते. आकाशदर्शनाचा एक रोमांचक अनुभव तिथे घेता येतो. त्यातूनच अनेकांचे कुतूहल जागे होते. त्यातील काहीजण संशोधक किंवा प्राध्यापक होतात , तर काही विज्ञानप्रसाराचा वसा घेतात...
......

वरळीतील नेहरू तारांगण हे मुंबईतील रहिवाशांकरिता आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. महालक्ष्मी मंदिराकडून हाजीअलीचा दर्गा पार करत पुढे आलात की उजवीकडे नेहरू सेंटरची १६ मजली गोल इमारत डोळ्यात भरते. थोडं जवळ आल्यास गोल इमारतीच्या पुढील छोटेखानी घुमट आपल्याला वेगळ्याच विश्वात नेणार , याची खात्री पटवतो.

सन १९७५मध्ये पी. जी. पटेल यांनी जर्मनीहून कार्ल-झाइस कंपनीचा तारांगणाचा प्रोजेक्टर विकत आणला. तो अडकला सीमा-शुल्क विभागात. तो सोडवून घेतला रजनीभाई पटेल यांनी. त्यावेळी रजनीभाईंचा वरळी येथे नेहरू सेंटर सुरू करण्याचा मानस होता. अखेर नेहरू सेंटर तर्फे शैक्षणिक उपक्रम म्हणून तारांगण सुरू करावे असे ठरले. पण ही विज्ञानगंगा मुंबईत आणायची ती कोणाच्या बळावर ? सुदैवाने त्यावेळी टी.आय.एफ.आर. येथे असलेले डॉ. जयंत नारळीकर डॉ. कुमार चित्रे व डॉ. बालू यांनी त्यासाठी मदत करायचे आश्वासन दिले. प्रख्यात वास्तुविशारद कादरी यांनी या वास्तची रचना करण्याचे मान्य केले. मुख्य अडचण होती , ती संचालकपदासाठी विज्ञानाच्या प्रसाराची आवड असणारा संशोधक शोधण्याची. डॉ. अरविंद भटनागर या सौर शास्त्रज्ञाच्या रूपाने ती पूर्ण झाली. अनेक अडचणींवर मात करत दि. ३ मार्च १९७७ रोजी मुंबईत नेहरू तारांगणाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले.
आज २६ वर्षांनंतरही तारांगणातर्फे खगोल विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

अगदी सर्वप्रथम बनवलेला ' नियती बरोबर भेट ' (Tryst with Destiny) या कार्यक्रमाने तारांगणाची सुरुवात झाली. आता तारांगणात मराठी , हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये मंगळवार ते रविवार दररोज चार कार्यक्रम सादर केले जातात. तारांगणाला सोमवारी सुट्टी असते. स्थापनेपासून आजवर तारांगणातर्फे ३० विविध कार्यकमांची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थात कार्यकमांची तयारी करताना केवळ विज्ञान किंवा वैज्ञानिकांचा सहभाग असून भागत नाही. संहिता तयार करताना भाषा , कला , नाट्य , संगीत , ध्वनिमुद्रण इत्यादी अनेक घटकांना विचारात घ्यावे मागते. तसे झाल्यासच कार्यक्रम रोचक व सहज , सोप्या भाषेत सर्वांना समजेल असा होतो.

तारांगणाच्या घुमटात ६०० लोक बसू शकतात. आता जुने तंत्रज्ञान (जुना प्रोजेक्टर) जाऊन त्याच्या जागी ' डीजीस्टार-३ ' हे नवे कम्प्युटरकृत तंत्रज्ञान वापरले जाते. आठ कम्प्युटरांच्या साह्याने अंतराळातील वैविध्यपूर्ण घडामोडींचे दर्शन सहा प्रोजेक्टरच्या मदतीने घुमटावर घडते. खाली बसण्याच्या खुर्चीची पाठ अगदी मागे नेत जवळ-जवळ झोपल्यासारख्या स्थितीत जाऊन घुमटाकडे बघावे लागते. त्यामुळे खुल्या पटांगणात आकाशाखाली झोपल्याचा आभास निर्माण होतो. कृत्रिम आकाश बघताना सर्वजण हरखून जातात. या दुर्मिळ अनुभवाचे आकर्षण त्यामुळे वाढत जाते व लोक मोठ्या संख्येने तारांगणाकडे वळतात. गेल्या २६ वर्षांत सुमारे एक कोटी ३२ लाख लोकांनी असे कार्यक्रम पाहिले आहेत. यावरूनच तारांगणाची लोकप्रियता लक्षात येईल.

तारांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर सर्व प्रथम ग्रहमालेची प्रतिकृती दिसते. सूर्याभोवती फिरणारे ग्रह व त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह बघत येणारा प्रत्येकजण या कालातीत दुनियेत प्रवेश करतो. मंगळाच्या पृष्ठभागावरील दृश्य , चांद्रदेखावा व अनेक संशोधकांची तैलचित्रे आपल्याला खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेल हे दाखवणारे वजनकाटे सर्वांत महत्त्वाचे आकर्षण ठरते. जोडीला सहज भाषेतील माहिती आपल्यामधील जिज्ञासा जागृत करते.

कृत्रिम ग्रह-तारे बघणाऱ्यांना बरेचदा दुर्बिणीतून प्रत्यक्ष आकाशाकडे बघायची इच्छा होते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणून तारांगणातर्फे दर रविवारी सायंकाळी सात ते आठ या वेळात दुर्बिणीतून विनामूल्य आकाशदर्शन घडविले जाते. त्याव्यतिरिक्त विविध खगोलीय घटना असल्यास तारांगणाकडे आपसूकच लोकांची पावले वळतात. त्याला प्रतिसाद देत तारांगणाच्या वतीने अशा खगोलीय घटना सर्वसामान्य लोकांना दाखवण्याची सोय केली जाते. सूर्य-चंद्र ग्रहणे , गुरू-शनी ग्रहांचे दुर्बिणीतून निरीक्षण , उल्का वर्षाव या व अशा अनेक घटनांच्या वेळी नेहरू तारांगण विशेष सोय करते.

