Wikipedia

Search results

Wednesday, 2 July 2014

सुरूची बाग

सुरूची बाग

सुरूची बाग म्हणजे समुद्रकिनाराच आहे.. जिथे किनार्‍यावर सुरूची झाडे बहुसंख्येने उभी आहेत.. अजय पाटील या मायबोलीकरांच्या पेटींगमध्येदेखील इकडचे चित्र पाहीले होते.. तेव्हा या ठिकाणाला भेट द्यायची राहिलीच होती.. वसई (पश्चिम) ला इथे एसटी वा रिक्षाने जाता येते.. एसटीने (भाडे प्रत्येकी ७ रु.) गेल्यास वसई शहर स्टॉपला (पापडीच्या पुढचा स्टॉप)उतरायचे.. मग इसको पूछ -उसको पूछ करत पंधरा- वीस मिनीटांत चालत सहज पोहोचता येते.. इथे बहुदा स्वतःची गाडी घेउन जाता नाही येत.. कारण जवळपास एक किलोमीटर अंतराआधी गेट लावला आहे.. रिक्षाने (भाडे अंदाजे प्रत्येकी १६ रु.) आलात तर इथपर्यंतच सोडतो..
इथून मग समुद्रचा आवाजच खेचून घेतो.. सरळ जाणारी वाट नि आजुबाजूला खारफुटी.. असे अंतर पार करताना समोरच सुरूची झाडे डोकावू लागतात.. किनार्‍यापाशी पोहोचलो नि खादाडीसाठी चक्क एकच स्टॉल दिसला.. झोपडीच म्हणा.. एखाद दुसरा टांगा नि दोन तीन घोडे.. बाकी विस्तीर्ण पसरलेला किनारा.. असे दृश्य मुंबईतील समुद्रकिनार्‍यावर फार कमीच दिसते... इथे पोहोचलो नि किनार्‍यावरील ही सुरूची झाडं वार्‍यामूळे समुद्राच्या विरुद्ध दिशेने कललेली दिसली.. उजव्या बाजूपेक्षा डावीकडे जास्त प्रमाणात झाडे दिसत होती... मग तिथेच आधी फेरफटका मारण्यासाठी गेलो.. सुरूची बाग हे नाव खरच उठून दिसते..

 

- - -- - - - -
प्रचि २
-- - - -- - -
संध्याकाळी चारची वेळ.. पण वातावरण पावसाळी त्यात उंचपुरी अशी ही सुरूची झाडे.. शिवाय सभोवताली पसरलेली हिरवाई.. इथे फिरायला कोणाला नाही आवडणार... स्मित

प्रचि ३
- - -- - - - -

प्रचि ४
(फोटो by 'ती' .. )
- - - -- - - -
इथून मग समुद्र बघतानाही छान वाटते..
प्रचि ५

(ती तिथं उभी.. )
- - - - - -- - -
मग पावले आपसुकच समुद्राकडे वळवली..

- - - -- - - -
प्रचि ७ : समुद्रकिनारा नि घोडागाडी हे मुंबईतल्या चौपाटीवरचे नेहमीचे दृश्य.. पण इथे एकच होती..
- -- - - - - -
प्रचि ८:

धावत जाऊन कधी एकदा त्या समुद्राच्या लाटांवर झोकून देतोय.. !! (लहानपणी आम्ही भावंडेसुद्धा अशी शर्यत लावायचो.. आता कधी मित्रांसोबत गेलो तर उलटे धावत जाण्याची शर्यत खेळतो..फिदीफिदी)
------------
प्रचि ९: एकीकडे आकाशात काळ्या ढगांचे आच्छादन तयार झाले..

प्रचि १०:

Monday, 16 June 2014

समाजकल्याण

(सोशल वेलफेअर). समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करुन त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे  समाजकल्याण.

भारतीय संविधानातील कलम ४६ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार, दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाति-जमाती यांच्या शैक्षणिक, सामा-जिक व आर्थिक विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. कल्याणकारी राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनामार्फत उन्नत समाजाच्या प्रगतीबरोबर समाजातील दुर्बल घटक, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अपंग, महिला इत्यादींच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जातात. समाजकल्याण ही स्थल - काल सापेक्ष संकल्पना असल्यामुळे, या विषयीची व्याख्या ठरविताना सामाजिक, आर्थिक व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. समाजातील वंचित, दुर्बल व मागासवर्गीय जनतेला पूरक व पोषक सहाय्य करणे,हे कल्याणकारी सेवांचे कार्यक्षेत्र होय. परिस्थितीजन्य व इतर अनिवार्य समस्यांमुळे ज्या विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायांचा सर्वांगीण विकास होत नाही (उदा., वृद्घ, बालके, स्त्रिया, अपंग, दलित, गोरगरीब, आदिवासी इ.) अशा व्यक्तींना सक्षम बनविण्यासाठी समाजकल्याणाचे उपकम गरजेचे ठरतात.

माजकल्याणाची कल्पना प्राचीन काळापासून प्रचलित आहे. नैतिक व धार्मिक परंपरा व तत्कालीन शासनकर्त्यांची कर्तव्ये, यांच्या सर-मिसळीतून अनेक गंथांत कल्याणसंबंधी तत्त्वे मांडलेली आहेत. समाज-ऋण प्रत्येक सक्षम व्यक्तीने, गृहस्थाने व शासन करणाऱ्यानी फेडले पाहिजे, ही शिकवण प्राचीन धार्मिक व पुराणगंथांत सापडते. सेवा-भावाची उत्पत्ती मानवाच्या ठायी असलेल्या दया, करुणा व संवेदनक्षमता या प्रवृत्तीमुळे प्रकट होते, हे गृहीत धरले आहे. प्राचीन ऋग्वेदा मध्ये ‘दातृत्व’ या गुणाचा गौरव केला आहे ( ऋ. १०·११७). स्मृतिवाङ्मयात व पुराणांत दानशूर राजा हरिश्चंद्र व दधीचीच्या कथा सापडतात. प्रजेच्या हितासाठी समाट अशोकाने केलेल्या सेवायोजनांचे उल्लेख शिलालेखांत कोरलेले आढळतात. उपनिषदांत सर्व मानवजातीला स्वास्थ्य व सुख लाभावे, असे प्रतिपादन केले आहे. जनतेचे कल्याण व हित साधणे, हेच समाजव्यवस्थेचे व शासकीय यंत्रणेचे मुख्य उद्दिष्ट असावे, असा आदर्श प्रचलित होता -

                   सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामय: ।
 सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्

                   दु:खभाग् भवेत् ॥ 
कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देखील राजाच्या कर्तव्यांची चर्चा आहे - 
                  प्रजासुखे सुखम् राज्ञ: प्रजानांच हिते हितम् । 
                 नात्मप्रिये हितम् राज्ञ: प्रजानांतु प्रियम् हितम् ॥ 
‘ जनतेच्या सुखसमाधानामुळेच राजाला सुख लाभते व जनतेचे कल्याण तेच राज्यकर्त्याचे कल्याण होय .’

योगक्षेम ’ ही संकल्पनादेखील समाजाच्या सर्वांगीण विकासाचा निर्देश करुन, जनहित साधणे हे शासनाचे परमकर्तव्य असल्याचे स्पष्ट करते.

र्वाचीन काळात महात्मा गांधी यांनी सामाजिक समता व न्याय, ही  मूल्ये सर्वोदयाच्या मोहिमेतून प्रचलित केली ‘‘ सर्व व्यक्तींना व त्यांच्या श्रमांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे ,’’ हा सर्वोदयाचा अर्थ  आहे. व्यक्तीचे कल्याण हेच समष्ठीला उत्कर्षाच्या मार्गाकडे नेते, हा संदेश त्यांच्या तत्त्वज्ञानाचाच गाभा आहे. बौद्घ धर्मात दया, करुणा व अहिंसा या तत्त्वांचे पालन करुन मानवाच्या दु:खांचे निवारण करावे, हा संदेश गौतम बुद्घाने दिला. क्रिश्चन धर्म परंपरेत सेवाभाव व मानवसेवा ही उच्च् नैतिक कर्तव्ये मानली आहेत.

पारंपरिक भारतीय समाजामध्ये वैयक्तिक व सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त कुटुंब, जातपंचायती, गामसभा, दानशूर व्यक्ती व धर्मादाय संस्था प्रयत्न करीत असत. राज्यकर्त्यानी गरीब जनतेला दानधर्म करण्याचा त्याकाळी प्रघात होता; मात्र हे कार्य संघटित अथवा व्यापक पातळीवरुन केले जात नसे.

