Wikipedia

Search results

Tuesday 28 May 2013

निजामशाही


अहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.
 स्थापना

इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्या बहमनी सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.

२८ मे, इ.स. १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामांतर केले.

पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. चांद बिबी ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अंबर हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.
घराणे
या सल्तनतीच्या अधिकारारूढ सुलतानांना निजामशाह या किताबाने उल्लेखले जाई.
नाव     कार्यकाळ (इ.स.)
अहमद निजामशाह     १४९० - १५०८
बुऱ्हाण निजामशाह     १५०८ - १५५३
हुसेन निजामशाह     १५५३ - १५६५
मूर्तझा निजामशाह     १५६५ - १५८८
मिरान हुसेन     १५८८ - १५८८
इस्माइल निजामशाह     १५८८ - १५९०
दुसरा बुऱ्हाण निजामशाह     १५९० - १५९५
इब्राहिम निजामशाह     १५९५ - १५९६
दुसरा अहमद निजामशाह     १५९६ - १५९६
बहादुर निजामशाह     १५९६ - १६०५
दुसरा मूर्तझा निजामशाह     १६०५ - १६३१

मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे औरंगाबाद) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.

सुरुवातीचा काळ

मलिक अंबर हा जन्माने हबशी होता.[१] त्याच्या आई-वडीलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वत:चे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
 महसूल व्यवस्था

दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. अनेक वर्षांच्या प्रशासनाच्या अनुभवातून प्रत्येक जमिनीच्या तुकड्याचे सरासरी उत्पन्न त्याने निश्चीत केले आणि ह्या उत्पन्नाच्या दोन पंचमांश उत्त्पन्न महसूल म्हणून गोळा करण्यास त्याने सुरुवात केली. इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरुपात न गोळा करता पैशाच्या रुपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रक्कमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली.

त्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
मृत्यू
८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला

Thursday 16 May 2013

मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगावकर
पूर्ण नाव     मंगेश केशव पाडगावकर
जन्म     नोव्हेंबर १०, १९२९
वेंगुर्ला,सिंधुदुर्ग
कार्यक्षेत्र     साहित्य, संगीत, दूरचित्रवाणी
राष्ट्रीयत्व     भारतीय Flag of India.svg
पुरस्कार     महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी पुरस्कार १९८०
विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, २०१०
वडील     केशव पाडगावकर
पत्नी     पाडगावकर
 लेखन
 * धारानृत्य (१९५०)  * सलाम (१९८०)
    * त्रिवेणी (१९९५)  * मीरा १९९५ मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद
    * उदासबोध (१९९६)   * मोरू (१९९९)   * सुरदास (१९९९)
      * मीरा १९९५ मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद    * राधा (२०००)
    * शर्मिष्ठा (१९६०)  * वादळ * सूर आनंदघन * कबीर १९९७ कबीराच्या दोह्यांचा अनुवाद
    * गिरकी  * चोरी   * भटके पक्षी (१९८४)    * जिप्सी (१९९४)
    * उत्सव (१९६२)    * मुखवटे   * नवा दिवस (१९९३)
    * काव्यदर्शन (१९६२)      * तुझे गीत गाण्यासाठी (१९८९)
    * तृणपर्णे     * गझल (१९८१)   * सुट्टी एक्के सुट्टी (१९९३)
    * उदासबोध (१९९६) * वात्रटिका (१९९९)   * कविता माणसाच्या माणसासाठी (१९९९)
    पाडगावकरांच्या काही प्रसिद्ध कविता
        * अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी   
    * फिदी फिदी हसतील ते?   * फ़ूल ठेवुनी गेले 
    * दार उघड , दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड !
    * आम्‍लेट   * मी बोलले न काही नुसतेच पाहिले
    * जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा  * सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
        * सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला   * सलाम   
 गौरव
     * अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, २०१०
 पुरस्कार
    * साहित्य अकादमी पुरस्कार १९८० सलाम
    * महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००


पाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.
    पाडगावकर मला तूमची आमची भेट कधी झाली हे खरच स्मरत नाही. तूम्ही लहानपनापासूनच भेटत गेलात. लहानपणी कधी तरी घरच्यांसोबत तूमचे "भावनांचा तू भुकेला रे" ऐकले आणी ते ऐकता ऐकता झोपी गेलो असे आमच्या मातोश्री सांगतात. ती जादू तूमची होती की लता मंगेशकरांची हे कळलेच नाही. तेव्हा ते वयच न्हवतें ते, मग आईने सांगीतले की अरे हे "आपले" पाडगावकरं. तिथे तूम्ही जे आपले झालात ते अजुनही आपलेच राहीलात.
    कळत्या वयातं तिच्या कडे पाहताना तूमचे लाजुन हासने अनं ची नेहमीच आठवन व्ह्यायची पाडगावकर. वाटायच पाडगावकर नसते तर माझ्या ह्या भावनांना कोणी ओळखले असते.
    पुढे कधी तरी जेव्हा सर्वांचे "प्रेम सेम नसते" हे ऐकले तेव्हां वाटल की, बास हेच माझे गाणें असनार. आणि आपले गाणे, आपणच गायचे हे तेव्हांच ठरवीले. मैत्रीनी बरोबर बसलो की "संथ निळे हे पाणी" आठवायचे. तेव्हां वाटायचे तो शुक्राचा तारा कधी संपूच नये. हेच हेच चित्र राहावें. नेहमीसाठी. पुढे जेव्हा मैत्रीनीने "मामा" बनवले तेव्हा तूमच्याच "अखेरचे येतील माझ्या" चा खरा अर्थ कळला.
    पाडगावकर तूम्ही मला जळी-स्थळी भेटत असता. भरधाव वेगाने जेव्हा मी अमेरिकेतील रस्त्यांवरून गाडी हाकत असतो तेव्हा तूमच्याच कविता, भावगीत रुपाने माझ्या गाडीत वाजतात. त्या रस्त्यांचे भाग्य आहे पाडगावकर साहेब, कारण अशी वंदता आहे की आवाजाच्या लहरी खुप काळ तिथेच राहतात. कोणी जर पुढे मी गेलेल्या रस्त्यावरुंन ते लहरी ओळखायचे मशिन फिरवले तर त्याला रेडीओ लहरीत तूमची गाणी ऐकायला मिळतील व त्याचं जिवन सार्थकी लागेल.
    तूमचा जिवनाचा दृष्टीकोण काय ह्याचाशी आम्हा रसिकांना काही घेनेदेणे नाही, नसावे. आम्हाला फक्त तूमच्या कविता हव्यात, मग त्या मोरूच्या असोत वा बोलगाणी असोत. कारण अहो या जिवनावर प्रेमं करायला आम्हाला तूम्ही शिकवलत.
    तूम्ही आणि खळे काकांनी जे मला दिलयं, मला नाही वाटत त्यांच ऋण मी फेडू शकेन. तूम्हाला तूमच्याच कवितेने माझा "सलाम".

''पद्म पुरस्कार मिळण्याबाबत मी व्यक्त केलेल्या मनोगतावर कवी ना. धों. महानोर यांनी "सकाळ'मध्ये केलेले भाष्य वाचून मी निरुत्तर झालो आहे. त्यांनी जे काही लिहिले, त्यावर मी काही बोलण्यापेक्षा, माझ्यावर, माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनीच बोलणे योग्य ठरेल,'' अशी भावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
    संगमनेर येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात पाडगावकर यांनी भारत सरकारचा पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेची निस्सीम सेवा करूनही अद्याप शासनाने दखल न घेतल्याची बोचही पाडगावकरांनी या वेळी बोलून दाखवली होती. हे पुरस्कार कसे मिळतात, हेदेखील आपल्याला माहीत असल्याचे विधानही त्यांनी या वेळी केले होते.
    पाडगावकर यांनी पद्म पुरस्कारांबाबत व्यक्त केलेल्या मनोगतावर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करणारा महानोर यांचा लेख "लाचावले मन, लागलीसे गोडी' या शीर्षकाखाली आज (ता. 4) "सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर मी काय प्रतिक्रिया द्यायची, असा प्रतिप्रश्‍न पाडगावकरांनी केला आहे.

Monday 13 May 2013

विश्वनाथन आनंद

विश्वनाथन आनंद
विश्वनाथन आनंद हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे व तो सध्याचा जग्गजेता आहे. FIDE फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता.
   बुद्धिबळाच्या पटावर अधिराज्य गाजवणारा ‘ राजा ’ विश्वनाथन आनंद भारताचा नागरिक नसल्याचा भन्नाट जावईशोध केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्यानं लावला आहे. त्यामुळे हैदराबाद विद्यापीठाची मानद डॉक्टरेट आनंदला नाकारण्यात आली आहे.
  जगभरातल्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणारा, तिथे देशाचा तिरंगा अभिमानानं फडकवणारा विश्वनाथन आनंद हा स्पेनचा रहिवासी आहे, असं (अ)ज्ञान मनुष्यबळ विकास मंत्रालयानं पाजळलंय. काय तर म्हणे, ‘ तो त्याच्या पत्नीसोबत स्पेनमध्ये राहतो... ’
  विश्वनाथन आनंदला मानद डॉक्टरेटनं गौरवण्याचा निर्णय हैदराबाद विद्यापीठानं २००९ मध्ये घेतला होता. परंतु, परदेशी पुरस्कारविजेत्या व्यक्तीला कुठलीही पदवी-पुरस्कार देताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागते. त्यानुसार त्यांनी आपला सविस्तर प्रस्ताव खात्याकडे सोपवला होता. आता याच मनुष्यबळ विकास मंत्रालयानं विद्यापीठाकडे आनंदच्या नागरिकत्त्वाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आनंद आणि त्याची पत्नी अरुणा आनंद स्पेनमध्ये राहत असल्यामुळे त्याला डॉक्टरेट देण्यावर मंत्रालयाचा आक्षेप आहे.
  मनुष्यबळ विकास खात्याच्या या विचित्र भूमिकेबद्दल अरुणा आनंद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा सगळा प्रकार आमच्यासाठी खेदजनक आहे, आम्ही भारतीय आहोत हे कुणाला सिद्ध करून द्यायची आम्हाला गरज वाटत नाही, आम्ही भारतीय आहोतच, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
  दरम्यान, सर्व आवश्यक कागदपत्रं मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचं विद्यापीठानं नमूद केलंय. त्यामुळे जगज्जेता बुद्धिबळपटू भारतीय नसल्याचा जावईशोध मनुष्यबळ खात्यात कुणी लावला, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्याच्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी आनंदच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
  बुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा 'माइंड गेम' आहे. यामध्ये प्यादी, हत्ती, घोडा, ऊंट, वजीर यांच्यात आपल्या राजाला वाचविण्यासाठी घमासान युद्ध चालते. या खेळात आपला ‍विश्वनाथन आनंद पुन्हा जगज्जेता ठरला. त्याने बुल्गेरियात‍ील सोफियात इतिहास घडविला. सोफियाच्या वॅसेलीन टोपालोवला पराभूत करुन जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक त्याने केली. बुद्धिबळातील सर्व प्रकारात जिंकलेला आनंद हा एकमेव खेळाडू आहे. चार वेळा जगज्जेता, पाच वेळा बुद्धिबळातील ऑस्कर विजेता, सर्वात कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम करणारा आनंद गेल्या तीन दशकांपासून बुद्धिबळाचा राजा आहे. आपण सर्वकालिन महान खेळाडू असल्याचे त्याने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे.
   आनंदसाठी बुल्गेरियातील स्पर्धा सोपी नव्हती. त्याच्या अडचणी प्रवाशातून सुरु झाल्या. युरोपातील आकाशात ज्वालामुखीच्या राखेचे ढग असल्यामुळे आनंद जर्मनीत अडकला होतो. दीर्घकाळ विमानसेवा खंडीत राहणार असल्यामुळे 40 तासांचा प्रवास करुन आनंद पत्नी अरुणासह फ्रॅंकपर्टने सोफियात दाखल झाला. पाच देशांतून दोन हजार किलोमीटरचा प्रवास करताना आनंद आणि त्याच्या टीमला अनेक अडचणी आल्या. परंतु त्यांनी अडचणींना दाद दिली नाही. ब्लगेरियात आनंदच्या प्रसिद्धीचा परिचय आला. बल्गेरिया चेकपोस्टपासून चार तासांचे अंतर सोफिया होते. चेकपोस्टवर आनंद ही अक्षरे वाचल्यावर कोणतेही चेकिंग झाले नाही. त्याची कार वेगाने जात असल्यामुळे पोलिसांनी रोखली. परंतु आत आनंद आहे, असे सांगताच त्याच्या गाडीला हिरवा कंदील पोलिस देत होते. आनंद हा बुद्धिबळातील 'कोहीनूर' भारतात नव्हे तर जगात प्रसिद्ध असल्याचे यातून दिसून आले.
    भारतात बुद्धिबळ हा राजे-महाराजांच्या काळापासून चालत आलेला खेळ आहे. परंतु कालांतराने यामध्ये रशियाने वर्चस्व निर्माण केले. गॅरी कॅस्पारॉव्ह, मिखेल बोत्वीनिक, बोरिस स्पॅस्की, अ‍ॅलेक्झांडर अलीखाईन आणि व्लादिमीर क्रॅमनिक या रशियातील खेळाडूंचे वर्चस्व विश्वनाथन आनंदने मोडून काढले.
   आनंदचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी तमिळनाडूतील लहान शहरात झाला. आनंदला घरात ‘विशी’ म्हणतात. त्याच्या जन्मानंतर त्याचे कुटुंब लवकरच चेन्नईला स्थायिक झाले. त्याचे वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेचे निवृत्त महाव्यवस्थापक आहेत. त्याची आई सुशीला ही गृहिणी आणि त्याची गुरु आहे. त्याला एक बहीण आणि एक भाऊ आहे. सर्वांमध्ये आनंदच मोठा. त्याची बालपण फिलिपाईन्समधल्या मनाली शहरात गेले. तेथेच त्याला बुद्धिबळ खेळाची आवड जडली.
   वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्याने बुद्धिबळाच्या पटाशी गट्टी जमविली. बघता बघता त्याने या खेळात नैपुण्य प्राप्त केले. फिलिपाईन्समध्ये टीव्हीवर येणारे पझल्स गेम सोडवून तो पुस्तके जिंकायचा. जिंकलेल्या पुस्तकांचे ढीगच्या त्याच्याकडे लागले होते.
   आनंदला बुद्धिबळाची प्रेरणा आई आणि मामांकडून मिळाली. ते बुद्धिबळ खेळत असल्याने आनंद त्याकडे आकर्षिला गेला. मग बुद्धिबळात यश मिळवणे सुरु केल्यावर त्याने कधी पाठीमागे पाहिले नाही. 1983 मध्ये नऊ पैकी नऊ गुण घेत तो कनिष्ठ गटाचा राष्ट्रीय विजेता बनला. पंधराव्या वर्षी तो 'इंटरनॅशनल मास्टर' बनला. हा विक्रम करणारा आशियातील तो एकमेव खेळाडू आहे. सोळाव्या वर्षीच म्हणजे 1986मध्ये ‘राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली. 1987 मध्ये फिलिपाईन्समध्ये जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकणारा तो पहिला आशियाई ठरला. 1987 मध्ये तो ग्रॅण्डमास्टर बनणारा तो एकमेव भारतीय होतो. 1991 मध्ये गॅरी कॅस्पारॉव्ह आणि अनातोली कारपोव मागे टाकून 'रेगिया इमीलिया' स्पर्धा त्याने जिंकली. 1998 मध्ये लिनारेस विजेतेपद त्याने मिळविले. पाच वेळा कोरस बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे.
   सन 2000 मध्ये आनंद आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहचला. यावेळी त्याने एलेक्सी शिरोव याला पराभूत करुन 15 वा जगज्जेता झाला आणि या खेळावरील रशियाचे वर्चस्वही संपविले.
  आनंदमुळे भारतात लहान मुले आणि युवकांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. त्याला आदर्श मानूनच नवीन खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आता चमकत आहे. क्रिकेटवेड्या देशात आनंदने बुद्धिबळाला एक वेगळी प्रतिष्ठा आणि नवसंजीवनी मिळवून दिली आहे.