तारांगणाचा एक मोठा उपयोग पावसाळ्यात होतो. भारतासारख्या देशात जून ते सप्टेंबर असे चार महिने पावसाळा असतो. त्यावेळी बऱ्याचवेळा सूर्य दडी मारून बसलेला असतो. आकाशही दिसेनासे होते. अशावेळी तारांगणाचा वापर करून आकाशदर्शन घेता येते.

आत्ता तुम्ही मुंबईतून आकाश बघत असाल आणि काही दिवसांनी अगदी उत्तरेला जाऊन जम्मूसारख्या ठिकाणी आकाश पाहणार असाल , तर तेथे ताऱ्यांची स्थाने वेगळीच भासतात. उत्तरेला गेल्यास ध्रुव तारा क्षितिजसापेक्ष वर सरकतो. जागा बदलल्यानंतर आकाशातील फरक काय असतो , याचा अभ्यास तारांगणामुळे करता येतो. खगोल ऑलिम्पियाड ( Astro Olympiad) या सपर्धेसाठी दरवर्षी भारतीय चमू जातो. ही स्पर्धा ज्या देशात , ज्या ठिकाणी असेल , त्या ठिकाणचे आकाश नेहरू तारांगणात दाखवून आपल्या चमूला तेथल्या आकाशाचा सराव करून दिला जातो.

खगोल मंडळासारख्या हौशी निरीक्षक संस्था गेली अनेक वर्षे तारांगणाच्या प्रसारकांच्या हातात हात घालून खगोलप्रसाराचे कार्य करत आहेत. कृत्रिम आकाश बघून मन न भरलेले हौशी निरीक्षक मग वांगणी येथे प्रत्यक्ष आकाशाखाली उभे राहून सर्वसामान्यांना रात्रभर आकाश दाखवतात. पाऊण तासाचे तारांगणाचे कार्यक्रम सुरू होतात व संपतात. पण तारांगणाने लावलेली खगोलजिज्ञासा लोकांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच पुढे हौशी निरीक्षक तयार होतात. त्यातील काही पुढे संशोधक , प्राध्यापक होतात. काही विज्ञानप्रसारक होतात. बरेचजण विज्ञाननिष्ठ विचारसरणीची शिदोरी सोबत घेऊन जातात. तारांगणाची स्थापना करताना हाच उद्देश संस्थापकांचा असावा. तो उद्देश बऱ्यापैकी सफल झाल्याचे नमूद करावेसे वाटते.

मुंबईत भटकंती करणाऱ्यांनी जरूर वरळीत जावे. तारांगणाच्या घुमटाखाली थोडावेळ बसावे. भरदुपारी होणाऱ्या रात्रीचा अनुभव घ्यावा. गावी मोकळ्या शेताच्या बांधावरून केलेल्या आकाश निरीक्षणाच्या आठवणी ताज्या कराव्यात. त्यासाठी तरी नेहरू तारांगणाला एकदा तरी भेट द्या.

Wednesday, 26 February 2014

अनुराधा पाटील

अनुराधा पाटील


1981 ते 2005 या 24 वर्षात अनुराधा पाटील यांच्या चार कविता संग्रहात एकूण 224 कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या कवितांचा वेगळा `पिंड’ असून त्या कवितांवर त्यांचीच छाप दिसून येते.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अनुराधा पाटील यांचे शिक्षण पहूर (ता. जमनेर) येथे दहावीपर्यंत झाले. त्यांच्या कवितेने स्वतःची स्वतंत्र वाट शोधलीच पण त्याचबरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रभाव निर्माण करणार्या प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून स्थान निर्माण केले आहे. अनुराधाताईंच्या एकूण लेखनाविषयी, नवीन लिहित असलेल्या कवितांविषयी आणि बालपणीच्या आठवणींविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणतात की, माझ्या लेखनाची, कविता लिहिण्याची सुरुवात शाळेत असल्यापासूनच झाली. साधारणपणे मला आठवतं की, तिसरी ते चौथीत असेन त्यावेळी भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असल्याने स्वातंत्र्यानंतरच बदलाचे वातावरण होते. मात्र असे असले तरीही मुलींना खूप शिकू देतील असे वातावरण नव्हते. तरीही शाळेत असताना मी कविता, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे. पुढे मात्र दहावी झाले आणि काही दिवसातच माझे लग्न कौतुकराव ढाले पाटील यांच्याशी झाले. माझे पती हे मराठीचे प्राध्यापक होते त्यामुळे त्यांच्यामुळे माझ्या कविता करण्याला त्यांच्याकडूनच प्रोत्साहन मिळाले असे मी म्हणेन आणि मग त्यांच्यामुळेच मी लग्नानंतरही कविता लेखन सुरू ठेवले.

तुमची पहिली कविता कोठे छापून आली होती का, यावर अनुराधाताई म्हणतात की, लग्नानंतर खर्या अर्थाने माझे जोमाने कवितालेखन सुरू झाले. या काळात मला सुचतील त्या कविता मी एका वहीत लिहून ठेवत होते. मग त्यातलीच एक कविता औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणार्या `प्रतिष्ठान’ या मासिकात छापून आली. डॉ. सुधीर रसाळ हे त्यावेळी त्या मासिकाचे काम पाहत आणि ही कविता प्रसिद्ध झाल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला आणि मग मी अधिक जोमाने कविता लिहू लागले. त्यानंतर 1981 साली माझा दिगंत, 1985 साली `तरीही’ आणि 1992 मध्ये `दिवसेंदिवस’ असे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले तर साधारण 13 ते 14 वर्षांनी `वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हा कवितासंग्रह 2005 साली प्रकाशित झाला. 1992 नंतर खूप वर्षांनी तुमचा चौथा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मध्ये खूप वर्षे आपण लिहितच नव्हतात का, असे विचारताच खूपच भावनिक झालेल्या अनुराधा ताईंचा स्वर कापरा झाला. माझा मुलगा या दरम्यान आमच्यातून निघून गेल्याने कविता लेखन करण्यास मनच तयार होत नसे त्यामुळे मग खूप वर्षांनी कधीतरी या कवितांनी मोहात पाडले आणि मग `वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला.

