Wikipedia

Search results

Thursday 31 July 2014

व्यवसाय


सुतारकाम 


सुतार करणारा अथवा लाकडी वस्तू तयार करणारा कारागीर होय. सुतार लाकडापासून फर्निचर, दैनंदिन वापराच्या लाकडी वस्तू बनवण्यासोबतच इमारतींच्या बांधकामासाठीही सुतारकाम करतात.लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय. यासाठी लाकूड कापून त्याची विविध तऱ्हेने जोडरचना केली जाते. मानवाच्या रोजच्या वापराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सुतारकामाचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) जुन्या पद्घतीच्या घराला लागणारे खांब, तुळया, कैच्या व चौकटी असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे. (२) फळ्यांची दारे, खिडक्या व विभाजक पडदे अशा प्रकारचे सपाट भाग बनवून बिजागऱ्या, कड्या व अटका बसविणे. (३) खुर्च्या, टेबले व कपाटे अशा प्रकारचे साधे तसेच शोभिवंत उंची फर्निचर तयार करणे. (४) मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे, कमानीच्या व काँक्रीटच्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे. (५) शेतकामांसाठी लागणारे औत, नांगरादी लाकडी अवजारे बनविणे. (६) तेलघाणे, उखळ, जाती व चरक अशा प्रकारची लाकडी यंत्रे तयार करणे. (७) बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोड्यां च्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने बनविणे. (८) नावा, पडाव, शिडाची जहाजे व तराफे अशा प्रकारची पाण्यातील वाहने बनविणे. (९) सूत व कापड उद्योगांतील चरखे, हातमाग वगैरे साहित्य तयार करणे. (१०) पिपे, खोके व पिंजरे अशा प्रकारचे साहित्य बनविणे. (११) पांगुळगाडा वगैरे खेळण्याचे लाकडी साहित्य तयार करणे. (१२) फर्निचरासाठी लागणारे गोल छेदाचे नक्षीदार काम, लेथ यंत्रावर कातून त्यावर तेलातील रोगण (व्हॉर्निश) किंवा लाखेचे रंग बसविणे. (१३) विविध प्रकारचे पोकळ व भरीव कातकाम करणे. (१४) लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.(१५) ओतकामासाठी लागणारे नमुने व तात्पुरत्या स्वरूपाच्या पेट्या  बनविणे. (१६) रूळगाड्या, मोटारगाड्या, आगबोटी आणि विमानांमध्ये लागणारे लाकूडकाम करणे. चांभार


बारा बलुतेदारांपैकी चांभार हे एक. पूर्वीपासून प्रत्येक गावामध्ये असे बलुतेदार असत. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
कातडीं कमावण्याचा धंदा न करितां कमावलेल्या कातड्याचे जोडे व इतर जिन्नस करणारे लोक स्वत:स मोची हें नांव घेतात; व आपला दर्जा जरा उच्च समजतात.
पूर्वी चर्मकार (चांभार) समाजातील बांधव कातडी कमावण्याचा धंदा करत असत. नुकतेच काढलेले व नदी अथवा तत्सम पाणवठ्यावरून भिजवून वाळत घातलेले कातडे मोठे निब्बर असायचे. त्याला मनासारखा आकार द्यायचा (पादत्राणे बनवण्यासाठी) तर ते पहिल्यांदा नरम पडायला हवे. त्यासाठी या चांभाराकडे इंगा नावाचे औजार होते. त्याने या कातड्याला चांगले बडवून काढले की ते नरम पडे आणि मग ते चांभाराच्या मनासारखे निमुटपणे आकार घेई. 