आनंदचे यश...
चार वेळा जगज्जेतेपद 2000, 2007, 2008 आणि 2010
पाच वेळा बुद्धिबळातील ऑस्कर (खेळातील सर्वोत्तम पुरस्कार)
बुद्धिबळातील सर्व प्रकाराचे जगज्जेतेपद जिंकलेला एकमेव
सर्वांत कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी (1991)
जगज्जेतेपद ==
=== २००० ===
  आनंदने २००० मध्ये फिडेचे जगज्जेतेपद क्नॉक-आऊट स्पर्धेमध्ये जिंकले. अंतिम सामन्यात त्याने स्पेनच्या अलेक्सी शिरोवला ३.५ - ०.५ अशी मात दिली.
  === २००७ ===
  मेक्सिको शहरात झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून तो २९ सप्टेंबर २००७ रोजी जगज्जेता झाला. आनंदने ह्या स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळविले. तो ह्या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. त्याने इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवला.
  === २००८ ===
२००८ मधे आनंदने रशियाच्या [[व्लादिमिर क्रॅमनिक]]ला ६.५ - ४.५ असे हरवुन जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले. [[आनंद व क्रॅमनिक यांच्यात झालेल्या डावांची यादी|क्रॅमनिक व आनंद]] हे आजपर्यंत ६४ सामने खेळले आहेत.
   === २०१० ===
२०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या टोपोलोवला बुल्गेरियामध्ये ६.५ - ५.५ असे हरवून पुन्हा एकदा जग्गजेतेपद आपल्यापशिच ठेवले.
  === २०१२ ===
२०१२ मध्ये आनंद पुन्हा एकदा जगज्जेतेपद आपल्याजवळ राखण्यासाठी लढेल.

Saturday 11 May 2013

भारतीय नौदल



भारतीय नौदल इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
२६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक म्हणून घोषित. त्यानंतर रॉयल इंडियन नेव्ही भारतीय नौदलात रुपांतर. याच तारखेला भारतीय नौदलाचे नवीन निशाण (चिन्ह) स्वीकारण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय तिरंग्याने युनियन जॅकची जागा घेतली.भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांचा ताफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आयएनएस विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे ही नौदलाचे भाग आहेत.
 
इतिहास
इ.स. १९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या.
युद्धनौका बांधणी
युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने माझगाव गोदी मध्ये इ.स. १९६६ वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहेळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.
 
ताकद
भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निमिर्ती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे.
पाणबुडया
१) आय.एन.एस.चक्र : भारतातील पहिली आण्विक शक्ती असलेली पाणबुडी. ही पाणबुडी सोव्हिएत रशियाकडून तात्पुरती भाडयाने घेतली आणि नंतर परत केली. २) आय. एन. एस. शल्की-स्वदेशीरीत्या बनलेले पाणबुडी. १९९२ मध्ये ही सेवारत झाली. ३) आय.एन.एस. शंकुल-दुसरी स्वदेशी बनविलेली पाणबुडी. १९९४ मध्ये ही सेवेत रुजू झाली. ४) आय. एन. एस. संधिुशस्त्र -ही भारतातील पहिली क्षेपणास्त्र सोडणारी पाणबुडी आहे आणि ही जुलै २००० मध्ये सें. पिटर्सबर्ग येथे सेवेत रुजू झाली. हिची लांबी ७० मी. इतकी असून ती रशियन किलोफ्लास या वर्गात मोडते. जहाजभेदी क्लब क्षेपणास्त्र धारण करणारी संधिुशास्त्र ही पहिली पाणबुडी आहे.
२३ सप्टेंबर २००३ रोजी भारतीय नौदलात रुजू झालेली आय.एन. एस. तलवार ही विनाशिका सर्व बाबतीत श्रेष्ठ अशी आहे. रशियाच्या 'सुधारीत क्रिवाक' वर्गाची ही युध्दनौका तिच्या पूर्णपणे स्टेल्थ (रडारवर न दिसणार्‍या) आकारामुळे शत्रूच्या अतिशय जवळ जाऊन अचूक मारा करु शकते. १८० नाविकांसह (अधिकारी समाविष्ट)८ क्लब मिसाईल्स, ८ एस.ए. १६ पोर्टेबल मिसाईल्स ४ पी. टी. ए.५३ फिक्स्ड टॉरपेडो टयूब लॉचर्स, २ पी.के. - २ साफ लॉचर्स व एक हेलिकॉप्टर घेऊन ३० दिवस समुद्रात इंधन पाण्याशिवाय राहू शकते. रशियाकडून पुन्हा आय. एन.एस. त्रिशूळ व ताबर या दोन युध्दनौका भारतीय नौदलात सामील झाल्या. अजून तीन युध्दनौका सामील होतील व त्या भारतातही बनू शक्तील.
आजपर्यंत भारतीय फि्रगेट्सवर स्टिक्स ही सॅम (सरफेस टू एयर मिसाईल्स) प्रणाली होती. मात्र नव्या तलवार वर्गात श्टल१ ही नवी ( ) यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. याशिवाय या वर्गात क्लब क्षेपणास्त्रेसुध्दा बसविलेली आहेत. याशिवाय या युध्दनौकांवर एक हेलिकॉप्टर सुध्दा असते. ही युध्दनौका तिच्या विशेष आकारामुळे रडारहून सोडल्या गेलेल्या सर्व लहरी दुसर्‍या दिशेने परावर्तित करते. मात्र रडारकडे एकही लहर न गेल्यामुळे रडारवरही युध्दनौका अद्दृश्य राहते. नौकेच्या या गुणधर्मामुळे हे जहाज लक्ष्याच्या अतिशय जवळ जाऊन मारा करु शकते. याशिवाय अ‍ॅडमिरल गोर्शकोव्ह ही प्रचंड विमानवाहू युध्दनौका (क्रुझर) विकत घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र एवढी प्रचंड नौका सामावून घेणारे बंदरच सध्या भारतात नाही. त्या दृष्टीने नव्या कारवार बंदरातच तिची सोय करण्यात येऊ शकते.
आवाका
अन्य राष्ट्रांच्या विनंतीवरून भारतीय नौदल त्या त्या राष्ट्रांच्या समुद्रसीमेतही तैनात होऊ लागले. इतर राष्ट्रांच्या बंदरांना भेटी, संयुक्त कवायत, प्रशिक्षण व आपत्कालीन मदत याद्वारे मैत्रीचे संबंध बळकट करण्यात आले आहेत. अमेरिका, फ्रान्स, रशिया, चीन आदी राष्ट्रांबरोबर नौदलाने संयुक्त कवायतींमार्फत ज्ञानाचे आदानप्रदानही केले आहे. इ.स. २००४ मध्ये त्सुनामी संकटात श्रीलंका, इंडोनेशिया आणि मालदीव या देशांना तात्काळ मदतीचा हात दिला.
भारतीय नौदल दिन
४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.[१]
 
नौदल भरती    -   एमईआरएस, एनएमईआर आरटी फिसर अ‍ॅप्रॅण्टिसेसस (एए) आणि डायरेक्टर एण्ट्री डिप्लोमा होल्डर्स (डीइडीएच) या पदासाठी दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमधील रोजगार समाचार आणि सर्व आघाडीच्या राष्ट्र/ प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते.
    नौदल भरती संघटना नौदलाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयामध्ये असणा-या मनुष्यबळ नियोजन आणि भरती संचालनालयाअंतर्गत नौदल भरती संघटना काम करते. नौदलामध्ये कर्मचा-यांची भरती करण्याची जबादारी या संघटनेवर असते. भारतीय नौदलात खलाशांची भरती वर्षातून दोन वेळा होते.
संस्था
नौसेनेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. नौसेना कर्मचार्‍यांच्या मुख्याला खालील मुख्य अधिकारी वर्गाकडून सहाय्य केले जाते: १) नौसेनेचे उपप्रमुख , २) चीफ ऑफ मटेरियल, ३) डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ, ४) चीफ ऑफ पर्सोनेल, ५) कन्ट्रोलर ऑफ वॉरशिप प्रॉडक्शन अ‍ॅण्ड अ‍ॅक्युसिशन, ६) चीफ ऑफ लॉजिस्टिव्ह

Thursday 9 May 2013

जिजाबाई



जिजाबाई
    आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
    जिजाबाई (१५९४-१६७४) ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी वेरुळ येथे विवाह झाला.
राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.

भोसले व जाधवांचे वैर
    पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली १ ले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. २ रे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसल्यास ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला [ संदर्भ हवा ].

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले [ संदर्भ हवा ]. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. तुम्हाला खरच शिकायचे असेल तर शिवचरित्र ऐका म्हणजे जिजाबाईं काय होत्या ते कळेल तुम्हास.

जिजाऊंची अपत्ये
    जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

जिजाबाईंना पहिले आपत्य झाले नाव काय ठेवायचे हा प्रश्न होता ६ महिन्यानंतर दीराचे नावा प्रमाणे संभाजी ठेवले.यानंतर त्यांना ४ मुले झाली ४रीही दगावली,७ वषाचा काळ निघुन गेला एके दिवशी १९ फेब्रुवरी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरीत जिजाऊंना मुलगा झाला. छत्रपती शिवाजीराजे भोसलेयांचा जन्म झाला. शिवनेरीत पाळणा बांधला नाव ठेवले "शिवाजी".

राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
    शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.

प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.

जीवन
    शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

घास का मैदान

                                                               घास का मैदान

तालाब घास का मैदान नए सार्वजनिक स्विमिंग पूल. चेक गणराज्य में Znojmo में Loucký मठ के पास स्थित है. तालाब घास का मैदान मनोरंजन के आकर्षण के साथ अपने आगंतुकों की पेशकश 50 मीटर तैराकी पूल, स्की कूद, 3 तैराकी पटरियों और चालू चैनल के साथ एक द्वीप. तो आकार 25 x 21 मीटर की तैराकी 1.8 MA 8 पटरियों की गहराई के साथ पूल है. तैरने के लिए एक स्विमिंग पूल आकार 12 x 12 मीटर और गहराई 1 मीटर पूल स्लाइड और पानी स्लाइड के मुँह है. बच्चों की wading पूल के लिए 15 से 10 मीटर और गहराई के एक औसत के लिए उपलब्ध है 25 सेमी है. पूल में पानी 26 डिग्री का तापमान Celsia.तालाब घास का मैदान को गरम किया जाता है खेल के बहुत है. हम एक बीच वॉलीबॉल अदालत मिल जाए, खेल का मैदान streetball, खेल का मैदान और टेबल टेनिस टेबल कर सकते हैं. नाश्ते के लिए वहाँ एक साल के साथ एक रेस्तरां दौर ऑपरेशन है, और दो ताज़गी खड़ा है. वहाँ बहुत कुछ छूट के लिए घास क्षेत्रों के भी हैं. इससे पहले इस इलाके के बारे में 240 प्रभार से मुक्त कार के लिए पार्किंग है. क्षेत्र में एक किराये छाते, धूप कुर्सियों और खेल उपकरण है.

बांध घास का मैदान नदी पर एक जल भंडार जंगली ईगल पर्वत ईगल है. गांव /pastviny-1952540.htm में Klášterec Orlicí शहर के ग्रासलैंड चेक गणराज्य . बांध घास का मैदान 1933 और 1938 के बीच बनाया, और था उसके समारोह में मुख्य रूप से बाढ़ नियंत्रण और प्रवाह की रक्षा गया था. बांध और पनबिजली संयंत्र बनाया गया था. एक ही समय में शुरू बांध घास का मैदान मनोरंजन प्रयोजनों के लिए इस्तेमाल किया. बांध एक ईंट, उच्च 43 milliamperes लम्बाई 193 मीटर है जलाशय के बारे में 7 किमी लंबी है और 110 हेक्टेयर क्षेत्र में रह रहे हैं. गर्मियों बांध घास का मैदान में तैराकी, पानी के खेल और मछली पकड़ने के लिए इस्तेमाल किया. आसपास बांध लंबी पैदल यात्रा और साइकिल चालन के लिए उपयुक्त है, वहाँ कई चिह्नित लंबी पैदल यात्रा ट्रेल्स रहे हैं ..

  घास के मैदानों कई नामों से जाना. अमेरिका मिडवेस्ट में, वे prairies के रूप में जाना हो. दक्षिण अमेरिका में, वे कहते Pampas रहे हैं. केंद्रीय यूरेशियन steppes घास के मैदानों के रूप में भेजा है, जबकि अफ्रीका में वे नाम सवाना रहे हैं. वे सब आम में है क्या उनके स्वाभाविक रूप से प्रभावी वनस्पति के रूप में घास है. घास के मैदानों पाए जाते हैं जहां पर्याप्त नियमित रूप से एक जंगल के विकास का समर्थन वर्षा नहीं है, लेकिन बहुत कम ऐसा नहीं के रूप में एक रेगिस्तान बनाने के लिए.
 वास्तव में, ज्यादातर घास जंगल और रेगिस्तान के बीच में स्थित हैं. पृथ्वी की भूमि के बारे में एक चौथाई घास के मैदानों से आच्छादित है, लेकिन इन देशों के कई खेतों में बदल दिया गया है. घास के मैदानों आम तौर पर खुला और काफी फ्लैट हैं, और वे अंटार्कटिका के अलावा हर महाद्वीप पर मौजूद हैं. अधिकांश एक महाद्वीप के इंटीरियर के सुखाने की मशीन भागों में झूठ बोलते हैं.
   उष्णकटिबंधीय और शीतोष्ण: वहाँ घास के दो विभिन्न प्रकार होते हैं. दक्षिणी गोलार्द्ध में घास के मैदानों के लिए उत्तरी गोलार्द्ध में उन लोगों से ज्यादा वर्षा हो जाते हैं. कुछ घास से अधिक 7 (2 मीटर), पैर बढ़ने और मिट्टी में कई फुट तक जड़ें हैं.
 उष्णकटिबंधीय घास गर्म वर्ष दौर है, लेकिन आमतौर पर एक सूखे और एक बरसात के मौसम है. ऐसा ही एक उष्णकटिबंधीय चरागाह, अफ्रीकी सवाना, दुनिया के हाथी, जिराफ, गैंडा, zebras, शेर, hyenas warthogs सहित, और सबसे पहचानने योग्य प्रजातियों में से कुछ के लिए घर है.
 शीतोष्ण घास है, जो प्रति वर्ष बारिश के बीच 10 और 30 इंच (25 और 75 सेंटीमीटर) औसत छोटी घास, कभी कभी तो बस कुछ मिलीमीटर है. एक से बढ़ के मौसम और एक निष्क्रिय मौसम: इन क्षेत्रों को दो सत्रों है. निष्क्रिय के मौसम के दौरान, कोई घास क्योंकि यह बहुत ठंड है विकसित कर सकते हैं.
  जानवरों कि शीतोष्ण घास के मैदानों में रहते हैं, शुष्क हवा की स्थिति के लिए अनुकूलित है. सांप और coyotes जैसे और शिकारियों, चूहों और जैक खरगोश जैसे जानवरों burrowing, वहाँ चिकारे और हिरण की तरह चराई जानवर हैं. उत्तर अमेरिकी घास घर एक बार जंगली भैंसों के लाखों लोगों के लिए गए थे, इससे पहले कि उनमें से ज्यादातर मनुष्यों द्वारा मारे गए थे.जब बरसात का मौसम आता है, कई घास के फूल, जिनमें से कुछ अच्छी तरह से सर्दियों में भूमिगत भंडारण अंगों और मोटी स्टेम अड्डों की मदद से बच सकते हैं के साथ लेपित हो गया है.
 कोई अन्य निवास स्थान के रूप में कृषि घास के मैदानों के रूप में मनुष्य के लिए उपयोगी है. मिट्टी के लिए गहरी और उपजाऊ, cropland या चराई के लिए आदर्श होते हैं. उत्तर अमेरिकी prairielands की ज्यादातर एक पृथ्वी पर सबसे अमीर कृषि क्षेत्रों में से एक में बदल दिया गया है.
  आग, दोनों प्राकृतिक और मानव का कारण बना, घास के मैदानों को बनाए रखने में महत्वपूर्ण हैं. प्राचीन शिकार लोगों के लिए नियमित रूप से बनाए रखने और घास के मैदानों का विस्तार, और में ले जाने से आग असहिष्णु पेड़ों और shrubs को रोकने के लिए आग निर्धारित किया है. घास को आग जीवित करने में सक्षम होते हैं क्योंकि वे के बजाय ऊपर से नीचे से बढ़ता है.