यूरोपमध्ये विशेषत: गेट बिटनमध्ये याविषयी प्रथम प्रयोग केला गेला. तो १६०१ साली राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दित ‘ इंग्लिश पुअर लॉ ’ हा कायदा लागू केला तेव्हा. समाजातील बेघर, बेरोजगार व गरीब जनते-साठी अन्नछत्र व निवारा उपलब्ध करण्याची जबाबदारी स्थानिक चर्च व    इतर धार्मिक संस्थांवर सोपविली गेली. सतराव्या व अठराव्या शतकांत बेघर व बेकारांसाठी आधारगृहे ( वर्क हाउसेस ) व व्यावसायिक संस्था स्थापन  झाल्या.

भारतात देखील १७९३ साली बॅप्टिस्ट मिशनरींनी कलकत्ता शहरात समाजकल्याणाचे प्रयत्न सुरु केले. धर्म प्रचाराच्या कार्याबरोबर त्यांनी अस्पृश्य जाती, अनाथ बालके, भिकारी व कुष्ठरोगी अशा पीडितांसाठी मदतकार्य देण्याच्या सोयी निर्माण केल्या. विशेषत: दुष्काळपीडितांसाठी कार्य सुरु करुन कनिष्ठ जातींसाठी शिक्षण व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. १८८० साली इंगज सरकारने सॅनिटरी कमिशन स्थापन करुन कलकत्ता शहरात स्वच्छता व आरोग्यासाठी मोहीम सुरु केली.१८९६ च्या प्लेगच्या भयंकर साथीच्या काळात लसीकरण व उपायकार्याची योजना आखली. या सर्व कार्यांमुळे, सामाजिक कल्याणाला शासनातर्फे पुरस्कृत केले गेले. यापूर्वीच्या काळात, बहुतेक राष्ट्रांमध्ये संघटित समाजकल्याणाची कल्पना सर्वमान्य नव्हती. व्यक्तींच्या नशिबात दारिद्य, दु:ख, आजार वा इतर काही समस्या आल्या, तर त्या भोगणे हे व्यक्तीच्या नशिबावर अवलंबून असते, अशी विचारसरणी प्रचलित होती. रोगराई व दारिद्य हे प्रश्न अधिभौतिक कारणांमुळे उद्भवतात, असा पक्का समज होता. शासन अथवा श्रीमंत वर्गांमध्ये लोककल्याणाबाबत उदासीनता, उपेक्षा व अनास्था आढळत असे.

हिल्याबाई होळकर (१७२५-९५) यांनी भूतदया आणि परोपकारबुद्घी यांनी प्रेरित होऊन अनेक कल्याणकारी योजना भारतभर राबविल्या आणि त्यांवर अपार खर्च केला. बाह्मणांबरोबरच त्यांनी गोरगरिबांचा नित्य परामर्श घेतला. सणवारी त्यांना कपडे वाटले, थंडीच्या दिवसांत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्याना घोंगडी वाटल्या. उन्हाळ्यात आपल्या राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुद्दाम विहिरी व पाणपोया बांधून पाण्याची व्यवस्था केली. पशुपक्ष्यांनाही दाणे व नर्मदा नदीतील माशांना रामनामाच्या कणकेच्या गोळ्या टाकण्याची व्यवस्था केली. भारतभर मंदिरे, घाट बांधून धार्मिक कृत्यांबरोबरच त्यांनी तेथील बाह्मणांना अन्नदान केले. लोकांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधल्या आणि यात्रेकरुंची सोय केली. नवीन रस्ते बांधले.

त्रपती शाहू महाराजांनी केलेले समाजकल्याणविषयक कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या राजसत्तेचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सुधारणां-साठी पुरेपूर उपयोग केला. राज्यात अस्पृश्यांसह बहुजन समाजाला शिकण्यासाठी सकिय मदत केली. कोल्हापूरात निरनिराळ्या जातींसाठी विद्यार्थी वसतिगृहे स्थापन केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा आदेश काढला (१९१७).स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव, सामाजिक विषमता व अन्यायाविरुद्घ संघर्ष केला. अस्पृश्यांना शिक्षणात उत्तेजन, सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी, निरनिराळे व्यवसाय करण्यास  प्रोत्साहन, सहभोजनाचे कार्यकम व अस्पृश्यता निर्मूलन परिषदांचे आयोजन, असे सर्वांगीण प्रयत्न केले. दुष्काळपीडित शेतकऱ्यांना कर्जवाटप, यात्रेकरुंसाठी धर्मशाळा तसेच स्त्री सुधारणाविषयक विविध कामे त्यांनी केली.

कोणिसाव्या शतकानंतर मानवतावादाचा प्रसार होऊन सामाजिक समस्यां-वर तोडगा काढण्यासाठी बुद्घिवादी व विवेकनिष्ठ तत्त्वे प्रसृत झाली. कल्याणकारक योजनांबाबत वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन निर्माण होऊन, त्यांबाबत संशोधन व विचारविनिमय होऊ लागला. समाजातील परिस्थिती अभ्यासून योजनापूर्वक कल्याणाची धोरणे आखणे, ही काळाची गरज ठरली. समाजवाद, लोकशाहीवादी तत्त्वे व मानवी हक्कांविषयी जागृती झाली. समाजकल्याणाची प्रमुख जबाबदारी शासनाने उचलावी, हा आगह सर्व थरां-मार्फत प्रचलित झाला. कायदेशीर नियोजित धोरणे व जनतेच्या सहभागाचा उपयोग, हा समाजकल्याणाच्या कार्यासाठी आवश्यक असणे मान्य झाले.

भारतीय समाजकल्याण मंडळाची स्थापना १९४७ साली झाली. गांधींचे सामाजिक प्रबोधनाविषयीचे कार्य पुढील समाजकल्याणाच्या कार्यासाठी मार्गदर्शक ठरले. १९४७ नंतर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या विचारांना कायदेशीर स्वरुप प्राप्त झाले. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषत: फाळणीनंतर समाजात प्रचंड अशांतता व अस्थिरता निर्माण झाली. तसेच दारिद्य, स्थलांतरांचे पुनर्वसन व सामाजिक स्थैर्य प्रस्थपित करण्यावर भर दिला गेला. या काळात संपूर्ण जगभर आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रांत उलथापालथी झाल्या. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरणामुळे कृषिक्षेत्रातून कामगारांचे औद्योगिक केंद्रांकडे स्थलांतर, शहरांची वाढ व बदलते कौटुंबिक जीवन, या सर्व कारणांमुळे मानवी जीवनमानाविषयीच्या कल्पनांमध्ये आमूलाग बदल घडून आला. वैज्ञानिक व वैद्यकीय क्षेत्रांतील लक्षणीय प्रगतीमुळे ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. उत्पादन वाढले, उद्योगधंदे विस्तारले, आरोग्यविषयक सुविधा व रोगप्रतिबंधक उपाय उपलब्ध झाले; मात्र या प्रगतीचा समाजातील सर्व स्तरांना समान फायदा झाला नाही. वास्तवात, सर्वसामान्य जनतेला, विशेषत: ग्रामीण व कनिष्ठवर्गीयांना यथार्थ साधनसामगी, योग्य वेतन, अन्नपुरवठा, निवारा, शिक्षण व सुरक्षा या सुविधा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे समाजातील वंचित व दुर्बल जनतेसाठी शासकीय व ऐच्छिक संघटनांमार्फत पूरक मदत व साधनसामगी उपलब्ध करुन देणे अपरिहार्य झाले.

र्थशास्त्रज्ञ टी. एन. मार्शल यांच्या शब्दांत, ‘ कल्याणकारी राज्याचे प्रमुख वैशिष्टय् म्हणजे प्रत्येक नागरिकाला शासनाच्या मदतीने आपले जीवनमान सुधारणे शक्य होईल व त्यांना आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता प्राप्त होईल. कल्याणकारी योजनांसाठी प्रशासकीय यंत्रणा, आर्थिक नियोजन व उत्तम संघटनांची गरज आहे.’

ल्याणकारक योजना तीन पद्घतीने काम करतात : (१) उपचार करणाऱ्या यंत्रणा, (२) प्रतिबंधक सेवा, (३) आधारभूत सेवा.

(१) उपचारार्थी सेवा : या पीडित व अडचणीत असलेल्या, गस्त व्यक्तींसाठी मदत, पुनर्वसनाचे कार्य करतात - (उदा., पूरगस्त, अपंग, वेठबिगार मजूर, विस्थापित आदिवासी).