कुंभार

ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो, मात्र त्या भाजायची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही(बुलाबाई-बुलोजी) बनवतो. कुंभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद कालापासून कुंभार आहेत. त्यांच्या देवता पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, हर्दिया या असतात.
अन्य अवजारे
आवा : म्हणजे कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी. पाचसहा विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा, अशी आव्याची रचना असते. भाजलेल्या वस्तूंना तांबडा रंग हवा असेल तेर, आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात. वस्तू काळ्या रंगाच्या हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्या आत कोंडून वस्तूंना काळा रंग येतो.
गंडा किंवा गुंडा : हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो. वस्तूच्या आतून, वस्तूवर हा एका हाताने फिरवला की वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते.
चोपणे : ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते. जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते. त्यामुळे वस्तू पक्की होते.
बांबूचा दांडा : हा चाक फिरवायला लागतो. चाकाच्या दोन आ‍ऱ्यांमध्ये बांबू घुसवून कुंभार चाकाला गती देतो.

लोहार

लोहार म्हणजे लोखंडाच्या वस्तू घडवणारे कारागीर होत. लोखंडाला ऐरणीवर ठोकूनठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची/ बागकामाची अवजारे, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे इत्यादी लोखंडी वस्तू बनवतात.
भट्टीमध्ये  लोखंडाच्या अगर पोलादाच्या लहान वस्तू लाल होईपर्यंत तापवून व ठोकून आ. १. बिडाची भट्टी : (अ) पुढील दृश्य : (१) कोळसा ठेवण्याची जागा,  (२) छिद्रयुक्त प्रोथ, (३) धुराडे; (आ) मागील दृश्य : (१) हवेचा झोत नियंत्रित करणारी झडप, (२) झोत निर्माण करणारा पंखा चालविणारे विद्युत् चलित्र. हाताने बनविण्याच्या कामास लोहारकाम म्हणतात. बंद भट्टीत मोठ्या वस्तू तापवून मोठ्या यांत्रिक घणाने ठोकून आकार देण्याच्या कामास घडाईकाम (फोर्जिंग) म्हणतात. [⟶ घडाई, धातूची]. शेतीकरिता लागणारी हत्यारे व अवजारे म्हणजेच विळा, कोयता, कुऱ्हाड, खुरपे, पहार वगैरे वस्तू लोहार बनवितो; तसेच बैलगाडीच्या लाकडी चाकास लोखंडी धाव बसवितो. भट्टीमध्ये घडीव लोखंड तापविल्यास त्यास कोणताही आकार देण्याइतपत ते नरम होते अगर त्याला लवचिकपणा येतो हा गुणधर्म माहीत झाल्यामुळे लढाईकरिता लागणारी तलवार, भाला, खंजीर, कट्यार, बाणाची टोके, परशू वगैरे हत्यारे लोहार बनवीत असत. ॲल्यूमिनियम मिश्रधातू, पितळ, कासे (ब्राँझ) याही लोहेतर धातूंपासून यंत्रांचे सुटे भाग व अनेक वस्तू लोहार बनवितो.

शिंपी  

शिंपी  म्हणजे कपडे शिवणारा. तसेच शिंपी हे आडनावही असते.आपल्या आवडीचे, अंगाला नीट बसणारे, सरळ दुकानात जाऊन खरेदी करावयाचे पँट, शर्ट, कोट यांसारखे कपडे. कापडाच्या दुकानात कापड खरेदी करून त्यातून शिंप्याने आपली मापे घेऊन त्यांनुसार शिवलेल्या कपड्यांपासून भिन्नत्व दर्शविण्यासाठी ही संज्ञा वापरात आहे.
भारतात शिलाई मशीनचा प्रवेश झाला तोच १९व्या शतकाच्या अखेरीस. आधी नवीन तंत्राला विरोध झाला असला तरी एक-दोन दशकांत भारतीय शिंपी मशीनला सरावले. त्यात वेळोवेळी होत गेलेल्या बदलांनाही आत्मसात करत गेले. इंग्रज काळात भारतीय सैन्याच्या वेशभूषेत बदल होऊ लागलेला होताच. पण या बदलांचाही फारसा आर्थिक लाभ शिंपी समाजाला होवू शकला नाही. पन्नासच्या दशकात रेडीमेड कपड्यांनी तर खेडोपाडी पसरलेल्या शिंप्यांवर वाताहत होण्याची पाळी आणली. जे शिकले ते अन्य व्यवसायांत शिरले. सरकारी वा कारखान्यांत नोक-या करु लागले. जे नाही शिकले ते परंपरागत व्यवसाय कसाबसा करत राहिले.