Saturday 4 May 2013

ज्वालामुखी


ज्वालामुखी ही भूकवचात असलेली भेग असून, उद्रेकाच्या वेळी या भेगेतून खडकांचे तुकडे, लाव्हारस, राख, पाण्याची वाफ व अन्य वायू बाहेर पडत असतात. क्षीण भूकवच झालेल्या भागात अशा भेगा आढळतात किंवा निर्माण होतात. असे हे घन व वितळलेल्या स्वरुपातील द्रव्य भेगेच्या मुखाशेजारी साचून ज्वालामुखींचा शंकू निर्माण होतो, किंवा त्याल एखाद्या टेकडी वा पर्वताचा आकार प्राप्त होतो व त्याचा आकार शंकूसारखा होतो.

नरसाळयाच्या आकाराचा खळगा टेकडीच्या माथ्यावर असतो व त्यातूनच वरील विविध प्रकारचे द्रव्य बाहेर पडत असते. या खळग्याला ज्वालाकुंड म्हणतात. जपानमधील फयुजियामा, इटलीतील व्हेसूव्हियस, इक्केडॉरमधील कोरोपॅक्सी ही ज्वालामुखीची उदाहरणे होत. बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटांच्या पूर्वेकडील बॅरन बेट हे ज्वालामुखीच्या टेकडीचे उदाहरण आहे. उद्रेकांच्या पुनरावृत्तीवरनुसार ज्वालामुखीचे जागृत. निदि्रस्त व मृत असे तीन प्रमुख प्रकार पडतात. वारंवार उद्रेक होणार्‍या ज्वालामुखीस 'जागृत ज्वालामुखी' म्हणतात. पूर्वी कधीतरी उद्रेक झालेला व नंतर बराच काळ उद्रेक झालेला नसेल पण पुढे होण्याची शक्यता असेल तर अशा ज्वालामुखीस निदि्रस्त ज्वालामुखी म्हणतात. ज्या ज्वालामुखीतून ऐतिहासिक किंवा प्राचीन काळात उद्रेक झालेला असून, नंतर बराच काळपर्यंत उद्रेक झालेला नाही व पुढे होण्याची शक्यताही नसेल तर अशा ज्वालामुखीस 'मृत ज्वालामुखी' म्हणतात. बर्‍याच वेळा ज्वालामुखी हा निदि्रस्त अवस्थेत आहे की मृतावस्थेत आहे हे ओळखणे कठीण जाते. व्हेसुव्हियस व क्रॅकाटोआ हे बर्‍याच काळपर्यंत मृतावस्थेत असल्यासारखे वाटत होते. पण अलीकडे त्यांना उद्रेक घडून आलेत. जावा व सुमात्र बेटांमध्ये असलेल्या संंुडा सामुद्रधुनीतील क्रॅकाटोआ बेट असून, त्यावर क्रॅकटोआ ज्वालामुखी आहे. अलीकडच्या काळात १८८३ मध्ये या ज्वालामुखीत प्रचंड उद्रेक घडून आला होता. या उद्रेकात त्याचे शिखरच उद्धवस्त झाले व त्यामुळे समुद्रात १६ मीटर उंचीच्या प्रचंड लाटा निर्माण झाल्या व पश्चिम जावातील ३६,००० लोक यात मृत्यूमुखी पडले. खडकाचे तुकडे व लाव्हारस ८०० मीटर उंचीपर्यंत उडाले होते. ज्वालामुखीची धूळ, राख व धूर २७ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. या उद्रेकाचा आवाज पश्चिमेकडे तर्कस्तानातील इस्तबूंपर्यत तर पूर्वेला टोकिओपर्यंत ऐकला गेला होता.

पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील शीलारस-मॅग्मा-बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायूलोट आणि राखे सदृश्य असे खडकाचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो त्याला ज्वालामूखी हे नाव देतात.

ज्वालामूखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट धूरासारखे दिसणारे खडकांच्या सुक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वावरुन ही एक पेटलेली निर्सर्गाची भटटी आहे असे वाटणे साहजिक होते. त्यामूळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या खडकांच्या लहान मोठया कणांनाही राख अंगार-निखारे-अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक क्रियेत घडून येत नसते कचित बाहेर पडणार्‍या वायूपैकि गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.

जमिनीवर येण्यापूर्वी भुष्ठभागावर आला कि, त्यात विरघळलेले बहूतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडु लागतात ज्या शिलारसातून बहूतेक वायू निघुन गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.

मध्यवर्ती निर्सग द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामूखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालच्या शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुूळे बाजुच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकुच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो.
ज्वालामुखीय क्रिया :

भूपृष्ठाखाली अनेक कारणांनी शिलारस तयार होतो. हा शिलारस भूपृष्ठाला फोडून वर येतो. काही वेळा शिलारस भूपृष्ठावर न येता खालीच थंड होतो. या सर्व क्रियांना ज्वालामुखीय क्रिया असे म्हणतात. ज्वालामुखीय क्रिया फार पुरातन काळापासून घडत आहेत.
ज्वालामुखीचा उद्रेक :

भूपृष्ठाखालून शिलारस पृष्ठभागावर येणे यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी मोठा गडगडाट होतो व तेथील भूपृष्ठाला भूकंपाचे धक्के बसतात, तसेच त्या प्रदेशातील जमिनीचे तापमान वाढते. उद्रेकाच्या वेळी नळीसारख्या मार्गाने भूपृष्ठाखालील भागातून लाव्हारस, पाण्याची वाफ, दगडांचे तुकडे, धुळ व वायुपदार्थ वेगाने बाहेर पडतात.

भूपृष्ठातील नळीसारख्या मार्गाचे भूपृष्ठाकडील मुख म्हणजे ज्वालामुखीय विवर होय. उद्रेक होताना आकाशात वर फेकला गेलेला लाव्हा घन तुकडयांच्या स्वरूपात खाली पडत असतो. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे ज्वालामुखीय धुळ पाण्यात मिसळून उष्ण चिखलाचे प्रवाह वाहू लागतात.
ज्वालामुखी उद्रेकाचे प्रकार :

भूपृष्ठातून शिलारस कसा बाहेर पडतो, या आधारे ज्वालामुखी उद्रेकांचे दोन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१. केंद्रीय उद्रेक २. भेगी उद्रेक
१. केंद्रीय उद्रेक :


हा उद्रेक काही वेळा विस्फोटक स्वरूपाचा असतो. कारण भूपृष्ठातील एका नळीसारख्या अरुंद मार्गातून लाव्हा, वाफा, वायू, धूळ, धूर, दगड इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. केंद्रीय उद्रेकातील पदार्थ साचल्यामुळे शंक्वाकार पर्वत व घुमटाकार टेकडयांची निर्मिती होते.

आफ़्रिकेतील किलिमांजारो, जपानमधील फुजियामा, इटलीतील व्हेसुव्हिअस व माऊंट एटना ही केंद्रीय उद्रेकामुळे निर्मित ज्वालामुखी पर्वतांची काही उदाहरणे आहेत. भारतात सन १९९४ मध्ये अंदमान द्वीपसमुहातील बॅरन बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
२. भेगी उद्रेक :

भूपृष्ठाला लांबच लांब भेग पडते. त्यामुळे आतील शिलारस, दगड, वाफ, वायू हे हळूहळू बाहेर पडतात. हे उद्रेक अगदी संथ गतीने घडून येतात. हा लाव्हारस अधिक तरल असल्याने दूरवर पसरतो. कालांतराने भूपृष्ठावर लाव्हारस थंड होतो व तेथील भूपृष्ठाची जाडी वाढते. या उद्रेकापासून बेसाल्ट खडकाची पठारे निर्माण होतात.

ज्वालामुखी तीन प्रकारचे असतात. जागृत, निदिस्त, आणि मृत. जागृत ज्वालामुखी उद्रेकाची क्रिया सतत चालू असते. निदिस्त ज्वालामुखीतून अनिश्चित कालानंतर उद्रेक होतो. तर मृत ज्वालामुखीतून उद्रेक होण्याची क्रिया पूर्णपणे थांबलेली असतेे.

(१) पॅसिफिक महासागराभोवतालचा प्रदेश, यास 'अग्निकंकण' असेही म्हणतात. सर्वाधिक ज्वालामुखी याच विभागात आढळतात. (२) भूमध्यसागरी विभाग-आल्प्स पर्वत व द. युरोप. याशिवाय उ. अटलांटिक व हिंदी महासागरातील काही बेटांवर ज्वालामुखी आहेत. भारतात अंदमान समुहातील बॅरन व्दिप हा एकमेव ज्वालामुखीय प्रदेश आहे.

जगातील सुमारे ८५० ज्वालामुखीपैकी सुमारे ८० समुद्राअंतर्गत आहेत. सुमारे ५०० ज्वालामुखी पॅसिफिक महासागराच्या परिघावर आहेत.
ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ

या पदार्थाचे तीन प्रकार पडतात. ज्वालामुखीच्या भेगेतून बाहेर पडणारा द्रवरुप पदार्थ म्हणजे लाव्हारस. नुकताच बाहेर पडलेला लाव्हारस अतिशय उष्ण असतो व त्याचे तापमान ६०० ते १,२०० सेल्सिअसपर्यंत असते. भस्मिक लाव्हा जास्त प्रवाही असतो व तो दूरपर्यत वाहत जातो. लाव्हारस वाहण्याची गती जमिनीच्या उतारावरही अवलंबून असते. हा वेग दर ताशी ८० किलोमीटरपर्यंत असू शकतो. बर्‍याच वेळा भेगेतच लाव्हा साचून घट्ट होतो. पण आता कोंडलेल्या वायंुच्या वाढत्या दाबामुळे भेगेत घट्ट झालेला लाव्हा जोरदार उद्रेकामुळे वर उडून जाऊ शकतो. अशा वेळी भेगेच्या शेजारचे खडकही बाहेर फेकले जातात. बाहेर फेकलेले खडक भेगेच्या मुखाशी साचून राहतात. त्यामुळेच ज्वालाकुंड व शंकूची निर्मिती होते. खडकांचे बहुसंगायित प्रस्तर, लहान तुकडे, ज्वालामुखीची राख व धूळ, इत्यादी द्रवरुप पदार्थ आणि विविध प्रकारचे वायू पाण्याची वाफ, वायुरुप अवस्थेतील हैड्रोजन व कार्बन डायऑक्साईड, इत्यादी वायुरुप पदार्थ त्यातून बाहेर पडतात.
लाव्हा बाहेर पडण्याची पध्दत

लाव्हा बाहेर पडण्याच्या पध्दतीनुसार मध्यवर्ती ज्वालामुखी व लांब भेगेचे ज्वालामुखी असे दोन प्रकार केले जातात. मध्यवर्ती प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विशिष्ट शंकू व ज्वालामुख असलेल्या टेकडयांची व पर्वतांची निर्मिती होते. या प्रकारच्या ज्वालामुखीतून कोंडलेली वाफ व वायू अकस्मात स्फोट होऊन बाहेर पडतात. व्हेसुव्हियस व फुजियामा ही या प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे होत.

लांब भेगेच्या ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते. लाव्हाचे थर सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरत जातात. दख्खनच्या पठाराचा ५,००,००० चौसर किलोमीटरचा प्रदेश या पध्दतीने निर्माण झालेला आहे.
पर्मिअन एक्स्टींशन

सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास फार अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रे (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रे मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.

ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.

