Wikipedia

Search results

Wednesday, 25 September 2013

मोझेस


मोझेस
येथे जा: सुचालन, शोधयंत्र
मायकेल अ‍ॅँजेलो याने घडवलेले मोझेसचे शिल्प

मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.

मोझेस : (इ. स. पू. सु. चौदावे-तेरावे शतक). ज्यू राष्ट्रसंस्थापक, सर्वश्रेष्ठ ज्यू प्रेषित व ज्यूंना त्यांची धार्मिक-नैतिक सामाजिक संहिता देणारा एक श्रेष्ठ नेता. मोझेस (हिब्रू मोशे) हा शब्द ईजिप्शियन भाषेत ‘मोसे’ म्हणजे मुलगा या अर्थाचा आहे. त्याचा जन्म ईजिप्तमध्ये झाला. मोझेसचा पिता अम्राम व आई जोशेबेद. हे दोघेही लेव्ही जमातीचे ज्यू होते. परंतु ज्या दुसरा रॅमसीझ (कार. इ. स. पू. सु. १३०४-१२३७) ह्या ईजिप्ती राजाच्या (फेअरो) राज्यात ते गुलाम म्हणून राहत होते, त्याने ज्यूंच्या मुलांना नाईल नदीत बुडवून मारावे असा हुकूम काढला होता. मोझेसला त्याच्या आई-वडिलांनी तीन महिने कसेतरी गुप्तपणे सांभाळले; परंतु शेवटी त्यांनी त्याला गवताच्या पेटाऱ्यात ठेवून नाईल नदीत सोडून दिले. सुदैवाने फेअरीची राजकन्या नदीवर आंघोळीस आली असता तिला हे मूल आढळले व ते तिला इतके आवडले, का तिने त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे पालनपोषण केले व त्याचे नाव ‘मोझेस’ असे ठेवले. मोझेस मोठा झाल्यावर एकदा त्याने एक ईजिप्शियन माणूस एका ज्यूचा छळ करीत असताना पाहिले. लगेच त्याने त्या माणसास ठार केले. मोझेसच्या रक्तातला हा गुण उत्तरोत्तर अधिक प्रगट होऊ लागला. फेअरोच्या हाती सापडण्यापूर्वीच तो तेथून पळाला व जेथ्रो ह्या मीडियनच्या धर्मगुरूकडे आला. तिथे त्याने त्या धर्मगुरूची मुलगी झिप्पोरा हिच्याशी लग्न केले. मोझेसपासून जेरशोम व एलिएझर हे दोन पुत्रही झाले. तिथेच मोझेसने चाळीस वर्षे मेंढपाळाचा व्यवसाय केला. एकदा होरेब पर्वतावर मेंढ्या चारीत असता मोझेसला एका झुडपात अग्निज्वाला दिसली आणि तरीही ते झुडूप जळत नव्हते. तो जवळ गेला तेव्हा त्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला व ईजिप्तला परत जाऊन आपल्या भाऊबंदांना सोडवून आणण्याचा परमेश्वरी आदेश मिळाला. त्याप्रमाणे तो ईजिप्तला आला. तिथे त्याला त्याचा भाऊ ⇨ एअरन  भेटला. ज्यूंना सोडून देण्यासाठी फेअरोचे मन वळविणे कठीण आहे असे दोघा भावांना पटले. मग मोझेसच्या दैवी शक्तीमुळे येहोवाने ईजिप्तवर दहा वेळा प्लेगच्या साथी आणल्या. शेवटी ईजिप्शियन लोकांनी ज्यूंचा छळ थांबवून त्यांना सोडून दिले. मग सारे ज्यू आपली मेंढरे घेऊन सुएझच्या दक्षिणेकडे वसाहत करण्यासाठी निघाले. त्यांचे नेतृत्व मोझेसने केले. हा प्रसंग ‘एक्झोडस’ म्हणून बायबलमध्ये व इतिहासातही प्रख्यात आहे. त्यांच्यावर अनेक संकटे आली; पणे त्यांना ईश्वराने-येहोवाने सांभाळले. सिनाई येथे सारे आले तेव्हा त्यांचे मोठे स्वागत झाले. इथेच या पर्वताच्या शिखरावर (जेबेल मूसा) मोझेसला ईश्वरी साधात्कार झाला व ईश्वराने त्याला आपल्या ‘दशाज्ञा’ वा दहा नीतिनियम दिले. सिनाई पर्वतावर मोझेस ४० दिवस ईश्वराच्या सान्निध्यात होता. नंतर खाली येऊन त्याने आपल्या भाईबंदांना कादेश येथे नेले. तेथून ३८ वर्षांनंतर ते पूर्वेकडे निघाले. एसौ व मोआब याच्या प्रदेशातून त्यांना सुखरूपाणे जाता आले; परंतु पुढे त्यांच्या मार्गात प्रतिबंध आला. जॉर्डन नदी ओलांडून पलीकडे कॅनन प्रदेशात जाता येणार नाही व आपला अंत काळही जवळ येऊन ठेपला आहे असे पाहून मोझेसने आपल्या साऱ्या बांधवांना बोलावून त्यांना शेवटचा संदेश दिला (‘ड्यूटेरोनॉमी’ वा ‘पेंटाट्यूक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बायबलमधील  पहिल्या पाच पुस्तकांत हा संदेश ग्रंथित आहे) नंतर सर्वांना आशीर्वाद देऊन तसेच जोशुआ आपला वारस नियुक्त करून मोझेस नेबो पर्वतावरील पिसगाह शिखरावर गेला व तिथे त्याने वयाच्या एकशेविसाव्या वर्षी देह ठेवला. इ. स. पू. सु. १३९२ ते सु. १२७२ असा त्याचा आयुकाल अभ्यासक मानतात.