सोनार  

सोनार  म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर होय. सोनार सहसा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या जाणाऱ्या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात.
देवीदेवतांची आभूषणे नि सौंदर्यालंकार घडविणारे. एवढेच नव्हे तर पंचांग बधून विवाह जुळविणारे. लग्न लावणारे. वधुला सालंकृत करून सजविणारे. नवजात अर्भकांचे कान टोचणारे. दागिन्यांवरील नक्षीकाम, बारीक कलाकुसर याचबरोबरच `एक नंबरी’ सोन्याची हमी देणारे.

गवळी 

गवळी  म्हणजे दुभत्या जनावरांपासून दूध व दुग्धजन्य पदार्थ बनवून विकणारा व्यावसायिक होय.
दुधदुभत्याच्या धंद्यावरून ‘गवळी’ हें नांव पडलेली जात फक्त मुंबई इलाख्यांतच आहे. अहिरांची 
माहिती स्वतंत्र दिलेली आहे. लो. सं. ३८५४२. दक्षिण-हिंदुस्थान, कोंकण व कर्नाटक या प्रांतभर हे लोक आहेत.धनगर, कुरुबा, मराठा कुणबी इत्यादि लोकांचा भरणा या जातींत बराच असून त्यांच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्यें आठ पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोक एकमेकांशीं रोटीबेटीव्यवहार करीत नाहींत. यांखेरीज कानडी 'गोपाल किंवा गोला' हाहि गवळयांचाच एक पोटभाग आहे असें म्हणतात.या लोकांच्या पुष्कळ चालीरीती लिंगायतांप्रमाणें असून कांहीं खास लिंगायत झालेले आहेत. एक आडनांव असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली यांमध्यें रूढ आहेत.हे लोक मांसाहारी असून त्याचा सामाजिक दर्जा कुणब्यांहून वरचा आहे. यांची मुख्य देवता कृष्ण ही होय.यांच्या कुलदेवता महादेव, खंडोबा, विठोबा इत्यादि आहेत.जंगम व ब्राह्मण हे त्यांचे उपाध्ये असतात परंतु लग्नाच्या वेळीं ब्राह्मण असावाच लागतो.

डॉक्टर

डॉक्टर म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी साक्षात देवच , आणि हे डॉक्टर आज त्यांच्यासाठी रक्षक नाहीतर भक्षकच झाले आहेत .....आज शिक्षणाचाही " आईचा घो झाला आहे " म्हणजेच पैसे देऊन डोनेशन वर मेडीकललाही सहज प्रवेश घेता येतो अर्थातच ज्यांच्या बापजाद्यांकडे पैसा असतो तेच लोक जातात ( लायकी नसतानाही ) आणि काय तर म्हणे आम्ही डॉक्टर ? तुम्हाला जर मानवी जीवनाच मूल्य कळत नसेल तर तुमचं डॉक्टर असणे हे ओसामा बिन लादेन असण्या सारखच आहे नव्हे का ? कारण त्यालाही मानवी जीवनाच मूल्य हे माहित नव्हत ते काय असतं हे आणि हे सर्व जगाला माहित आहे. तुम्ही तर चक्क सफेद कपडे, नव्हे कफन ओढून हे काम करता आणि म्हणे आमचा संप आहे आमच्या एका डॉक्टर सहकाऱ्याला मारहाण झाली .संप जरूर व्हावा पण तो कोणाच्याही जीवाशी खेळून नाही . तुम्ही डॉक्टर आहात यम नाही. तुमचं काम जीवन देणं आहे घेणं नाही. म्हणून तुम्हाला संपाचा विचार करताना काम बंद आंदोलन करण्यापेक्षा दुसरा पर्याय शोधला पाहिजे. कारण उद्या डॉक्टरांवर हमला झाला म्हणून फाशीचा कायदा जरी झाला तरी तुम्हाला असे हमले होणार नाहीत अस जर वाटत असेल तर ते साफ चुकीच आहे ......कारण एखाद्या परिवारातील व्यक्ती डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे जर दगावली तर तिथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांना कायद्याच काही देणं घेणं नसेल आणि तुमच्यावर हमला केला जाईल .....म्हणून जर तुम्ही डॉक्टर म्हणून व्रत अंगिकारले असेल तर तुम्हाला तुमच्या रुग्णाकडे एक बकरा म्हणून न पाहता त्याच्याशी तुमचं सौहार्दाच नात निर्माण झालं पाहिजे तुमच्या वर त्याचा संपूर्ण विश्वास असला पाहिजे. तरच हे हल्ले होणार नाहीत नाहीतर तुम्हाला फाशीचा कायदाही वाचू शकणार नाही ...