द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो


 टोबाचे तांडव
कुकडी ही नदी, पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या अनेक नद्यांपैकी एक. कल्याण जवळच्या नाणेघाटात तिचा उगम. पुढे जुन्नरच्या जवळून वहात जाऊन ती भीमा नदीला मिळते. जुन्नरच्या थोडे पुढे, या नदीच्याच काठांवर बोरी खुर्द व बोरी बुद्रुक अशी दोन अगदी सर्व सामान्य खेडेगावे आहेत. या गावांच्या जवळ असलेले कुकडीचे पात्र मात्र मोठे वैशिटयपूर्ण आहे. या ठिकाणी असलेले पात्र, एका खडकाळ अशा दरीतून वहाते. पात्राची खोली फारशी नसली तरी पात्र भरपूर रूंद मात्र आहे.नदीच्या दोन्ही काठांना ‘बॅसॉल्ट’ प्रकारच्या खडकांचे उभे सरळ रेषेत तुटलेले कडे आहेत. 1960 च्या आसपास या गावाच्या आसपास असलेल्या नदीच्या पात्राजवळ अष्मयुगातील मानवी हत्यारे सापडल्यामुळे उत्खननशास्त्रज्ञांचे या जागेकडे लक्ष होतेच. पण 1986-1988 च्या आसपास नदीच्या काठांना असलेल्या उभ्या कडयांच्यामधे ‘ टेफरा’ या घन पदार्थाचे 2 मीटर किंवा 6 फूट जाडीचे थर भूगर्भशास्त्रज्ञांना आढळून आले व बोरी गावाचा परिसर आंर्तराष्ट्रीय शास्त्रज्ञ समुदायात एका वेगळयाच कारणासाठी प्रसिध्दिझोतात आला.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत घडामोडी होत असतात. पाउस व वितळणारा बर्फ यांनी सतत जमिनीची धूप होत असते तर उलट सुलट वाहणाऱ्या वाऱ्यांनी पृष्ठभागावरील धूळ सगळीकडे पसरत असते. पावसाचे पाणी नद्या नाल्यांमधून वहाते व नदी काठच्या सखल भागात वहात आणलेला चिखल पसरते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालूच राहते. लाखो वर्षानंतर या साठलेल्या धुळीचे कठिण असे दगड बनतात. कालांतराने या पैकी एखादा समुद्र तळ हिमालया सारखा किंवा मध्य अमेरिकेसारखा वर उचलला जातो. तर नद्यांमुळे ग्रॅन्ड कॅनियन सारखी खोल दरी तयार होते. भूकंपामुळेही कडे कोसळतात व एखादा दोन तीन मैल उंचीचा उभा कडा उभा रहातो. या सर्व घडामोडींमुळे पृथ्वीचा इतिहास ज्यावर उभा छेद घेऊन आलेखित केला आहे असे कडे पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी आढळतात. या कडयांच्या तळापासून ते वरच्या थरापर्यंत पृथ्वीच्या इतिहासातील एका मोठया कालखंडाचा आलेख मोठया अचूकपणे नोंदला जातो.
एखाद्या ज्वालामुखीचा जेंव्हा उद्रेक होतो तेंव्हा त्याच्या मुखातून राखेसह अनेक घन पदार्थ फेकले जातात. ही राख व हे घन पदार्थ कांही कालाने परत जमिनीवर जमा होतात. पांदरट रंगाच्या या घन पदार्थांच्या थरांना शास्त्रीय परिभाषेत ‘टेफरा’ (Tephra) असे नाव आहे. नदीच्या काठी असलेल्या उभ्या कडयांच्या छेदात जर ‘टेफरा’ घन पदार्थाचे थर आढळून आले तर कधीतरी तो भूभाग ज्वालामुखीने फेकलेल्या घन पदार्थांचे आवरणाखाली झाकला गेला होता हे सप्रमाण सिध्द होते. बोरी गावाजवळ आढळून आलेल्या ‘टेफरा’ घन पदार्थाच्या थराचा उत्खननशास्त्रज्ञांनी अभ्यास करून त्यांनी ते थर बऱ्याच जुन्या काळातील ( 15 लक्ष वर्षांपूर्वीचे)असावेत असे अनुमान काढले होते व त्यांच्या दृष्टीने ते थर आदिमानव कालाच्या फारच पूर्वीचे असल्याने फारसे महत्वाचे नव्हते.
ज्वालामुखीचा उद्रेक झाला तरी तो अणुबॉम्ब च्या (किंवा आण्विक अपघाता)पेक्षा कैक सुरक्षित आहे… सबब आपण सौरउर्जेनंतर ज्वालामुखीची ऊर्जा, समुद्रावरील ऊर्जा ह्यांचाच वि४ करणे अधिक योग्य आहे…
जेम्स बॉण्डच्च्याच एका चित्रपटात (बहुतेक गोल्डफिंगर) एक मस्त वाक्य आहे “Don’t start something that you can NOT stop”. आणि हे वाक्य अगदी सद्यउपयुक्त विवादामध्ये सूचक ठरणार आहे…
जगातल्या (माफ करा पृथ्वीवरील…) सर्व अणुउर्जेचा प्रसार आणि उपयोग करणाऱ्या देशांना खुले आवाहन की त्यांनी आपली सर्व तंत्रज्ञान शक्ती आणि बुद्धीमत्ता पणाला लावून १५ मे पूर्वी जपानमधिल आण्विक प्रदूषण थांबवून दाखवायचे… अन्यथा आपापली शेपूट दोन पायात घालून गुपचूप पडायचे…
ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्याचा अनुभव इतर कोणालाही इजा न करता घेता येतो… कसा? मूळव्याध प्रज्वलित झालेल्या व्यक्तीला विचारा… (मारुतीच्या बेंबीत बोट घातले की कसे वाटते?)
400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक
प्रेषक चंद्रशेखर (सोम, 08/30/2010 - 05:59)

    आंतरराष्ट्रीय
    माहिती

इंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत. एखाद्या ज्वालामुखींची जागृती ही घटना, इंडोनेशिया साठी काही फार असामान्य घटना नाही तरीही 29 ऑगस्टच्या सकाळी सुमात्रा बेटाच्या उत्तरेस असलेल्या मेदान या शहराच्या जवळ असलेल्या सिनाबुन्ग या ज्वालामुखीचा उद्रेक ही एक चिंताजनक बाब आहे असे मत Indonesian Center for Volcanology and Geological Disaster Mitigation या संस्थेचे प्रमुख मिस्टर . सुरोनो यांनी व्यक्त केले आहे.
एखादे विमान डोक्यावरून जात असताना जसे आवाज येतात त्याच पद्धतीचे आवाज या ज्वालामुखीजवळ राहणार्‍या खेडूतांनी ऐकले. यानंतर एक मोठा स्फोट झाला व 1500 मीट्रर उंचीपर्यंत राख, वाळू व पाण्याची वाफ या ज्वालामुखीने बाहेर फेकली. त्यानंतर या डोंगराच्या टोकावर त्यांना ज्वाला व लाव्हा रस वहाताना दिसू लागला. सुमात्रा शासनाने 12000 पेक्षा जास्त खेडूतांना त्वरित त्यांच्या खेड्यातून हलवले असून त्यांना मास्क दिले आहेत. ज्वालामुखीच्या भोवतीच्या 6 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खेडूतांच्या निवेदनाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतांच्यावर या ज्वालामुखीने फेकलेली राख पडली आहे व त्यामुळे या शेतात असलेला भाजीपाला संपूर्ण नष्ट झाला आहे.
या ज्वालामुखीचा उद्रेक दोन कारणांसाठी चिंताजनक आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे 400 वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक कोणतीही पूर्वसूचना न देता झाला आहे. काल झालेला उद्रेक जरी फारसा हानीकारक नसला तरी या विषयातील तज्ञांच्या मताप्रमाणे या ज्वालामुखीने काल बाहेर फेकलेली राख व लाव्हा हा त्याच्या पोटातून आलेला नसून चोंदलेले नाक साफ करावे तशी फक्त त्याच्या बाह्य भागात साठून राहिलेली राख असू शकते. या ज्वालामुखीबद्दल पूर्वीची काहीच माहिती नसल्याने, यानंतर तो काय करेल हे सांगणे मोठे अवघड आहे. कदाचित यानंतर मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहेच.
यापेक्षा सर्वात मोठी काळजी तज्ञांना या ज्वालामुखीच्या स्थानामुळे वाटते आहे. हा ज्वालामुखी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात विशाल अशा टोबा ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या जलाशयापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की 73000 वर्षांपूवी झालेल्या टोबा ज्वालामुखाच्या स्फोटात जवळ जवळ सर्व मानवजात नष्ट झाली होती. भारतीय उपखंडातले तर सर्व सजीव नष्ट झाले होते.
टोबाच्या सानिध्यात असलेल्या या सिनाबुन्ग ज्वालामुखीच्या उद्रेकाला, म्हणूनच गंभीरतेने घेतले जात आहे. भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. हा ज्वालामुखी पुढे काय करणार आहे का गप्प बसून राहणार आहे हे फक्त काल सांगू शकेल.

ज्वालामुखी हे पृथ्वीच्या पृष्ठभागाला पडलेले भोक असते ज्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील लाव्हारस, उष्ण वायू, राख इत्यादि बाहेर पडतात.
ज्वालामुखी ही भूकवचात असलेली भेग असून, उद्रेकाच्या वेळी या भेगेतून खडकांचे तुकडे, लाव्हारस, राख, पाण्याची वाफ व अन्य वायू बाहेर पडत असतात. क्षीण भूकवच झालेल्या भागात अशा भेगा आढळतात किंवा निर्माण होतात. असे हे घन व वितळलेल्या स्वरुपातील द्रव्य भेगेच्या मुखाशेजारी साचून ज्वालामुखींचा शंकू निर्माण होतो, किंवा त्याल एखाद्या टेकडी वा पर्वताचा आकार प्राप्त होतो व त्याचा आकार शंकूसारखा होतो.

जमिनीच्या पृष्ठभागाला छेद देत "मॅग्मा' (ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी त्या विवरात उकळत असलेल्या द्रवाला मॅग्मा म्हणतात) त्याचप्रमाणे राख, वायू बाहेर पडतात, या प्रक्रियेला ढोबळ मानाने ज्वालामुखी म्हणता येईल. उद्रेकातून "मॅग्मा' बाहेर पडल्यावर त्याचे लाव्ह्यात रूपांतर होते. लाव्ह्याचे तापमान ६०० ते ११०० अंश सेल्सिअस इतके असू शकते. सिसिलीमध्ये असलेल्या "व्हल्कॅनो' बेटाच्या नावावरून ज्वालामुखीला "व्होल्कॅनो' हे नाव पडल्याचे मानले जाते. रोमन भाषेत अग्निदेवतेचे नाव "व्हल्कन' असे आहे. त्यावरून हा शब्द प्रचलित झाला असल्याचे मानतात.

भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे (टेक्‍टॉनिक प्लेट्‌स) काही ठिकाणी जमिनीचे कवच ठिसूळ बनते, प्रामुख्याने अशा ठिकाणीच ज्वालामुखी आढळतात. त्याचप्रमाणे महासागराच्या तळाशी सुरू असलेल्या जमिनीच्या सततच्या हालचालींमुळेही ज्वालामुखीचा उद्रेक होतो. समुद्राच्या तळाशी जमिनीचे आवरण ठिसूळ झालेले असते. त्यामुळे बहुतांश ज्वालामुखी महासागरात आढळतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे विविध प्रकार असतात... "फ्रियाटिक इरप्शन' (उद्रेकानंतर मोठ्या प्रमाणात वाफ बाहेर पडणे), "ऱ्हिओलाईट इरप्शन' (सिलिकाचा समावेश असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक). या उद्रेकातून लाव्हा, राख याबरोबरच कार्बन डायऑक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन क्‍लोराईड, हायड्रोजन फ्लोराईड, कार्बन मोनॉक्‍साईड असे विविध विषारी वायू बाहेर पडतात.

मोठ्या क्षमतेच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे होणारे परिणाम भयानक असतात. त्यातून उत्सर्जित झालेले विषारी वायू पर्यावरणावर दीर्घ काळ परिणाम घडवितात. त्यातून बाहेर पडणारे कार्बन डायऑक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन क्‍लोराईड, हायड्रोजन फ्लोराईड, कार्बन मोनॉक्‍साईड असे वायू पर्यावरणाला आणि सजीवांना अतिशय धोकादायक असतात. त्यामुळे सूर्याची नीलकिरणे पृथ्वीपर्यंत पोचू न देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ओझोनच्या थरालाही धक्का पोचू शकतो. अशा ज्वालामुखीच्या आसपास राहणाऱ्यांना त्याचा मोठा त्रास होण्याची शक्‍यता असते. "मॅग्मा' आणि इतर वायूंमुळे तयार होणाऱ्या दाबामुळे ज्वालामुखीचा स्फोट होतो. मोठ्या दाबामुळे त्यातून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाचा वेग अतिशय जोरात असतो. त्याचबरोबर सुमारे १२०० अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमान घेऊन तो वाटेत येणाऱ्या सर्व गोष्टी आडव्या करत वेगाने पुढे वाहत असतो. डोंगरउतारावरून वाहणाऱ्या लाव्ह्यामुळे भूस्खलन होण्याचीही शक्‍यता असते. त्यातून बाहेर पडणारी राख आणि वायूंमुळे श्‍वसनाचे विकार बळावू शकतात. प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्धांना त्याचा त्रास होण्याची शक्‍यता असते. गेल्या ३०० वर्षांत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुमारे दोन लाख ६० हजार जण मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. जगातील एकूण ज्वालामुखींपैकी ९० टक्के ज्वालामुखी प्रशांत महासागराच्या परिसरात असल्याचे मानले जाते. त्याला "रिंग ऑफ फायर' असे नामाभिधान करण्यात आले आहे. एकूण ज्वालामुखींपैकी १९०० ज्वालामुखी जागृत मानले जातात.

फादर ब्लास देल क्रस्टिलो याला ज्वालामुखीचा पहिला अभ्यासक मानले जाते. निकाराग्वातील मसाया येथील जागृत ज्वालामुखीच्या विवरात तो १३ एप्रिल १५३८ या दिवशी उतरला. त्या विवरात असलेल्या "मॅग्मा'चे, तेथील खडकांचे त्याने नमुने घेतले. त्याने केलेल्या या धाडसानंतरच खऱ्या अर्थाने ज्वालामुखीच्या अभ्यासाला सुरवात झाली, असे मानले जाते.
व्हेसुव्हियस व क्रॅकाटोआ हे बर्‍याच काळपर्यंत मृतावस्थेत असल्यासारखे वाटत होते. पण अलीकडे त्यांना उद्रेक घडून आलेत. जावा व सुमात्र बेटांमध्ये असलेल्या संंुडा सामुद्रधुनीतील क्रॅकाटोआ बेट असून, त्यावर क्रॅकटोआ ज्वालामुखी आहे. अलीकडच्या काळात १८८३ मध्ये या ज्वालामुखीत प्रचंड उद्रेक घडून आला होता. या उद्रेकात त्याचे शिखरच उद्धवस्त झाले व त्यामुळे समुद्रात १६ मीटर उंचीच्या प्रचंड लाटा निर्माण झाल्या व पश्चिम जावातील ३६,००० लोक यात मृत्यूमुखी पडले. खडकाचे तुकडे व लाव्हारस ८०० मीटर उंचीपर्यंत उडाले होते. ज्वालामुखीची धूळ, राख व धूर २७ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. या उद्रेकाचा आवाज पश्चिमेकडे तर्कस्तानातील इस्तबूंपर्यत तर पूर्वेला टोकिओपर्यंत ऐकला गेला होता.

मृत ज्वालामुखी'
निदि्रस्त व मृत असे तीन प्रमुख प्रकार पडतात. वारंवार उद्रेक होणार्‍या ज्वालामुखीस 'जागृत ज्वालामुखी' म्हणतात. पूर्वी कधीतरी उद्रेक झालेला व नंतर बराच काळ उद्रेक झालेला नसेल पण पुढे होण्याची शक्यता असेल तर अशा ज्वालामुखीस निदि्रस्त ज्वालामुखी म्हणतात. ज्या ज्वालामुखीतून ऐतिहासिक किंवा प्राचीन काळात उद्रेक झालेला असून, नंतर बराच काळपर्यंत उद्रेक झालेला नाही व पुढे होण्याची शक्यताही नसेल तर अशा ज्वालामुखीस 'मृत ज्वालामुखी' म्हणतात. बर्‍याच वेळा ज्वालामुखी हा निदि्रस्त अवस्थेत आहे की मृतावस्थेत आहे हे ओळखणे कठीण जाते.

ज्वालामुखीय क्रिया :
भूपृष्ठाखाली अनेक कारणांनी शिलारस तयार होतो. हा शिलारस भूपृष्ठाला फोडून वर येतो. काही वेळा शिलारस भूपृष्ठावर न येता खालीच थंड होतो. या सर्व क्रियांना ज्वालामुखीय क्रिया असे म्हणतात. ज्वालामुखीय क्रिया फार पुरातन काळापासून घडत आहेत.

ज्वालामुखीचा उद्रेक :
भूपृष्ठाखालून शिलारस पृष्ठभागावर येणे यालाच ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी मोठा गडगडाट होतो व तेथील भूपृष्ठाला भूकंपाचे धक्के बसतात, तसेच त्या प्रदेशातील जमिनीचे तापमान वाढते. उद्रेकाच्या वेळी नळीसारख्या मार्गाने भूपृष्ठाखालील भागातून लाव्हारस, पाण्याची वाफ, दगडांचे तुकडे, धुळ व वायुपदार्थ वेगाने बाहेर पडतात.
भूपृष्ठातील नळीसारख्या मार्गाचे भूपृष्ठाकडील मुख म्हणजे ज्वालामुखीय विवर होय. उद्रेक होताना आकाशात वर फेकला गेलेला लाव्हा घन तुकडयांच्या स्वरूपात खाली पडत असतो. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे ज्वालामुखीय धुळ पाण्यात मिसळून उष्ण चिखलाचे प्रवाह वाहू लागतात.