ज्यू धर्माप्रमाणे येहोवाने इझ्राएल राष्ट्र निर्माण करण्यासाठी मोझेसला प्रेषित बनविले होते व त्याच्या द्वारा ईश्वर आपल्या साऱ्या आज्ञा ज्यू जनतेला कळवीत राहिला. मोझेस हा स्वभावाने अत्यंत शांत होता, असे त्याचे वर्णन आढळते. ‘ज्याने ईश्वराला समोरासमोर पाहिले असा धर्मप्रेषित एकटा मोझेसच होय’, अशी त्याची थोरवी गायिली जाते. ज्या काळात मोझेसने आपल्या बांधवांची एकी घडवून आणली त्या काळात येहोवा या देवाचा नाममहिमा नुकताच सुरू झाला होता. अशा काळात मोझेसच्या प्रयत्नांमुळे ज्यू जनतेने ईश्वरावर श्रद्धा ठेवली. ‘सिनाई पर्वतावरून जे वादळ आले त्यामुळे साऱ्या वाळवंटावर पावसाचा वर्षाव झाला व जिकडे तिकडे पिके डवरून आली’, या त्यांच्या उद्‌गारावरून मोझेसने ज्या ईश्वरावर त्यांना श्रद्धा ठेवायला सांगितले, त्याने अनेक चमत्कार केल्याच्या कथा आहेत. मोझेस खरोखरच त्यांना मदत करणारा ठरला. मोझेसची खरी कीर्ती त्याने घालून दिलेल्या नियमामुळे विशेष झाली आहे. मोझेसच्या ड्यूटेरोनॉमीतल्या नियमांमुळे ज्यू लोकांची एकी झाली, त्यांच्यात राष्ट्रीय भावना निर्माण झाली; इतकेच नव्हे, तर धर्माची खरी कसोटी विधी आणि पूजा यांवर अवलंबून नसून नैतिक आचारणावर आहे, हा दृष्टिकोन त्यांना प्रथम मोझेसकडून मिळाला.


मायकेलअँजेलो या प्रसिद्ध कलावंताने तयार केलेल्या मोझेसच्या पुतळ्यात मोझेसच्या कपळातून शिंगे बाहेर आलेली दाखविली आहेत. मोझेसच्या कपाळावरील शिंगाची कल्पना मूळ हिब्रूवरून लॅटिनमध्ये झालेल्या चुकीच्या भाषांतरामुळे आली आहे. ’जेव्हा मोझेस सिनाई पर्वतावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावरील कातडी चमकत होती’ या बायबलच्या वाक्यातील मूळ हिब्रूतील ‘चमकत होती’ या अर्थाचा शब्दप्रयोग ‘(तिच्यातून) किरणे निघत होती’ असा आहे. लॅटिनमध्ये ‘किरण’ व ‘शिंग’ यांचा घोटाळा केला गेला. मोझेसच्या जीवनातील प्रसंगांवर अनेक प्रख्यात चित्रकारांनी आणि शिल्पकारांनी आपल्या चित्र-शिल्पाकृती तयार केल्या आहेत.

Saturday, 17 August 2013

राजन खान

राजन खान

मराठीतले नावाजलेले कथा आणि कादंबरीकार.
त्यांनी ग्रामीण भागातील दलित आणि मुस्लिम समाजाचे (मुख्यतः स्त्रियांचे) प्रश्न, व स्वार्थी राजकारणी लोकांनी त्यांचा घेतलेला गैरफायदा ह्याचे विदारक पण अतिशय वास्तव चित्र कादंबऱ्यांद्वारे मांडले आहे.
प्रकाशित साहित्य

  •     सत्‌ ना गत (कादंबरी)
  •     हिलाल (कादंबरी)
  •     जिनगानी (ललित)
  •     बाईच्या प्रेमाच्या दोन गोष्टी
  •     एडनच्या बागेतील सर्प (कथा संग्रह)
  •     पिढी (वैचारीक)
  •     पांढऱ्या जगातला अंधार
  •     बाई जात (कथा संग्रह)
  •     ग्वाही आणि वेगळी नसलेली गोष्ट (एकत्र २ कादंबऱ्या)
  •     गूढ (कथा संग्रह)
  •     जिरायत (ललित)
  •     इह (माहितीपर)
  •     मीच मला माहिती नाही (कादंबरी)
  •     किंबहुना (ललित)
  •     सध्या सारं असं चालू आहे (कथा संग्रह)
  •     तत्रैव (कथा संग्रह)
  •     एक लेखक खर्च झाला (कथा संग्रह)
  •     अजब गजब जगणं वागणं (वैचारिक)
  •     एकूण माणसांचा प्रदेश (कथा संग्रह)
  •     बीजधारणा (कादंबरी)
  •     काळ (कादंबरी)
  •     गाठी गाठी जीव (कादंबरी)
  •     जन्मजंजाळ (कथा संग्रह)
  •     हयात आणि मजार (कादंबरी)
  •     यतीम (कादंबरी)
  •     जातवान आणि विनशन (कादंबरी)
  •     वळूबनातली कामधेनू (कादंबरी)
  •     चिमूटभर रुढीबाज आभाळ (कादंबरी)