आपल्या कविता या चिंतनात्मक असतात असे म्हटले जाते तर स्त्रियांच्या जाणीवा, भावना आपण खूप हळूवार पद्धतीने मांडता हे कसे काय याविषयी त्या म्हणतात की, माझ्या कविता या स्वतःची वाट शोधतात. मला माहीत आहे की, स्त्रियांच्या जीवनातील दुःखाला, एकाकीपणाला, सोशिकतेला पर्यायच असू शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मी माझ्या `दिवसेंदिवस’ या कविता संग्रहातले देईन. या संग्रहातील `काळ्या कातळाच्या छातीत’ ही त्यांची कविता प्रखर आत्मविश्वास जपताना दिसतात. ती कविता अशी आहे – काळ्या कातळाच्या छातीत घुसमटणार्या

मातीच्या कणांनाही ओढ लागते

मुळं रुजवत नव्या कोंबातून

प्रकाश पाहण्याची आणि मी देईन

तेवढाच अर्थ उरतो मग तुझ्या असण्याला

जगण्याच्या संदर्भात.

सध्या आपले नवीन लिखाण काय सुरू आहे आणि विविध ठिकाणी होणार्या प्रकाशन समारंभ, चर्चा, संमेलने यास आपण उपस्थित राहिला का? यावर त्या म्हणतात की, आता अगदी नवीन असे काही कविता लेखन सुरू नाही पण मध्येच असे काही सुचले आणि लिहावेसे वाटले की एका वहीत लिहून ठेवते. पण सध्यातरी लिहून ठेवलेल्या कवितांचा संग्रह करावा असे डोक्यात नाही आणि पुरस्कारांचे म्हणाल तर पुरस्कार खूप मिळाले आणि मी त्याबद्दल समाधानीही आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट भाष्य लेखनाचा, केशवसुत पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कविता लेखनाबरोबर मी काही कथाही लिहिल्या, त्याही विविध मासिकात छापून आल्या. विशेष म्हणजे मी लिहिलेल्या कवितांचा `अनुराधा पाटील की कविताएँ’ हा 75 कवितांचा हिंदी अनुवाद दिल्लीहून प्रकाशित झालाय, याचा मला आनंद आहे.

अनुराधा पाटील यांच्याविषयी असे म्हणता येईल की, त्यांच्या कविता आज मराठीत अग्रेसर आहेत आणि म्हणूनच की काय, मराठीतील प्रथम दर्जाच्या 20 समीक्षकांनी घडवलेलं अनुराधा पाटील यांच्या कवितेचे दर्शन `अनुराधा पाटील यांची कविता’ संपादक डॉ. दादा गोरे यांच्या पुस्तकातून घडले. मुंबईच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सभासद म्हणून दिल्लीच्या साहित्य अकादमीच्या सदस्य आणि कोलकाताच्या भारतीय भाषा परिषदेच्या मानद सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी मराठी भाषा जपण्यासाठी तसेच या भाषेतील शुद्धलेखन, कवितेचे प्रकार, विविध भाषा प्रकार यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला आहे.

एकंदरीतच अनुराधाताई यांच्या कविता आणि जीवनाकडे बघण्याची त्यांची जाणीव अधिकाधिक विकसित झालेली दिसते. त्यांच्या कवितांतून चिंतन तर होतेच एकूणच त्यांच्या कविता भीषण सत्य मांडतात आणि आपण फक्त अंतर्मुख होत जातो

            मी अनुराधा पाटील .
मनुष्याला जे हवे असते ते मिळतेच. तो ज्याचा नेहेमी विचार करतो ते समोर येतेच.

माझेही तसेच झाले . मी साधी गृहिणी होते.कोणालाही काही त्रास किंवा वेदना असल्या तर मला असे वाटे की कोणाच्याही वेदना मला सहजतेने, स्पर्शाने दूर करता याव्यात.

मुले लहान असताना त्यांचे छोटे मोठे आजार सहजतेने नैसर्गिक रीतीने व औषधाशिवाय बरे करता यावेत असे मला वाटे.  त्यासाठी नॅचरोपॅथी  , आयुर्वेद, आहारशास्त्र , बर्‍याच गोष्टीचे छोटे मोठे कोर्सेस  केलेत . मुलांसाठी चाइल्ड सायकॉलॉंजीच्या पुस्तकांचेही बरेच वाचन झाले. पण अजून हवे ते मिळाले नव्हते. फारसे पथ्य न करता, त्वरित रिझल्ट देणारे असे काही हवे होते. वेदना किवा व्याधी निवारणासाठी नियमीतपणे फारशी उठाठेवही करायची नव्हती. थोडक्यात आखूड शिंगी आणि बहु दुधी गाय हवी होती.

याच काळात माझे पती मोहन यांना मानेचे व पाठीचे दुखणे सुरू झाले. ते pain killers , traction, short wave diathermy अनेक उपचार व यासाठी अनेक डॉक्टर्स झालेत.

शेवटी अॅक्युप्रेशर केंद्रावर काही प्रमाणात रिलीफ मिळाला व माझे पती मोहन यांनी मला ही विद्या शिकण्यास प्रोत्साहन दिले. मला जुलै 1993मधे प्रा. पार्क यांचे सु जोक उपचारांचे कोर्स सुरू होणार असे कळले. त्यावेळी शिल्पा, माझी मुलगी 12 वी होऊन तिचे मेडिकल अॅडमिशन व्हायचे होते. आम्ही दोघींनी हा सुजोक अॅक्युपंक्चर कोर्स करायचे ठरवले.

अॅक्युप्रेशर केंद्रावर मला कळले की  प्रा .पार्क जे वू हे ह्या अॅक्युप्रेशर शास्त्राला हात आणि पाउलांवर खूप सोपे करून शिकवतात.आणि त्याचे रिझल्ट् ही लगेच दिसतात.

मला फार आनंद झाला.  त्यात मला हवे ते सारे दिसत होते . पण सर्वस्वी नवीन पद्धती असल्याने लक्ष देवून अभ्यास करावा लागणार होता. कारण याच्याही पुढे जाऊन हे उपचार वेदनेशिवाय कसे देता येईल हे शोधायचे होते.