ज्वालामुखी उद्रेकाचे प्रकार :
भूपृष्ठातून शिलारस कसा बाहेर पडतो, या आधारे ज्वालामुखी उद्रेकांचे दोन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. केंद्रीय उद्रेक २. भेगी उद्रेक
१. केंद्रीय उद्रेक :
हा उद्रेक काही वेळा विस्फोटक स्वरूपाचा असतो. कारण भूपृष्ठातील एका नळीसारख्या अरुंद मार्गातून लाव्हा, वाफा, वायू, धूळ, धूर, दगड इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. केंद्रीय उद्रेकातील पदार्थ साचल्यामुळे शंक्वाकार पर्वत व घुमटाकार टेकडयांची निर्मिती होते.
आफ़्रिकेतील किलिमांजारो, जपानमधील फुजियामा, इटलीतील व्हेसुव्हिअस व माऊंट एटना ही केंद्रीय उद्रेकामुळे निर्मित ज्वालामुखी पर्वतांची काही उदाहरणे आहेत. भारतात सन १९९४ मध्ये अंदमान द्वीपसमुहातील बॅरन बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

२. भेगी उद्रेक :
भूपृष्ठाला लांबच लांब भेग पडते. त्यामुळे आतील शिलारस, दगड, वाफ, वायू हे हळूहळू बाहेर पडतात. हे उद्रेक अगदी संथ गतीने घडून येतात. हा लाव्हारस अधिक तरल असल्याने दूरवर पसरतो. कालांतराने भूपृष्ठावर लाव्हारस थंड होतो व तेथील भूपृष्ठाची जाडी वाढते. या उद्रेकापासून बेसाल्ट खडकाची पठारे निर्माण होतात.
ज्वालामुखी तीन प्रकारचे असतात. जागृत, निदिस्त, आणि मृत. जागृत ज्वालामुखी उद्रेकाची क्रिया सतत चालू असते. निदिस्त ज्वालामुखीतून अनिश्चित कालानंतर उद्रेक होतो. तर मृत ज्वालामुखीतून उद्रेक होण्याची क्रिया पूर्णपणे थांबलेली असते.

ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यातून बाहेर पडणारे विविध वायू, लाव्ह्याची तीव्रता आणि त्याचबरोबर त्याचा उद्रेक कोणत्या भागात होतो, यावरून त्याचे विविध प्रकार पडतात. "स्ट्राटोव्होल्कॅनो', "सुपर व्होल्कॅनो', "सबमरिन व्होल्कॅनो', असे ज्वालामुखीचे विविध प्रकार शास्त्रज्ञांनी नमूद केले आहेत.

स्ट्राटोव्होल्कॅनो : याला "कंपोझिट व्होल्कॅनो' असेही म्हणतात. या ज्वालामुखीतून एकाआड एक अशा पद्धतीने लाव्हा आणि इतर उत्सर्जित पदार्थ बाहेर पडत असतात. त्यामुळे त्याच्या उद्रेकातून वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागाची निर्मिती होते. त्यात सिंडर्स, राख आणि लाव्ह्याचा समावेश असतो. सिंडर्स आणि राखेचे प्रथम उत्सर्जन होते आणि त्यानंतर त्यांच्यावरून तप्त लाव्हा वाहण्यास सुरवात होते. जपानमधील माऊंट फुजी येथील ज्वालामुखी या प्रकारच्या ज्वालामुखीचे उदाहरण आहे. अशा प्रकारचे ज्वालामुखी सर्वात धोकादायक मानण्यात येतात.

सुपर व्होल्कॅनो : अशा ज्वालामुखीच्या उद्रेकातून सल्फर आणि राखेचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. सल्फर मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरल्यास, त्याचा परिणाम तापमानावर होते. तापमानात मोठी घट होते. त्यामुळे या उद्रेकानंतर शीतलहर येण्याची शक्‍यता असते. बराच मोठा भूभाग अशा ज्वालामुखीच्या तडाख्यात येणे शक्‍य असते. न्यूझीलंडमधील लेक ताओपो हे याचे उत्तम उदाहरण आहे.

सबमरिन व्होल्कॅनो : या ज्वालामुखीचा उद्रेक प्रामुख्याने सागरतळाशीच होतो. सागरतळाशी भूपृष्ठ बऱ्याच प्रमाणात ठिसूळ झाल्यामुळे हे ज्वालामुखी कायम जागृत स्वरूपात असतात. त्याचा उद्रेक महासागराच्या पृष्ठभागावरही सहज दिसू शकतो.

(१) पॅसिफिक महासागराभोवतालचा प्रदेश, यास 'अग्निकंकण' असेही म्हणतात. सर्वाधिक ज्वालामुखी याच विभागात आढळतात. (२) भूमध्यसागरी विभाग-आल्प्स पर्वत व द. युरोप. याशिवाय उ. अटलांटिक व हिंदी महासागरातील काही बेटांवर ज्वालामुखी आहेत. भारतात अंदमान समुहातील बॅरन व्दिप हा एकमेव ज्वालामुखीय प्रदेश आहे.
जगातील सुमारे ८५० ज्वालामुखीपैकी सुमारे ८० समुद्राअंतर्गत आहेत. सुमारे ५०० ज्वालामुखी पॅसिफिक महासागराच्या परिघावर आहेत.
ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ

या पदार्थाचे तीन प्रकार पडतात. ज्वालामुखीच्या भेगेतून बाहेर पडणारा द्रवरुप पदार्थ म्हणजे लाव्हारस. नुकताच बाहेर पडलेला लाव्हारस अतिशय उष्ण असतो व त्याचे तापमान ६०० ते १,२०० सेल्सिअसपर्यंत असते. भस्मिक लाव्हा जास्त प्रवाही असतो व तो दूरपर्यत वाहत जातो. लाव्हारस वाहण्याची गती जमिनीच्या उतारावरही अवलंबून असते. हा वेग दर ताशी ८० किलोमीटरपर्यंत असू शकतो. बर्‍याच वेळा भेगेतच लाव्हा साचून घट्ट होतो. पण आता कोंडलेल्या वायंुच्या वाढत्या दाबामुळे भेगेत घट्ट झालेला लाव्हा जोरदार उद्रेकामुळे वर उडून जाऊ शकतो. अशा वेळी भेगेच्या शेजारचे खडकही बाहेर फेकले जातात. बाहेर फेकलेले खडक भेगेच्या मुखाशी साचून राहतात. त्यामुळेच ज्वालाकुंड व शंकूची निर्मिती होते. खडकांचे बहुसंगायित प्रस्तर, लहान तुकडे, ज्वालामुखीची राख व धूळ, इत्यादी द्रवरुप पदार्थ आणि विविध प्रकारचे वायू पाण्याची वाफ, वायुरुप अवस्थेतील हैड्रोजन व कार्बन डायऑक्साईड, इत्यादी वायुरुप पदार्थ त्यातून बाहेर पडतात.

लाव्हा बाहेर पडण्याची पध्दत
लाव्हा बाहेर पडण्याच्या पध्दतीनुसार मध्यवर्ती ज्वालामुखी व लांब भेगेचे ज्वालामुखी असे दोन प्रकार केले जातात. मध्यवर्ती प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विशिष्ट शंकू व ज्वालामुख असलेल्या टेकडयांची व पर्वतांची निर्मिती होते. या प्रकारच्या ज्वालामुखीतून कोंडलेली वाफ व वायू अकस्मात स्फोट होऊन बाहेर पडतात. व्हेसुव्हियस व फुजियामा ही या प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे होत.
लांब भेगेच्या ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते. लाव्हाचे थर सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशात पसरत जातात. दख्खनच्या पठाराचा ५,००,००० चौसर किलोमीटरचा प्रदेश या पध्दतीने निर्माण झालेला आहे.

आइसलॅन्डमधल्या ‘ एव्हलूब ‘ ( Eyjafjallajokull) (उच्चार यू ट्यूब वरून घेतला आहे. चू.भू.द्या.घ्या.) ज्वालामुखीचा एका महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा उद्रेक झाला. मागच्या महिन्याच्या मानाने या उद्रेकाची तीव्रता बरीच जास्त आहे. कालपासून हा ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात राख व छोटे दगड, खनिज कण व कांचकण यासारखे इतर घन पदार्थ आकाशात फेकून देत आहे. या फेकून देण्याची तीव्रता इतकी अधिक आहे की या राखेचा ढग अंदाजे 20000 फूट उंचीवरून आग्नेय दिशेला पसरत चालला आहे. वार्‍याची दिशा हीच असल्याने, अमेरिका खंड या राखेच्या ढगापासून वाचले असले तरी हा ढग युरोपवर पसरला आहे. त्यामुळे युरोपवरची विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. अर्थात हे सगळे तात्पुरते परिणाम आहेत. दोन चार दिवसानंतर हा ढग विखुरला की उड्डाणे पुन्हा पूर्ववत होतील अशी आशा आहे.
या ज्वालामुखीचा याच तीव्रतेचा उद्रेक, याच्या आधी डिसेंबर 1821मधे झाला होता व तो जानेवारी 1823 पर्यंत चालू राहिला होता. या वेळेस जर मागच्या वेळेची पुनरावृत्ती झाली तर मात्र युरोप मधला विमान उद्योग मोठ्याच संकटात सापडू शकतो. असे जरी असले तरी शास्त्रज्ञांना वाटणारी खरी भिती काही निराळीच आहे.
‘ एव्हलूब ‘ हा ज्वालामुखी आइसलॅन्डमधल्या इतर ज्वालामुखींच्या मानाने बच्चा ज्वालामुखी समजला जातो. या देशात असलेल्या सुमारे 35 ज्वालामुखीमध्ये ‘ हेकला ‘(Hekla), ‘ काटला ‘(Katla) व ‘ ग्रिम्स्व्होट्न ‘(Grimsvotn) हे तीन ज्वालामुखी, बडे किंवा दादा ज्वालामुखी समजले जातात. या तीन बड्या ज्वालामुखींपैकी ‘ काटला ‘ या ज्वालामुखीची भिती आइसलॅन्ड मधल्या नागरिकांना सर्वात अधिक वाटते. या ज्वालामुखीचे मुख साधारण 10 किलोमीटर व्यासाचे आहे व तो 5000 फूट उंचीवर असल्याने या ज्वालामुखीच्या उद्रेकात, महाप्रचंड पूर येऊ शकतात. 1918 मधे या ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. सध्या या ज्वालामुखीच्या मुखावरून हिमनद वहात असल्याने, बर्फाच्या मोठ्या जाडीच्या थरांनी हे मुख, बूच बसवल्यासारखे बंद केले गेले आहे. ‘एव्हलूक ‘ व ‘ काटला ‘ हे दोन्ही ज्वालामुखी एकमेकाजवळच आहेत.
बुधवारच्या ‘ एव्हलूब ‘ च्या उद्रेकाने, शास्त्रज्ञाना खरी भिती अशी वाटते आहे की हा उद्रेक जर बराच काल चालू राहिला तर या ज्वालामुखीतून वहात असलेल्या लाव्हा रसामुळे, ‘ काटला ‘ ज्वालामुखीच्या मुखावरचे, बर्फाचे बूच वितळून जाईल व या ज्वालामुखीचा मोठा विस्फोट होऊन लाखो टन राख आकाशात फेकली जाईल. 1991 मधे फिलिपाईन्स देशातल्या ‘ पिनाट्यूबो ‘ ज्वालामुखीने दोन दिवसात पृथ्वीपासून 70000 फूट अंतर उंचीपर्यंत राख फेकली होती व त्यामुळे जगभरातले तपमान 0.4 डिग्री सेल्सियसने कमी झाले होते.
याच हिशोबाने ‘ काटला ‘ ज्वालामुखीचा उद्रेक, जगाला डीप फ्रीझ मधे टाकू शकतो. अठराव्या शतकात जेंव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता तेंव्हा संपूर्ण अमेरिका खंडाला अतिशय तीव्र असा शीतकाल सहन करावा लागला होता. अमेरिकेतील मिसिसिपी नदी, न्यू ऑर्लिन्स या शहराजवळ मेक्सिकोच्या आखाताला मिळते. या न्यू ऑर्लिन्स शहराच्या थोड्या उत्तरेला असलेल्या स्थानापर्यंत मिसिसिपी नदी या शीत कालात गोठली होती. जर ‘ काटला ‘ ज्व्वालामुखीचा परत उद्रेक झाला तर जगाला फार मोठ्या प्रमाणात हवामानातले बदल सहन करावे लागतील यात शंकाच नाही.

. इतिहास माहिती
नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. अश्याच काही ऐतिहासिक ज्वालामुखींची माहिती पाहुयात.
सुपरव्होल्कॅनो: सुपर व्होल्कॅनो कमीत कमी ३०० क्युबिक किलोमीटर अ‍ॅश (मॅग्मा) वातावरणात पसरवते. १००० क्युबिक किलोमीटर अ‍ॅशमुळे एक किलोमीटर रुंदीच्या लघुग्रहाने(अ‍ॅस्टेरॉइड) च्या धडकेने जितके नुकसान होईल त्याच्याशी तुलना करता येते. साधारणपणे एक लाख वर्षांत असा एक सुपर वोल्कॅनो होतो. अश्या सुपर वोल्कॅनोंमुळे अनेक प्रजाती नष्ट होउन पृथ्वीचा इतिहासच बदलु शकतो.
सर्वात नुकताच झालेला असा सुपर व्होल्कॅनो म्हणजे टोबाचा वोल्कॅनो जवळ जवळ ७४,००० वर्षांपुर्वीचा , याचा आपल्या इतिहासाशी असलेला संबंध थोडासा रंजक आणि मतभेद असलेला आहे.

इ. स. २०१० मधली खऱ्या अर्थानं ‘अर्थ श्ॉटरिंग’ म्हणजे पृथ्वीभेदक घटना म्हणजे आईसलँडमधील ज्वालामुखीचा उद्रेक! ज्वालामुखी मानवजातीला नवे नाहीत. पुराणकथांमधून ज्वालामुखींबद्दल बऱ्याच आख्यायिका वाचायला मिळतात. ग्रीक पुराणांमध्ये ‘हीफेस्टॉस’ या अग्निदेवाचा उद्योग म्हणजे देवांची हत्यारे बनविणे हा होता. त्याच्या ऐरणीवर घणानं ठोकून तोही हत्यारं बनवत असे. त्यातून ज्या ठिणग्या उडत आणि त्याच्या भट्टीतून जो धूर निघे, तो म्हणजे ज्वालामुखी! रोमनांचा असा देव म्हणजे ‘व्हल्कन’. त्यावरून ‘व्होल्कॅनो’ हा शब्द तयार झाला. पूर्वी हीफेस्टॉसच्या उद्योगामुळे अेटना या ज्वालामुखीचा उद्रेक व्हायचा. त्यानंतर अेओलिअन बेटांमधल्या ‘व्हुल्कानो’ बेटाचा नाश एका ज्वालामुखीच्या उद्रेकात झाल्यानंतर ज्वालामुखींना ‘व्होल्कॅनो’ हे नाव मिळालं. संस्कृतमध्ये ‘ज्वालामुखी’ हा शब्द आहे, पण भारतात तरी गेल्या पाच हजार वर्षांत ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे पुरावे नाहीत.  हिफेस्टॉसच्या हाताखाली जे मजूर काम करीत त्यांना सायक्लॉप्स असं म्हणण्यात येत असे. यांना कपाळाच्या मध्यभागी एकच एक डोळा असे. बऱ्याच तज्ज्ञांच्या मते अेटनाच्या विवराचं हे प्रतीक पुराणात सायक्लॉप्सच्या डोळ्याच्या रूपानं शिरलं असावं.पॅसिफिक महासागरामध्ये इतरत्र कुठेही आढळत नाहीत एवढय़ा संख्येनं ज्वालामुखी आहेत. काही तळाला आहेत, काही या सागराच्या कडांना आहेत. जपानमधले सर्वच ज्वालामुखी पवित्र मानले जातात. त्यांच्या उतारांवर असंख्य देवालये आढळतात. यातला सर्वात प्रसिद्ध ज्वालामुखी म्हणजे फुजियामा! हे सूर्य-साम्राज्याचं केंद्र मानलं जातं. पेरूमध्ये मिस्टी नावाचा एक दुरात्मा ज्वालामुखीच्या रूपात प्रकटतो असं मानलं जातं.