पुरस्कार
    महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पटकथा पुरस्कार (चित्रपटः धुडगूस, २००९)

इतर
    २००८ साली मराठी साहित्य संमेलनाच्या उमेदवारांपैकी एक (विरुद्ध: प्रा. हातकणंगलेकर)
    राजन खान यांनी २००९ साली मी संमेलन नावाचे एक साहित्य संमेलन पाचगणीजवळच्या एका खेड्यात भरवले होते.

राजन खान यांचे घणाघाती भाषण

 

१. मला एक जण भेटायला आला तो ढोंगीपणे शिवाजी महाराज म्हणायच्या आधी 'छत्रपती' हा शब्द वापरत होता. प्रत्येकवेळेस छत्रपती म्हणताना त्याची देहबोली मी पाहात होतो. तो उच्चार ढोंगी होता. तसेच प्रत्येक वेळेस तुकारामांचा उल्लेख करताना तो जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणत होता. मी त्याला म्हणालो की महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुर्‍हाणपूर या गावापलीकडेही तुकारामांचे नांव कुणाला माहीत नाही. ते जगद्गुरू कसे? जगात सहाशे पन्नास कोटी लोक राहतात व महाराष्ट्रात दहा कोटी! म्हणजे बाकीच्या सहाशे चाळीस कोटी लोकांना जवळपास माहीतही नसलेला संत आपण जगद्गुरू म्हणून नावाजतो याला काही अर्थ आहे का?
२. मराही साहित्यात मुसलमान कायम क्रूर म्हणून रेखाटला गेलेला आहे. मुसलमानांची वागणूक, राहणी याची अजिबात कल्पनाही नसताना मुसलमान रेखाटणारे मराठी साहित्याचाच अपमान करत आहेत.
३. मराठी लेखक 'स्वतःच्या बाहेर जाऊन' काहीही लेखन करत नाही. संशोधन करणे, कष्ट काढून जीवनचे इतर पैलू तपासणे, अभ्यासणे व नंतर रेखाटणे हे प्रकार तो करतच नाही. ब्राह्मणाला सांगीतले की महार माणूस लेखनात चितार, तर तो ग्रामीन शब्दांचा समावेश असलेले लेखन करतो इतकेच! प्रत्यक्षात महाराची जीवनशैली तपासण्याची इच्छा नसते. उलटे महाराला जर सांगितले की ब्राह्मण माणसे कशी असतात हे लेखनात चितार, तर तोही आजवर वाचलेल्या साहित्याचा पगडा म्हणून तसेच लिहितो. तो कधीही ब्राह्मणाचे आचरण जवळून पाहात नाही. ज्यांनी कोणी असे परजातीय चित्रण केलेले आहे तेही त्यांच्या अनुभवात जे आहे तितकेच! त्या पलीकडे जाऊन नाही.
४. मराठीतीत बहुतेक साहित्य हे असेच आहे. आजवर मी (मी म्हणजे राजन खान), हमो व आणखीन काही समकालीन माणसांनी वयाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राने, मराठी भाषेने गौरवलेले साहित्य वाचले. मात्र आज या टप्यावर आम्हाला असे वाटते की आपण नेमके काय वाचले? तर ते साहित्य, ज्यात 'मी' व 'मी पाहिलेले आयुष्य' या पलीकडे काहीही नाही? कल्पनाविस्तार, संशोधन, प्रवास, अनोळखी जगाचा परिचय, त्यात वास्तव्य, सखोलतेची अशी पातळी की जेथे मानवजमातीतील कोणत्याही प्रदेशात, वंशात त्या साहित्याचे मूल्य अमूल्य ठरावे असे मराठी साहित्यात काही मिळाले नाही. एखाद्याने लेखन केले तर त्याच्या कथेत महार किंवा एखादे ग्रामीण पात्र जरूर असते. ते पात्र म्या, व्हय, नाय असे शब्दही बोलते. मात्र फक्त ग्रामीण भाषेचा बाज हे ग्रामीण जीवन नाहीच.
५. जागतिक पातळीवरच्या लेखकांचे लेखन महाराष्ट्रात गौरवले जाते. आजही जगाच्या कानाकोपर्‍यात कुठे ना कुठे शेक्सपिअरचा एक खेळ चाललेलाच असतो. महाराष्ट्राचे साहित्य मात्र जागतिक पातळीवर गेलेले नाही. याला मराठी रसिकांच्या कोत्या आणि लेखकांच्या मत्सरी प्रवृत्ती कारणीभूत आहेत. तसेच, मराठी भाषेने आजवर लेखकाला भौतिक श्रीमंती प्रदान केलेली नाही. ज्या रस्त्यावर प्रकाशक गाडीतून फिरतो त्या रस्त्यावर लेखक फुटपाथवरून पुढच्या कथेचा विचार करत चाललेला असतो व दुसरा विचार त्याच्या मनात हा असतो की पैसे आणले नाहीत म्हणून बायको किती आणि कशी बोलेल?
६. काळाच्या पुढचे, निदान शंभर वर्षे पुढचे असे लेखन मराठी माणूस करतच नाही. तो त्याच्याच जीवनाचे चित्रण करत राहतो. अशा साहित्यामुळे ते साहित्य वाचणारा समाजही तेथेच राहतो. उलट, काही महान महाराष्ट्रीय साहित्यिकांचे साहित्य वाचून तर समाज मागेच जातो. समाजाच्या बौद्धिक प्रगतीसाठी व नवीन आव्हाने स्वीकारण्याच्या वृत्तीच्या वाढीसाठी साहित्यात नवेपणा, नवीन पैलू, काळाच्याही पुढचे सोचण्याची क्षमता साहित्यिकांमध्ये असायला हवी व असल्यास ती त्यांनी जोपासायला हवी व समाजाने त्या साहित्यिकांना आधार द्यायला हवा.
७. मोठमोठे कवी, मोठमोठे लेखक जे प्रचंड गौरवले गेले व ज्यांचे साहित्य अभ्यास म्हणून अभ्यासण्यात आले व ज्यांनी साहित्याच्या दर्जा
देव ,धर्म आणि जात सगळे काल्पनिक : राजन खान