दहा दिवसात त्यांनी बेसिक सुजोक , 12 ब्योल मेरीडियन , मसल डायग्नोसिस , 6की , टाइम अॅक्युपंचर, पल्स डायग्नोसिस सारे सारे  शिकवले. एवढे एकाच वेळी पचवणे मला कठीण  होते. पण शिल्पाच्या मदतीने सारे शक्य झाले. उपचारांना रिझल्ट्स ही चांगले मिळत होते.अर्थात सर्वात आधी प्रयोग झालेत ते माझे पती मोहन यांच्यावर . या उपचारांनी त्यांना संपूर्ण रिलीफ मिळाला व तद्नंतर कधीही मान व कंबर यासाठी बेल्ट वापरावा लागला नाही. त्यांचे  spondylosis चे दुखणे पूर्ण बरे  झाले.

माझ्या दोन्ही मुले आणि मोहन  हे उपचार शिकले. मी गेली 20 वर्ष वेदनारहित अॅक्युप्रेशर कसे द्यावे यावर संशोधन चालू  ठेवले. हजारो विद्यार्थी व रुग्ण ही पद्धत माझ्याकडून शिकून गेलेत.

वेदनारहित आरोग्य उपचार सर्वांपर्यंत पोहोचवावे यासाठीच हा लेखन प्रपंच .

आपणच आपल्याला - अनुराधा पाटील
आपणच आपल्याला लिहीलेली
पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पानं

थोडंसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधी तरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वराचं एखादं गाणं

आपणच जपावेत मनात
वा-यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी दूरात धावणारी पायवाट
जपावेत काही नसलेले भास

जिथे आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास

सुख बोलत नाही
सुख बोलत नाही;
ते कणाकणातून फक्त झिरपत राहतं
कडेकपारीतून ठिबकणा-या सहस्त्रधारेसारखं
फेसाळत्या दुधासारखं ते जिवणीच्या कडेकडेनं सांडत असतं.
तीराला बिलगणा-या फेसासारखं ते नाच-या डोळ्यांतून खेळत असतं.
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
आभाळाला ओढून घेणा-या सरोवरासारखं
ते जीवाला स्वत:त ओढून घेतं, लपेटून घेतं.
—- निरोपाच्या थरथरत्या क्षणी बोलू पाहतं ते सुखच असतं
तेव्हाही त्याची भाषा असते हुंकाराची, खुणेची,
डोळ्यांत साकळलेल्या आसवांची
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
ते असतं…. फक्त असतं.

अनुराधा पाटील यांना "दुःखी' राज्य काव्य पुरस्कार
जालना - शहरातील नंदकिशोर सहानी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा कै. राय हरिश्‍चंद्र साहनी दुःखी राज्य काव्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना त्यांच्या समग्र योगदानाबद्दल देण्यात येणार असल्याची माहिती विनीत साहनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील गीता भोज या ठिकाणी शुक्रवारी (ता. एक) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. साहनी यांनी ही माहिती दिली. या वेळी नवल साहनी, प्रा. जयराम खेडेकर यांची उपस्थिती होती. नंदकिशोर सहानी चॅरिटेबल टस्ट व "ऊर्मी'च्या वतीने दरवर्षी गुढी पाडव्यास "कवितेचा पाडवा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कै. राय हरिश्‍चंद्र साहनी दुःखी राज्य काव्य पुरस्कार यानिमित्ताने देण्यात येतो, अशी माहिती या वेळी श्री. साहनी यांनी दिली. यंदाचा चौदावा राज्य काव्य पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील यांना कवितेतील समग्र योगदानाबद्दल देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रोख 21 हजार रुपये,  सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कवितांवर दोन दिवस चर्चासत्र
सुप्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कवितांवर मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रात राज्यातील व महाराष्ट्राबाहेरील अभ्यासक आपले निबंध सादर करणार आहेत. २६ व २७ ऑक्टोबर रोजी मसापच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात हे चर्चासत्र होणार आहे.
मसापतर्फे फादर थॉमस स्टीफन्स, ना. धों. महानोर, रा. रं. बोराडे यांसह विविध लेखक-समीक्षकांच्या साहित्यामध्ये चर्चा घडवून आणलेली आहे. अशा प्रकारच्या या वर्षीच्या उपक्रमात कवयित्री अनुराधा पाटील यांच्या काव्यलेखनावर चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्राचे उद्घाटक ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ असून पहिल्या सत्रात 'अनुराधा पाटील आणि समकालीन मराठी कविता' यावर डॉ. वसंत पाटणकर निबंध सादर करणार आहेत. 'अनुराधा पाटील यांच्या कवितेतील स्त्रीत्वाचा शोध' यावर प्रा. नितीन रिंढे, तर त्यांच्या कवितेतील स्त्रीवादी आकलन यावर डॉ. माया पंडित यांचे निबंध सादर होणार आहेत. 'कवितेची रचनातत्त्वे' यावर प्रवीण बांदेकर व 'काव्यशैली' यावर डॉ. हरिश्चंद्र थोरात यांचे निबंध असतील. चौथ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत पाटील असणार आहेत. दुसऱ्या दिवशी डॉ. सुषमा करोगल (बडोदा), नांदेड येथील पी. विठ्ठल व उल्हासनगर येथील प्रा. उदय रोटे हे सांस्कृतिक संदर्भ, कवितेतील मिथके, ग्रामसंदर्भाचे स्वरूप व प्रतिमासृष्टी या विषयी निबंध सादर करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी वसंत पाटणकर असतील. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, श्रीधर नांदेडकर, प्रा. दिगंबर पाध्ये, रणधीर शिंदे, बळवंत जेऊरकर या चर्चासत्रात सहभागी होतील.