पर्मिअन एक्स्टींशन
सुमारे २५ कोटी वर्षांपुर्वी चीन जवळील समुद्रात झालेल्या या ज्वालामुखीने पृथ्वीची प्रगती एकदम थांबली असे म्हणल्यास फार अतिशयोक्ती व्हायला नको. ९० टक्क्यांपेक्षा जास्त जलचरांचा यात संपुर्ण नाश झाला. जमीनीवरील सुमारे ७० टक्के व्हर्टीब्रे (कणा असलेले, मनुष्य ही व्हर्टीब्रे मध्ये येतो) नष्ट झाले. कीटके (इन्सेक्ट्स, इन्सेक्ट म्हणजे पृथ्वीवरील प्रचंड समृद्ध प्रजाती, लाखो उपजाती, पृथ्वीवर जवळजवळ सर्वं ठिकाणी यांचा वावर असतो) प्रचंड प्रमाणात नाश झाला. कीटकांचा इतका नाश कधीही झाला नसावा असे शास्त्रंज्ञांचे मत आहे.
ह्या महाप्रचंड ज्वालामुखीमुळे इतर ज्वालामुखी सुद्धा 'ट्रीगर' झाल्याचे आढळले आहे, उदा. ह्या व्होल्कॅनोमुळे झालेली सायबेरीयातील भुगर्भ हालचालीने कित्येक लाख कीलोमीटर क्षेत्रफळावर लाव्हा पसरल्याचे सांगितले जाते.

द टोबा सुपर-इरप्शन
इंडोनेशियातील टोबा तलावात झालेल्या ह्या भुकंपाने पृथ्वीवर अमुलाग्र बदल झाल्याचा काही शास्त्रंज्ञांनाचा दावा आहे (ह्यावर अजुन शोध चालुच आहे) ह्यामुळे काही दशके पृथ्वीवर 'जबरदस्तीची थंडी' पडली असावी. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मानवजातीची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याची शक्यता आहे.

भारतात पुरात्तत्व संशोधन करुन ह्या ज्वालामुखीचे काय परिणाम झाले असतील याचा अभ्यास करणे चालु आहे. प्रगत हत्यारे ह्या ज्वालामुखीच्या आधी आणि नंतरही उत्तखननात सापडल्याने काही लोकांचा दावा आहे की प्रगत मनुष्य आशियात ह्या आधी आला असावा, पण त्याचा ह्या ज्वालामुखीने नाश झाला असावा. आत्तापर्यंत मानल्या गेलेला 'आफ्रिकेतुन बाहेर पडायचा फसलेला बेत' (फेल्ड डिस्पर्सल) हा चुकीचा असु शकतो. जर हे खरे असेल तर त्यावेळी आलेल्या प्रगत जाती यात नष्ट झाल्या असाव्यात (कमजोर झाल्या असाव्यात) त्यामुळे प्रगत पीढीची नवी तुकडी सहज येउन बस्तान बसवु शकली, तसे असल्यास हत्यारे एकत्र सापडण्याचा तर्क करता येतो.

जिवंत ज्वालामुखी
जिवंत ज्वालामुखी  एटना  - जगात असे बरेच जिवंत ज्वालामुखी आहेत. इटलीमध्ये एटना (Mount Etna) पर्वतावरचा ज्वालामुखी ३००० (तीन हजार) वर्षांपेक्षा जास्त काळ जिवंत आहे. स्त्रोम्बोली (Stromboli) नावाचा दुसरा जिवंत ज्वालामुखी पण इटलीमध्येच आहे. व्हॅन्वाटू बेटावरचे (Vanautu) दोन ज्वालामुखी गेली ८०० वर्षांपासून जिवंत आहेत आणि त्यांचे सतत स्फोटही होत आहेत.
हवाई बेटावरचा किलावेया (Kilauea) ज्वालामुखी त्याच्या वाहत्या लाव्हासाठी (जो समुद्रात जाऊन मिळतो आणि सतत तिथल्या भूभागामध्ये भर घालतो) प्रसिद्ध आहे.
अजूनही बरेच आहेत. थोडा शोध घेतल्यास कळेलच. चित्रातला ज्वालामुखी हा काँगोमधला १८८२ पासून जिवंत असलेला निअरागाँगो नावाचा ज्वालामुखी आहे. २००२ मध्ये याच्या स्फोटामुळे जवळच्या शहरांतून ४ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं होतं आणि बरेच लोक विषारी वायूंमुळे मेले होते.
इंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत. एखाद्या ज्वालामुखींची जागृती ही घटना, इंडोनेशिया साठी काही फार असामान्य घटना नाही तरीही 29 ऑगस्टच्या सकाळी सुमात्रा बेटाच्या उत्तरेस असलेल्या मेदान या शहराच्या जवळ असलेल्या सिनाबुन्ग या ज्वालामुखीचा उद्रेक ही एक चिंताजनक बाब आहे असे मत Indonesian Center for Volcanology and Geological Disaster Mitigation या संस्थेचे प्रमुख मिस्टर . सुरोनो यांनी व्यक्त केले आहे.

एखादे विमान डोक्यावरून जात असताना जसे आवाज येतात त्याच पद्धतीचे आवाज या ज्वालामुखीजवळ राहणार्‍या खेडूतांनी ऐकले. यानंतर एक मोठा स्फोट झाला व 1500 मीट्रर उंचीपर्यंत राख, वाळू व पाण्याची वाफ या ज्वालामुखीने बाहेर फेकली. त्यानंतर या डोंगराच्या टोकावर त्यांना ज्वाला व लाव्हा रस वहाताना दिसू लागला. सुमात्रा शासनाने 12000 पेक्षा जास्त खेडूतांना त्वरित त्यांच्या खेड्यातून हलवले असून त्यांना मास्क दिले आहेत. ज्वालामुखीच्या भोवतीच्या 6 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खेडूतांच्या निवेदनाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतांच्यावर या ज्वालामुखीने फेकलेली राख पडली आहे व त्यामुळे या शेतात असलेला भाजीपाला संपूर्ण नष्ट झाला आहे.
या ज्वालामुखीचा उद्रेक दोन कारणांसाठी चिंताजनक आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे 400 वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक कोणतीही पूर्वसूचना न देता झाला आहे. काल झालेला उद्रेक जरी फारसा हानीकारक नसला तरी या विषयातील तज्ञांच्या मताप्रमाणे या ज्वालामुखीने काल बाहेर फेकलेली राख व लाव्हा हा त्याच्या पोटातून आलेला नसून चोंदलेले नाक साफ करावे तशी फक्त त्याच्या बाह्य भागात साठून राहिलेली राख असू शकते. या ज्वालामुखीबद्दल पूर्वीची काहीच माहिती नसल्याने, यानंतर तो काय करेल हे सांगणे मोठे अवघड आहे. कदाचित यानंतर मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहेच.
यापेक्षा सर्वात मोठी काळजी तज्ञांना या ज्वालामुखीच्या स्थानामुळे वाटते आहे. हा ज्वालामुखी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात विशाल अशा टोबा ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या जलाशयापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की 73000 वर्षांपूवी झालेल्या टोबा ज्वालामुखाच्या स्फोटात जवळ जवळ सर्व मानवजात नष्ट झाली होती. भारतीय उपखंडातले तर सर्व सजीव नष्ट झाले होते.
टोबाच्या सानिध्यात असलेल्या या सिनाबुन्ग ज्वालामुखीच्या उद्रेकाला, म्हणूनच गंभीरतेने घेतले जात आहे. भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. हा ज्वालामुखी पुढे काय करणार आहे का गप्प बसून राहणार आहे हे फक्त काल सांगू शकेल.
30 ऑगस्ट 2010

ज्वालामुखी राख -
ज्वालामुखीच्या राखेमधून तयार झालेल्या ढगामुळे आज लंडन विमानतळावरील अनेक उड्डाण रद्द करण्यात आली आहेत.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आयर्लंडचा दौरा अर्धवट सोडून परतावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी राखेच्या ढगामुळे युरोपमध्ये शेकडो विमान उड्डाणे रद्द करावी लागली होती. याही वेळी उड्डाणे रद्द करावी लागतील अशी शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ज्वालामुखीच्या राखेच्या ढगामुळे (ग्रिम्सवोन) या आठवड्यामध्ये आयर्लंड आणि ब्रिटनच्या इतर भागांमधील विमान वाहतुकीवर परिणाम होईल, असे ब्रिटिश नागरी उड्डयन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. युरोपच्या इतर भागांवर या ढगाचा परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.

युरोपीयन एअर ट्राफिक कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५२ उड्डाण रद्द करण्यात आली आहे.

ग्रिम्स्वोट ज्वालामुखी  - युरोपात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पुन्हा एकदा विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रिम्स्वोट नावाच्या ज्वालामुखीमुळे ब्रिटिश एअरवेजच्या ५०० विमानांना उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या युरोपा दौ-यालाही त्याचा फटका बसला आहे.
ज्वालामुखीच्या उदेकामुळे परिसरात राखेचे लोट उडाले आहेत. परिणामी विमानांना उड्डाणे करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिटनने ५०० विमानोड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे युरोकंट्रोलतफेर् स्पष्ट करण्यात आले. उत्तर आयर्लंड, स्कॉटलंड आणि स्कँडिनेव्हियाच्या काही भागांतील ५०० व्यावसायिक उड्डाणे रद्द करावी लागतील, असेही सांगण्यात आले. युरोपात दररोज किमान ३० हजार विमानफेऱ्या होतात. त्यामुळे ज्वालामुखीच्या उदेकाचा या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गेल्या वषीर्ही अशाच ज्वालामुखीमुळे सुमारे महिनाभर युरोपातील विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

नरसाळयाच्या आकाराचा खळगा टेकडीच्या माथ्यावर असतो व त्यातूनच वरील विविध प्रकारचे द्रव्य बाहेर पडत असते. या खळग्याला ज्वालाकुंड म्हणतात. जपानमधील फयुजियामा, इटलीतील व्हेसूव्हियस, इक्केडॉरमधील कोरोपॅक्सी ही ज्वालामुखीची उदाहरणे होत. बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटांच्या पूर्वेकडील बॅरन बेट हे ज्वालामुखीच्या टेकडीचे उदाहरण आहे. उद्रेकांच्या पुनरावृत्तीवरनुसार ज्वालामुखीचे जागृत. निदि्रस्त व मृत असे तीन प्रमुख प्रकार पडतात. वारंवार उद्रेक होणार्‍या ज्वालामुखीस 'जागृत ज्वालामुखी' म्हणतात. पूर्वी कधीतरी उद्रेक झालेला व नंतर बराच काळ उद्रेक झालेला नसेल पण पुढे होण्याची शक्यता असेल तर अशा ज्वालामुखीस निदि्रस्त ज्वालामुखी म्हणतात. ज्या ज्वालामुखीतून ऐतिहासिक किंवा प्राचीन काळात उद्रेक झालेला असून, नंतर बराच काळपर्यंत उद्रेक झालेला नाही व पुढे होण्याची शक्यताही नसेल तर अशा ज्वालामुखीस 'मृत ज्वालामुखी' म्हणतात. बर्‍याच वेळा ज्वालामुखी हा निदि्रस्त अवस्थेत आहे की मृतावस्थेत आहे हे ओळखणे कठीण जाते.
पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील शीलारस-मॅग्मा-बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायूलोट आणि राखे सदृश्य असे खडकाचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो त्याला ज्वालामूखी हे नाव देतात.
ज्वालामूखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट धूरासारखे दिसणारे खडकांच्या सुक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वावरुन ही एक पेटलेली निर्सर्गाची भटटी आहे असे वाटणे साहजिक होते. त्यामूळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणार्‍या खडकांच्या लहान मोठया कणांनाही राख अंगार-निखारे-अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक क्रियेत घडून येत नसते कचित बाहेर पडणार्‍या वायूपैकि गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.
जमिनीवर येण्यापूर्वी भुष्ठभागावर आला कि, त्यात विरघळलेले बहूतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडु लागतात ज्या शिलारसातून बहूतेक वायू निघुन गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.
मध्यवर्ती निर्सग द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामूखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालच्या शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुूळे बाजुच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकुच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो.