 

मी कुठल्याच धर्माचा नाही , देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे . देव , धर्म आणि जात काल्पनिक आहे . असे प्रतिपादन राजन खान यांनी संजीवनी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना केले .

त्यांनी यावेळी सांगितले की , आजपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव , धर्म मानणा - या लोकांनीच केला आहे . या देशातील ६० टक्के लोक गरीब आहेत . सर्व देव मानणारे आहेत . देव त्याचं भल्ल का करत नाही ? गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत . भ्रष्टाचारी अधिका अधिक श्रीमंत होत चालले आहेत आणि देवबाप्पा काहीच करायला तयार नाही . हि या देशाची वाईट अवस्था आहे . या जगात एक ही मुसलमान खरा मुसलमान नाही , एक ही हिंदू खरा हिंदू नाही , एक ही ख्रिश्चन खरा ख्रिश्चन नाही . त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत . गर्वसे कहो म्हणणारे तेवढ्या पुरतेच त्या त्या धर्माचे आहेत .

धर्म त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होइल . प्रत्येक धर्म मुलभूत पणे एक शिकवण देतो , दुस - या माणसाला माणूस म्हणून वागव , किमंत दे . धर्माचा गर्व मानणारे , सर्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत . खरे धार्मिक नहीत . दोन पर्याय आहेत , एक धर्म सोडा जे जगायचे आहे तसे जगा . किवा विनंती पूर्ण सागणे आहे कि जो धर्म आहे तरी नीट पाळा , इमानदारीत पाळा . कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही . मारण्या आधी जगणार का हा प्रश्न आहे . मला वाटते बिनधर्माचं नैतिक जगता येते . नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुस - या माणसाशी मायेने , आपुलकीने आणि माणसा सारखं वागणे म्हणजे नैतिकता . पाळायचा असेल तर खरोखर धर्म पाळा , नाहीतर धर्म सोडा . आपला धर्म शोधा त्याचा अभ्यास करा त्याचे पालन करा , असे खान यांनी स्पष्ट केले . मनोज पाटील यांनी प्रास्ताविक पाहुण्याची ओळख करून दिली . अध्यक्षस्थानी पंढरीनाथ नाईक होते . सूत्रसंचलन कोमल जोशी यांनी केले . ईशस्तवन तेजल पाटील यांनी सादर केले .