Sunday, 2 February 2014

सिडनी ओपेरा हाउस

सिडनी ओपेरा हाउस : हार्बर पर उगा अद्वितीय फूल

आस्ट्रेलिया के चार शहरों की यात्रा में हमारा पहला पड़ाव सिडनी था और पहला ही साक्षात्कार सिडनी ओपेरा हाउस की सम्मोहित कर देने वाली डिजाइन से होता है। क्या ही खूबसूरत इमारत है। जितनी बार जितने कोणों से देखिए इसका नया ही आकर्षक रूप सामने आता है और यह तो हमें दूसरी शाम पता चला कि सिडनी ओपेरा हाउस का असली, भव्य दर्शन तो समुद्र में थोड़ा दूर जाकर होता है। जब हमने क्रूज की ढा़ई घण्टे की यात्रा में समुद्र में दूर से ओपेरा हाउस को देखा तो अहसास हुआ कि ढ़लती शाम की सुनहरी धूप और रात की जगमग रोशनी में ओपेरा हाउस का सौन्दर्य कई गुणा बढ़ गया है। हार्बर पर उगे किसी अद्वितीय फूल की तरह। समुद्र की लहरें निरन्तर जिसके चरण पखारती हों और सुबह से रात तक की विविध रोशनियाँ जिसका पल-पल नया श्रंगार करती हों, ऐसे ओपेरा हाउस की छवि बस मन में टंकी रह जाती है।

और जब ओपेरा हाउस का वाक्पटु गाइड उसके निर्माण के इतिहास के रोचक और उदास प्रसंगों का बखान करता है तो उस दिव्य छवि में एक कसक भी समा जाती है। विश्वव्यापी डिजायन प्रतियोगिता के बाद चयनित जिस डच आर्कीटेक्ट उटजन ने 1959 में इसे अथक परिश्रम और लगन से बनवाना शुरू किया, वही इसका तैयार भव्य रूप कभी नहीं देख पाया। निर्माण के दौरान इतनी मुश्किलें आईं और अप्रिय विवाद उठे कि उटजन को इसके निर्माण से अलग कर दिया गया। बाद में उटजन सही साबित हुआ और उसी के मूल डिजायन और निर्देशों के तहत ओपेरा हाउस पूरा हुआ मगर 1973 में इसके उद्घाटन के समय उटजन का नाम तक नहीं लिया गया था। हालाँकि बाद में सिडनी ओपेरा हाउस ट्रस्ट ने उटजन को पूरा श्रेय दिया और उसे ससम्मान सिडनी आमंत्रित भी किया लेकिन उटजन अपनी इस अद्वितीय कृति को देखने फिर कभी सिडनी नहीं आया। हाँ, नवंबर 2008 में अपनी मृत्यु से पहले उसने ओपेरा हाउस के रखरखाव और भविष्य के लिए कुछ नई परिकल्पनाएँ जरूर भेजीं। आज सिडनी में उटजन को बड़े सम्मान के साथ याद किया जाता है और उसकी स्मृति में ओपेरा हाउस में बाकयदा ‘उटजन रूम’ भी बनाया गया है। उसे इस डिजायन के लिए आर्कीटेक्चर का सर्वोच्च सम्मान मिला और सिडनी ओपेरा हाउस को वर्ल्ड हेरिटेज सूची में जगह। इस इमारत में पाँच अलग-अलग आकार-प्रकार के थिएटर हैं जहाँ जज, बैले, शास्त्रीय संगीत, नाटक, नृत्य सभी तरह के कार्यक्रम निरंतर होते रहते हैं-एक वर्ष में करीब 2500 प्रदर्शन!

सिडनी ओपेरा हाउस से नजर घूमी नहीं कि हमें ऐतिहासिक और आलीशान सिडनी हार्बर ब्रिज के दर्शन होते हैं। छह वर्ष के परिश्रम से बना और मार्च 1932 में पूरा हुआ यह पुल दुनिया का सबसे बड़ा (लम्बा नहीं) इस्पात चाप वाला पुल है। इसमें इतना लोहा लगा है कि उसे रंगने में 60 बड़े खेल मैदानों को रंगने के बराबर पेंट खर्च होता है और बड़े-बड़े जहाज इसके नीचे से आते-जाते हैं। इसके उद्घाटन का एक रोमांचक किस्सा भी है। 19 मार्च 1932 को भव्य समारोह में न्यू साउथ वेल्स के प्रीमियर जैक लांग इसका फीता काटते कि उससे पहले ही फौजी वेश में दौड़ते आए एक घुड़सवार ने अपनी तलवार से वह फीता काटकर जनता की ओर से पुल का उद्घाटन कर दिया था। उसे गिरफ्तार करके और दोबारा रिबन बाँधकर पुल का औपचारिक उद्घाटन किया गया। खैर, ओपेरा हाउस बनने से पहले यह पुल आस्ट्रेलिया, विशेषकर सिडनी का अन्तर्राष्ट्रीय पहचान प्रतीक था। अब ओपेरा हाउस इस पर भारी पड़ रहा है, हालाँकि सिडनी हार्बर ब्रिज आज भी उतना ही दर्शनीय और लोकप्रिय है और साहसी पर्यटक चार सौ सीढ़ियाँ चढ़-उतरकर सिडनी हार्बर ब्रिज के चाप (आर्क) की रोमांचक यात्रा करने से नहीं चूकते ।