आइसलँडमध्ये आठवडय़ापूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने युरोपची विमानवाहतूक आठवडय़ासाठी ठप्प केली. ज्वालामुखींच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास हा उद्रेक अगदीच किरकोळ ठरेल, कारण प्राचीन काळातील उद्रेकांनी पृथ्वीच्या हवामानात मोठय़ा प्रमाणावर बदल घडवून आणले आणि ते हिमयुग अवतरण्यासही कारणीभूत ठरले. आदीमानवाच्या विकासाच्या टप्प्यातही या उद्रेकांनी मोठा प्रभाव टाकला. विशेष म्हणजे हजारो किलोमीटर अंतरावर झालेल्या या उद्रेकांच्या खाणाखुणा राखेच्या रूपात भारतात आणि महाराष्ट्रात आजही जतन झाल्या आहेत! निसर्गाच्या स्वभावाची नेमकी व्याख्या करणे हे अत्यंत कठीण काम! कारण निसर्ग म्हणजे एकाच वेळी सर्वात नियमित आणि तितकाच अनिश्चित. म्हणून तर ग्रहगोलांचे फिरणे, एकापाठोपाठ येणार्‍या ऋतूंमधील नियमितता थक्क करते. पण त्याच वेळेस चक्रीवादळं, भूकंप, ज्वालामुखींचे उद्रेक आणि उल्का-अशनींचे आघात हे अनिश्चिततेचे दर्शन घडवतात. किनारी प्रदेशात धडकणारी चक्रीवादळे आणि भूकंपांच्या विध्वंसातून निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप पाहायला मिळते. गेल्याच आठवडय़ात आइसलँडमध्ये उद्रेक झालेल्या ज्वालामुखीने निसर्गाच्या आणखी एका रूपाचे दर्शन घडविले. प्रचंड उद्रेकामुळे ज्वालामुखीच्या विवरातून हजारो टन राख बाहेर फेकली गेली आणि तिने आइसलँडवरचा आसमंत व्यापलाच, शिवाय ती वार्‍यावाटे शेकडो किलोमीटर अंतरावर पसरली. या उद्रेकामुळे शेकडो किलोमीटर अंतरावरील युरोप व कॅनडामधील विमानवाहतूक ठप्प झाली आणि विमान कंपन्यांना रोजचे एक हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान सोसावे लागले; जागोजागी अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले ते वेगळेच. इतकेच नाही तर खुद्द आइसलँडमध्ये आरोग्याची चिंता उभी राहिली आहे. माणसांसाठी काळजी घेणे शक्य आहे, पण जनावरांचे काय? असा प्रश्न उभा ठाकला आहे. कारण वातावरणात फेकल्या गेलेल्या आणि आता हळूहळू वरून बरसणार्‍या ज्वालामुखीच्या राखेमुळे अनेक समस्या येऊ घातल्या आहेत. या राखेत असलेले फ्लोराईड व इतर घटकांमुळे जनावरे मृत्युमुखी पडण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक समस्या आज त्या देशाला आणि परिसरातील देशांना भेडसावत आहेत. एरवी पोषक व पूरक समजल्या जाणार्‍या निसर्गाचेच हे एक रूप!
ज्वालामुखींच्या उद्रेकांचा इतिहास
आइसलँडमध्ये पाहायला मिळाली ती या रूपाची केवळ एक झलक आहे. कारण पृथ्वीचा इतिहास असा असंख्य अचाट व विध्वंसक घटनांनी भरलेला आहे. त्यांनी वेळोवेळी अनिश्चिततेचे दर्शन घडविलेसुद्धा आहे. युरोपातील अनेक देशांना जेरीस आणणारा आइसलँडचा आताचा उद्रेक अगदी किरकोळ ठरावा अशा भयंकर घटनांनी पृथ्वीला हादरवले आहे. त्याचे पुरावे आजही आपल्याच आसपास पाहायला मिळतात. अगदी आपल्या भारतात आणि महाराष्ट्रातसुद्धा! विशेष म्हणजे याच घटनांनी माणसाचा इतिहास घडवला आहे, माणसाच्या विकसित होण्यावर आपला प्रभाव टाकला आहे. त्याचा शोध घ्यायला लांब कुठे जायची आवश्यकता नाही. अगदी पुणे जिल्ह्य़ात बारामतीजवळ मोरगाव, नारायणगावजवळ बोरी किंवा विदर्भात पूर्णा खोर्‍यात अंदोरा, गांधीग्राम, कपिलेश्वर तसेच, वर्धा खोर्‍यातही अशा ठिकाणी या इतिहासाचे स्पष्ट पुरावे आजही अस्तित्वात आहेत. इंडोनेशियातील टोबा ज्वालामुखीच्या प्राचीन काळी झालेल्या उद्रेकांचेच हे पुरावे! या ज्वालामुखीच्या विध्वंसक उद्रेकामुळे प्रचंड प्रमाणावर राख बाहेर फेकली गेली. ती इंडोनेशियाच्या आसपास तर बरसलीच, शिवाय कित्येक किलोमीटर उंचावर जाऊन भारतीय उपखंडात परसली. संपूर्ण भारतीय उपखंड, हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि चीनच्या समुद्रातही जमा झाली. माणसाचा विकास होत असताना अलीकडच्या काळात घडलेली ही सर्वात विध्वंसक आणि पृथ्वीवर परिणाम करणारी घटना. टोबा ज्वालामुखीचे उद्रेक हे खरंतर कमालीचे थरारक व चित्तवेधक प्रकरण! कारण या ज्वालामुखीने वेगवेगळ्या कालखंडात आग ओकली आणि आपला प्रभाव संपूर्ण पृथ्वीवर दाखवून दिला. इतका, की ग्लोबल वॉर्मिग थांबविणे हा जणू या ज्वालामुखीचा ‘बाये हाथ का खेल!’ कारण गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये पृथ्वीच्या वातावरणाचे तापमान जितके वाढले (सुमारे पाऊण अंश सेल्सिअस) त्याच्या कितीतरी पट तापमान कमी करण्याची क्षमता या ज्वालामुखीच्या एका उद्रेकात आहे. त्याचा अनुभव पृथ्वीने वेळोवेळी घेतलासुद्धा आहे. त्याच्या ज्ञात इतिहासानुसार गेल्या १२ लाख वर्षांमध्ये त्याने चार प्रचंड उद्रेक पाहिले आहेत आणि प्रत्येक उद्रेकाने पृथ्वीच्या हवामानात (पर्यायाने जीवसृष्टीतही!) मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. या प्रकरणाचा अभ्यास कित्येक दशकांपासून सुरू आहे आणि त्याद्वारे नवनव्या रहस्यांचा उलगडासुद्धा होत आहे. पण त्याआधी अलीकडच्या काळात इतरही काही उद्रेकांनी पृथ्वीवर टाकलेल्या प्रभावाची माहिती घ्यावी लागेल. तो धागा धरून भूतकाळात डोकावणे हे हा संपूर्ण इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने अधिक संयुक्तिक ठरेल. ज्वालामुखी, भूकंप या आपल्यासाठी आपत्ती असल्या, तरी पृथ्वी जिवंत असल्याचे ते पुरावेच. तिच्या अंतरंगात साठलेली प्रचंड ऊर्जा या घटनांद्वारे बाहेर पडते. पृथ्वीवर विशिष्ट पट्टय़ात ज्वालामुखी व भूकंपांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते. त्यात सर्वात सक्रिय पट्टा म्हणजे प्रशांत महासागराला वेढणारा गोल पट्टा! तिथे जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी असल्याने तो ‘रिंग ऑफ फायर’ या नावानेही ओळखला जातो. पृथ्वीच्या ज्ञात इतिहासात सर्वात घातक ज्वालामुखींना जन्म देणारे इंडोनेशिया, मलेशिया हे देशही याच ‘रिंग ऑफ फायर’वर आहेत. याशिवाय दुसरा सक्रिय पट्टा म्हणजे अटलांटिक महासागराच्या मधोमध असलेला ‘मिड अटलांटिक किंवा मिड ओशियानिक बेल्ट’! गेल्या आठवडय़ात बरसलेला आइसलँडमधील ज्वालामुखी या पट्टय़ात मोडतो. तिसरा पट्टा आहे, ‘अल्पाईन-हिमालयन बेल्ट’; हिमालयापासून युरोपातील आल्प्स पर्वतापर्यंत पसरलेला! इटलीमधील माउंट वेसुवियस यांसारखे प्रसिद्ध ज्वालामुखी या पट्टय़ात मोडतात. हेच पट्टे सक्रिय असण्याचे कारण म्हणजे हे पट्टे पृथ्वीच्या कवचाच्या विविध प्लेट्सच्या सीमारेषांवर आहेत. या प्लेट्सची सतत हालचाल होत असते, त्यामुळे अधिकाधिक ऊर्जा येथूनच बाहेर पडते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय बाहेर पडते, त्यावर त्याचे स्वरूप ठरते. त्यातून प्रवाही लाव्हारस बाहेर पडतो, त्याचप्रमाणे खडकाच्या मोठाल्या शिळा तसेच वेगवेगळ्या आकाराची राखसुद्धा बाहेर पडते. राख सूक्ष्म आकाराची असेल तर ती कितीतरी किलोमीटर (अगदी १० किलोमीटरपासून ते ३० किलोमीटपर्यंत) उंचावर फेकली जाते आणि उंचावरील वार्‍यांच्या प्रवाहासोबत ती हजारो किलोमीटरचा प्रवास करून दूरवरच्या प्रदेशात कुठेतरी जमा होते.
तंबोरा, पिनाटुबो आणि क्रोकाटोआ

टोबाच्या प्रकरणाकडे वळण्यापूर्वी अलीकडच्या काळातील प्रचंड अशा तंबोरा, पिनाटुबो, क्रोकाटोआ या ज्वालामुखींच्या उद्रेकाची दखल घ्यावी लागेल. कारण त्यांनीसुद्धा पृथ्वीचे वातावरण व हवामानावर मोठा प्रभाव टाकला आहे. या उद्रेकांमधून जितकी जास्त प्रमाणात राख बाहेर पडेल आणि ती जितक्या जास्त अंतरावर पसरली जाईल, तितका जास्त प्रभाव जागतिक हवामानावर पडतो. कारण ही राख वातावरणात पसरते, तेव्हा पृथ्वीवर येणार्‍या सूर्याच्या किरणांना रोखते. त्यामुळे जागतिक तापमान कमी होते. याशिवाय उद्रेकातून बाहेर पडणार्‍या सल्फर डायऑक्साईड वायूमुळेसुद्धा तापमान कमी होण्यास मदत होते. फिलिपिन्समधील लूझॉन बेटावरील ‘माऊंट पिनाटुबो’ ज्वालामुखीचा अलीकडे म्हणजे १९९१ साली उद्रेक झाला. त्यातून तब्बल १० घनकिलोमीटर इतकी राख बाहेर पडली. त्याचा परिणाम असा झाला, की आताच्या जागतिक तापमानवाढीच्या युगातही वातावरणाचे तापमान काही काळासाठी तब्बल ०.४ ते ०.५ अंश सेल्सिअसने कमी झाले. त्यापूर्वी १८८३ साली इंडोनेशियातील क्रोकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक त्याहून भयंकर होता. इतका भयंकर की हे बेटच कायमचे कोलमडून पडले. या बेटाचे क्षेत्रफळ साधारणत: २३ चौरस किलोमीटर होते. त्यापैकी दोन-तृतीयांश बेट या उद्रेकात पूर्ण उडाले. आणि त्याचे रूपांतर तब्बल सहा किलोमीटर व्यासाच्या विवरात झाले. त्याच्या प्रचंड हादर्‍यामुळे तब्बल साडेचार हजार किलोमीटरवरची जमीनही हादरली होती. या विध्वंसाबरोबरच तप्त राख व विषारी वायूंचा परिणाम म्हणून बेटावरील हजारो लोक मृत्युमुखी पडलेच, शिवाय त्याचा प्रभाव हवामानातील बदलांच्या रूपात जगभर पाहायला मिळाला. या दोन प्रचंड उद्रेकांनाही लहान ठरविणारा उद्रेक १८१५ साली इंडोनेशियामध्ये झाला. तो होता तंबोरा ज्वालामुखीचा. या उद्रेकात तब्बल ५० घनकिलोमीटर इतकी प्रचंड प्रमाणात राख बाहेर पडली. त्यापैकी काही राख उद्रेकानंतर लगेचच या चार किलोमीटर उंचीच्या ज्वालामुखीवरून वेगाने खाली उतरली. त्या तप्त राखेत दहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अलीकडच्या काळातील हवामानावर सर्वात मोठा परिणाम करणारा हा उद्रेक ठरला, कारण त्यातून बाहेर पडलेल्या राखेमुळे जागतिक तापमान तब्बल ०.४ ते ०.७ अंश सेल्सिअसने कमी झालेच पण त्याहून मोठा परिणाम म्हणजे या उद्रेकानंतरच्या वर्षी उत्तर गोलार्धातील बर्‍याचशा प्रदेशात (अमेरिका व युरोपसह) उन्हाळा पडलाच नाही. ते वर्ष उन्हाळ्याविनाच गेले. या उद्रेकांची आणि त्यांच्या प्रचंड स्वरूपाची ओळख करून घेतल्यावर आता टोबाच्या उद्रेकांची माहिती पचविणे सोपे जाईल. कारण आतापर्यंत वाचलेले वर्णन अगदीच फिके ठरावे असाच टोबाचा इतिहास आहे. माऊंट टोबा हासुद्धा इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील ज्वालामुखी; बराच काळ निद्रिस्त अवस्थेत असणारा, पण जागा झाला की संपूर्ण पृथ्वीवर आपली छाप सोडणारा! कारण आतापर्यंतच्या ज्ञात इतिहासात टोबाचे एकूण चार प्रचंड उद्रेक झाले आहेत. त्या सर्वच्या सर्व उद्रेकांच्या खाणाखुणा आजही जागोजागी अस्तित्वात आहेत; केवळ इंडोनेशिया किंवा जवळच्या परिसरात नव्हे, तर त्या जगभर विखुरलेल्या आहेत. त्याच्या खुणा म्हणजे त्यातून बाहेर पडलेली प्रचंड प्रमाणातील राख ठिकठिकाणी साठून राहिली आहे. त्याच्या चार प्रमुख उद्रेकांपैकी सर्वात जुना म्हणजे- १२ लाख वर्षांपूर्वीचा. त्यापाठोपाठ आठ लाख, पाच लाख आणि सर्वात अलीकडचा ७४ हजार इतक्या वर्षांपूर्वी त्याचे उद्रेक झाले. या उद्रेकांचे प्रमाण कमालीचे प्रचंड असल्याने हवामानावर त्याचा प्रचंड परिणाम झालाच, शिवाय हा काळ अर्वाचीन माणसाच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याने त्याच्यावरही या बदलांचा खूप मोठा परिणाम झाला. इतका की काही तज्ज्ञांच्या मते तर सर्वात अलीकडच्या काळातील म्हणजे ७४ हजार वर्षांपूर्वीच्या उद्रेकामुळे झालेल्या बदलांमुळे संपूर्ण माणूस जात नष्ट होण्याच्या मार्गावर होती. याबाबत अनेक अभ्यासकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मात्र, त्या उद्रेकाचे प्रचंड स्वरूप तसेच, त्याचे हवामानावर आणि माणसावर झालेले परिणाम याबाबत कोणाचेही दुमत नाही.
टोबाची महाआपत्ती
‘टोबा महाआपत्ती सिद्धांता’नुसार साधारणत: ७४ हजार वर्षांपूर्वी झालेला टोबाचा उद्रेक हा पृथ्वीवरील आतापर्यंतच्या माहीत असलेल्या उद्रेकांपैकी सर्वात भीषण मानला जातो. हा एक ज्वालामुखी नव्हता, तर ते अनेक ज्वालामुखींचे सुमारे १०० किलोमीटर बाय ३५ किलोमीटर आकाराचे विस्तृत असे केंद्र असल्याचे समजले जाते. त्यातून तब्बल २००० ते ३००० घन किलोमीटर इतक्या प्रचंड प्रमाणातून लाव्हारस, खडक, राख, अनेक वायू असे पदार्थ बाहेर पडले. त्यापैकी राखेचे व वायूंचे प्रमाण तब्बल ८०० ते १००० घन किलोमीटर इतके होते. अलीकडच्या काळातील तंबोरा ज्वालामुखीच्या उद्रेकाशी तुलना केली, तर ही राख १६ ते २० पटीने जास्त होती. तंबोरामुळे एक वर्ष उन्हाळा पडला नाही, तर टोबामुळे काय झाले असेल? टोबामुळे तेच घडले- या उद्रेकामुळे पृथ्वीभोवती जणू या राखेचे आवरणच निर्माण झाले होते. त्यामुळे सूर्यप्रकाश अडून जगभर सलग सहा ते दहा वर्षे हिवाळाच अनुभवायला मिळाला. एवढय़ावर भागले नाही, तर त्यानंतरच्या एक हजार वर्षांहून अधिक काळासाठी पृथ्वीवर छोटे हिमयुग अवतरले होते. काहींच्या मते वातावरणाचे तापमान तीन-साडेतीन अंशांनी कमी झाले होते. जगाचे तापमान एका झटक्यात इतके कमी होणे ही अनोखी आणि अपवादात्मकच घटना! काही अभ्यासकांच्या मते तर तापमानातील घट तब्बल १५ अंश इतकी जास्त होती. या सर्व घडामोडींचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर झाला तसाच तो माणसाच्या पूर्वजांवरही झाला. या काळात माणसाची लोकसंख्या इतकी कमी झाली की मनुष्य जात नष्ट होण्याच्या काठावर येऊन पोहोचली होती. त्या वेळी जगातील माणसांची संख्या केवळ १० हजारांच्या आसपास उरली होती आणि प्रजननक्षम जोडप्यांची संख्या तर एक हजारापर्यंत झाली आली होती, असे काही अभ्यासक मानतात. माणसाच्या इतिहासात हा काळ ‘पॉप्युलेशन बॉटलनेक’ म्हणून ओळखला जातो. (अर्थात, याबाबत सर्व अभ्यासकांचे एकमत नाही.) या आपत्तीतून तावून-सुलाखून निघाल्यावर मात्र पुढच्या काळात माणसांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. टोबाच्या उद्रेकाचा परिणाम म्हणून माणसाच्या पूर्वजांमध्ये असलेली वांशिक विविधता नष्ट झाल्याचेही काही तज्ज्ञ मानतात. या उद्रेकात असे काही गट नामशेष झाल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते. पण या सिद्धांताबाबतही अभ्यासकांचे एकमत नाही. टोबाच्या उद्रेकाचा सर्वाधिक प्रभाव आशिया खंडात, मुख्यत: भारतीय उपखंडात पडल्याचे मानले जाते. त्यातून बाहेर पडलेल्या राखेचे सुमारे अर्धा-अर्धा फूट जाडीचे थर आजही भारतीय उपखंडात अनेक ठिकाणी तसेच, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, चीनचा समुद्र येथे ठळकपणे पाहायला मिळतात.
टोबा आणि भारत
याचा अर्थ काही अभ्यासकांनी असा लावला, की या काळात भारतीय उपखंडातील व एकूणच या भागातील माणसाचा वंश नष्ट झाला आणि त्यानंतर तो हिमयुगाच्या काळात (विशेषत: आफ्रिका-युरोपमार्गे) ठिकठिकाणी पोहोचला. बर्‍याच पाश्चात्त्य अभ्यासकांनी हा सिद्धांत उचलून धरला होता. त्यामुळे टोबा हा विषय केवळ भूशास्त्र-पर्यावरण यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो विविध प्रदेशांच्या अस्मितांच्या दृष्टीनेही अभ्यासाचा भाग बनला आहे. अलीकडच्या काळातील टोबाच्या अभ्यासावरून मात्र हा पाश्चात्त्यांचा सिद्धांत टिकणारा नसल्याचे दिसून आले. हा निव्वळ खोडसाळपणा आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेला फार्स असल्याचे अनेक भारतीय तज्ज्ञ सांगतात. कारण या म्हणण्याला पुरावेच नव्हते, तरीही तो पुढे रेटण्यात आला होता. आता हेच तज्ज्ञ आपला सिद्धांत खोटा असल्याचे सांगून पुन्हा प्रसिद्धी मिळवत आहेत. टोबासारख्या उद्रेकांचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे आदीमानवाशी संबंधित अनेक पुरातत्त्वीय ठिकाणांचा काळ ठरविणे शक्य झाले आहे. एकतर ज्वालामुखीची राख जमा झाल्याने ही ठिकाणे व तेथील साहित्य त्या राखेखाली आहे तसे टिकून राहते. शिवाय किरणोत्सारी पद्धत वापरून राखेचा कालखंड काढता येतो त्यामुळे आदीमानवाशी संबंधित असलेल्या त्या ठिकाणांचाही काळ सांगता येतो. त्यामुळेच केवळ भूशास्त्रज्ञांच्या दृष्टीनेच नव्हे, तर पुरातत्त्वाच्या अभ्यासकांसाठीसुद्धा टोबा किंवा असे ज्वालामुखीचे उद्रेक तितकेच उपयुक्त ठरत आहेत. भारतातही महाराष्ट्र, मध्य भारत व दक्षिण भारतात अनेक ठिकाणी अशी राख व आदीमानवाशी संबंधित ठिकाणे आढळतात. पुण्यातील डेक्कन कॉलेज किंवा इतर संशोधक संस्थांकडून त्याचा अभ्यास सुरू आहे. भारतात महाराष्ट्रातील बोरी, मोरगाव तसेच आंध्र प्रदेशातील ज्वालापूरम या ठिकाणच्या अभ्यासात आढळलेली एक बाब म्हणजे- या राखेच्या थराखाली व वरसुद्धा आदीमानवाची एकाच प्रकारची हत्यारे मिळाली आहेत. याचा अर्थ ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या आघाताचा माणसावर परिणाम झाला असला, तरी या धक्क्य़ातून येथे तरी तो सावरला असल्याचे पाहायला मिळते. डेक्कन कॉलेजचा अभ्यासही त्याला दुजोरा देतो. केंब्रिज विद्यापीठातर्फे आधी वेगळाच सिद्धांत मांडला जात होता- टोबाच्या उद्रेकामुळे भारतातील माणूस नष्ट झाल्यामुळे त्यानंतर बाहेरून माणूस येथे स्थलांतरित झाला. पण अलीकडे भारतातील टोबाच्या राखेचा व पुरातत्त्वीय ठिकाणांच्या अभ्यासावरून हे तज्ज्ञसुद्धा, असे स्थलांतरण झाले नसल्याच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत. याबाबत वेगवेगळ्या अभ्यासकांचे वेगवेगळे सिद्धांत असले, तरी टोबाच्या उद्रेकांनी जगात उलथापालथ केल्याचे सर्व जण मान्य करतात. टोबा व एकूणच ज्वालामुखींच्या उद्रेकांचा विचार करता भविष्यात त्यांच्याकडून कोणती उलथापालथ घडवून आणली जाईल, हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. मात्र, असे उद्रेक होत राहणार, हे निश्चित! हे कधी घडणार हाच कळीचा प्रश्न आहे. या प्रचंड उद्रेकांच्या राखेमुळे भविष्यात वातावरणाचे तापमान कमी होऊन कदाचित काही काळासाठी ग्लोबल वॉर्मिगला आळा बसेल. पण असे उद्रेक माणसाच्या विकासावर व प्रगतीवर परिणाम करतील की आणखी काही परिणाम घडवून आणतील हे येणारा काळच सांगेल. टोबाच्या उद्रेकांनी भूतकाळातील अनेक रहस्ये उलगडून दाखवली आहेत. त्याचबरोबर निसर्गाच्या रौद्र रूपाचे दर्शन घडवून निसर्गाबद्दलच्या आपल्या गोंडस कल्पनांना छेदही दिला आहे. त्यामुळे पचायला कितीही जड असले, तरी निसर्गातील नियमिततेबरोबरच त्याच्या अनिश्चिततेचे वास्तवसुद्धा स्वीकारावेच लागेल. नाहीतर आपल्याला संपूर्ण निसर्ग समजला असे म्हणता येणार नाही. निसर्गात सर्व काही चांगलेच घडते असे नाही. तर अनिश्चितता, विध्वंस, रौद्रता हेसुद्धा त्याचे अविभाज्य भाग आहेत. त्यावर मात करून टिकून राहणे हेच काय ते आपल्याला करावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील राखेचे गूढ