(२) प्रतिबंधक सेवा : या आधुनिक काळाची मोठी गरज आहे. समाजात घडणारे बदल, बदलते नातेसंबंध, ताण, असुरक्षितता, हिंसाचार यांमुळे कौटुंबिक जीवन विघटित होते. ताणतणावांचा माणसांच्या परस्परसंबंधांवर विपरित परिणाम होतो. त्यासाठी तज्ज्ञांमार्फत मार्फत समुपदेशन, सामुदायिक भावना बळकट करण्यासाठी कार्यशाळा, लोकशिक्षण असे उपकम, मनोरंजनाचे उपकम व नैतिक शिक्षण यांसारखे उपाय योजावे लागतात. पर्यावरणविषयक माहिती, आरोग्यविषयक शिक्षण इत्यादींमुळे समाजविघातक प्रवृत्तीला व चुकीच्या समजुतींना आळा बसतो.

(३) आधारभूत सेवा : प्रामुख्याने आरोग्य व शैक्षणिक कार्य करतात. कुटुंबनियोजनाचा प्रचार व प्रसार, मानवी संसाधन विकास, व्यावसायिक व अनौपचारिक शिक्षण, रोजगार उपलब्धी, हे प्रमुख कार्य आधारभूत सेवा करतात.

पचार करणाऱ्या सेवा मर्यादित क्षेत्रात व समुदायांसाठी काम करतात. उदा., बालकामगारांचे पुनर्वसन, दुष्काळगस्तांसाठी रोजगार हमी योजना चालविणे.

प्रतिबंधक अथवा प्रचारार्थी सेवांचे क्षेत्र अधिक व्यापक असते. उदा., कुटुंबनियोजनविषयक प्रचारार्थ मोहीम, ‘ एड्सविषयी ’ जागृती, कौटुंबिक हिंसाचाराविरुद्घ प्रचार, दारुबंदीसाठी आंदोलने, अंधश्रद्घा निर्मूलनाच्या चळवळी इत्यादी. या मोहिमांचे कार्य म्हणजे समाजातील गैरसमजूती दूर      करुन, लोकजागृती व लोकशिक्षण देणे. विशिष्ट समस्यांबाबत समाजाला अधिक संवेदनाक्षम बनविणे व घातक प्रवृत्तींना आळा घालणे. उदा., भूणहत्या, हुंडा  इत्यादी.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात केवळ शासनातर्फे वरील सर्व कार्यकम व योजना राबविणे अशक्य आहे. बिगरसरकारी ऐच्छिक संघटना मोठय प्रमाणात विकासाच्या कार्यात सहभागी होतात. केंद्रीय कल्याण आयोग व राज्य सरकारच्या पातळीवर सामाजिक कल्याणासाठी प्रकल्प राबविले जातात. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरुन संयुक्त राष्ट्न संघा-तर्फे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ( आय्. एल्. ओ .), बालकांच्या कल्याणा-साठी युनिसेफ सारख्या संघटनांमार्फत निधी व यंत्रणा उपलब्ध करुन दिल्या जातात. १९५० सालापासून शासनातर्फे दहा पंचवार्षिक योजना,   विकास कार्यासाठी आखल्या गेल्या. या सर्व योजनांनी दारिद्य निर्मूलन, बेकारी व शिक्षणाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेले दिसते. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वानुसार सामाजिक न्याय, समता व स्वातंत्र्य या तत्त्वांचा पुरस्कार केला आहे. पंधराव्या कलमानुसार सर्वांना शैक्षणिक हक्क  व  सोळाव्या  कलमानुसार  रोजगार  मिळण्याचा  हक्क  स्पष्ट  होतो.

भारतासारख्या विकसनशील देशाला विकासाचे धोरण आखताना शासनामार्फत समाजकल्याणाचे संयोजन करणे अपरिहार्य आहे. आर्थिक विकासाबरोबर सामाजिक क्षेत्रात प्रगती होण्याकरिता सुविधा देण्याबाबत शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. दहाव्या योजनेत कुटुंबकल्याण व बालकांसाठी प्राथमिक शिक्षण, या बाबींवर भर दिला आहे. (२००७ पर्यत साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के झाले पाहिजे हे लक्ष्य आहे. आरोग्य व शिक्षणासाठी भरीव तरतूद केली आहे ). विशेषत: स्त्री-साक्षरता वाढावी व बहुसंख्य श्रमिक स्त्रियांसाठी योग्य रोजगार, आरोग्य सेवा आणि समान वेतन निश्चिती कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

मागासवर्गीय व अल्पसंख्याक समुदायांना शासनामार्फत आरक्षण व इतर सवलती दिल्या जातात. घटनेतील शेहेचाळीसाव्या कलमानुसार शैक्षणिक हक्क व रोजगार मिळण्याच्या सुविधा अनुसूचित जाति-जमातींना मिळतात. यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाति-जमाती आयोग स्थापून विविध योजना व कार्यकमांचे नियोजन व संघटन केले जाते. आदिवासींसाठी दहाव्या योजनेनुसार १९४ विकास योजना स्थापन केल्या गेल्या आहेत. ज्यामार्फत शिक्षण, आरोग्यकेंद्र, रस्ते व पूलबांधणी, आश्रमशाळा इ. सोयींसाठी निधी उपलब्ध  होतो.

सार्वजनिक आरोग्यासाठी शासनामार्फत अनेक प्रकल्पांचे आयोजन केले गेले. १९५१ साली भारतीयांचे आयुर्मान ३७·७ टक्के होते, ते वाढून २००६ साली ६८ टक्के झालेले आहे. याचे प्रमुख कारण रोगप्रतिबंधक योजनांतर्फे मलेरिया, क्षयरोग इत्यादींसाठी विविध उपाययोजना कार्यरत आहेत. २००१ साली भारताची लोकसंख्या १०० कोटींवर गेली. कुटुंब नियोजन कार्यकमाचे हे अपयश आहे. त्यामुळे २००१ साली ‘ जनसंख्या स्थिरता कोश ’ स्थापून कुटुंब नियोजनाचा प्रचार व कार्य अधिक सक्षम करण्याचे  प्रयत्न  सुरु  झाले  आहेत.

ग्रामीण विभागांसाठी सामुदायिक विकास प्रकल्प १९५२ साली स्थापन झाला. पंचायत राज विधेयक १९५८ साली लागू झाले. ग्रामीण विकासांच्या कार्यात बिगर - शासकीय व खाजगी संस्था देखील विधायक काम करताना दिसतात. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्घी खेडयतील विकासकार्य; राजस्थानातील पाणी साठवण व व्यवस्थापन करण्यासाठी राजेंद्रसिंह यांनी राबविलेला ‘ जोहड ’ प्रकल्प हे कार्यकम सुयोग्य नेतृत्व व खेडयतील जनतेच्या सकिय सहभागामुळे यशस्वी  ठरले. आजच्या घटकेला ग्रामीण क्षेत्रातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्तेबांधणी व अन्नधान्य वितरणाबाबत समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे  आहे.

हरी विभागाकडे शासकीय निधी व विकास यंत्रणेचा ओघ वाढत आहे; पण ग्रामीण भागात असंतुलित व अपुरा विकास होतो आहे. दुष्काळाचे सावट, अन्नधान्याची टंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, भूकबळी आणि कुपोषणाची गंभीर समस्या, ही परिस्थिती कल्याणकारी योजनांमधील त्रुटी दर्शविते. नोबल पारितोषिक विजेते डॉ.  अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थक्षेत्राचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते आर्थिक उत्पन्न वाढल्यामुळे कल्याणाच्या संधी व क्षमता निर्माण होतात. या क्षमता आरोग्य, शिक्षण व पोषण यांवर निर्भर असतात. मात्र दारिद्यरेषेखाली अनेक भिन्न स्तर असतात व तेथेही आर्थिक विषमता आढळते. दारिद्य निर्मूलनासाठी हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

लोककल्याणकारी कार्यासाठी कायदेशीर तरतुदींची निर्मिती व अंमल-बजावणी आवश्यक असते. उदा., बालकामगारांचे शोषण थांबविण्यासाठी १९८६ साली बालकामगार प्रतिबंधक कायदा लागू झाला. तसेच स्त्रियांसाठी समान वेतन कायदा १९७६ साली संमत झाला. बालगुन्हेगार सुरक्षा योजना कायदा २००० साली लागू झाला व भूणहत्या प्रतिबंधक कायदा १९९४ साली संमत झाला. आज भारतातील वृद्घांचे प्रमाण वाढून ते ७·६ कोटींवर गेले आहे. १९९९ सालापासून वृद्घांसाठी कल्याणकारक योजना आखणी मंडळ, निवृत्ती योजना, वृद्घाश्रम व आरोग्यदायी सेवांचे आयोजन केले जाते.

मानवी जीवनाची प्रत तपासणे व त्याबाबत मानवी विकास अहवाल प्रसिद्घ करण्याचे कार्य संयुक्त राष्ट्रीय विकास आयोगातर्फे १९९० सालानंतर सुरु झाले. सुधारणा व विकास यांबाबत समाजकल्याणाची भूमिका व तत्त्वे आज मानव संसाधन विकासावर भर देण्याबाबत आगही आहेत. सर्व विकसित, विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये समता, न्याय, धर्म-निरपेक्षता व दुर्बल घटकांचे हक्क जोपासण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण काम कल्याणदायी संघटनांनी करणे व त्यासाठी सतर्क राहणे, या आधुनिक काळातील मूलभूत गरजा आहेत.

Saturday, 7 June 2014

जोन ऑफ आर्क

जोन ऑफ आर्क ही इंग्लंड-फ्रान्समधील युद्धाच्या वेळी फ्रेंच लोकांची एकजूट करून इंग्रजांविरुद्ध यशस्वी लढा देणारी एक थोर नायिका होती.

सुरुवातीचे दिवस

जोन चा जन्म उत्तर फ्रान्समधिल डोम्रेमी या खेड्यात १४१२ साली एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. तिच्या जन्माच्या वेळी फ्रान्स आणि इंग्लंडदरम्यान इतिहासात प्रसिद्ध असलेले १०० वर्षांचे युद्ध सुरू होते. सातत्याने चालत असलेल्या युद्धाने फ्रान्सची जनता त्रस्त झाली होती. इंग्लंडचा राजा पाचवा हेन्ऱी याने फ्रेंचांचा अगीनकोर्ट येथे १४१५ मध्ये जबरदस्त पराभव केला. यानंतर त्याने त्याच्या मुलास फ्रान्सचा राजा घोषित केले. फ्रेंच राजा चार्ल्स सातवा व राजपुत्र डो-फॅन लोरें नदीच्या पलिकडे पळून गेले.

आकाशवाणी

साधारणपणे वयाच्या तेराव्या वर्षी जोन ला आकाशवाणी ऐकू येण्याचे भास होऊ लागले. तिचे असे म्हणणे होते कि काही महान संतांनी तिला सांगितले आहे कि, ती फ्रेंचांना इंग्लंडपासून वाचवणार आहे. जसे तिचे वय वाढत गेले तसे तिचे भास अजून वाढत गेले व सरतेशेवटी १७ व्या वर्षी तिने स्थानिक किल्लेदाराला भेटून डो-फॅन ला भेटायची परवानगी मागितली. सुरुवातीला तिची मागणी धुडकावून लावण्यात आली. पण तिने सातत्याने आपल्या मागणीचा पाठपुरावा चालू ठेवला. सरतेशेवटी तिची मागणी मान्य करण्यात आली व रोबर्ट डे बॉड्रिकोर्ट याने तिला एक घोडा व काही घोडेस्वार दिले. रातोरात ती इंग्लिश शिपायांची पर्वा न करता लोरें नदीच्या काठच्या चिनॉ येथे डो-फॅन पाशी पोहोचली.

युद्धनायिका

डो-फॅनच्या दरबारात तिचे स्वागत अपेक्षितरित्या काय हा वेडेपणा, कसं शक्य आहे या सुरातच झाले. एक शेतकरी, ती पण षोडश वर्षाची मुलगी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य देणार ही गोष्टच कुणाला पटली नाही. पण तिने सांगितलेल्या गोष्टीची खात्री म्हणून डो-फॅनने कर्ल्गींना (धर्मगुरुंचे पॅनेल) विचारले. त्यांनी मात्र ती जे काही सांगत आहे ते भास नसून देवाज्ञा आहे असे प्रमाणपत्र दिले. व सर्वांचा हळूहळू तिच्यावर विश्वास बसू लागला.
याच वेळेस फ्रान्सवरचे मोठे संकट म्हणजे ओर्लिन्स वर असलेला इंग्रजांचा वेढा. जर ओर्लिन्स पडले तर पुढील लढा अजून बिकट झाला असता. डो-फॅनने जोनला ४००० सैन्याची फौज मदतीला दिली. १७२९ एप्रिल मध्ये जोन ओर्लिन्सला फौजेसकट पोहोचली. अत्यंत बिकट परिस्थितीत तिने आपल्या बचावासाठी लढणाऱ्या फ्रेंच सैनिकांना आक्रमणासाठी प्रेरित केले. या जोरदार आक्रमणामुळे पाहता पाहता इंग्रजांना वेढा उठवणे भाग पाडले. एवढ्यावरच संतुष्ट न होता तिने त्यांचा पाठलाग केला व इंग्रजांची पळता भुई थोडी केली. आपल्या आक्रमणाचा भाग म्हणून तिने इंग्रजांच्या ताब्यातील फ्रेंच हद्दीवर हल्ले चालु केले व अनेक दशके इंग्रजांच्या ताब्यातील भाग मुक्त करण्यास सुरुवात केली. फ्रेंच घोडदळाच्या मदतीने पटाय येथे इंग्रजांचा मोठा पराभव केला. हा इंग्रजांचा कित्येक दशकातील सर्वांत मोठा पराभव होता.
या विजयानंतर रेह्म्स कॅथेड्रल येथे तिने १७ जुलै १४२९ रोजी चार्ल्सला राज्याभिषेक केला. व त्याला पुन्हा फ्रेंच राज्यकर्ता म्हणून घोषित केले. हा क्षण जोन च्या कारकिर्दितील अत्युच्च क्षण मानता येईल. पुढील तीन महिन्यात जोनने अनेक लढायामध्ये लक्षणीय कामगिरी बजावली. व फ्रेंच राज्यपरिवार वॉलोय्स ची मक्तेदारी कायम राहिल याची काळजी घेतली.

बंदिवास,धर्मिक खटला व शेवट

जोनची वाढती लोकप्रियता व फ्रेंचांचे प्रतिआक्रमण यामुळे जोन इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरली होती. तसेच फ्रान्समधील अनेक सरंजामशाह ज्यांना वॉलोय्स राजघराण्याची मक्तेदारी नको होती व इंग्रजांशी ज्यांचे हितसंबध जुळले होते असे अनेक जण जोनचे शत्रू बनले होते. त्यापैकी बुर्गुंडी च्या सैनिकांनी जोनला २३ मे १४३०ला पकडले व पैश्याच्या मोबदल्यात तिला इंग्रजांच्या ताब्यात दिले. तिला उत्तर फ्रान्स मधील रुएन येथे डांबून ठेवले. इंग्रजांनी तिच्यावर धार्मिक खटला चालवला. जेणेकरून ती जर दोषी आढळली तर फ्रेंच जनतेवरील तिचा प्रभाव कमी होइल. तिच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप ठेवण्यात आले. पण देवावर आपार श्रद्धा असलेली जोन त्या आरोपांना सहज सामोरी गेली. तिने ते आरोप मान्य करावेत म्हणून तिचा खूप छळ करण्यात आला. पण इंग्रजांना तिला काहीही करून दोषी सिद्ध करायचे होतेच, सरतेशेवटी तिला युद्धाच्यावेळेस पुरुषी वेष धारण केला म्हणून व तिने कोणतीही संतांची आकाशवाणी ऐकलेली नाही, उलट सैतानाची दूत म्हणून तिला दोषी सिद्ध करून तिला जिवंत जाळण्याची क्षिक्षा ठोठाविण्यात आली. ३० मे १४३१ रोजी तिला जाळ्ण्यात आले. एका देशभक्त, देवावर आपार श्रद्धा असलेल्या महान नायिकेचा अशा प्रकारे चेटकीण, सैतानाची दूत म्हणून शेवट झाला.
१४५६ मध्ये कोर्ट ट्रायलच्या वेळेस असे लक्षात आले कि जोन वरील आरोप पूर्णपणे पूर्वग्रहदुषित होते व तिच्या वर चुकीच्या पद्धतीने खटला चालवण्यात आला.
सरतेशेवटी १९२० मध्ये जोनला संत पद बहाल केले गेले.

Monday, 19 May 2014

संस्‍कृत भाषा


संस्कृत ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत.

संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, गीर्वाणवाणी, देवभाषा, अमरभारती इत्यादी नावे आहेत.
संस्कृत भाषेची निर्मिती

पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
 
प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा

‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एक‍एक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.