सिडनी का तीन-चौथाई आकर्षण हार्बर के इर्द-गिर्द ही फैला है-ओपेरा हाउस और हार्बर ब्रिज के अलावा कोआला और कंगारू के स्नेहिल सानिध्य वाला टरोंगा जू, हजारों समुद्री प्राणियों का रोचक संसार दिखाने वाला सिडनी एक्वेरियम और वाइल्ड लाइफ वर्ल्ड, कैप्टन कुक की आस्ट्रेलिया की खोज और बाद की कई प्राचीन समुद्री यात्राओं का इतिहास संजोए आस्ट्रेलियन नेशनल मेरीटाइम म्यूजियम, नेशनल बाटेनिक गार्डन, आदि आकर्षण हार्बर पर ही हैं। हार्बर किनारे के बेहतरीन रेस्त्रां सुबह से रात तक खान-पान के शौकीनों से गुलजार रहते हैं। ‘एब-ओरिजनल्स’ अर्थात आस्ट्रेलियाई मूल के आदिवासी अपने लोक-करतब दिखाने हार्बर पर ही जुटते हैं तो हिन्दुस्तानी कस्बों की तरह सड़क छाप सर्कस या करतब दिखाकर पैसा मांगने (कमाने) वाले फुटपाथिए-करामाती भी हमें सिडनी हार्बर पर ही मिले। हार्बर पर आप घण्टों बैठे रह सकते हैं, आस्ट्रेलिया की बीयर अथवा वाइन का निर्मल आनन्द ले सकते हैं और मन करे तो स्पीड बोट का रोमांच उठा सकते हैं, जो समुद्र में 80 किमी प्रति घण्टे की रफ्तार से दौड़ते हुए सहसा पूरा ब्रेक लगाकर आपको लहरों पर चकरघिन्नी खिलाती और दाँएं-बाएं उछालती है। हमारे मुँह से तो चीख ही निकल गई थी और तीखा खारा पानी खुले मुँह में भर गया था। यह दुस्साहिक रोमांच पसंद न हो तो, आलीशान क्रूज भी हार्बर पर ही मौजूद हैं जो ढाई-तीन घण्टे की मादक यात्रा में बेहतरीन खान-पान, डांस और विविध मनोरंजन पेश करते हैं।

एक और रोमांचक आकर्षण सिडनी टावर है जो जमीन से 268 मीटर (879 फुट) ऊपर ले जाकर सिडनी का चौतरफा विहंगम दृश्य दिखाता है। अंतरिक्ष यात्री की सी पोशाक पहनाकर और कमर से बंधी जंजीरों को ‘स्काई वाक’ की रेलिंग से सुरक्षित कर आपको टावर के चारों ओर जैसे आकाश-मार्ग पर ही घुमाया जाता है। पैरों के नीचे शीशे की फर्श होती है जो हवा में खड़े होने की प्रतीति कराती है और ऊँचाई से डरने वालों की सांसें थाम देने को काफी है। हवा के तेज थपेड़ों के बीच टावर के चारों ओर घूमते हुए आप सिडनी के हर कोण से दर्शन करते हैं। प्रशान्त महासागर का नीला विस्तार अनन्त की ओर ले जाता है और हम दार्शनिक होने लगते हैं लेकिन फिर टावर की तेज रफ्तार लिफ्ट हमें 40 सेकेण्ड में 268 मीटर से जमीन पर उतार लाती है।

बोण्डाई से बोंटी बीच की कोई 4 किमी की पैदल यात्रा से हमारे सिडनी दर्शन का समापन होता है। सिडनी शहर से 8 किमी दूर आस्ट्रेलिया के


सबसे सुन्दर समुद्र तटों में शुमार बोण्डाई से बोंटी तक का यह छोर सुनहरी रेत पर छोटी-बड़ी लहरों की अठखेलियों से लेकर चट्टानों पर उनके आक्रामक प्रहार तक का विविध नजरा पेश करता है। प्रशान्त महासागर के नीले विस्तार से उठती धवल-उच्छृंखल लहरों में तैरते, भीगते, बैठे-लेटे, नंगे-अधनंगे सैलानियों से पूरा तट भरा पड़ा है। भारी भीड़ के बावजूद समुद्र तट की स्वच्छता ध्यान खींचती है। स्वर्णिम रेत वाले इस बेहद खूबसूरत समुद्र तट पर तरह-तरह से अपनी ही मस्ती में डूबे लोगों को देखकर लगता है संसार में कहीं कोई कष्ट और अभाव नहीं है, आनन्द ही आनन्द है!

यहाँ यह सोचना भी जैसे इस आनन्द लोक में खलल डालना है। एक बड़ी शैतान लहर मुझे पूरा भिगोकर जैसे सचेत कर जाती है।

Saturday, 18 January 2014

सिंधु नदी


 
सिंधु नदी : संस्कृत - सिंधु (नदी), ग्रीक - सिंथोस, लॅटिन - सिंदुस. हिमालयात उगम पावणारी एक मोठी नदी. लांबी सु. ३,००० किमी. पूर्वी हिचा उल्लेख ‘किंग रिव्हर’ असा केला जाई. तिबेटच्या नैऋर्त्य भागात असलेल्या कैलास पर्वताच्या उत्तर भागात सिंधू नदी उगम पावते. हे उगमस्थान मानसरोवराच्या उत्तरेला सु. १०० किमी. व सस. पासून सु. ५,५०० मी. उंचीवर आहे. उगमानंतर ती हिमालयाच्या उतारावरुन वायव्य दिशेला वाहत जाते. उगमापासून गार नदी मिळेपर्यंतचा तिचा सु. २५७ किमी. लांबीचा प्रवाह सिंग-क-बाब किंवा सिंग-गे-चू या तिबेटी नावाने ओळखला जातो. पुढे ती भारताच्या जम्मू व काश्मीर राज्याच्या आग्नेय दिशेकडून राज्यात प्रवेश करुन राज्याच्या साधारण मध्यातून वायव्येस वाहत जाते. येथील तिचे खोरे रुक्ष व निर्जन आहे. काश्मीरमध्ये उत्तरेकडील लडाख पर्वतश्रेणी व दक्षिणेकडील झास्कर पर्वतश्रेणी यांदरम्यानच्या खोल घळईतून वायव्येस वाहताना लेहजवळ तिला झास्कर पर्वतश्रेणी पार करुन आलेली झास्कर ही उपनदी मिळते. पुढे स्कार्डूजवळ श्योक ही उपनदी येऊन मिळते. बाल्टिस्तानमध्ये खैटाशो गावाजवळ झास्कर पर्वतश्रेणी पार करुन सिंधू अतिशय खोल घळईतून वाहत रहाते. येथील घळई ही जगातील सर्वांत खोल घळ्यांपैकी

एक आहे. काराकोरम पर्वतश्रेणीच्या पायथ्याजवळ तिला गिलगिट नदी मिळाल्यानंतर एक मोठे वळण घेऊन सिंधू नैऋर्त्यवाहिनी बनते. पुढे नंगा पर्वताच्या पश्चिमेस हिमाद्री श्रेणीतील खोल अशा घळईतून ती वाहू लागते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते सिंधू नदीचे पात्र जुने असून हिमालय उंचावला जात असताना नदीचे खणनकार्य प्रभावी राहिल्याने सिंधू नदीने आपले पात्र कायम ठेवले आहे. सिंधू नदीमुळे हिंदुकुश ही हिमालयाची शाखा हिमालयापासून अलग झाली आहे.
  जम्मू व काश्मीर राज्यातून पुढे सिंधू पाकिस्तानात प्रवेश करते. पाकिस्तानच्या उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशातून काहीशी दक्षिणेस वाहत जाते. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांतून सु. १,६६५ किमी. चा प्रवास करुन अटकजवळ पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून ती पंजाबच्या पठारी प्रदेशात येते. तिचा उगमाजवळचा भूप्रदेश सस. पासून ५,५०० मी. उंचीचा असून अटकजवळच्या भूभागाची उंची ३०५ ते ४५७ मी. आहे. अटकजवळच तिला काबूल व स्वात नद्या येऊन मिळतात. त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद म्हणजे सु. २४४ मी. रुंदीचे बनते. येथे तिच्यातील पाण्याची पातळीही बरीच वाढत असून प्रवाहही खूप वेगवान असतो. अटक ते कालाबागपर्यंतचा प्रवाह उच्चभूमी व खडकाळ प्रदेशातून वाहत असल्यामुळे द्रुतगती आहे. या मार्गावरील चुनखडीच्या टेकाडांमुळे तिचा प्रवाह निळसर दिसतो, म्हणून तिला नील-आब हे नाव मिळाले आहे. पुढे सॉल्ट रेंज डोंगररांग पार करुन पाकिस्तानातील अर्धओसाड पंजाब मैदानात ती प्रवेश करते. डेरा इस्माइलखानजवळ ती दक्षिणवाहिनी होते. मिठाणकोटजवळ तिला पंचनद म्हणजे भारतातून वाहत जाणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज यांचा संयुक्त प्रवाह मिळतो. त्यामुळे तिचे पात्र सु. २·५ किमी. पर्यंत रुंद बनले असून प्रवाह मंदगतीने

वाहू लागतो. मिठाणकोटपासून पुढचा प्रवाह खोल, रुंद व संथ आहे. त्याला मिहरान म्हणतात. मिठाणकोटनंतर सिंधू पुन्हा नैऋर्त्येस वळून सिंध प्रांतात शिरते आणि कराचीच्या आग्नेयीस अनेक फाट्यांनी अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. या त्रिभुज प्रदेशाची सुरुवात थत्ता (तत्ता) पासून होते. हा त्रिभुज प्रदेश विस्तृत असून त्यातील बराचसा भाग दलदलयुक्त आहे.


एकेकाळी सिंधू नदी कच्छच्या रणातील दलदली प्रदेशाला जाऊन मिळत होती. तेव्हा ती सांप्रत पात्रापासून पूर्वेस सु. ११० किमी. वरुन, तसेच तिला समांतर वहात होती. कच्छचे रण हळुहळू भरुन आले आणि नदी पश्चिमेकडे सरकली. सक्कर धरणापासूनचा सिंधूच्या पूर्वेकडून वाहणारा पूर्व नार नावाचा एक फाटा पुढे कच्छच्या रणाकडे वाहत जातो, तर सिंधू नदीच्या मूळ पात्राच्या पश्चिमेस सु. १६ ते ३२ किमी. वरुन पश्चिम नार हा फाटा वाहतो.

श्योक, झास्कर, शिगर, गिलगिट, अस्तोर ह्या उपनद्या तसेच इतर अनेक प्रवाह मुख्य हिमालय श्रेणी, काराकोरम पर्वतश्रेणी, नंगा गिरिपिंड व कोहिस्तान उच्चभूमीवरील हिम व हिमाचे वितळलेले पाणी सिंधू नदीकडे वाहून आणतात. उत्तर पाकिस्तानातील काबूल, स्वात व कुर्र या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. टोची, गुल, झोब, विहोआ, संगर व रावनी या कमी लांबीच्या नद्या सुलेमान श्रेणीतून पूर्वेस वहात जाऊन सिंधूला मिळतात. भारतातून वहात येणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या सिंधूच्या सर्वांत मोठ्या उपनद्या आहेत. या पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह मिळाल्यानंतरचे सिंधूचे पात्र रुंद व उथळ बनले असून ती मंदगतीने वाहते. त्यामुळे तिच्या प्रवाहमार्गात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन होते. पुरापासून संरक्षण करण्यासाठी तिच्या काठावर बांध घातले आहेत; परंतु कधीकधी उत्प्रवाहाच्या वेळी पात्राबाहेर पाणी पसरुन मोठे नुकसान होते.

सिंधू नदीचे पाणलोट क्षेत्र ११,६५,५०० चौ. किमी. असून त्यांपैकी भारतातील क्षेत्र २७·५६ टक्के आहे. भारतातील सिंधूच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के जम्मू व काश्मीर राज्यात, १६ टक्के हिमाचल प्रदेशात, १६ टक्के पंजाबात, ५ टक्के राजस्थानमध्ये तर ३ टक्के हरयाणात आहे. तिचे वार्षिक प्रवाहमान नाईल नदीच्या प्रवाहमानापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. कारण सिंधूला काराकोरम, हिंदुकुश, मुख्य हिमालय पर्वतश्रेणी यांवरील हिमक्षेत्र व हिमनद्यांपासून तसेच हिमालयीन उप-नद्यांपासून पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात पावसामुळे व उन्हाळ्यात हिमालय पर्वतक्षेत्रांवरील बर्फ वितळून पाणीपुरवठा होत असल्यामुळे सिंधू बारमाही वाहणारी नदी आहे. तरीही ऋतुमानानुसार तिच्या पाण्याच्या पातळीत चढउतार आढळतात. हिवाळ्यात किमान प्रवाहमान असते. वसंत ऋतु व उन्हाळ्यात हिमनग वितळल्यामुळे प्रवाहमान वाढते, तर जुलै ते सप्टेंबर या पावसाळ्यातील कालावधीत नदीला पूर येतात. काही वेळा हे पूर विनाशकारी ठरतात. इ. स. १८४१ मध्ये अटक येथे आलेल्या पुराच्या वेळी पाण्याची पातळी चार तासांत २५ मीटरने वाढून हजारो चौ. किमी. क्षेत्र पूरगस्त झाले होते. मैदानी प्रदेशातील उष्ण व कोरड्या हवामानामुळे पृष्ठीय जलाचा पुरवठा कमी होतो. तसेच तेथील बाष्पीभवनाचा जास्त वेग व जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याची पातळी कमी असते.