जागतिक साहित्य निर्मितीसाठी सर्व भेद सोडावे लागतील- राजन खान
 जागतिक साहित्य मानवतावादी व विज्ञानवादी असते. ते निर्माण करण्यास सर्व भेद सोडावे लागतील, असे प्रतिपादन २० व्या नवोदित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन खान यांनी केले.
पुष्पक मंगल कार्यालयातील महात्मा फुले साहित्यनगरीत आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे, मराठा सेवासंघाचे प्रदीप साळुंके, सतीश मडके आदींची उपस्थिती होती. पोटाला आधार देण्याची धमक मराठी भाषेत आहे. मात्र, शिक्षणसम्राट असलेले नेते व त्यांच्यामागे धावणारे तथाकथित लेखक यांच्यामुळे मराठी भाषा अडचणीत आली आहे. साहित्यात इंग्रजी भाषेचा वापर करणारे बांडगे साहित्यिकच भाषेच्या मुळावर उठले असल्याचे खान यांनी सांगितले.
बोराडे यांनी साहित्य म्हणजे माणसाच्या जगण्याचा इतिहास असतो. तो तटस्थपणेच मांडायला हवा, असे सांगून विशिष्ट स्थितीत होत असलेल्या संमेलनातून इतिहासात कधी नव्हे, इतक्या तीव्र स्वरूपात निर्माण झालेल्या पाणी, चारा व रोजगार टंचाईचे प्रतििबब उमटणे गरजेचे आहे, असे नमूद केले. स्वागताध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी भीषण परिस्थितीला लेखणीच्या माध्यमातून पर्याय मिळावा. वास्तव सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी संधी म्हणून संमेलन आयोजित केल्याची भूमिका मांडली.
कार्याध्यक्ष शरद गोरे यांनी साहित्य परिषदेच्या कामांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ यादव यांनी आभार मानले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना संमेलनाध्यक्ष खान व बोराडे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘आता सावध राहा’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी हरी नरके समितीने केंद्राकडे प्रस्ताव दिला. वर्ष-दीड वर्षांत त्याला मंजुरी मिळेल. मराठीचे भाषिक संवर्धन करण्यासाठी केंद्राकडून दरवर्षी ५०० कोटींचा निधी उपलब्ध होईल, असे सांगून खान यांनी आता सावध राहा, असा सल्ला दिला. राज्यातील अनेक िशगारू संस्था या ५०० कोटींकडे डोळे लावून बसल्या आहेत. नाही तर पुन्हा मेहनत करे मुर्गा, अंडा खाए फकीर असे घडेल आणि अनेक फकीर सध्या पुण्यात संस्था काढून बसले असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राने संत तुकाराम, ज्ञानेश्वर या कवींची देवळे बांधली. त्यांची नित्यनियमाने पूजा केली जाते. मात्र, त्यांनी दिलेला विचार देवळांमध्येच कोंडला असल्याची खंतही खान यांनी व्यक्त केली.

Monday, 5 August 2013

जिवलग मित्र

जिवलग मित्र

मैत्री म्हणजे काय हे शब्दात सांगता येत नाही.
जिवलग मित्र हा नशीबानेच मिळू शकतो
इतर कोणत्याही नात्यापेक्षा
मैत्री खूपच चांगलं नांत....
जिवलग मित्र
तोच... जो आपल्या सुखात आणि दु:खातही सोबत करतो.
मित्राची खरी कसोटी संकटाच्याच वेळी होत असते.
मित्र हा आपल्या मैत्रीसाठी कोणताही त्याग करू शकतो
ज्या व्यक्तिला अशी मैत्री भेटली तो भाग्यवानच..... 

 
सत्याची कास सोडू नये
होउदे मनास किती त्रास
डोक्यातून अश्रू सांडू नये
प्रयत्त्नाने यश लाभेलच
त्यासाठी वेळ वाया दवडू नये
करावी मैत्री निरपेक्ष,
स्वार्थीपण मैत्रीत असूच नये...

मैत्रीचा निर्मळ धागा काही
काळापुरता जोडणारा नसावा
तर ती अनंत काळची असावी.
मैत्रीमधूनच काही नाती निर्माण होतात ती
गुलाबासारखी निर्मळ असावी
आणि मोगर्‍याच्या फुलासारखी सुंगधित असावी. 

\


मैत्री की प्रेम...?


कधी न संपणारी फक्त मैत्रीच असते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच न संपणारे
मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन् फसवा
मैत्री नाजूक धागा अन् अतूट बंधन
प्रेम कितीही नाजूक
पण...
तुटतेच कधीतरी
मैत्रीचे तसे नाही
मैत्री दोघही निभावतात
   मैत्रीनेच प्रेमाला सुरुवात होते
माझ्या मैत्रीत प्रेम आहे
पण माझ्या प्रेमात मैत्री
कधीच नसणार
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की
प्रेमापेक्षा जास्त मैत्री
मग तुम्ही काय मागाल?
मैत्री की प्रेम?

Saturday, 20 July 2013

गोळाबेरीज

गोळाबेरीज
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत पुलं तथा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची जादू आजही मराठी मनावर कायम आहे . लेखक , कवी , दिग्दर्शक , नाटककार , नट , वादक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पुलंच्या कलाकृतींचा मोह अनेक नटांना झाला . म्हणूनच त्यांच्या कलाकृतींचे सादरीकरण आजही अनेक ठिकाणी होत असते . अखिल मराठीजनांना हसवणाऱ्या पुलंची गोष्ट आता प्रथमच रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे .

अभिनेता - दिग्दर्शक क्षितीज झारापकरने हे शिवधनुष्य उचलायचे ठरवले आहे . ' गोळाबेरीज ' असे नाव असलेल्या या भव्य सिनेमात मराठी मनोरंजनविश्वातले तब्बल ४२ स्टार्स असणार आहेत .