संस्कृत भाषेत एका प्राण्याला, एका वस्तूला आणि एका देवाला अनेक नावे असतात.

संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक नावे देण्याची प्रथा होती, उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी नावे आहेत. सूर्याची १२ नावे, विष्णु सहस्रनाम, गणेश सहस्रनाम काही जणांना पाठही असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.
वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे

वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति ।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः ।’ ‘खादति रामः आम्रं ।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Rama eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Rama.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’)
 
एकात्म भारताची खूण

प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशीला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती

‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता ? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ?

इंडो-यूरोपियन भाषाकुलांतील एक प्राचीन भाषा. या इंडो-यूरोपियन भाषेच्या मूलस्थानाविषयी संशोधकांत अजून एकवाक्यता नाही. ते स्थान भारतात असावे, अशी प्रथम एक कल्पना होती; नंतर ते मध्य आशियात असल्याचे मानण्यात येऊ लागले आणि ते मूलस्थान यूरोपातच कुठेतरी बहुधा मध्य यूरोपात असावे, असे अलीकडे मानण्यात येते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते ती पूर्व यूरोपातील लहानशा प्रदेशात उगम पावली, ही गोष्ट त्यांच्या महत्त्वाच्या शब्दावलीवरुन सूचित होते. विशेषतः ह्यावरुन भौगोलिक वैशिष्ट्य सूचित होते. पण ते स्थान कुठेही असले, तरी तिथून इसवी सनापूर्वी सु. अडीच-तीन हजार वर्षे निघून, वाटेत इराणमध्ये काही काळ स्थिरावून, पुढे इसवी सनापूर्वी सु. १५०० च्या सुमारास ही भाषा बोलणारे लोक बाहेरुन भारतात आले असावेत, असे अनुमान करण्यास हरकत नाही. ही भाषा बोलणारे लोक एकाच वेळी भारतात न येता टोळ्याटोळ्यांनी निरनिराळ्या काळी आले असण्याचीही शक्यता आहे. भारतात येण्यापूर्वी संस्कृत भाषा बोलणाऱ्यांचे पूर्वज आणि प्राचीन इराणी भाषा (अवेस्ता) बोलणाऱ्यांचे पूर्वज काही काळ एकत्र राहिले असावेत, असे संस्कृत व प्राचीन इराणी (अवेस्ता) वाङ्‌मयातील भाषिक व काही प्रमाणात वैचारिक साम्यावरुन स्पष्ट होते.

संस्कृत भाषेचा अतिप्राचीन नमुना ऋग्वेदा तील मंत्रांत आढळतो. हे मंत्र इ. स. पू. सु. १५००-१२०० ह्या काळात रचले गेले असावेत, असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते. ह्या भाषेचा त्यानंतरचा सु. साडेतीन हजार वर्षांचा इतिहास निरनिराळ्या कालखंडांतील उपलब्ध वाङ्‌मयामुळे ज्ञात आहे. उदा., हल्ली मराठी भाषेत उपयोगात येत असलेला ‘ दूध ’ हा शब्द क्रमाने दुग्ध (संस्कृत) व दुद्घ (प्राकृत) ह्या अवस्थांतून उत्कांत झाला आहे, हे वाङ्‌मयीन पुराव्यावरुन कळते. परंतु संस्कृतपूर्व त्या शब्दाचे रुप काय असावे, हे जाणण्यास वाङ्‌मयीन पुरावा उपलब्ध नाही. तौलनिक आणि ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या आधारे ते रुप धुघ्त किंवा धुद्घ असे असावे, असे अनुमान करावे लागते.

आपण ज्या भाषेला संस्कृत म्हणून ओळखतो, तिच्यातील सर्व प्राचीन वाङ्‌मय ऋग्वेदा तील मंत्रांत आढळते. त्या भाषेची ऐतिहासिक दृष्ट्या स्थूलमानाने तीन रुपे आढळतात. पहिले रुप वेदांच्या संहिता भागांत दिसणारे; दुसरे उत्तर वैदिक म्हणजे बाह्मणे, आरण्यके व उपनिषद हे ग्रंथ व वेदांग वाङ्‌मय यांत आढळणारे व जिचे पाणिनीने वर्णन केले आहे ती ‘ भाषा ’; आणि तिसरे पाणिनीनंतरच्या ग्रंथांतून विशेषत: कालिदासादी कवींच्या काव्यांत आढळणारे. ‘ संस्कृत ’ शब्दाचा प्रयोग ती भाषा प्राकृतापासून- म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या नेहमीच्या बोलीभाषेहून - भिन्न असल्याचे दर्शविण्याचा असावा. ‘ संस्कार ’ हा शब्द यास्क त्याच्या निरुक्त ग्रंथांत वापरतो (तद्यत्र स्वरसंस्कारौ समार्थौ ....). तिथे त्याचा अर्थ वैयाकरणांना संमत अशी भाषेतले शब्द सिद्घ करण्याची प्रक्रिया असा आहे. त्यावरुन ‘ संस्कृत ’ म्हणजे ‘ व्याकरणशुद्घ ’, ‘ घडविलेली ’, अतएव सुशिक्षितांच्या बोलण्यात येणारी शिष्टसंमत भाषा, असा अर्थ होऊ शकेल. त्या दृष्टीने जिला संस्कृत म्हणता येईल, त्या भाषेच्या तीन ऐतिहासिक अवस्था वर सांगितल्या पण व्यवहारात मात्र वैदिक संस्कृत व अभिजात संस्कृत अशा दोनच अवस्था कल्पिण्यात येतात. ह्याखेरीजही संस्कृत भाषेची दुसरी दोन रुपे उपलब्ध आहेत. पैकी एक रुप रामायण - महाभारत ह्या सूतवाङ्‌मयात आढळते, तर दुसरे रुप महावस्तुसारख्या बौद्घसंस्कृत ग्रंथांतून आढळते. पहिल्या रुपाला सूतसंस्कृत असे म्हणता येईल. ह्यात अपाणिनीय रुपे बरीच दिसतात. (जसे - सेवति, अदसि, श्रृत्य, चिंत्य, प्रस्थापयित्वा इ.). दुसऱ्या रुपाला बौद्घ संस्कृत किंवा मिश्र संस्कृत हे नाव देता येईल. ह्यात दिन्न (सं. दत्त), आणत्त (सं. आज्ञप्त) अशा प्राकृत शब्दांखेरीज ऋषिस्य, भिक्षुस्य, पिबित्वा अशी मिश्र रुपेही आढळतात.

वैदिक संस्कृतची जी दोन स्थित्यंतरे झाल्याचे वर सांगितले, ती होताना त्यांचा परिणाम संस्कृतच्या वर्णव्यवस्थेवर फारच तुरळक स्वरुपाचा झाला. उदा., ऋग्वेदा त स्वरांतरी ड व ढ ह्यांऐवजी येणाऱ्या ळ व ळ्‌ह ह्या वर्णांना पाणिनीच्या सूत्रांत स्थान नाही. तसेच वैदिक संस्कृतच्या मानाने अभिजात (क्लासिकल) संस्कृतात मूर्धन्य वर्ण जास्त आढळतात. ह्याउलट संस्कृतनंतर जेव्हा लोकांच्या बोलीभाषेतून प्राकृत भाषांचा उदय झाला, तेव्हा भाषेच्या वर्णव्यवस्थेवर फारच मोठा परिणाम घडून आला. वैदिक संस्कृतातही काही प्रयोग प्रादेशिक बोलीभेद दर्शवितात. उदा., ऋग्वेदात सूरो दुहिता ह्या अपेक्षित संधीऐवजी एका ठिकाणी सूरे दुहिता (ऋ. १.३ ४.५) असा संधी आढळतो; तो प्राकृतामुळे असावा, अशी अभ्यासकांची कल्पना आहे. तथापि वैदिक संस्कृत ही प्राय: त्या काळी प्रचलित असलेल्या पश्चिमेकडच्या बोलीभाषेवर आधारलेली अशी एकजिनसी भाषा मानण्यात येते. ह्याचे एक यमक म्हणजे वैदिक संस्कृतात इंडो-यूरोपियन ‘ल’ वर्णाच्या ऐवजी ‘र’ वर्णाचा वापर आढळतो. वैदिक संस्कृत व अभिजात संस्कृत ह्यांमध्ये वर्णव्यवस्थेच्या दृष्टीने जरी सारखेपणा असला, तरी त्यांच्यात मुख्य भेद आढळतो, तो त्यांच्या व्याकरणात व शब्दसंपत्तीत. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिल्यास वैदिक संस्कृतच्या मानाने अभिजात संस्कृत ‘ निर्धन ’ मानावी लागेल. नामे व आख्याने ह्यांच्या रुपांत वैदिक संस्कृतात खूपच विविधता आहे. अकारान्त नामांचे उदाहरण घेतल्यास वैदिक संस्कृतात त्याच्या प्रथमेच्या व द्वितीयेच्या द्विवचनांची देवा-देवौ, प्रथमेच्या बहुवचनाची देवास:-देवा:, तृतीयेच्या एकवचनाची देवा-देवेन, तृतीयेच्या बहुवचनाची देवेभि:-देवै: अशी भिन्न रुपे आढळतात. अभिजात संस्कृतात ह्यांपैकी एकेकच रुप अवशिष्ट राहिले आहे. वैदिक भाषेत हेत्वर्थाची दृशे, चक्षसे, सनये, पीतये, कर्तवे, गन्तवै, पिबध्यै, दावने, आरभम्, प्रष्टुम्, संपृच:, गन्तो: अशी विविध प्रत्यययुक्त रुपे  आढळतात. ह्यांपैकी अभिजात संस्कृतात फक्त एकच प्रकार (प्रष्टुम्) शिल्ल्क राहिला आहे. वैदिक भाषेत प्रचलित असलेली लेट् ची रुपे (जसे भवाति) पुढील वाङ्‌मयात नाहीत. अभिजात संस्कृतात उपसर्ग हे नेहमी क्रियापदाशी संबंधित व क्रियापदापूर्वी उपयोगात येते. वैदिक वाङ्‌मयात उपसर्ग व क्रियापद ह्यांच्यातला संबंध त्या मानाने शिथिल आहे. एक तर उपसर्ग व क्रियापद ह्यांमध्ये इतर शब्द येऊ शकतात, उदा., स देवाँ एह (आइह) वक्षति (ऋ. १.१.२). दुसरे म्हणजे उपसर्ग क्रियापदानंतरही येऊ शकतो - जसे म गदूजिभिरा (वाजेभि: आ) सन: (ऋ. १.५.३). वैदिक भाषेत सामासिक पदे फार नसतात आणि जी असतात, ती बहुधा इन्द्रावरुणा, युक्तगावा अशी दोन पदांची असतात. ह्याउलट अभिजात संस्कृतात समासांचे बंड इतके वाढले की, दंडीला ‘ ओज: समासभूयस्त्वमेत गद्यस्य जीवितम् ’, असे म्हणून गद्यवाङ्‌मयात समासांचे महत्त्व कबूल करावे लागले.
 
संस्कृतच्या वैदिक व अभिजात ह्या दोन अवस्थांत शब्दसंपत्तीच्या दृष्टी-नेही मोठा भेद आढळतो. वैदिक काळातले पुष्कळसे शब्द नंतरच्या काळी प्रचारातून गेल्यामुळे त्यांचे अर्थ नीटसे कळेनासे झाले हे यास्काच्या निरुक्ता वरुन लक्षात येते. परंतु त्यापूर्वीच्या बाह्मणग्रंथाचे नीट वाचन केले असता, तिथेही ओकस्, दुर्य, पितु ह्यांसारखे जुने शब्द उपयोगांतून जात असल्याचे व त्यांच्याऐवजी गृह, अन्न ह्यांसारखे शब्द प्रचलित होऊ लागल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. ह्याखेरीज दुसरा एक फरक भाषिक उसनवारीमुळे घडून आला. संस्कृतभाषक लोक भारतात येऊन स्थायिक झाल्यावर त्यांचा जो एतद्देशीयांशी संबंध आला, त्यामुळे ह्या भिन्न भाषक समूहांत शब्दांची देवाणघेवाण होणे अपरिहार्य होते. संस्कृत भाषेत प्रचलित असलेले कित्येक शब्द एतद्देशीय द्राविड किंवा मुंडा भाषासमूहांतले असल्याचे संशोधकांनी दाखविले आहे. उदा., अनल (अग्नि), कुन्तल (केस), कुवलय (कमळ), नीर (पाणी), मीन (मासा), तीर (किनारा) इत्यादी. ह्यांखरीज आणखी एक फरक घडून आला; तो मात्र लेखनाची एक नवी शैली प्रचारात आल्यामुळे. व्याकरणशास्त्राने मान्य केलेली पुष्कळशी क्रियापदांची रुपे पाणिनी- नंतरच्या काळात लोकांच्या बोलीत वापरली जात नव्हती, हे पतंजलीच्या महाभाष्यावरुन कळते. उदा., परोक्षभूताची द्वितीयपुरुषी बहुवचनी ऊष, तेर, चक्र ह्यांसारखी रुपे न वापरता त्यांऐवजी उषिता:, तीर्णा:, कृतवन्त: अशी धातुसाधित विशेषणे लोक वापरु लागले होते. पुढेपुढे ही प्रवृत्ती इतकी वाढत गेली की, लोकांच्या लेखनात क्रियापदांचा वापर खूपच कमी होऊ लागला. ह्या नव्या शैलीला रा. गो. भांडारकरांनी ‘ नामप्रधान शैली ’ (नॉमिनल स्टाइल) असे अन्वर्थक नाव दिले आहे.

भारतात संस्कृतचा उपयोग वाङ्‌मयीन निर्मितीसाठी प्रथम होऊ लागला; त्याकाळचे पहिले उपलब्ध वाङ्‌मय धार्मिक स्वरुपाचे आहे. नंतरच्या काळात ‘ वेदांग ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रीय स्वरुपाच्या ग्रंथांतही संस्कृतचा उपयोग आढळतो. त्यानंतर मात्र संस्कृत भाषेत काव्य नाटकादी ललित वाङ्‌मय, कथासरित्सागर, पंचतंत्र इ. कथावाङ्‌मय, गद्य- पद्यमय चंपूकाव्ये, शतककाव्ये, अर्थशास्त्र, कामशास्त्र इ. शास्त्रीय ग्रंथ आणि विविध टीका अशी नाना प्रकारची विपुल ग्रंथरचना झाली.

मेहेंदळे, म. अ.

भाषावैज्ञानिक व व्याकरणिक वैशिष्ट्ये : प्राचीन वैदिक कालखंडात लेखनपद्घती अस्तित्वात होती किंवा कसे, याबद्दलचे उल्लेख उपलब्ध होत नाहीत; कारण सर्व वैदिक वाङ्‌मय मौखिक काटेकोर उच्चरण पद्घतीने परंपरेने जतन करुन ठेवले गेले. इ. स. पू. पाचव्या शतकातील बौद्घ वाङ्‌मयात अक्षरिक, लेखक (रेखा-रेघ काढणे) असे शब्द आढळतात. इ. स. पू. चौथ्या शतकातील ⇨ ब्राह्मी लिपी तील अतिप्राचीन ताम्रपट गोरखपूर जिल्ह्यात सोहगौरा येथे सापडला. ब्राह्मी लिपी भारतीय आहे किंवा काय, याबद्दल उलटसुलट मते आहेत. इ. स. पू. तिसऱ्या शतकातील सम्राट अशोकाचे पस्तीस शिलालेख आहेत. त्यांतील दोन शिलालेख ⇨ खरोष्ठी लिपी त आहेत. उर्वरित बरेच ब्राह्मी लिपीत आहेत. आज संस्कृत भाषा अन्य लिप्यांतही लिहिली जाते. त्यांपैकी ज्या ⇨ नागरी लिपीत किंवा देवनागरी लिपीत लिहिली जाते, त्या लिपीची सुरुवात सहाव्या-सातव्या शतकांत आढळते. लिपीच्या सोपेपणाने ती अल्पावधीत सर्वत्र पसरली. दक्षिण भारतामध्ये याच दरम्यान ग्रंथलिपीचा वापर तालपत्रांवर किंवा भूर्जपत्रांवर लिहिण्यासाठी केला जात असे.

संस्कृत भाषेतील स्वर आणि व्यंजने उच्चरताना दोन प्रकारचे प्रयत्न करावे लागतात - बाह्य आणि आभ्यन्तर. अ, इ, उ, ऋ, लृ हे पायाभूत स्वर. यांना उदात्त, अनुदात्त व स्वरित असे स्वराघात असतात. परत अनुनासिक, निरनुनासिक, ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत असेही भेद असतात. ए, ओ, ऐ, औ हे संधिस्वर असून त्यांचेही वरीलप्रमाणे प्रकार होतात.

  
बाह्यप्रयत्न (११)
विवार, श्वास, 
अ घोष,
अल्पप्राण 
विवार, श्वास, 
अ घोष,
महाप्राण 
संवार, नाद, 
घोष,
अल्पप्राण 
संवार, नाद, 
घोष,
महाप्राण 
उदात्त,  
अनुदात्त,
स्वरित
, च, ट, त, प
, छ, ठ, थ, फ, श, ष, स
सर्व स्वर, ज, ञ् , ब, म, ग, ङ्, ड, ण, द, न, य, र, ल, व 
, भ, घ, ढ, ध, ह
सर्व स्वर,
आभ्यन्तर प्रयत्न 
स्पृष्ट 
ईषत्स्पृष्ट 
विवृत 
संवृत 
क ते म 
(स्पर्श) 
, र, ल, व 
अन्त:स्थ 
सर्व स्वर 
,ष,स,ह 
प्रयोगावस्थेतील अकार 

या दोन्ही प्रयत्नांचा विचार तैत्तिरीय प्रातिशाख्या मध्ये सूक्ष्म रीतीने केलेला आहे. वेगवेगळ्या वर्णांचे उच्चरण होत असताना छातीपासून ते ओठापर्यंत श्वासाचे आघात कुठे व कसे होतात, याचा विशेष विचार प्रातिशाख्यांनी केला. त्यावर भाषाशास्त्रातील ध्वनिव्यवस्थेची उभारणी झालेली आहे. जोडाक्षरे हेही संस्कृत भाषेचे एक वैशिष्ट्य आहे.

वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या कमाला महत्त्व नाही. प्रत्ययांवरुन कर्ता, कर्म समजते. विशेषणे, सर्वनामे, धातुसाधिते, समास, संबद्घशब्द, अव्यये असे शब्दप्रकार असतात. अव्यये व काही धातुसाधिते अविकारी असतात.

नामे व विशेषणे स्त्रीलिंगी, पुपुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी तसेच एकवचनी, द्विवचनी किंवा अनेकवचनी असतात. ती एकूण आठ विभक्तींमध्ये व्यक्त केली जातात. प्रत्येक विभक्तीचे तीन वचनांतील प्रत्यय वेगवेगळे असतात. विशेषणांमध्ये तर- तम-भाव दाखविण्यासाठी प्रत्यय आहेत. उदा., अल्प - अल्पियस् - अल्पिष्ठ. संस्कृत भाषेत गुणवाचक, संख्यावाचक तसेच क्रमवाचक विशेषणे आहेत. देव हे नाम व पूज्य हे त्याचे विशेषण यांची विभक्तिरुपे अशी :

एकवचन 
द्विवचन 
बहुवचन 
प्रथमा 
द्वितीया 
तृतीया 
चतुर्थी 
पंचमी 
षष्ठी 
सप्तमी 
पूज्य: देव:
पूज्यम् देवम् 
पूज्येन देवेन 
पूज्याय देवाय 
पूज्यात् देवात् 
पूज्यस्य देवस्य 
पूज्ये देवे 
पूज्यौ देवौ 
पूज्यौ देवौ 
पूज्याभ्याम् देवाभ्याम् 
पूज्याभ्याम् देवाभ्याम् 
पूज्याभ्याम् देवाभ्याम् 
पूज्ययो: देवयो:
पूज्ययौ: देवयौ: 
पूज्या: देवा:
पूज्यान् देवान् 
पूज्यै: देवै:
पूज्येभ्य: देवेभ्य:
पूज्येभ्य: देवेभ्य:
पूज्यानाम् देवानाम् 
पूज्येषु देवेषु 

तिन्ही लिंगांतील नामांचे स्वरान्त व व्यंजनान्त असे गट केलेले असून त्या त्या गटाला विशिष्ट प्रत्यय लागतात. 

क्रियापदे दहा प्रकारची कल्पिली आहेत. ती अशी : वर्तमान, विध्यर्थ, संकेतार्थक, स्य भविष्यकाळ, तास् भविष्यकाळ, आज्ञार्थ, वैदिक आज्ञार्थी इच्छार्थक (नंतर लुप्त), भूतकाळ, परोक्षभूत, तृतीयभूत. नामांप्रमाणे क्रियापदांनाही प्रत्यय लागतात. हे प्रत्यय वरील दहांपैकी अर्थ, काल,कर्ता किंवा कर्म वचन व पुरुष (प्रथम, द्वितीय व तृतीय) दाखवितात.अर्थाचे एकाहून अधिक घटक एका प्रत्ययातून दिसतात. हे संस्कृत भाषेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. नाम व क्रियापदे यांच्या प्रत्ययांचा मूळ आराखडा असून त्यानुसार त्यांची इष्ट रुपे तयार होतात. त्यामुळेच संस्कृत व्याकरणाला उत्पादनक्षम (जनरेटिव्ह) व्याकरण म्हणतात.

एकवचन 
द्विवचन 
अनेकवचन 
प्रथम पुरुष - 
द्वितीय पुरुष - 
तृतीय पुरुष - 
गच्छामि 
गच्छसि 
गच्छति 
गच्छाव: 
गच्छथ: 
गच्छत: 
गच्छाम: 
गच्छथ 
गच्छन्ति 

गच्छामि ’ यातील ‘ मि ’ हा प्रत्यय वर्तमानकाळ, कर्ता व प्रथम पुरुष असे घटक दाखवितो. धातुपाठानुसार सर्व धातू दहा गटांमध्ये विभागलेले आहेत. ते आत्मनेपदी, परस्मैपदी किंवा उभयपदी असून सकर्मक किंवा अकर्मक असतात. त्यांना प्र, परा, अप, अनु यांसारखे उपसर्ग जोडले असता त्यांच्या अर्थांत फरक पडतो उदा., भू (असणे) या धातूला ‘ अनु ’ हा उपसर्ग जोडला असता, अनुभवणे अशा अर्थाचे क्रियापद बनते. वाक्यरचनेत कर्तरी, कर्मणि व भावे, कर्मकर्तरि असे प्रयोग असतात.

सर्वनामे यद् - तद् (जे - ते), अस्मद् - युष्मद (मी-तू), किम् (प्रश्नार्थक), एतद् - इदम् (हा, ही, हे), अदस् (तो, ती, ते), सर्व इ. असून ती तीनही लिंगांमध्ये आहेत. धातूंपासून केलेली रुपे म्हणजे धातुसाधित विशेषणे क्रियापदाचे काम करतात.

मास हे संस्कृत भाषेचे मोठे वैशिष्ट्य आहे. दोन किंवा अधिक पदे नियमांनुसार एकत्र आली की, समास तयार होतो. समासाचे चार प्रमुख प्रकार (द्वंद्व, अव्ययीभाव, तत्पुरुष, बहुवीही) आहेत. त्यांपैकी अव्ययीभाव समासाचा अव्ययाप्रमाणे वापर होतो. उर्वरित समास विशेषणांप्रमाणे वापरले जातात. विधाने एकमेकांना जोडण्यासाठी च, परं, परंतु, किंतु, अपिच, अपिवा इ. संबद्घशब्द वापरले जातात.

अव्यये स्थलवाचक (यत्र-तत्र), कालवाचक (रात्रौ, दिवा, सर्वदा), संबद्घवाचक (यथा- तथा), अन्यथा तसेच सह, विना, नम:, बहिः स्वस्ति अशा प्रकारची आहेत. त्यांबरोबर विशिष्ट विभक्तीतील शब्द वापरावे लागतात.

संधी हे आणखी एक वैशिष्ट्य. दोन शब्दांचा संधी होतो व या शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असते. त्यांचे स्वरसंधी, विसर्गसंधी व व्यंजनसंधी असे प्रकार आहेत. सुप्रसिद्घ अमेरिकन भाषावैज्ञानिक लेनर्ड ब्लूमफील्ड याने संस्कृतेतर पाश्चात्त्य भाषांना संधिनियम लावून तशी रुपे सिद्घ करता येतात, हे दाखवून भाषाशास्त्रात मोलाची भर घातली.

Thursday, 13 March 2014

नेहरू तारांगण


मुंबईतील वरळी येथील नेहरू तारांगण आपल्याला एका अद्भुत दुनियेत घेऊन जाते. आकाशदर्शनाचा एक रोमांचक अनुभव तिथे घेता येतो. त्यातूनच अनेकांचे कुतूहल जागे होते. त्यातील काहीजण संशोधक किंवा प्राध्यापक होतात , तर काही विज्ञानप्रसाराचा वसा घेतात...
......

वरळीतील नेहरू तारांगण हे मुंबईतील रहिवाशांकरिता आणि पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. महालक्ष्मी मंदिराकडून हाजीअलीचा दर्गा पार करत पुढे आलात की उजवीकडे नेहरू सेंटरची १६ मजली गोल इमारत डोळ्यात भरते. थोडं जवळ आल्यास गोल इमारतीच्या पुढील छोटेखानी घुमट आपल्याला वेगळ्याच विश्वात नेणार , याची खात्री पटवतो.

सन १९७५मध्ये पी. जी. पटेल यांनी जर्मनीहून कार्ल-झाइस कंपनीचा तारांगणाचा प्रोजेक्टर विकत आणला. तो अडकला सीमा-शुल्क विभागात. तो सोडवून घेतला रजनीभाई पटेल यांनी. त्यावेळी रजनीभाईंचा वरळी येथे नेहरू सेंटर सुरू करण्याचा मानस होता. अखेर नेहरू सेंटर तर्फे शैक्षणिक उपक्रम म्हणून तारांगण सुरू करावे असे ठरले. पण ही विज्ञानगंगा मुंबईत आणायची ती कोणाच्या बळावर ? सुदैवाने त्यावेळी टी.आय.एफ.आर. येथे असलेले डॉ. जयंत नारळीकर डॉ. कुमार चित्रे व डॉ. बालू यांनी त्यासाठी मदत करायचे आश्वासन दिले. प्रख्यात वास्तुविशारद कादरी यांनी या वास्तची रचना करण्याचे मान्य केले. मुख्य अडचण होती , ती संचालकपदासाठी विज्ञानाच्या प्रसाराची आवड असणारा संशोधक शोधण्याची. डॉ. अरविंद भटनागर या सौर शास्त्रज्ञाच्या रूपाने ती पूर्ण झाली. अनेक अडचणींवर मात करत दि. ३ मार्च १९७७ रोजी मुंबईत नेहरू तारांगणाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले.
आज २६ वर्षांनंतरही तारांगणातर्फे खगोल विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

अगदी सर्वप्रथम बनवलेला ' नियती बरोबर भेट ' (Tryst with Destiny) या कार्यक्रमाने तारांगणाची सुरुवात झाली. आता तारांगणात मराठी , हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये मंगळवार ते रविवार दररोज चार कार्यक्रम सादर केले जातात. तारांगणाला सोमवारी सुट्टी असते. स्थापनेपासून आजवर तारांगणातर्फे ३० विविध कार्यकमांची निर्मिती करण्यात आली आहे. अर्थात कार्यकमांची तयारी करताना केवळ विज्ञान किंवा वैज्ञानिकांचा सहभाग असून भागत नाही. संहिता तयार करताना भाषा , कला , नाट्य , संगीत , ध्वनिमुद्रण इत्यादी अनेक घटकांना विचारात घ्यावे मागते. तसे झाल्यासच कार्यक्रम रोचक व सहज , सोप्या भाषेत सर्वांना समजेल असा होतो.

तारांगणाच्या घुमटात ६०० लोक बसू शकतात. आता जुने तंत्रज्ञान (जुना प्रोजेक्टर) जाऊन त्याच्या जागी ' डीजीस्टार-३ ' हे नवे कम्प्युटरकृत तंत्रज्ञान वापरले जाते. आठ कम्प्युटरांच्या साह्याने अंतराळातील वैविध्यपूर्ण घडामोडींचे दर्शन सहा प्रोजेक्टरच्या मदतीने घुमटावर घडते. खाली बसण्याच्या खुर्चीची पाठ अगदी मागे नेत जवळ-जवळ झोपल्यासारख्या स्थितीत जाऊन घुमटाकडे बघावे लागते. त्यामुळे खुल्या पटांगणात आकाशाखाली झोपल्याचा आभास निर्माण होतो. कृत्रिम आकाश बघताना सर्वजण हरखून जातात. या दुर्मिळ अनुभवाचे आकर्षण त्यामुळे वाढत जाते व लोक मोठ्या संख्येने तारांगणाकडे वळतात. गेल्या २६ वर्षांत सुमारे एक कोटी ३२ लाख लोकांनी असे कार्यक्रम पाहिले आहेत. यावरूनच तारांगणाची लोकप्रियता लक्षात येईल.

तारांगणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर सर्व प्रथम ग्रहमालेची प्रतिकृती दिसते. सूर्याभोवती फिरणारे ग्रह व त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह बघत येणारा प्रत्येकजण या कालातीत दुनियेत प्रवेश करतो. मंगळाच्या पृष्ठभागावरील दृश्य , चांद्रदेखावा व अनेक संशोधकांची तैलचित्रे आपल्याला खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असेल हे दाखवणारे वजनकाटे सर्वांत महत्त्वाचे आकर्षण ठरते. जोडीला सहज भाषेतील माहिती आपल्यामधील जिज्ञासा जागृत करते.

कृत्रिम ग्रह-तारे बघणाऱ्यांना बरेचदा दुर्बिणीतून प्रत्यक्ष आकाशाकडे बघायची इच्छा होते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणून तारांगणातर्फे दर रविवारी सायंकाळी सात ते आठ या वेळात दुर्बिणीतून विनामूल्य आकाशदर्शन घडविले जाते. त्याव्यतिरिक्त विविध खगोलीय घटना असल्यास तारांगणाकडे आपसूकच लोकांची पावले वळतात. त्याला प्रतिसाद देत तारांगणाच्या वतीने अशा खगोलीय घटना सर्वसामान्य लोकांना दाखवण्याची सोय केली जाते. सूर्य-चंद्र ग्रहणे , गुरू-शनी ग्रहांचे दुर्बिणीतून निरीक्षण , उल्का वर्षाव या व अशा अनेक घटनांच्या वेळी नेहरू तारांगण विशेष सोय करते.

तारांगणाचा एक मोठा उपयोग पावसाळ्यात होतो. भारतासारख्या देशात जून ते सप्टेंबर असे चार महिने पावसाळा असतो. त्यावेळी बऱ्याचवेळा सूर्य दडी मारून बसलेला असतो. आकाशही दिसेनासे होते. अशावेळी तारांगणाचा वापर करून आकाशदर्शन घेता येते.

आत्ता तुम्ही मुंबईतून आकाश बघत असाल आणि काही दिवसांनी अगदी उत्तरेला जाऊन जम्मूसारख्या ठिकाणी आकाश पाहणार असाल , तर तेथे ताऱ्यांची स्थाने वेगळीच भासतात. उत्तरेला गेल्यास ध्रुव तारा क्षितिजसापेक्ष वर सरकतो. जागा बदलल्यानंतर आकाशातील फरक काय असतो , याचा अभ्यास तारांगणामुळे करता येतो. खगोल ऑलिम्पियाड ( Astro Olympiad) या सपर्धेसाठी दरवर्षी भारतीय चमू जातो. ही स्पर्धा ज्या देशात , ज्या ठिकाणी असेल , त्या ठिकाणचे आकाश नेहरू तारांगणात दाखवून आपल्या चमूला तेथल्या आकाशाचा सराव करून दिला जातो.

खगोल मंडळासारख्या हौशी निरीक्षक संस्था गेली अनेक वर्षे तारांगणाच्या प्रसारकांच्या हातात हात घालून खगोलप्रसाराचे कार्य करत आहेत. कृत्रिम आकाश बघून मन न भरलेले हौशी निरीक्षक मग वांगणी येथे प्रत्यक्ष आकाशाखाली उभे राहून सर्वसामान्यांना रात्रभर आकाश दाखवतात. पाऊण तासाचे तारांगणाचे कार्यक्रम सुरू होतात व संपतात. पण तारांगणाने लावलेली खगोलजिज्ञासा लोकांना स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच पुढे हौशी निरीक्षक तयार होतात. त्यातील काही पुढे संशोधक , प्राध्यापक होतात. काही विज्ञानप्रसारक होतात. बरेचजण विज्ञाननिष्ठ विचारसरणीची शिदोरी सोबत घेऊन जातात. तारांगणाची स्थापना करताना हाच उद्देश संस्थापकांचा असावा. तो उद्देश बऱ्यापैकी सफल झाल्याचे नमूद करावेसे वाटते.

मुंबईत भटकंती करणाऱ्यांनी जरूर वरळीत जावे. तारांगणाच्या घुमटाखाली थोडावेळ बसावे. भरदुपारी होणाऱ्या रात्रीचा अनुभव घ्यावा. गावी मोकळ्या शेताच्या बांधावरून केलेल्या आकाश निरीक्षणाच्या आठवणी ताज्या कराव्यात. त्यासाठी तरी नेहरू तारांगणाला एकदा तरी भेट द्या.