भारतीय पोलिस सेवा

भारतीय पोलिस सेवा (इंडियन पोलिस सर्व्हिसेस किंवा आय.पी.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.पी.एस. ही तीन आखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.पी.एस. सेवा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या पोलिस खात्यांत अनेक महत्त्वाची पदे आय.पी.एस. अधिकारी सांभाळतात.
आय.पी.एस. अधिकाऱ्यांची निवड नागरी सेवा परीक्षेद्वारा (सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन) केली जाते. संघ लोक सेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) ही भारत सरकारची संविधानिक संस्था सरकारी अधिकाऱ्यांची निवड व नियुक्ती करण्यास जबाबदार आहे. आय.ए.एस. अधिकारी बनण्यासाठी इच्हुक उमेदवारांना नागरी सेवा परीक्षेचे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात. निवड झालेल्या आय.पी.एस. अधिकाऱ्यांना हैदराबादमधील राष्ट्रीय पोलिस विद्यालय (नॅशनल पोलिस अकॅडमी) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.

खालील काही प्रमुख पदे आय.पी.एस. अधिकारी भुषवितात:
भारतीय गुप्तहेरखात्याचे (इंटेलिजन्स ब्यूरो) संचालक
राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण खात्याचे (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरो) संचालक
सीमा सुरक्षा पोलिस संचालक अधिकारी
रेल्वे सुरक्षा बल संचालक अधिकारी
पोलिस कमिशनर

सैनिक

पायी चालून शत्रूशी लढाई करणाऱ्या सैन्यदलांस पायदळ म्हणतात. हा सर्वात जुना सैन्यदल प्रकार आहे.
युद्धात संख्येने सर्वात जास्ती असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनीक काळांतही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर दळांच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते.


रॉयल आयरिश रॅफल्स राशन पार्टी, १९१६
सैन्यातील इतर दळांच्या मानाने पायदळाचे प्रशिक्षण खडतर असते व त्यांत शिस्त, आक्रमकता आणि शारिरिक क्षमतेवर जास्ती भर दिला जातो.
दुसऱ्या महायुद्धापासून तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने सैन्यातील (मुख्यतः पश्चिमात्य देशांतील) पायदळाचा आकार कमी होत गेलेला आढळतो. उदा. अमेरिकन सैन्यात पायदळाची संख्या केवळ ४९,००० आहे. 

Friday 11 July 2014

बटाट्यापासून वीज!

बटाट्यापासून वीज!

उकडलेल्या बटाट्याचं तुम्ही काय काय करू शकता? वडा, कटलेट, शेव.. अर्थात, हे सर्व झाले खाण्याचे पदार्थ आणि बटाटयाचा खाण्याव्यतिरिक्त काय उपयोग असू शकतो, असा विचार साहजिकच मनात येतो. मात्र उकडलेल्या बटाट्यापासून चक्क वीजनिर्मिती होऊ शकते हे जरा अनपेक्षितच आहे नाही का..? पण जेरुसलेमच्या काही संशोधकांनी उकडलेला बटाटा खाण्याऐवजी चक्क वीजनिर्मितीसाठी वापरला आहे.