महाराष्ट्रात मोरगाव व बोरी येथे आढळणार्‍या टोबाच्या राखेच्या काळाबाबत गूढ कायम आहे. सर्वसाधारणपणे अभ्यासक या राखेचा संबंध टोबा ज्वालामुखीच्या सर्वात अलीकडच्या (७४ हजार वर्षांपूर्वीच्या) उद्रेकाशी जोडतात. मात्र, पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या डॉ. शीला मिश्रा व त्यांच्या सहकार्‍यांनी प्राचीन चुंबकत्वाचे तत्त्व आणि पुरातत्त्वीय हत्यारांचा अभ्यास केला आहे, त्यावरून या राखेचा काळ बराच मागे जातो. बोरी येथील राखेचा काळ आठ लाख वर्षांच्या मागे जातो, तर मोरगाव येथील राखेचा काळ १२ लाख वर्षांचा असल्याचे त्यावरून दिसते. मात्र, इतर आणखी पुरावे तपासून हा काळ निश्चित करावा लागेल, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

Friday 3 May 2013

डाल्टन जॉन



डाल्टन, जॉन : (६ सप्टेंबर १७६६–२७ जुलै १८४४). इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकीविज्ञ. अणुसिद्धांत व वायूंचे गुणधर्म यासंबंधी महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म ईगल्सफील्ड (कंबर्लंड) येथे झाला. त्यांनी केंडल येथे भौतिकी व गणित या विषयांचा खाजगी रीत्या अभ्यास केला. १७८७ मध्ये त्यांनी वातावरणीय निरीक्षणांची नोंद ठेवण्यास सुरुवात करून मृत्यूपावेतो हे कार्य अविरतपणे चालू ठेवले व दोन लक्षापेक्षाही जास्त नोंदी संग्रहित केल्या. या निरीक्षणांच्या आधारे त्यांनी मिटिऑरॉलॉजिकल ऑब्झर्वेशन्स अँड एसेज  हा ग्रंथ १७९३ मध्ये प्रसिद्ध केला. उत्तरध्रुवीय प्रकाश (ध्रुवीय प्रदेशात आढळणारा विविधरंगी आविष्कार) मूलतः विद्युत् स्वरूपाचा आहे, असे त्यांनी या ग्रंथात प्रतिपादन केले होते. ते मॅंचेस्टर येथील न्यू कॉलेजमध्ये गणित आणि भौतिकीचे प्राध्यापक होते. (१७९३–९९). 

मॅंचेस्टर येथील लिटररी अँड फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाल्यानंतर १७९३ साली रंगांधत्वाचा (वर्णपटलातील एका किंवा अधिक रंगांची डोळ्याला संवेदना न होण्याचा) शोध त्यांना लागला. त्यासंबंधीचे विस्तृत विवेचन त्यांनी सोसायटीपुढे मांडले, ते स्वतःच रंगांध होते. तांबड्या व हिरव्या रंगात भेद न करता येणे या सर्वात जास्त आढळणाऱ्या दोषाला डाल्टनीझम असे म्हणतात. १८०१ मध्ये त्यांनी ‘ संमिश्र वायूंची घटना’, ‘बाष्पशक्ती’, ‘बाष्पीभवन’ आणि ‘वायूचे उष्णताजन्य प्रसरण’ या विषयांवरील चार निबंध सोसायटीपुढे सादर केले. वातावरणविज्ञानाचा शास्त्र या दृष्टीने त्यांनीच पाया घातला व त्यामुळे त्यांना यूरोपभर प्रसिद्धी मिळाली. वायूंची पाण्यातील निरनिराळी विद्राव्यता (विरघळण्याचे प्रमाण) व त्यांचे इतर गुणधर्म हे ज्या निरनिराळ्या मूलभूत कणांपासून वायू तयार झालेले आहेत त्या कणांची वजने व संख्या यांवर अवलंबून आहेत, असे त्यांनी अनुमान काढले. ‘वायूंचे शोषण’ (१८०३) या आपल्या निबंधात त्यांनी वरील सिद्धांत, अणुभारांचे एक प्राथमिक स्वरूपाचे कोष्टक तसेच त्यांचा वायूंच्या आंशिक दाबासंबंधीचा सुपरिचित नियमही (वायुमिश्रणातील एखाद्या वायूचा दाब हा त्या वायूचे त्याच तापमानाला मिश्रणातील एकूण वायूंच्या घनफळाइतके घनफळ व्यापल्यास त्याच्या होणाऱ्या दाबाइतके असते) प्रसिद्ध केला होता. न्यू सिस्टिम ऑफ केमिकल फिलॉसॉफी  (१८०८–२७) या या आपल्या ग्रंथात त्यांनी आपले सिद्धांत विस्तारपूर्वक दिलेले आहेत. हे सिद्धांत मांडतांना रासायनिक संयोग म्हणजे त्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या ठराविक वजनाच्या अलग कणांचे एकत्रीकरण होय, असे त्यांनी गृहीत धरले होते. अणू हे अविभाज्य व अविनाशी आहेत आणि कोणत्याही विशिष्ट मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखेच असतात, असे त्यांचे मत होते. संयुगांमधील अणूंच्या संख्येनुसार संयुगांचे वर्गीकरण करण्याची पद्धतीही त्यांना तयार केली होती. डाल्टन यांचे प्रायोगिक कौशल्य विशेष उच्च दर्जाचे नव्हते व त्यांची कित्येक अनुमाने अगदीच चुकीची असल्याचे नंतर आढळून आले, परंतु त्यांचा अणुसिद्धांत आणि अणुभाराची कल्पना मात्र मूलभूत महत्त्वाची ठरली आणि त्यांमुळे रसायनशास्त्रात एक मोठी क्रांती घडून आली. 

रॉयल सोसायटीने १८२२ मध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड केली व १८२५ मध्ये अणुसिद्धांताबद्दल सोसायटीतर्फे त्यांना बहुमानाचे पदक देण्यात आले. फ्रेंच ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने १८३० साली त्यांची परदेशी सदस्य म्हणून निवड केली. एडिंबरो, बर्लिन, म्यूनिक व मॉस्को येथील शास्त्रीय संस्थांचेही ते सदस्य होते. ते मँचेस्टर येथे मृत्यू पावले. 




जॉन डाल्टन(६ सितंबर, १७६६- ७ जुलाई, १८४४) एक अंग्रेज़ वैज्ञानिक थे। इन्होंने पदार्थ की रचना सम्बन्धी सिद्धान्त का प्रतिपादन किया जो डाल्टन के परमाणु सिद्धान्त के नाम से प्रचलित है। डाल्टन का जन्म सन् १७६६ में इंग्लैंड  के एक गरीब जुलाहा-परिवार में हुआ था। बारह वर्ष की आयु में उन्होंने एक शिक्षक केरूप में अपनी जीविका शुरू की। सात साल बाद वह एक स्कूलके प्रिंसिपल बन गए। सन् १७९३ में जाॅन डाल्टन एक काॅलेज में गणित,भौतिकी एवं रसायन शास्त्रा पढ़ाने वेफ लिए मैनचेस्टरचले गए। वहाँ पर उन्होंने अपने जीवन का अधिकांशसमय शिक्षण एवं शोध्कार्य में व्यतीत किया। सन्1808 में इन्होंने अपने परमाणु सिद्धांत को प्रस्तुतकिया, जो द्रव्यों वेफ अध्ययन वेफ लिए एक महत्वपूर्ण सिद्धांत साबित हुआ।

डाल्टन ने द्रव्यों की प्रवृफति के बारे में एक आधरभूत सिद्धांत प्रस्तुत किया। डाल्टन ने द्रव्यों की विभाज्यत ाका विचार प्रदान किया जिसे उस समय तक दार्शनिकता माना जाता था। ग्रीक दार्शनिकों के द्वारा द्रव्यों के सूक्ष्मतम अविभाज्य कण, जिसे परमाणु नाम दिया था, उसे डाल्टन ने भी परमाणु नाम दिया। डाल्टन का यह सिद्धांत रासायनिक संयोजन के नियमों पर आधरितथा। डाल्टन के परमाणु सिद्धांत ने द्रव्यमान के संरक्षण के नियम एवं निश्चित अनुपात के नियम की युक्तिसंगतव्याख्या की। डाल्टन के परमाणु सिद्धांत के अनुसार सभी द्रव्य चाहे तत्व, यौगिक या मिश्रण हो, सूक्ष्म कणों से बनेहोते हैं जिन्हें परमाणु कहते हैं। डाल्टन के सिद्धांत की विवेचना निम्न प्रकार से कर सकते हैं:

    * सभी द्रव्य परमाणुओं से नियमित होते हैं।
    * परमाणु अविभाज्य सूक्ष्मतम कण होते हैं जो रासायनिक अभिक्रिया में न तो सृजित होते हैंन ही उनका विनाश होता है।
    * दिए गए तत्व के सभी परमाणुओं का द्रव्यमान एवं रासायनिक गुणध्र्म समान होते हैं।
    * भिन्न-भिन्न तत्वों के परमाणुओं के द्रव्यमान एवं रासायनिक गुणधर्म भिन्न-भिन्न होते हैं।
    * भिन्न-भिन्न तत्वों के परमाणु परस्पर छोटीपूर्ण संख्या के अनुपात में संयोग कर यौगिक नियमित करते हैं।
    * किसी भी यौगिक में परमाणुओं की सापेक्ष संख्या एवं प्रकार निश्चित होते हैं।