पुलंची २७ पुस्तकं , त्यांच्यावरचे ३ माहितीपट , त्यांचे पाच सिनेमे आणि काही लेखांचा समावेश या सिनेमात करण्यात आला आहे . याबाबत बोलताना दिग्दर्शक क्षितीज म्हणाला , ' एखाद्या लेखकावर सिनेमा करावा असे मला वाटत होते . त्यासाठी पुलंशिवाय दुसरं नाव नव्हतेच . कारण , ते स्वत : बहुआयामी प्रतिभावंत होतेच . पण , त्यांना भेटलेल्या माणसांचे अचूक वर्णन त्यांच्या लेखनात दिसते . सिनेमा करण्यासाठी ही पात्रे अत्यंत महत्त्वाची होती . हा सिनेमा म्हणजे पुलंचा इतिहास नव्हे , तर त्यांची गोष्ट असेल .'
   पुलंच्या जन्मापासून साठीपर्यंतचा प्रवास या सिनेमात दिसेल . या प्रवासादरम्यान त्यांना भेटलेली माणसे या सिनेमात येतील . हरितात्या , दामले मास्तर , चितळे मास्तर , नंदा प्रधान , सोन्या बागलणकर , अंतू बरवा , बाबा आमटे , नामू परीट , रावसाहेब , सखाराम गटणे , पेस्तन काका , नारायण अशी त्यांच्या पुस्तकांतून भेटलेली सगळी माणसे या सिनेमात पुलंसोबत दिसतील . यासाठी ' खोगीरभरती ', ' गोळाबेरीज ', ' हसवणूक ', ' व्यक्ती आणि वल्ली ', ' गणगोत ', ' बटाट्याची चाळ ', ' असा मी असामी ', ' म्हैस ', ' काही अप्स काही डाऊन्स ' आदी पुस्तके - लेखांसोबत ' गुळाचा गणपती ', ' दूधभात ', ' पुढचं पाऊल ' अशा सिनेमांचे काही अंश यात असतील . त्यांच्या मूळ कलाकृतींना कोणताही धक्का न लावता त्यांना या पटकथेत समाविष्ट केले जाणार आहे . सिनेमाची कथा , पटकथा , संवाद क्षितीजचेच आहेत . ' पुलंचे लिखाण विनोदी होतेच . पण , त्यात आयुष्याचे मोठे तत्त्वज्ञान लपलेले असे . ते अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न असेल . या सिनेमाला परवानगी देतानाच , आपल्याकडील पुलंचे अप्रकाशित साहित्य , त्यांची भाषणे , पेटीवादन असा सर्व खजिना देण्याची तयारी पुलंच्या नातेवाईकांनी दर्शवली आहे ,' अशी माहितीही त्याने दिली .

पुलंसाठी सर्वसृष्टी एकत्र ?
' गोळाबेरीज ' चे शूट ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून , सध्या कलाकारांना करारबद्ध करण्याचे काम सुरू आहे . एकूण ७७ पैकी ४२ भूमिकांसाठी सिने , नाट्य , टीव्हीसृष्टीतल्या ४२ स्टार्सकडे विचारणा करण्यात आली आहे . या सर्वांनी होकार दिला , तर पुलंसाठी संपूर्ण इंडस्ट्री एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे .

Wednesday, 3 July 2013

औरंगजेब

औरंगजेब

औरंगजेब (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हा मुघल सम्राट होता. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता.[ संदर्भ हवा ] गैर-मुसलमान जनते वर असा कायदा लागू करणारा तो पहला मुसलमान राज्यकर्ता होता.[ संदर्भ हवा ] त्याने आपल्या आयुष्यातील काळ बव्हंशी दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि ईतर विरोधकांवर अंकूश ठेवण्याच्या प्रयत्नात घालवला.


औरंगजेब
बादशाह
Aurangzeb reading the Quran.jpg
औरंगजेब कुराण पठण करताना, इसवी सनाच्या १८ व्या शतकातील अनामिक चित्रकाराने रंगविलेले चित्र
अधिकारकाळ १६५९-१७०७
पूर्ण नाव अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर
जन्म नोव्हेंबर ३, १६१८

दाहोद, भारत
मृत्यू मार्च ३, १७०७

औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
पूर्वाधिकारी शाह जहान
उत्तराधिकारी बहादूर शाह पहिला
पत्नी रबिया दुर्रानी, दिलरास बानो बेगम
संतती * बहादूर शाह पहिला, पुत्र
राजघराणे मुघल

राजकीय कारकिर्दीची सुरुवात

१६३४ मधे शाहजहानने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने खडकी या शहराचे नाव बदलून ते औरंगाबाद केले. 1637 साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने दाराशुकोला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगीतले. 1644 मध्ये औरंगजेबाची बहिण एका दुर्घटनेत जळुन मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आँग्रा येथे आला, यामुळे बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारी वरुन पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँ. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केलेँ, येथे त्याने आपल्यातील कसब लावून काम केले. फलस्वरुप त्याला बदख्शान (अफगाणिस्तान) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.

सत्तासंघर्ष

सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला. त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दारा शिकोह, शाह सुजा आणि औरंगज़ेब यांच्यत सत्ता संघर्ष सुरु झाला. शाह सुज़ा, ज्यने स्वतःला बंगालचा गवर्नर म्हणून घोषित केल होतं त्याला हार पत्करुन बर्मायेथील अराकान क्षेत्री जावं लागलं आणि १६५९ साली औरंगज़ेबानी शाहजहाँला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. दारा शिकोहचा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहाँला मारण्यासाठी औरंगज़ेबाने दोनदा विष पाठवलं होतं. पण त्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहाँला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकलं.

मराठ्यांविरुद्ध युद्ध

मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.

सुरतेची पहिली लूट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.

मिर्झाराजे जयसिंहाची मोहीम

इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले. आग्र्याहून सुटका

शिवाजीची आग्र्यातील नजरकैद

इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे. सर्वत्र विजयी घोडदौड
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. इ.स. १६७९ मध्ये स्वतः औरंगजेब मोठ्या फौजेसह दक्षिणेच्या मोहिमेवर निघाला. याच दरम्यान ३० एप्रिल, इ.स. १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. त्यांच्या नंतर संभाजी राजांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. 1689 मध्ये संभाजीला हालहाल करून त्यांचा वध करण्यात आला. २७ वर्षे सतत लढाई करूनही औरंगजेबाच्या हाती काहीच लागले नाही. औरंगजेब कडवा धर्मवेडा होता. त्याने अनेक हिंदूना जबरदस्तीने इस्लामचा स्विकार करायला भाग पाडले. त्यातच दक्षिणेतील मोहीमेत अपेक्षेच्या उलट मराठ्यांनी कडवी झुंज दिल्याने एवढ्या प्रदिर्घ आणि खर्चीक मोहीमेतून त्याला काहीच साधता आले नाही. जबरदस्तीच्या धर्म परीवर्तन धोरणांमुळे औरंगजेबाच्या इस्लामकेतर सैन्यात बंडाळी खदखदू लागली. त्यातच जीर्ण झालेल्या औरंगजेबाचा ३ मार्च, इ.स. १७०७ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे मृत्यु झाला, त्याच्या निधनानंतर राजपुतांनी मोठी बंडाळी केली. औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला हिंदुस्तानवर कधीच अधिराज्य गाजवता आले नाही. इ.स. १७५१ मध्ये दिल्लीची अवस्था इतकी बिकट बनली की पेशव्यांना "अहमदिया" करार करून दिल्लीच्या आणि "शहेंशाहच्या" संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली.
 

Tuesday, 28 May 2013

निजामशाही


अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
 स्थापना

इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्या बहमनी सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.

२८ मे, इ.स. १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामांतर केले.

पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. चांद बिबी ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अंबर हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.
घराणे
या सल्तनतीच्या अधिकारारूढ सुलतानांना निजामशाह या किताबाने उल्लेखले जाई.
नाव     कार्यकाळ (इ.स.)
अहमद निजामशाह     १४९० - १५०८
बुऱ्हाण निजामशाह     १५०८ - १५५३
हुसेन निजामशाह     १५५३ - १५६५
मूर्तझा निजामशाह     १५६५ - १५८८
मिरान हुसेन     १५८८ - १५८८
इस्माइल निजामशाह     १५८८ - १५९०
दुसरा बुऱ्हाण निजामशाह     १५९० - १५९५
इब्राहिम निजामशाह     १५९५ - १५९६
दुसरा अहमद निजामशाह     १५९६ - १५९६
बहादुर निजामशाह     १५९६ - १६०५
दुसरा मूर्तझा निजामशाह     १६०५ - १६३१

मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे औरंगाबाद) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.

सुरुवातीचा काळ

मलिक अंबर हा जन्माने हबशी होता.[१] त्याच्या आई-वडीलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वत:चे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
 महसूल व्यवस्था

दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. अनेक वर्षांच्या प्रशासनाच्या अनुभवातून प्रत्येक जमिनीच्या तुकड्याचे सरासरी उत्पन्न त्याने निश्चीत केले आणि ह्या उत्पन्नाच्या दोन पंचमांश उत्त्पन्न महसूल म्हणून गोळा करण्यास त्याने सुरुवात केली. इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरुपात न गोळा करता पैशाच्या रुपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रक्कमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली.

त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
मृत्यू
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला

Thursday, 16 May 2013

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर
पूर्ण नाव     मंगेश केशव पाडगावकर
जन्म     नोव्हेंबर १०, १९२९
वेंगुर्ला,सिंधुदुर्ग
कार्यक्षेत्र     साहित्य, संगीत, दूरचित्रवाणी
राष्ट्रीयत्व     भारतीय Flag of India.svg
पुरस्कार     महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी पुरस्कार १९८०
विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, २०१०
वडील     केशव पाडगावकर
पत्नी     पाडगावकर
 लेखन
 * धारानृत्य (१९५०)  * सलाम (१९८०)
    * त्रिवेणी (१९९५)  * मीरा १९९५ मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद
    * उदासबोध (१९९६)   * मोरू (१९९९)   * सुरदास (१९९९)
      * मीरा १९९५ मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद    * राधा (२०००)
    * शर्मिष्ठा (१९६०)  * वादळ * सूर आनंदघन * कबीर १९९७ कबीराच्या दोह्यांचा अनुवाद
    * गिरकी  * चोरी   * भटके पक्षी (१९८४)    * जिप्सी (१९९४)
    * उत्सव (१९६२)    * मुखवटे   * नवा दिवस (१९९३)
    * काव्यदर्शन (१९६२)      * तुझे गीत गाण्यासाठी (१९८९)
    * तृणपर्णे     * गझल (१९८१)   * सुट्टी एक्के सुट्टी (१९९३)
    * उदासबोध (१९९६) * वात्रटिका (१९९९)   * कविता माणसाच्या माणसासाठी (१९९९)
    पाडगावकरांच्या काही प्रसिद्ध कविता
        * अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी   
    * फिदी फिदी हसतील ते?   * फ़ूल ठेवुनी गेले 
    * दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
    * आम्‍लेट   * मी बोलले न काही नुसतेच पाहिले
    * जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा  * सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
        * सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला   * सलाम   
 गौरव
     * अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, २०१०
 पुरस्कार
    * साहित्य अकादमी पुरस्कार १९८० सलाम
    * महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००


पाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.
    पाडगावकर मला तूमची आमची भेट कधी झाली हे खरच स्मरत नाही. तूम्ही लहानपनापासूनच भेटत गेलात. लहानपणी कधी तरी घरच्यांसोबत तूमचे "भावनांचा तू भुकेला रे" ऐकले आणी ते ऐकता ऐकता झोपी गेलो असे आमच्या मातोश्री सांगतात. ती जादू तूमची होती की लता मंगेशकरांची हे कळलेच नाही. तेव्हा ते वयच न्हवतें ते, मग आईने सांगीतले की अरे हे "आपले" पाडगावकरं. तिथे तूम्ही जे आपले झालात ते अजुनही आपलेच राहीलात.
    कळत्या वयातं तिच्या कडे पाहताना तूमचे लाजुन हासने अनं ची नेहमीच आठवन व्ह्यायची पाडगावकर. वाटायच पाडगावकर नसते तर माझ्या ह्या भावनांना कोणी ओळखले असते.
    पुढे कधी तरी जेव्हा सर्वांचे "प्रेम सेम नसते" हे ऐकले तेव्हां वाटल की, बास हेच माझे गाणें असनार. आणि आपले गाणे, आपणच गायचे हे तेव्हांच ठरवीले. मैत्रीनी बरोबर बसलो की "संथ निळे हे पाणी" आठवायचे. तेव्हां वाटायचे तो शुक्राचा तारा कधी संपूच नये. हेच हेच चित्र राहावें. नेहमीसाठी. पुढे जेव्हा मैत्रीनीने "मामा" बनवले तेव्हा तूमच्याच "अखेरचे येतील माझ्या" चा खरा अर्थ कळला.
    पाडगावकर तूम्ही मला जळी-स्थळी भेटत असता. भरधाव वेगाने जेव्हा मी अमेरिकेतील रस्त्यांवरून गाडी हाकत असतो तेव्हा तूमच्याच कविता, भावगीत रुपाने माझ्या गाडीत वाजतात. त्या रस्त्यांचे भाग्य आहे पाडगावकर साहेब, कारण अशी वंदता आहे की आवाजाच्या लहरी खुप काळ तिथेच राहतात. कोणी जर पुढे मी गेलेल्या रस्त्यावरुंन ते लहरी ओळखायचे मशिन फिरवले तर त्याला रेडीओ लहरीत तूमची गाणी ऐकायला मिळतील व त्याचं जिवन सार्थकी लागेल.
    तूमचा जिवनाचा दृष्टीकोण काय ह्याचाशी आम्हा रसिकांना काही घेनेदेणे नाही, नसावे. आम्हाला फक्त तूमच्या कविता हव्यात, मग त्या मोरूच्या असोत वा बोलगाणी असोत. कारण अहो या जिवनावर प्रेमं करायला आम्हाला तूम्ही शिकवलत.
    तूम्ही आणि खळे काकांनी जे मला दिलयं, मला नाही वाटत त्यांच ऋण मी फेडू शकेन. तूम्हाला तूमच्याच कवितेने माझा "सलाम".

''पद्म पुरस्कार मिळण्याबाबत मी व्यक्त केलेल्या मनोगतावर कवी ना. धों. महानोर यांनी "सकाळ'मध्ये केलेले भाष्य वाचून मी निरुत्तर झालो आहे. त्यांनी जे काही लिहिले, त्यावर मी काही बोलण्यापेक्षा, माझ्यावर, माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनीच बोलणे योग्य ठरेल,'' अशी भावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
    संगमनेर येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात पाडगावकर यांनी भारत सरकारचा पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेची निस्सीम सेवा करूनही अद्याप शासनाने दखल न घेतल्याची बोचही पाडगावकरांनी या वेळी बोलून दाखवली होती. हे पुरस्कार कसे मिळतात, हेदेखील आपल्याला माहीत असल्याचे विधानही त्यांनी या वेळी केले होते.
    पाडगावकर यांनी पद्म पुरस्कारांबाबत व्यक्त केलेल्या मनोगतावर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करणारा महानोर यांचा लेख "लाचावले मन, लागलीसे गोडी' या शीर्षकाखाली आज (ता. 4) "सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर मी काय प्रतिक्रिया द्यायची, असा प्रतिप्रश्‍न पाडगावकरांनी केला आहे.