बटाटा हा बहुगुणी कंदमूळ आहे हे सर्वानाच माहीत आहे, पण या बहुगुणी बटाट्यापासून वीज निर्माण होऊ शकते हे मात्र जरा अतीच होतंय असं वाटेल. पण हे खरं आहे व जेरुसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीतील कृषिविज्ञानाचे प्राध्यापक हैम राबिनोविच व त्यांच्या सहका-यांनी हे सप्रयोग सिद्ध करून दाखवलं आहे. कच्च्या बटाट्याचा एक छोटा पातळ काप कॉपर कॅथोड व झिंक अ‍ॅनोड यांच्यामध्ये ठेवून त्याची वायर बल्बला जोडल्यास बल्ब पेटतो. अशा प्रकारे निर्माण केलेली ऊर्जा चाळीस दिवसही पुरू शकते, हे त्यांना सिद्ध करायचं होतं. ही ऊर्जा सेलफोन व इतर उपकरणांसाठीही वापरता येऊ शकते. मुख्य म्हणजे यासाठी नेहमीच्या बॅटरीपेक्षा अत्यंत कमी खर्च येतो. बटाटयाचा ऊर्जानिर्मितीसाठीचा हा वापर हा आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या भागातील रहिवाशांसाठी खूप फायद्याचा ठरू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

कच्चा बटाटा हा दोन धातूंमध्ये फक्त विद्युतवाहकाचं काम करतो, ज्यामुळे विद्युतभारीत कण वायरमध्ये जाऊन विजेला प्रवाही करतात. खरं तर स्ट्रॉबेरी व केळं या फळांमध्येही अशा प्रकारची विद्युतनिर्मितीची क्षमता आहे, त्यांच्यातही नैसर्गिकरित्या बॅटरी अ‍ॅसिड असतं. मात्र ही फळं सर्वच देशांमध्ये उपलब्ध नाहीत आणि असली तरीही ती सर्वच गरिबांना सहजरीत्या परवडतील अशी नाहीत, शिवाय ती नाशवंतही आहेत. मात्र बटाट्याच्या कोणत्याही वातावरणात टिकून राहण्याच्या गुणामुळे व तो सर्वत्र सहज उपलब्ध असल्यामुळे आम्ही बटाट्यालाच या प्रयोगात वापरल्याचं राबिनोविच यांनी सांगितलं. बटाटा हा जगातलं सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन असलेलं चौथं पीक आहे. बटाट्यामध्ये असलेला स्टार्च उकडल्यावर निघून जातो व त्यानंतरच त्यापासून ऊर्जा निर्माण होऊ शकते, म्हणूनच आठ मिनिटं उकडलेल्या बटाट्याचा वापर या प्रयोगासाठी करण्यात आला.

या संशोधकांनी बटाटा बॅटरी किटच बनवला आहे, ज्यात दोन मेटल इलेक्ट्रोड्स व अ‍ॅलिगेटर क्लिप्स आहेत. दोन इलेक्ट्रोड्समध्ये बटाट्याचा काप ठेवण्याची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून एक काप सुकला की बल्ब किंवा उपकरण सुरू ठेवण्यासाठी दुसरा काप त्यात लगेच सरकवला जाऊ शकतो. नेहमीच्या बॅटरी किंवा विजेवर उपकरण चालवण्यापेक्षा बटाट्यापासून तयार होणा-या विजेचा खर्च दहापटीने कमी असेल, असा संशोधकांचा दावा आहे. जेरुसलेमच्या संशोधकांच्या या प्रयोगावर काहींनी टीकाही केली आहे. जिथे अन्नच मिळणे मुश्कील तिथली जनता मुळात वीज निर्माण करण्यासाठी बटाटा का वापरेल, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अन्नपदार्थापासून ऊर्जानिर्मिती करायची असल्यास त्याची मुबलकता खूपच पुष्कळ प्रमाणात असली पाहिजे, असा मुद्दा या प्रयोगासंदर्भात पुढे आला आहे. अद्याप राबिनोविच यांच्या या प्रयोगाला प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणी पुरस्कर्ते मिळालेले नाहीत, तेव्हा आपल्या या प्रयोगाला कोणीतरी पाठिंबा देऊन समाजाच्या उपयोगी पडू शकेल असा हा बटाटा बॅटरी किट प्रत्यक्षात आणावा, असं त्यांना वाटत आहे.