जगातील जलसिंचनासाठी सर्वाधिक उपयोग केल्या जाणाऱ्या नद्यांपैकी ही एक नदी आहे. पाकिस्तानात हिचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचन व जलविद्युत्शक्ती निर्मितीसाठी केला जातो. प्राचीन काळापासून सिंधूचा जलसिंचनासाठी वापर केला जात आहे. बिटिश शासनाने सन १८५० नंतर कार्यान्वित केलेली कालवा जलसिंचन पद्घती ही जगातील सर्वांत मोठ्या आधुनिक कालवा सिंचन प्रकल्पांपैकी एक मानली जाते. सक्कर व कोत्री ही प्रमुख धरणे आहेत. सक्कर येथील लॉइड धरण १९३२ मध्ये बांधून पूर्ण झाले असून ते विशेष महत्त्वाचे आहे. टार्बेला धरण हे जलसाठयच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. कालाबाग येथे सिंधू चुनखडीयुक्त घळईतून वाहते. येथील भक्कम तळभागामुळे येथे थळ हा जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आला आहे. पाकिस्तानातील ओसाड व निमओसाड प्रदेशाला पाणीपुरवठा करणारा सिंधू हाच प्रमुख स्रोत असून, त्यामुळेच येथील कृषी विकास घडून आला आहे. ईजिप्तमध्ये जसे नाईलला महत्त्व तसे पाकिस्तानात सिंधूला महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंधू खोरे हे प्रमुख कृषी क्षेत्र असून गहू, मका, तांदूळ, बारीक तृणधान्य, कापूस, खजूर व फळे ही या खोऱ्यातील प्रमुख पिके आहेत.

हिंदुस्थानच्या फाळणीमुळे सिंधू खोऱ्यातील सर्वाधिक पाण्याचा लाभ पाकिस्तानला झाला. सिंधूचे मुख्य खोरे पाकिस्तानात गेले, तर तिच्या प्रमुख उपनद्यांचे शीर्षप्रवाह भारतात राहिले. सिंधू व तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपावरुन भारत-पाकिस्तान दरम्यान अनेकदा वाद निर्माण झाले. त्या दृष्टीने १९६० मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान सिंधू पाणी वाटपासंदर्भातील करार करण्यात आला आहे.



सिंधू नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. खाद्योपयोगी मत्स्यप्रकारांस पल्ल असे म्हणतात. थत्ता, कोट्री व सक्कर ही पाकिस्तानातील प्रमुख मासेमारी केंद्रे आहेत. पूर्वी सिंधू नदीतून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक केली जाई; परंतु सिंधू खोऱ्यातून लोहमार्ग टाकण्यात आल्यापासून (१८७८) आणि जलसिंचन प्रकल्पांचा विस्तार करण्यात आल्यापासून व्यापारी जलमार्ग म्हणून सिंधूचे महत्त्व कमी झाले. सांप्रत केवळ खालच्या टप्प्यात लहानलहान बोटींचा वाहतुकीसाठी
वापर केला जातो.

सिंधू नदीचे खोरे हे पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे खोरे आहे. सिंधू नदीच्या तीरावरील व तीराजवळील पाकिस्तानमधील प्रमुख नगरे पुढीलप्रमाणे आहेत : कराची, कोत्री, ठठ्ठा, केंटा, हैदराबाद, सेहवान, सक्कर, रोहरी, मिठानकोट, डेरा गाझीखान, डेरा इस्माइलखान, मिआनवाली, कालाबाग, खुशालगढ व अटक. जम्मू व काश्मीर राज्यातील सिंधूच्या खोऱ्यात गिलगिट, स्कार्डू, लेह ही प्रमुख नगरे आहेत.

सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहें-जो-दडो, हडप्पा, चन्हुदारो इ. ठिकाणी केलेल्या उत्खननात एका अत्यंत प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले. ही प्राचीन संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती होय. या संस्कृतीचा उगम व विकास याच नदीखोऱ्यात झाला. या संस्कृतीचे मुख्य केंद्र सिंधू व हाका नद्यांच्या पूरमैदानात होते. या संस्कृतीचा विस्तार सांप्रत पाकिस्तान, उत्तर भारत व अफगाणिस्तानात होता. काही संशोधकांच्या मते सिंधूसंस्कृतीचा प्रसार कालांतराने दक्षिण भारतात झाला. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या वेगवेगळ्या कारणांपैकी हाका नदीचा वाढत गेलेला कोरडेपणा व सिंधू नदीने वारंवार बदललेले प्रवाहमार्ग हे एक कारण सांगितले जाते. महाकाव्ये, पुराणे इ. प्राचीन गंथातही या नदीचा महिमा वर्णिलेला आहे. वैदिक साहित्यात सिंधू नदीचा निर्देश अनेकदा झालेला आहे. ऋग्वेदाच्या काही ऋचांत सिंधू हा शब्द काही ठिकाणी सागर या अर्थी, तर काही ठिकाणी नदी या अर्थाने वापरला आहे. सिंधू या शब्दावरुनच हिंदू हे नाव उद्भवले आहे. बेहिस्तून येथील पहिल्या डरायसच्या प्रस्तरलेखात सिंधू नदीला हिंदू हेच नाव दिलेले आढळते. संस्कृत वाङ्मयात तिचा उल्लेख हिंदू असा केलेला आहे. आर्य लोक सिंधूला पवित्र मानत.