Wednesday 2 July 2014

सुरूची बाग

सुरूची बाग

सुरूची बाग म्हणजे समुद्रकिनाराच आहे.. जिथे किनार्‍यावर सुरूची झाडे बहुसंख्येने उभी आहेत.. अजय पाटील या मायबोलीकरांच्या पेटींगमध्येदेखील इकडचे चित्र पाहीले होते.. तेव्हा या ठिकाणाला भेट द्यायची राहिलीच होती.. वसई (पश्चिम) ला इथे एसटी वा रिक्षाने जाता येते.. एसटीने (भाडे प्रत्येकी ७ रु.) गेल्यास वसई शहर स्टॉपला (पापडीच्या पुढचा स्टॉप)उतरायचे.. मग इसको पूछ -उसको पूछ करत पंधरा- वीस मिनीटांत चालत सहज पोहोचता येते.. इथे बहुदा स्वतःची गाडी घेउन जाता नाही येत.. कारण जवळपास एक किलोमीटर अंतराआधी गेट लावला आहे.. रिक्षाने (भाडे अंदाजे प्रत्येकी १६ रु.) आलात तर इथपर्यंतच सोडतो..
इथून मग समुद्रचा आवाजच खेचून घेतो.. सरळ जाणारी वाट नि आजुबाजूला खारफुटी.. असे अंतर पार करताना समोरच सुरूची झाडे डोकावू लागतात.. किनार्‍यापाशी पोहोचलो नि खादाडीसाठी चक्क एकच स्टॉल दिसला.. झोपडीच म्हणा.. एखाद दुसरा टांगा नि दोन तीन घोडे.. बाकी विस्तीर्ण पसरलेला किनारा.. असे दृश्य मुंबईतील समुद्रकिनार्‍यावर फार कमीच दिसते... इथे पोहोचलो नि किनार्‍यावरील ही सुरूची झाडं वार्‍यामूळे समुद्राच्या विरुद्ध दिशेने कललेली दिसली.. उजव्या बाजूपेक्षा डावीकडे जास्त प्रमाणात झाडे दिसत होती... मग तिथेच आधी फेरफटका मारण्यासाठी गेलो.. सुरूची बाग हे नाव खरच उठून दिसते..

 

- - -- - - - -
प्रचि २
-- - - -- - -
संध्याकाळी चारची वेळ.. पण वातावरण पावसाळी त्यात उंचपुरी अशी ही सुरूची झाडे.. शिवाय सभोवताली पसरलेली हिरवाई.. इथे फिरायला कोणाला नाही आवडणार... स्मित

प्रचि ३
- - -- - - - -

प्रचि ४
(फोटो by 'ती' .. )
- - - -- - - -
इथून मग समुद्र बघतानाही छान वाटते..
प्रचि ५

(ती तिथं उभी.. )
- - - - - -- - -
मग पावले आपसुकच समुद्राकडे वळवली..

- - - -- - - -
प्रचि ७ : समुद्रकिनारा नि घोडागाडी हे मुंबईतल्या चौपाटीवरचे नेहमीचे दृश्य.. पण इथे एकच होती..
- -- - - - - -
प्रचि ८:

धावत जाऊन कधी एकदा त्या समुद्राच्या लाटांवर झोकून देतोय.. !! (लहानपणी आम्ही भावंडेसुद्धा अशी शर्यत लावायचो.. आता कधी मित्रांसोबत गेलो तर उलटे धावत जाण्याची शर्यत खेळतो..फिदीफिदी)
------------
प्रचि ९: एकीकडे आकाशात काळ्या ढगांचे आच्छादन तयार झाले..

प्रचि १०: